Author: Saimat

मुंबई : प्रतिनिधी क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकर सध्या एका गोष्टीने त्रस्त आहे. बनावट जाहिरात प्रकरणी सचिन तेंडुलकरचा फोटो वापरण्यात आला आहे. सोशल मीडियावर सचिनचा एक फोटो व्हायरल होतोय, ज्यामध्ये तो कसिनोची जाहिरात करताना दिसतोय. दरम्यान यानंतर सचिनने स्वतः यावर प्रतिक्रिया देत अशा गोष्टींचं आपण समर्थन करत नसल्याचं सांगितलंय. सचिनच्या सांगण्याप्रमाणे, ही बनावट जाहीरात असून सचिनची टीम याविरूद्ध कायदेशीर कारवाई करणार आहे. सचिन म्हणतो की, मी कधीही वैयक्तिकरित्या दारू, जुगार तसंच तंबाखूचं समर्थन केलं नाही. माझ्या फोटोचा दुरूपयोग करणं दुःखद आहे. यासदंर्भात सचिनने ट्विट करत खुलासा केला आहे.

Read More

नंदुरबार : प्रतिनिधी  जिल्ह्याच्या वेशीलगत असलेलं आदर्श गाव टेमली या गावापासून पुढे सुरु होतं मध्यप्रदेश राज्य त्यामुळे राज्याचं हे शेवटचं टोक. या गावात रहाणारे किरण आणि आनंदा भीमराव मोहने या दाम्पत्याला दोन मुले आणि एक मुलगी. पण, त्या दाम्पत्याचं दुर्देव पहा! ही तीनही मुले जन्मली ती दृष्टिहीन. मात्र, त्या दाम्पत्याने हार मानली नाही. त्यांनी आपल्या तीनही मुलाचं चांगलं पालनपोषण केलं. त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं अशक्य काम त्यांनी करून दाखवलं. प्रवीण आणि सुरेश या त्या दोन मुलांनी धुळे, मुंबई, पुणे, अमरावती अश्या विविध ठिकाणी असलेल्या दृष्टीहीनांसाठीच्या शाळांमधून आपले पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. यथावकाश दोन्ही मुलांना शासनाच्या दिव्यांग कोट्यातून ‘शासकीय नोकरी’…

Read More

जळगाव : प्रतिनिधी रशिया आणि युक्रेन युद्धाला सुरुवात झाली आहे. भारतातील आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी, नागरिक युक्रेनमध्ये अडकले असण्याची शक्यता आहे. भारत सरकारतर्फे त्यांच्यासाठी हेल्पलाईन जारी करण्यात आली असून संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रशिया आणि युक्रेन युद्धाला गुरुवारी सकाळी सुरुवात झाली. रशियाने युक्रेनच्या काही शहरात हवाई हल्ले सुरू केले असून शेकडो नागरिकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. युक्रेनमध्ये शिक्षण, नोकरीसाठी गेलेले हजारो विद्यार्थी, नागरिक यामुळे तिकडे अडकून पडले आहेत. भारतात त्यांचे नातेवाईक चिंताग्रस्त होत आहेत. केंद्र सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांच्या मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कक्ष, नवीदिल्लीची हेल्पलाईन जारी केली आहे. भारतातील आणि उत्तर…

Read More

मुंबई : प्रतिनिधी जगभरात क्रिकेटमधील देव म्हणून प्रसिद्ध असलेल्या सचिन तेंडुलकरबाबात ऑस्ट्रेलियाचा माजी लेग स्पिनरनं धक्कादायक विधान केलं आहे. त्याच्या दृष्टीनं सचिन हा सर्वात बेस्ट कसोटीतील फलंदाज नाही हे देखील त्याने सांगितलं आहे. त्याच्या या विधानामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाणं आलं आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी लेग स्पिनर शेन वॉर्ननं खळबळजनक विधान केलं. माझ्या दृष्टीनं शतकांचं शतक ठोकणारा म्हणजेच 100 शतक ठोकणारा सचिन हा सर्वात बेस्ट खेळाडू नाही असं विधान त्याने केलं. यासोबत त्याने कसोटीमधील 5 बेस्ट क्रिकेटपटू कोण आहेत याची देखील नावं सांगितली आहेत. यामध्ये एका भारतीय खेळाडूचं देखील नाव आहे. क्रिकेटच्या इतिहासात सचिन तेंडुलकरने एकामागे एक शतक ठोकले. त्याच्या कामगिरीचं…

Read More

मुंबई : प्रतिनिधी ज्योतिष शास्त्रानुसार शनी ग्रह खरं तर चांगला नाही असं म्हटलं जातं. मात्र हा शनी आता 6 राशींसाठी राज योग ठरू शकतो. 12 राशींपैकी कोणत्या 6 राशी आहेत ज्यांना हा फायदा होणार आहे जाणून घेऊया. मेष – या राशीच्या लोकांच्या कुंडलीमध्ये राजयोग आहे. राजकारणात मोठं यश मिळणार आहे. चांगलं पद मिळणार आहे. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. वृषभ – या राशीच्या लोकांच्या कुंडलीमध्ये राजयोग आहे. नोकरी आणि व्यापारामध्ये मोठा फायदा होणार आहे. प्रत्येक कामात यशस्वी होणार आहे. धनलाभाचा योग आहे. कर्क – हाती घेतलेल्या कामात यश मिळणार आहे. धनलाभ होण्याचे संकेत आहेत. प्रेम आणि वैवाहिक जीवनात चांगला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम कॉम्प्लेक्स परिसरातून व्यापाऱ्याचा मोबाईलची चोरी करणाऱ्या दोन संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना कुसुंबा येथून गुरूवारी २४ फेब्रुवारी रोजी सकाळी अटक करण्यात आली आहे. दोघांवर जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, बळीराम पेठेतील व्यापारी गुरफान उस्मान शेख (वय-३३) हे सोमवारी १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास कामानिमीत्त छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्समध्ये आले. संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कॉम्प्लेक्स मधील जम्बो झेरॉक्स दुकाना समोरुन अज्ञात चेारट्याने त्याच्या खिश्यातून मोबाईल लांबविला होता. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होतो. या गुन्ह्याचा तपास तपास पेालिस नाईक…

Read More

मुंबई : प्रतिनिधी 24 फेब्रुवारी हा दिवस युक्रेनसाठी अत्यंत धोकादायक आणि भीतीदायक ठरत आहे. बॉम्बस्फोटांमुऴे युक्रेनमधील रहिवाशांचे डोळे उघडले आहेत. सर्वत्र युद्धजन्य परिस्थिती असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, बॉलीवूड अभिनेत्रीचा जीव थोडक्यात बचावला आहे. तिने योग्य वेळी योग्य ती पावले उचलली नसती तर तीही या युद्धात सापडली असती. बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिचे नशीब म्हणावे लागेल की यावेळी थोडक्यात बचावली. खरंतर, उर्वशी रौतेलाचा 25 फेब्रुवारीला वाढदिवस होता, त्यामुळे ती तिच्या कुटुंबासह आधीच प्लान ठरलेल्या वाढदिवसाच्या सुट्ट्यांसाठी मालदीवला पोहोचली. मात्र याच्या 2 दिवस आधीपर्यंत उर्वशी रौतेला तिच्या चित्रपटाचे शूटिंग युक्रेनमध्येच करत होती. जिथून तिने एक व्हिडिओ देखील शेअर केला होता.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी युवा सेना जळगाव महानगरतर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शनिवार, दि.26 फेब्रुवारी 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात दुपारी 1 वाजता युवा संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. युवा संवादावेळी महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मा.ना.श्री.उदय सामंत यांना सुप्रसिद्ध निवेदक व मुलाखतकार श्री.सुधीर गाडगीळ (मुंबई) हे आपल्या बहारदार शैलीच्या माध्यमातून ‘युवकांच्या शैक्षणिक प्रश्नांवर’ मुलाखतीद्वारे बोलतं करणार आहेत. यासाठी जळगावसह जिल्हाभरातील महाविद्यालयीन विद्यार्थी या संवादासाठी सविनय निमंत्रित आहेत. चुकवू नये अशा या संवादातून सद्यःस्थितीतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील कमालीची संभम्रावस्था आणि त्यातून निर्माण झालेल्या विविध प्रश्नांची सोडवणूक यानिमित्ताने नक्कीच दूर होणे शक्य आहे. त्यामुळे जळगावसह जिल्हाभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने युवा संवादाचा लाभ घेण्यासाठी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील हरिविठ्ठल नगरातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुध्द पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हरिविठ्ठल नगरातील अल्पवयीन मुलगी ही कुटुंबासह वास्तव्यास आहे. जेवण झाल्यानंतर मंगळवारी रात्री ११ वाजता कुटुंबीय झोपून गेले होते. बुधवारी पहाटे अल्पवयीन मुलीच्या वडिलांना जाग आल्यानंतर त्यांना मुलगी झोपलेल्या जागेवर दिसून आली नाही. त्यांनी इतर भागांमध्ये तिचा शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही. अखेर वडिलांनी रामानंदनगर पोलीस ठाणे गाठून मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी लग्नासाठी गेलेल्या व्यक्तीचा बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह टीव्ही चोरून नेल्याची घटना शहरातील दांडेकर नगरात मंगळवारी दुपारी ३ वाजता उघडकीस आली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलीसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सेवानिवृत्त अरविंदराव निकम असे घर मालकाचे नाव आहे. निकम हे पुतण्याच्या लग्नासाठी धुळ्याला गेले होते. त्यामुळे दांडेकर नगरातील घर कुलूपबंद होते. हीच संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घरात डल्ला मारला. दागिने चोरी लग्नसमारंभ आटोपून अरविंदराव निकम हे मंगळवार, दि. २२ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास दांडेकर नगरातील घरी परतले. त्यावेळी त्यांना घराच्या दरवाजाला लावलेले कुलूप दिसून आले नाही. घराच्या मागील बाजूस गेल्यानंतर मागील दरवाजाही अर्धवट…

Read More