जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात राहणारी १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देवून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील एका गावात राहणारी १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गावातील संशयित आरोपी साबीर शेख जहूर (वय-२६) याचे अल्पवयीन मुलीशी ओळख होती. याचा गैरफायदा घेत १ ऑगस्ट २०२१ ते ३० सप्टेंबर २०२१ दरम्यान अल्पवयीन मुलीला साबीर शेख हा त्याच्या घरी बोलावून पाण्यात गुंगीचे औषध देवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. हा प्रकार सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीने आपल्या…
Author: Saimat
मेष:- प्रवासात आरोग्याची काळजी घ्यावी. वरिष्ठांची नाराजी पत्करू नका. हातून एखादे सत्कार्य घडेल. मानभंगाला सामोरे जावे लागेल. प्रतिकूलतेतून मार्ग निघेल. वृषभ:- मनाने कामे मिळवाल. सामाजिक कामात पुढाकार घ्याल. अनाठायी खर्च होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी चालढकल महागात पडेल. छुप्या शत्रूंकडे लक्ष ठेवावे. मिथुन:- सतत आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न कराल. सरकारी नोकरदारांना दिवस चांगला जाईल. पत्नीचा हट्ट पुरवाल. दुचाकी वाहन सावधगिरीने चालवावे. कौटुंबिक परिस्थिती समंजसपणे हाताळावी. कर्क:- नातेवाईकांशी मतभेद संभवतात. कौटुंबिक परिस्थितीतून मार्ग काढावा. आरोग्याची काळजी घ्यावी. स्वभावातील मानीपणा दाखवाल. स्वत:चे स्थान टिकवण्याचा प्रयत्न कराल. सिंह:- मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. मानसिक ताण राहील. रागाचा पारा चढू देवू नका. चोरांपासून सावध राहावे.…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे मिळत नसल्याने भाजपने आक्रमक पवित्रा घेत शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. पीक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांचे पैसे तात्काळ द्या, असं म्हणत भाजप खासदार उन्मेष पाटील आणि आमदार सुरेश भोळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना घेराव घातला व जाब विचारला. जिल्ह्यातील १० हजार शेतकरी पीक विम्यापासून वंचित असून त्यांची ४ ते ५ कोटी रुपयांची पीक विम्याच्या नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही. मागील २४ महिन्यांपासून पाठपुरावा करुनही पैसे मिळत नसल्याचं सांगत भाजपने आक्रमक पावित्रा घेतला. शुक्रवारी रात्री चक्क ९ ते १० वाजेदरम्यान उन्मेश पाटील, सुरेश भोळे, पंचायत समिती सदस्य…
जळगाव : प्रतिनिधी राज्याचे महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे दोन दिवस जळगाव दौ-यावर येत आहेत. या दोन दिवसात ते जैन हिल्स आणि कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाला भेटी देणार आहेत. महामहिम राज्यपालांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. रविवार 27 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 5.30 वाजता औरंगबाद विमानतळावरुन विमानाने रवाना. सायंकाळी सहा वाजता जळगाव विमानतळावर आगमन. 6 वाजून 20 मिनीटांनी जैन हिल्स येथे आगमन व मुक्काम. सोमवार 28 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 2 वाजता कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाकडे कारने रवाना. 2 वाजून 10 मिनीटांनी कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापिठात आगमन व राखीव 3 वाजून 30 मिनीटांनी जळगाव विमानतळाकडे प्रस्थान. 3.50 वाजता जळगाव विमानतळावर आगमन व राखीव.…
वाशिम : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीने केलेल्या अटकेचा निषेधार्थ राज्यभरात तीव्र आंदोलन, निदर्शनं करण्यात येत आहेत. दरम्यान आज नवाब मलिक यांच्या अटकेच्या विरोधात धरणे आंदोलन करण्याकरिता रिसोड मतदार संघाचे काँग्रेस आमदार अमित झनक हे वाशिम येथील आंदोलन आटोपून परत जात असताना, अकोला – नांदेड महामार्गावर सावरगाव गावानजीक जवळ आमदार अमित झनक यांच्या गाडीला ट्रकने मागून धडक दिल्याने अपघात झाला आहे. या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसून, आमदार ही सुखरूप आहेत. मात्र यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
यवतमाळ :प्रतिनिधी यवतमाळ शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पांढरकवडा रोड वरील वाकी फाट्याजवळ ट्रक ने चार चाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दोन चिमुकल्यासह वडिलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी घटना घडली आहे. हार्दिक सुनिल धुर्वे वय वर्ष 8, सुमेध सुनिल धुर्वे वय वर्ष 5 आणि सुनिल कर्णुजी धुर्वे वय वर्ष 38 असं या घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. यवतमाळ वरून पाटणबोरी कडे जात असताना वाकी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली त्यात दोन चिमुकल्यासह वडिलांचा जागीच मृत्यू झाला तर चिमुकल्यांची आई नर्मता सुनिल धुर्वे ही गंभीर जखमी असून तिच्या वर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे.
GM Mumbai Recruitment 2022 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक संधी चालू आलीय. भारत सरकार मिंट मुंबई यांनी विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया आज म्हणजेच ३१ जानेवारी २०२२ पासून सुरू झालीय. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 मार्च 2022 आहे. या भरतीबाबत अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्जासाठी, तुम्ही अधिकृत वेबसाइट igmmumbai.spmcil.com ला भेट देऊ शकता. भारत सरकार मिंट मुंबई हे सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे एक युनिट आहे. ही देशातील मिनी रत्न श्रेणीची कंपनी आहे. एकूण जागा – 15 रिक्त जागा तपशील १) सचिवालय सहाय्यक –…
चाळीसगाव : प्रतिनिधी एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने उभ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली होती. या घटनेत कारमधील चाळीसगाव येथून जवळच असलेल्या जामडी येथील परदेशी कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला होता. यात जामडी गावातील तिघे आणि वडजी (ता.भडगाव) येथील एकाचा मृत्यू झाला. जामडीतील तिघा मृतांवर २४ रोजी दुपारी १२ वाजता हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार झाले. गावात एकाचवेळी तीन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे गावात एकाही घरात चूल पेटली नाही. तिघेही घरातील कमावते असल्याने, त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अंत्यसंस्कारावेळी तिघांच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला. गावातील विजयसिंग परदेशी (वय ५८), चतरसिंग परदेशी (वय ३८) आणि…
सोयगाव : विजय चौधरी जरंडी शिवारात एकापाठोपाठ एक दोन बिबटे अत्यवस्थ अवस्थेत आढळल्यानंतर पाहिल्या नर बिबट्याचा दि.२३ मृत्यू झाल्यानंतर दुसर्याच दिवशी दि.२४ मादि बिबट्या अत्यवस्थ अवस्थेत आढळला होता.परंतु उपचारासाठी वेताळ वाडीच्या रोपवाटिकेत दाखल असलेल्या या मादी बिबट्याने शुक्रवारी सायंकाळी अखेरचा श्वास घेतल्याने सोयगाव परिसरात शोककळा पसरली आहे. जरंडी शिवारात दि.२४ पहाटे एका शेतात मादी बिबट अत्यावस्थ स्थितीत असल्याची माहिती वनविभागास मिळाली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरील परिस्थितीवरून लगेचच रेस्क्यू टीम व डॉक्टरांना सूचित करण्यात आले व वनाधिकाऱ्यांनी बिबट्यास उपचाराकरिता लगेच वेताळवाडी रोपवाटिका याठिकाणी हलविले. त्याठिकाणी तीन तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत सर्व सोयीसुविधाची व्यवस्था करून अत्याधुनिक…
मुंबई : प्रतिनिधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. राष्ट्रगीत अवमान प्रकरणी त्यांच्याविरोधात शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने समन्स जारी करुन कायदेशीर प्रकिया सुरु केली होती. सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश राहुल रोकडे यांनी या प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. याबाबत २५ मार्च रोजी पुढील कार्यवाही होईल. ममता बॅनर्जी यांच्यातर्फे माजी खासदार अँड मजीद मेमन यांनी बाजू मांडली. एक डिसेंबर २०२१ रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांच्याकडून राष्ट्रगीत अवमान झाल्याची तक्रार भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून करण्यात आली होती. याबाबत ममता बॅनर्जी यांच्याविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्याचा व त्यांना समन्स बजावण्याचा…