Author: Saimat

नंदुरबार: प्रतिनिधी रशिया आणि युक्रेन या देशात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून युक्रेनमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील जे नागरीक व विद्यार्थी अडकले असतील त्यांच्या नातेवाईकांनी जवळच्या तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले होते. त्यानुसार अद्यापर्यंत युक्रेनमध्ये असणाऱ्या नऊ विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क केला आहे.

Read More

मुंबई  : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीने केलेल्या अटकेचा निषेध म्हणून आज चेंबूर पांजरापोळ येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून तीव्र आंदोलन व निदर्शनं करण्यात आलं यावेळी प्रदेश अध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असता भाजपने महाविकास आघाडीवरती केलेला टीकेला उत्तर त्यांनी दिलं. आता कॅबिनेटच्या मिटींगसाठी कोर्टातच एक स्क्रीन लावावी लागेल या भाजप मंत्र्यांच्या व्यक्तव्यावर उत्तर देताना पाटील म्हणाले, ‘तुम्ही सर्वांवर खोटे आरोप करून त्यांना तुरुंगामध्ये टाकण्याची भूमिका घेणार असाल, तर तसही करावं लागेलं, तुम्ही सर्वांना तुरुंगात घालायला लागला तर काय…

Read More

चाळीसगाव; प्रतिनिधी:  चाळीसगांव मुस्लीम समजाच्या वतीने महाराष्ट्र अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्याबद्दल जाहीर निषेध व्यक्त करण्यात येवून चाळीसगाव येथील तहसिदार यांना निवेदन सादर करण्यात आले. दि.23 रोजी महाराष्ट्र सरकार मधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलीक यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका मांडल्याने अशा पध्दतीचा राजकीय सुडबुध्दीने गैरवापार करून खोट्या नाट्या केसमध्ये अटक करून एकप्रकारे विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. याचा आम्ही चाळीसगांव मुस्लीम समाजाच्या वतीने केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. सदर निवेदनावर अलताफ जमशेर खान, असलम मिर्झा,लुकमानशहा बशीरशहा, वसिम शे रज्जाक, राजू खान आदींच्य सह्या आहेत. https://youtu.be/bVIZ4gnK1F0

Read More

मुंबई : प्रतिनिधी एसटी विलिनीकरणाबाबत त्रिसदस्यीय समितीने दिलेला अहवाल जाहीर करता येणार नाही, अशी माहिती राज्य सरकारच्यावतीने आज मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीशिवाय अहवाल सार्वजनिक करता येणार नाही, असा दावा सरकारी वकील अॅड. काकडे यांनी केला आहे. ST महामंडळाला देखील अहवाल दिलेला नाही. तसेच संपकरी कर्मचाऱ्यांच्या वकिलांनाही अहवाल दिलेला नाही, असे राज्य सरकारच्यावतीने न्यायालयात न्यालयात सांगण्यात आले. न्यायालयाचा आदेश असूनही संपकरी कर्मचारी अजून कामावर रूजू झालेले नाहीत, असेही यावेळी सांगण्यात आले. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरणच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी हे गेल्या तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून संपावर आहेत. महामंडळाने कर्मचाऱ्यांचे सेवाज्येष्ठतेनुसार वेतन वाढवून दिले. मात्र त्यानंतरही कर्मचारी हे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असलेले शिक्षक नरेंद्र विश्वनाथ भोई यांना विद्यार्थ्यांच्या सुप्त क्रीडागुणांना चालना देण्यासाठी तसेच क्रीडा क्षेत्राच्या प्रचार , प्रसार व प्रगतीसाठी भरीव योगदान दिल्याबद्दल जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नुकतेच जळगाव येथे झालेल्या एका कार्यक्रमात जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघातर्फे नरेंद्र भोई यांचा सपत्नीक सत्कार करून हा पुरस्कार देण्यात आला . नरेंद्र भोई हे जळगाव येथील काशिनाथ पलोड शाळेचे क्रीडा शिक्षक असून आजपर्यंत विविध राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये पंच म्हणून सुद्धा त्यांनी यशस्वीपणे कामगिरी बजावली आहे. पुरस्काराबद्दल शाळेचे प्राचार्य गणेश पाटील ,…

Read More

मॉस्को : वृत्तसंस्था:     नोव्हेंबर महिन्यापासून वर्तविण्यात आलेली रशिया-युक्रेन युद्धाची भीती अखेर गुरुवारी खरी ठरली. रशियाने युक्रेनवर चौफेर हल्ले केले. त्यात पहिल्या दिवशी 74 लष्करी तळ उद्ध्वस्त झाले असून, 40 सैनिकांसह 10 नागरिक ठार झाले. या युद्धखोरीचा निषेध करत पाश्चात्य देशांनी रशियावर आणखी निर्बंध लागू करण्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे भारताने यासंदर्भात सावध भूमिका घेतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यामध्ये फोनवरुन सर्व घडामोडींबद्दल गुरुवारी रात्री उशीरा चर्चा झाल्याची माहिती भारताच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिली  आहे. नक्की काय चर्चा झाली मोदी आणि पुतिन यांच्यामध्ये? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री फोनवरुन रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन…

Read More

जळगाव : प्रतिनिधी आजच्या काळात अभिनयाचे तांत्रिक शिक्षण घेऊनच सिने-नाट्यसृष्टीत पदार्पण करण्याचा मानस बरेच तरुण व्यक्त करताना दिसतात. अशा तरुण पिढीच्या अभिनय कौशल्याला वाव मिळावा म्हणून रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयात ‘ड्रामा क्लब’ स्थापन करण्यात आला असून महाविध्यालयाच्या प्रांगणात या क्लबचा उद्घाटन करण्यात आले. यावेळी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा तसेच ड्रामा क्लबचे समन्वयक व जनसंपर्क अधिकारी बापूसाहेब पाटील उपस्थित होते. रायसोनी इस्टीट्युट नाट्यस्पर्धांच्या माध्यमातून मराठी रंगभूमीवर सातत्याने नव-नवीन प्रयोग सादर करीत आली आहे. नाट्यविषयक उपक्रम राबवत आली आहे. भारतभर संस्थेने स्वत:चा प्रेक्षक वर्ग निर्माण केला आहे. संस्थेच्या वाटचालीत आता नवा टप्पा सुरू…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील भिलपूरा चौकात बेकायदेशीररित्या धारदार चॉपर घेऊन फिरणाऱ्या राकेश उर्फ लिंबू राक्या चंद्रकांत साळुंके (वय 26) रा. कांचन नगर जळगाव याला शनिपेठ पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत २४ फेब्रुवारी रोजी रात्री शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजेच्या दरम्यान शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी राहुल पाटील, सहाय्यक फौजदार रवींद्र बोदडे, इंदल जाधव, अनिल कांबळे हे नाकाबंदीसाठी भिलपूरा चौकात गस्तीवर असतांना रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सुमारास हिस्ट्रीशीटर असलेला गुन्हेगार राकेश उर्फ लिंबू राक्या चंद्रकांत साळुंके (वय-२६) रा. कांचन नगर, जळगाव हा बेकायदेशीरीत्या हातात चॉपर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील एका भागात राहणाऱ्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले. याप्रकरणी एकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील एका भागात राहणारी १२ वर्षीय मुलगी आपल्या आई-वडिलांसह वास्तव्याला आहे. मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. बुधवार २३ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते ४ वाजेच्या दरम्यान गावातील राजू नामदेव पवार याने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले आहे संशय व्यक्त केला आहे. यासंदर्भात पिडीत मुलीच्या आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुरूवार २४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता संशयित आरोपी राजू…

Read More

बोदवड : प्रतिनिधी ( सुहास बारी ) तालुक्यातील शिरसाळा येथे दर शनिवारी हजारोंच्या संख्येने भाविक मारुतीरायाच्या दर्शनासाठी येतात. प्रचंड प्रमाणात होणाऱ्या या गर्दीमुळे अनेकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत असतो. यासाठी खबरदारी म्हणून या ठिकाणी पोलीस चौकी उभारण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्रभैय्या पाटील यांनी केली आहे. शहराच्या उत्तरेस मुक्ताईनगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर बोदवड शहरापासून बारा किमी अंतरावर प्रसिद्ध शिरसाळा मारुती मंदिर हे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. यामुळे या स्थळाला तीर्थ क्षेत्राचा दर्जा देत या ठिकाणचा विकास करावा, अशी मागणी बऱ्याच दिवसांपासून प्रलंबीत आहे.त्यातच अलीकडे या तीर्थक्षेत्रावर दर शनिवारी पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने रहदारीच्या समस्या…

Read More