Author: Saimat

साईमत जळगाव जळगाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या प्रचार, प्रसार करणाऱ्या एलईडी चित्ररथास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून आरंभ केला. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील , अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक नखाते, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील, आदींची प्रमुख उपस्थिती होती. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजना समाजातील‌ तळागाळातील लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचे नियोजन चित्ररथाद्वारे करण्यात आले आहे. अत्यंत सोप्या भाषेमध्ये विविध योजनांची माहिती व लाभार्थ्यांच्या मुलाखती या चित्ररथाच्या माध्यमातून गावागावात दाखविण्यात येणार आहेत.…

Read More

साईमत जळगाव जळगाव देशवासियांचे श्रध्दास्थान असलेले अयोध्येतील प्रभु श्री रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठानिमित्त जळगावात गेल्या ४ दिवसांपासून ‘आपली आस्था…आपले मंदिर’ अंतर्गत स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे. आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांनी हाती घेतलेल्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून मंगळवार दि. १६ जानेवारी रोजी बळीरामपेठ येथील पत्र्या हनुमान मंदिराची स्वच्छता करण्यात आली. अयोध्येतील प्रभु श्री रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठा पर्वास प्रारंभ झाला. यानिमित्ताने जळगावात विविध उपक्रमांना उधाण आले आहे. शहरातील ३९९ वर्षे जुने असलेल्या बळीरामपेठेतील पत्र्या हनुमान मंदिरात मंगळवार दि. १६ जानेवारी रोजी आ. सुरेश भोळे (राजूमामा) व मित्र परिवारांच्या हस्ते स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमात युवक मंडळाने ही स्वच्छता मोहीम हाती…

Read More

साईमत जळगाव जळगाव महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ललित कला भवन जळगाव यांच्या वतीने आयोजित प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम अंतर्गत वेळेचे व्यवस्थापन यावर व्याख्यान कार्यक्रमात व्याख्याते म्हणून भगीरथ कौन्सिलचे संचालक समुपदेशक पंकज व्यवहारे बोलत होते. यावेळी त्यांनी जीवनात ४ डी महत्त्वाचे असल्याचे सांगितले व वेळेचे व्यवस्थापन यावर सविस्तर असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जे.डी.सी.सी. बॅकेचे बॅकिंग व्यवस्थापक सुनिल पवार होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आर.आर.पाटील , अतुल तोंडगांवकर, कर्मचारी युनियनचे हेमंत कुमार सांळुंखे, अनिल चौधरी, सुबोध सराफ, कामगार कल्याण अधिकारी सत्यजित चौधरी उपस्थित होते. यावेळी कल्याण निरीक्षक भानुदास जोशी यांनी मंडळाच्या योजना उपक्रम व कार्यक्रम बाबत पी.पी.टी. सादर…

Read More

साईमत जळगाव जळगाव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथील काळाराम मंदिराला भेट देऊन केलेल्या साफसफाईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जळगाव तालुक्यातील विविध देवस्थानांची भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वच्छता केली. वडनगरी येथील बडे जटाधारी महादेव मंदिर, कानळदा येथील महर्षी कण्वाश्रम, रिधुर येथील अवचित हनुमान मंदिराचा त्यात समावेश होता. भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज यांच्यासोबत जळगाव तालुकाध्यक्ष ॲड. हर्षल प्रल्हाद चौधरी, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस जगदीश सोनवणे, उपाध्यक्ष सचिन पवार, चिटणीस बाळकृष्ण कोळी तसेच समाधान सोनवणे, किनोद येथील नरेंद्र पाटील, फुपनगरी येथील ज्ञानेश्वर बडगुजर व इतर तरुणांनी तिन्ही देवस्थानांच्या साफसफाईचे काम पूर्ण केले. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राबविलेल्या…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी मराठा समाजाविषयी अत्यंत अवमानजनक वक्तव्य केल्यानंतर तब्बल दिड वर्षांपासून पोलिसांना चकवा देणारे जळगाव गुन्हे शाखेचे निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले सोमवार, १५ जानेवारी रोजी सकाळी पोलिसांना शरण आले. दुपारी बकाले यांना न्या.केळकर यांच्या निवासस्थानी हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, निलंबित निरीक्षक बकाले यांना जळगाव न्यायालयात आणण्यात येणार असल्याने प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मात्र कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता बकाले यांना न्यायमूर्तींच्या निवासस्थानी हजर करण्यात आले. मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विनोद देशमुख यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बकाले यांना…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जिल्ह्यात शबरी आवास योजनेत‌ यावर्षी पाच हजार घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले‌ आहे‌. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून दीड हजार लाभार्थ्यांना घरकुल देण्यात आले आहेत. भविष्यातही जिल्ह्यातील एकही आदिवासी लाभार्थी घरकुलाच्या लाभापासून पासून वंचित राहणार नसल्याची ग्वाही राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिली. गावा – गावात आदिवासींसाठी दफनभूमी, एकलव्य स्मारक, आदिवासी वस्त्यांवर सौर दिवे तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ आदिवासी समाजाला देण्यासाठी शासन कटीबद्ध असून माझ्यासह शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे‌. असा विश्वासही पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे होते. धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडा येथे “शासन…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महा स्वच्छता अभियानास ३१ डिसेंबर २०२३ रोजी सुरूवात केली. या महा स्वच्छता अभियानात आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार मंदीर स्वच्छता अभियान ही राबविण्यात येणार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात महा स्वच्छता अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यातील १६ नगरपरिषदा व ३ नगरपंचायतीमध्ये २०५ मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील ११४ प्रमुख मंदीरांमध्ये ही पालकमंत्र्यांच्या सूचनांनुसार मंदीर स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात ‘महा स्वच्छता अभियानास’ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाळधी येथून, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी जामनेर येथून तसेच मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी अमळनेर येथून सुरूवात…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथील शिक्षीका डॉ. वंदना भामरे यांना प्रतिष्ठेचा बी.एन. वाफारे आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाला असून त्यांना हैद्राबाद येथील आंतरराष्ट्रीय परीषदेत तो प्रदान करण्यात आला. डॉ. वंदना भामरे आणि एसएसव्हीपीएस सायन्स कॉलेज धुळे येथील गणित विषयातील प्रा.डॉ.एम.एम.पवार यांना 2023 सालच्या 89 व्या आंतरराष्ट्रीय संमेलनात बी.एन. वाफारे पुरस्कार जाहिर झाला. बीआयटीएस पिलानी, हैदराबाद कॅम्पस येथील मॅथेमॅटिकल सोसायटीने “कव्हरिंग एनर्जी ऑफ पोसेट अँड इट्स बाउंड, मॅथेमॅटिका बोहेमिकामध्ये प्रकाशित केलेल्या उत्कृष्ट शोधनिबंधासाठी प्रा. पी. के. त्रिविक्रम यांनी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान केला. सन्मानपत्र आणि रोख पुरस्कार रु. 25000/- याचा पुरस्कारात समावेश आहे. प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी.जैन आणि…

Read More

   धरणगाव : प्रतिनिधी    तालुक्यातील साळवे येथील  ग्राम सुधारणा मंडळ संचलित साळवे इंग्रजी विद्यालयात दहावीच्या सन २००४ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेही भेट मिलन सोहळा रविवारी उत्साहात साजरा झाला.यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनातील आठवणींना उजाळा दिला व आपले अनुभव कथन केले. २० वर्षानंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी या स्नेही भेट आयोजनाबद्दल आनंद व्यक्त केला व यानिमित्ताने माजी विद्यार्थ्यांना भेटण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी शिक्षकांनीही  माजी विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन केले.अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपला प्रवास कथन करतांना ,आपल्यासमोरील आव्हानांना आपण कसे सामोरे गेलो हे स्पष्ट केले तर काहींनी सध्या आपण  कोणत्या क्षेत्रात व कुठे कार्यरत आहोत,याबाबत माहिती दिली.मेळाव्यानंतरदेखील अनेक विद्यार्थी…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे न्यू जय बजरंग क्रिकेट क्लब तर्फे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या पालकमंत्री क्रिकेट चषकाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. क्रिकेट हा संघभावनेचे प्रतिक असणारा खेळ आहे. कोणत्याही स्पर्धेत विजयी होण्यासाठीच सहभागी व्हायचे असते. मात्र पराजय देखील तितक्यात खिलाडूपणाने मान्य करावा आणि स्पर्धकांच्या गुणांचे देखील कौतुक करावे असे नम्र आवाहन त्यांनी केले. एरवी आपल्या भाषणातून तुफान फटकेबाजी करणारे शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आजच्या क्रिकेट मॅच मध्ये देखील चौकार – षटकारासह फटेकबाजी करताच उपस्थितांनी त्यांना भरभरून दाद दिली. स्पर्धेचे आयोजन विशाल कुमावत, गौरव झंवर, विशाल चौधरी व…

Read More