Author: Saimat

साईमत जळगाव प्रतिनिधी जीवनात यशस्वी होण्याचा कोणताही शॉर्टकट नसतो. कष्ट घ्यावेच लागतात कारण कष्टाशिवाय गुणवत्ता प्राप्त होत नाही. तेव्हा विद्यार्थ्यांनी कॉपी करण्याची मानसिकता सोडून द्यावी. त्यामुळे भविष्यातील मोठे नुकसान टळेल असे प्रतिपादन कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, विद्यार्थी विकास विभागाव्दारे जागतिक युवा दिनाचे औचित्य साधुन कुलगुरू संवाद यात्रेला प्रारंभ करण्यात आला. जळगाव येथील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. यावेळी कुलगुरूंनी पहिल्या टप्यात विद्यार्थ्यांशी तर दुस-या टप्यात प्राध्यापकांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना कुलगुरू प्रा. माहेश्वरी म्हणााले की, विद्यार्थ्यांनी ज्ञान आणि माहिती यातील फरक समजून घेणे आवश्यक…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून धरणगाव व जळगाव तालुक्यातील सिंचनाच्या एकूण ९ कामासाठी १० कोटी २४ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जलसंधारण महामंडळाच्या माध्यमातून सदर ०९ नवीन मोठे गेटेड सिमेंट कॉंक्रीट बंधारे बांधण्यात येणार असल्याने दोन्ही तालुक्यात सिंचन क्षमतेत अधिक वाढ होणार आहे. महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या माध्यमातून धरणगाव व जळगाव तालुक्यातील शून्य ते शंभर हेक्टर सिंचन क्षमतेच्या एकूण ०९ गेटेड सिमेंट बंधाऱ्याच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून यासाठी एकूण १० कोटी २४ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. सदर योजनांच्या प्रशासकीय मान्यता अंदाजपत्रकानुसार एकूण साठवण क्षमता ७५३.०८१ स.घ.मी.…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी खान्देश युनियन एज्युकेशन सोसायटी संचलित कै. सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूल मध्ये दि. ११ गुरुवार रोजी शाळेत गणेशोत्सवा निमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धांचे बक्षिस वितरण शिक्षणाधिकारी डॉ. किरण कुंवर यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास शिक्षणाधिकारी मा.डॉ.किरण कुंवर, शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण, म.न.पा.शिक्षण विभाग अधिकारी दिपाली पाटील, संस्थेचे अध्यक्ष. प्रमोद चांदसरकर, मुखायाध्यापिका प्रिया सफळे, उपमुख्याध्यापक एस.पी.निकम, पर्यवेक्षक जे.एस.चौधरी, जेष्ठ कला शिक्षक एस.डी.भिरूडसर, गणेशोत्सव प्रमुख संगीता पाटील व गणेशोत्सव समिती सदस्य उपस्थित होते. शिक्षणाधिकारी डॉ.किरण कुंवर विद्यार्थांशी संवाद साधत म्हणाले की, जीवनात कोणतीतरी कला जोपासली पाहिजे म्हणजे जीवनात डिप्रेशन ला सामोरे जावे लागत नाही. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगिता पाटील…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव येथे राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम शाळेचे ज्येष्ठ शिक्षिका दिपाली चौधरी तसेच कल्पना तायडे , मुख्याध्यापिका धनश्री फालक यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कुमारी वैष्णवी पाटील या विद्यार्थिनीने राजमाता जिजाऊ यांची भूमिका साकारून जिजाऊंची माहिती सादर केली, तर काव्या फेगडे या विद्यार्थिनींनी सुद्धा जिजाऊंच्या जीवन कार्याला उजाळा दिला. यावेळी काही विद्यार्थ्यांनी भाषणे केली तर काहींनी गीते सादर केली. कार्यक्रमाचे आयोजन स्वाती पाटील, कायनात सय्यद, मंगल गोठवाल यांनी केले. यशस्वीतेसाठी…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागामार्फत समाजातील वंचित, दुर्लक्ष‍ित घटकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांपर्यत पोहचविण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर विभागाने भर द्यावा. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या. महाबळ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांची आढावा बैठक संपन्न झाली. याप्रसंगी यावल उप वनसंरक्षक जमिर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी राजेश एस.लोखंडे, समाज कल्याण सहायक आयुक्त योगेश पाटील, यावल आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार व इतर…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीतर्फे जळगाव जिल्हा पश्चिम विभाग महिला मोर्चा जिल्हाध्यक्षपदी संगीता राजेंद्र गवळी तसेच जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी जितेंद्र रघुनाथ पाटील यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील – जळकेकर महाराज यांनी केली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशान्वये तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन, भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवि अनासपुरे यांच्या सुचनेनुसार दोन्ही पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. खासदार उन्मेश पाटील यांच्यासह भाजपाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे स्वागत केले.

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी विवेकानंद प्रतिष्ठान तर्फे सर्व शाळांचा होणारा रंगतरंग हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात सुरू झाला. त्याच्या अंतर्गत या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने शककर्ते शिवराय या महानाट्याचा तिसरा भाग हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीवर व स्वराज्य उभारणीवर आधारित ‘ शिवरायांचा गनिमी ‘ हा कलाविष्कार काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलतर्फे दि. ११ जानेवारी रोजी सादर करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू विजय माहेश्वरी, प्रकल्प प्रमुख पुंडलिक पाटील, काशिनाथ पलोड स्कूलचे माजी विद्यार्थी अद्वय राजहस होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शोभाताई पाटील, प्रतिष्ठानचे…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे जळगाव येथे निवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या शिखर संमेलनाला आले असता पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारी तथा साहित्यिक विनोद अहिरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी विनोद अहिरे यांनी संजय पांडे यांना स्वलिखित ‘ हुंकार वेदनेचा’ आणि ‘मृत्यू घराचा पहारा’ हे पुस्तके भेट दिली. यावेळी दोघांमध्ये विविध विषयावर चर्चा झाल्या.

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळे अंतर्गत पूज्य साने गुरूजी संस्कार केंद्राच्यावतीने ‘साने गुरूजीच्या दृष्टीकोनातून मानवतावाद’ या विषयावर डॉ. संजय गोपाळ यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. डॉ. गोपाळ यांनी आपल्या व्याख्यानात साने गुरूजींचे जीवन ख-या अर्थाने मानवतावाद व समतेवर आधारित होते. साने गुरूजींच्या ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे’ या कवितेमधुन मानवतावाद धर्माचा सार असल्याचे त्यांनी सांगितले. साने गुरूजींनी सत्याग्रह तसेच अस्पृश्यता निवारणासाठी केलेल्या कार्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी मंचावर डॉ. संजय गोपाळ, गणितशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. एस. आर चौधरी, विचारधारा प्रशाळेचे प्र. संचालक प्रा. म. सु. पगारे, गणित विभागप्रमुख प्रा. किशोर पवार, केंद्राचे…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विविध क्रीडा संघ महोत्सव स्पर्धेसाठी रवाना झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथे दि. १२ ते १६ जानेवारी दरम्यान होणा-या क्रीडा महोत्सव स्पर्धेसाठी विद्यापीठाचे व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, मैदानी स्पर्धा, बॅडमिंटन, टेबलटेनिस संघ सहभागी होण्यासाठी रवाना झाले. तत्पूर्वी दि. ८ ते १० जानेवारी दरम्यान खेळाडूंचा एकत्रित सराव शिबिराचे आयोजन विद्यापीठात करण्यात आले. या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, वित्त व लेखा अधिकारी सीए. रवींद्र पाटील उपस्थित होते. डॉ. माहेश्वरी यांनी खेळाडूंना शुभेच्छा देतांना खेळाडूंनी शिस्त पाळावी व नियमित सराव करावा. नियमित सराव हा अत्यावश्यक असून…

Read More