साईमत जळगाव प्रतिनिधी नेत्रदान, त्वचादान, देहदान याबाबत फेडरेशन ऑफ ऑर्गन अॅण्ड बॉडी डोनेशन मुंबई, या सामाजिक संस्थेतर्फे जनप्रबोधन करणारी रथयात्रा काढण्यात आली असून ही रथयात्रा मंगळवार दि. १३ फेब्रुवारी रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात येणार आहे. नाशिक ते आनंदवन अशी १४३० कि.मी. ची ही रथयात्रा आयोजित करण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोग यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार अवयवदाना विषयी जनजागृती करण्याची जबाबदारी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवर सोपविण्यात आली आहे त्या अनुषंगाने विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचा वतीने मंगळवारी दुपारी २.०० वाजता विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात पुरुषोत्तम पवार, अध्यक्ष व सुनिल देशपांडे, उपाध्यक्ष फेडरेशन ऑफ ऑर्गन अॅण्ड…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी जुनं ते सोनं या म्हणीप्रमाणे आज मातीचे आरोग्य राखल्यास आपणासही सात्विक अन्न मिळू शकेल , सात्विक आहाराचा जीवनात उपयोग करणे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी केले. जळगाव जनता सहकारी बँकेच्या बचत गटाच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी त्या बोलत होत्या. या प्रसंगी व्यासपीठावर पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे, डॉ प्राजक्ता देवरे, बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने, संचालक हरिश्चंद्र यादव, संचालिका संध्या देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय नागमोती उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथि राहीबाई पोपेरे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथील असून त्यांना सन २०२० मध्ये देशी वाणांच्या बियाण्यांची जपवणूक केल्याबद्दल…
साईमत जळगाव प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर जिल्ह्याच्या विश्वकर्मा योजना जिल्हा संयोजन पदी विजय रामदास शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदरचे नियुक्ती पत्र त्यांना नुकतेच देण्यात आले. या निवडीबद्दल विजय शिंदे यांचे राज्याचे ग्रामविकास व पर्यटन ना.गिरीश महाजन, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवी अनासपुरे, खा. रक्षाताई खडसे, खा.उन्मेष पाटील,आ. राजूमामा भोळे,आ.संजय सावकारे, आ. मंगेश चव्हाण, माजी आ. स्मिता वाघ, प्रदेश चिटणीस अजय भोळे आदींनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
साईमत जळगाव प्रतिनिधी अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल एज्युकेशन पॉलीसी-२०२३ च्या धर्तीवर यंदाचा ‘एड्युफेअर-२०२४’ आयोजित केला असून यामध्ये चांद्रयानासह हडप्पा संस्कृती समजेल. सोबतच विज्ञान, गणित, समाजशास्त्रासह भाषिक कौशल्याला चालना देण्यासाठी एड्युफेअर महत्त्वाचा असून मनोरंजनातून शिक्षण घेण्याची संधी जळगावकरांनी चुकवू नये असे आवाहन अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन यांनी केले. शिक्षणाविषयी गोडी निर्माण करणाऱ्या अनुभूतीतर्फे आयोजित एड्युफेअरचे उद्घाटन जैन परिवारातील सुनीता भंडारी यांच्याहस्ते फित सोडून झाले. याप्रसंगी सौ. ज्योती जैन, सौ. शोभना जैन, डॉ. भावना जैन, प्राचार्य रश्मी लाहोटी, जनसंपर्क अधिकारी रूपाली वाघ, मनोज दाडकर उपस्थित होते. आजपासून ११ फेब्रुवारी असे तीन दिवस खान्देश सेंट्रल मॉलच्या मैदानावर संध्याकाळी ४.३०…
साईमत जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स महिला उद्योजकता समितीच्या अध्यक्ष तथा आयएनआयएफडी इन्स्टिटयूटच्या संचालिका संगीता पाटील यांच्या कार्याची दखल घेत महिला आणि बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते पुणे येथे त्यांना ‘महाराष्ट्र कन्यारत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. एमआयटी एटीडी विद्यापीठ संचालित स्कूल ऑफ लॉ व बृहन महाराष्ट्र अकादमी यांच्या वतीने आणि महाराष्ट्र शासनाच्या महिला बालविकास विभागाच्या सहकार्याने ‘एम्पॉवरमेंट समिट २०२४’ व ‘महाराष्ट्र कन्यारत्न पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्यासह एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. महेश चोपडे, महिला बालविकास अधिकारी मोनिका रंधवे, एमआयटी स्कुल ऑफ लॉ…
साईमत जळगाव प्रतिनिधी देशातील सर्वात मोठी सिंचन प्रणाली कंपनी जैन इरीगेशन सिस्टम्स लिमिटेडने डिसेंबर ३१, २०२३ रोजी समाप्त होणाऱ्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी एकल (Standalone) आणि एकत्रीत (Consolidated) आर्थिक निकाल जाहीर केले. ९ फेब्रुवारी रोजी जैन हिल्स येथे संचालक मंडळाची बैठक झाली. त्यात कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, सह व्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, संचालक डॉ. एच.पी. सिंग, डी. आर. मेहता, कंपनी सेक्रेटरी ए.व्ही. घोडगावकर यांची उपस्थिती होती. गत नऊ महिन्यात (डिसेंबर २०२३), एकल (स्टँडअलोन) उत्पन्नात १२.६% ने वाढ झाली, तर एकत्रीत (कंसोलिडेटेड) उत्पन्नात १०.५% ची वाढ झाली आहे. व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफीपूर्वीची…
साईमत जळगाव प्रतिनिधी येथील शासकीय तंत्रनिकेतन मधील मुलींच्या वसतिगृहातील मुलींसाठी रोज मोफत नास्ता, महिला सुरक्षा रक्षक व व्यायाम शाळेसाठी महिला प्रशिक्षक अशा विविध सुविधा सीएसआरच्या माध्यमातून सुरू करण्यात याव्यात. अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. स्वच्छता, योग व महिला सक्षमीकरण या तीन गोष्टींवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा भर आहे. त्यानुसार राज्य शासन योजना राबवित आहे. तंत्रनिकेतन मधील प्रत्येक वसतिगृहात व्यायाम शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती ही त्यांनी यावेळी दिली. जळगाव शासकीय तंत्रनिकेतनच्या मुलींच्या व मुलांच्या वसतिगृहातील व्यायामशाळा व खूल्या व्यायामशाळेचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी…
साईमत जळगाव प्रतिनिधी निर्धारपूर्वक उद्दिष्टाने पवन चॅरीटेबल ट्रस्ट आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी येथील सरदार पटेल लेवा भवन येथे सतरावे खान्देशस्तरीय बहिणाबाई- सोपानदेव साहित्य संमेलनाचे आयोजन होत आहे. संमेलन नियोजन बैठक नुकतीच रघुनाथ राणे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात झाली. खान्देशात प्रथमतः ‘ बहिणाबाई सोपानदेव चौधरी ‘ संमेलनाचे आयोजन ‘ मालतीकांत ‘ अर्थात पुरुषोत्तम चावदस नारखेडे ( महात्मा गांधी विद्यालय,भादली ) यांनी सन १९९९ मध्ये घेतले .त्यांनी व्रतस्थपणे सलग सोळा संमेलने यशस्वीरित्या घेतली. प्रसिद्ध साहित्यिक आणि विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते यांना पाचारण करून अविस्मरणीय वाङ्मयीन तसेच बौद्धिक मेजवानी जळगावकरांना दिली.तथापि त्यांच्या निधनानंतर आता…
साईमत जळगाव प्रतिनिधी स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो व त्यातूनच विद्यार्थी सर्वार्थाने समृद्ध होतो, असे प्रतिपादन जि.प च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार यांनी केले, त्या मूळजी जेठा महाविद्यालयाच्या “चैतन्य २०२३-२४ “या स्नेहसंमेलनाच्या उदघाटनप्रसंगी बोलत होत्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सं.ना.भारंबे, स्नेहसंमेलनप्रमुख डॉ.संगीता पाटील, विज्ञान विद्याशाखा प्रमुख डॉ.के.जी.खडसे,सामाजिकशास्त्र संचालक प्रा.देवेंद्र इंगळे ,भाषा प्रशाळा संचालक डॉ.भूपेंद्र केसुर,वाणिज्य विद्याशाखा प्रमुख प्रा.सुरेखा पालवे ,व्यवस्थापन विद्याशाखा प्रमुख प्रा.अब्दुल आरसीवाला, आयक्यूएसी समन्वयक डॉ. केतन नारखेडे, रेडीओ मनभावन ९०.८ एफ. एम. चे संचालक अमोल देशमुख, सर्वोत्कृष्ट विद्यार्थी कांचन लक्ष्मण पाटील, प्रिन्सिपल रोल ऑफ ऑनर पारितोषिकप्राप्त विद्यार्थी तसेच विविध छंद व ललित कला समितीप्रमुख डॉ.स्वप्नाली वाघुळदे, समिती…
साईमत जळगाव प्रतिनिधी जैन इरिगेशनच्या सहकार्यातून जैन स्पोर्टस् अकाडमी व जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे २१ वी १४ वर्ष वयोगटाखालील जैन चॅलेंज आंतर शालेय क्रिकेट चषक २९ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२४ दरम्यान ही स्पर्धा झाली. जिल्ह्याभरातील १९ संघांनी यात सहभाग घेतला. अंतिम सामना अनुभूती निवासी स्कूलच्या क्रिकेट मैदानावर झाला. सेंट जोसेफ कॉन्व्हेन्ट इंग्लिश स्कूल जळगाव व शिंदे इंटरनॅशनल स्कूल पाचोरा यांच्यात झालेल्या सामन्यात सेंट जोसेफ कॉन्व्हेन्ट इंग्लिश स्कूल अंतिम विजेता ठरला. अंतिम सामन्याची नाणेफक शिंदे इंटरनॅशनल स्कूल ने जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली. शिंदे स्कूलचा संपूर्ण संघ १२.३ षटकांमध्ये ५० धावा करू शकला. सेंट जोसेफ स्कूलने २ गडी गमावून १३.२ षटकांमध्ये ५२…