पाचोरा : प्रतिनिधी अवैध वाळू वाहतुकीचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पाचोरा तालुक्यातील परधांडे गावातील गिरणा नदी मधील वाळूगटाचा लिलाव झाला होता मात्र तो गेल्या 20 ते 22 दिवसापासून बंद आहे. तरी या वाळूगटातून दिवसाढवळ्या वाळूची चोरी सुरू आहे ,तर दुसरीकडे ठेका दिलेला असताना ठरवून दिल्यापेक्षा कितीतरी पटीने अवैध वाळूउपसा केला जातो. मात्र वाळू ठेका बंद केला असताना बिनधास्त पणे नदीतून रात्रीच्या वेळी पोकलेन – जीसीबी च्या साहाय्याने वाळू काढून मोठ्या प्रमाणात साठा करायचा आणि दिवसभर डंपर व ट्रॅक्टर च्या माध्यमातून वाहतूक करायची असा प्रकार सुरू असून या बाबत आचर्य व्यक्त होत आहे. नैसर्गिक संपत्तीवर दरोडा टाकत, महसुली उत्पन्न…
Author: Saimat
धर्मशाला ः वृत्तसंस्था प्रामुख्याने युवा खेळाडूंभोवती संघबांधणी करण्यात आलेला भारतीय संघ शनिवारी श्रीलंकेविरुद्धच्या तीन लढतींच्या ट्वेन्टी-20 मालिकेत विजयी आघाडी घेण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. उभय संघांत धरमशाला येथे दुसरा ट्वेन्टी-20 सामना रंगणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्या लढतीत श्रीलंकेला 62 धावांनी धूळ चारली. आगामी ट्वेन्टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीने भारतीय संघ युवा फळीची चाचपणी करत आहे. दुसरीकडे अनेक प्रमुख खेळाडू विविध कारणास्तव संघाबाहेर गेल्यामुळे श्रीलंकेच्या चिंतेत भर पडली आहे. विंडीजविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेत धावांसाठी झगडणाऱ्या इशान किशनने 89 धावांची खेळी साकारून भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्याशिवाय मुंबईकर श्रेयस अय्यरनेही वेगवान अर्धशतकासाह विश्वचषकाच्या दृष्टीने संघातील स्थानासाठी दावेदारी पेश केली आहे. ऋतुराज गायकवाडच्या तंदुरुस्तीबाबत…
मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेचे उपनेते आणि मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या माजगाव येथील निवासस्थानी शुक्रवारी सकाळी प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. तर दुसरीकडे दिल्लीमध्ये भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीमधील डर्टी डझन म्हणत भ्रष्ट नेत्यांविरोधात आम्ही पुरावे तपास यंत्रणांना देणार असल्याचे म्हटले. याच साऱ्या घडामोडींवरुन शिवसेनेने भाजपावर टीका केली आहे. शिवसेनेने भाजपाची तुलना तालिबानशी केली आहे. भाजपाने भ्रष्टाचाराविरोधात बोलणे म्हणजे तालिबानने रशियाला शांततेसाठी आवाहन करण्यासारखे असल्याचा टोला शिवसेनेने लगावला आहे. “भारतीय जनता पक्षाने म्हणे भ्रष्टाचाराविरुद्ध युद्ध पुकारले आहे. रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरू आहे हे सगळ्यांना माहीत आहे, पण भाजपानेही युद्ध पुकारले आहे. तेही भ्रष्टाचाराविरुद्ध! केंद्रीय तपास…
कराची : वृत्तसंस्था पाकिस्तानच्या लष्करातील दोन हिंदू अधिकाऱ्यांना प्रथमच लेफ्टनंट कर्नल पदावर बढती देण्यात आली आहे, असे वृत्त पाकिस्तानच्या अधिकृत मीडियाने दिले आहे. मुस्लिमबहुल पाकिस्तानच्या या निर्णयाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. मेजर डॉ. केलाश कुमार आणि मेजर डॉ. अनिल कुमार अशी या दोन अधिकाऱ्यांची नावे आहेत. पाकिस्तान आर्मी प्रमोशन बोर्डाने त्यांच्या पदोन्नतीला मान्यता दिल्यानंतर मेजर डॉ. कैलाश कुमार आणि मेजर डॉ. अनिल कुमार यांना लेफ्टनंट कर्नल पदावर बढती देण्यात आली आहे, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिंध प्रांतातील थारपारकर जिल्ह्यातील रहिवासी असलेले कैलाश कुमार हे 2019 मध्ये हिंदू समुदायातील देशातील पहिले मेजर बनले होते.…
मुंबई : प्रतिनिधी: कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. आता मुंबईतील शाळा दोन मार्चपासून पूर्ण क्षमतेने सुरु होणार आहेत. पहिली ते बारावीचे वर्ग पूर्णवेळ भरणार असल्याची माहिती मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. शाळा, महाविद्यालयामध्ये मास्कच वापरणे बंधनकारक असणार आहे. शाळेत खेळही सुरु राहतील, आदित्य म्हणाले. मुंबईतील कोरोनाचा प्रभाव कमी झाला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी पूर्णवेळ शाळा सुरु करण्याचा घेतला आहे. विशेष व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळा व मैदानी खेळ, विविध शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.
मॉस्को : वृत्तसंस्था:रशियन अंतराळ संस्था रॉसकोमोसच्या प्रमुखांनी युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकने लादलेल्या निर्बंधांचा परिणाम आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनसंदर्भातील कामांवर होऊ शकतो असे म्हटले आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियावर लादलेल्या नव्या निर्बंधांचा परिणाम रशिया करत असलेल्या आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनबाबत सहकार्य काढून घेण्यापर्यंत जाऊ शकतो असे रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर चार अमेरिकन, दोन रशियन आणि एक जर्मन अंतराळवीर वास्तव्यास आहेत. रॉसकोमोसचे प्रमुख दिमित्रि रोगोजिन यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात इशारा देताना भारताचही उल्लेख केला आहे.“जर तुम्ही आमच्यासोबतच्या सहकार्यावर निर्बंध आणले तर आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनला वाटेल त्या भ्रमणकक्षेत फिरण्यापासून कोण वाचवणार. ते अमेरिका किंवा युरोपमध्ये पडणार नाही का?”, असा प्रश्न दिमित्रि रोगोजिन…
मुंबई : प्रतिनीधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईसंदर्भात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला. तसेच नवाब मलिक यांच्यावर झालेल्या आरोपांचे खंडन केले. माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, मंत्रिमंडळातील एखाद्या व्यक्तीला पहाटे पाच वाजता समन्सशिवाय ताब्यात घेणे, त्यानंतर ईडी कार्यालयात गेल्यानंतर समन्स देणे, हा सर्व प्रकार कायदा धाब्यावर बसून केलेला प्रकार आहे, असा थेट आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. तसेच सर्व खरेदी प्रक्रिया रीतसर करण्यात आली आहे, असे स्पष्ट मत जयंत पाटील यांनी मांडले. यात कोणताही आतंकवादी दृष्टीकोन लावण्याची गरज नाही असे ते म्हणाले. नवाब…
जळगाव : प्रतिनिधी तमाशा मंडळातील तरुणी व तरुणाने विषारी प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पारोळा शहरात घडली. अंजली अशोक नामदास (वय २०, रा. दत्त कॉलनी, भुसावळ) व योगेश उर्फ सुनील नामदेव बोरसे (वय १९, रा. अंजाळे, ता. यावल) असे आत्महत्या केलेल्या दोघांची नावे असून त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. भिका-नामा तमाशा मंडळ हे धुळे जिल्ह्यातील बाबुळवाडी येथून येथे दि. २४ रोजी दुपारी तमाशाचे काम आटोपून दुसऱ्या ठिकाणी जात होते. पण पारोळा शहरातील कजगाव रोडवरील पेट्रोल पंपाजवळ वाहन नादुरुस्त झाल्याने थांबले होते. तमाशा मंडळातील तरुणी अंजली अशोक नामदास व योगेश उर्फ सुनील नामदेव बोरसे हे दोन्ही तमाशा मंडळातच…
जळगाव : प्रतिनिधी बॅंकेत जमा करण्यासाठी दिलेले दिड लाख रुपये घेऊन फरार झालेल्या नोकराविरुद्ध हॉटेल मालकाने एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. अजिंठा चौफुली परिसरातील रिलायन्स पेट्रोल पंपानजीक “हॉटेल लायबा”चे मालक इकबाल मन्सुरी यांचा मुलगा वकार इकबाल मन्सुरी यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. मोहम्मद आशान अन्सारी रा. गाजीपूर – बिहार असे फरार झालेल्या नोकराचे नाव आहे. हॉटेल लायबा येथे मोहम्मद आशान अन्सारी हा गेल्या सहा वर्षापासून कॅप्टन म्हणून काम करत होता. हॉटेलमधे मालाची डीलीव्हरी आणि बॅंकेत रोख रक्कम जमा करण्याचे कामदेखील तो करत होता. 18 फेब्रुवारी रोजी त्याला आयसीआयसीआय बॅंकेत दिड लाख रुपये जमा करण्यासाठी पाठवण्यात आले होते.…
जळगाव : प्रतिनिधी देशात 52 % शेतकरी असून शेतकऱ्यांनी स्वत: नेतृत्व करण्याची गरज असून व्यापाऱ्यांवर अवलंबून न राहता स्वत व्यापारी दृष्टीकोन ठेवला पाहिजे यासाठी मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प ( स्मार्ट ) योजना आधारवड ठरणार आहे. निर्यातक्षम केळी घड व्यवस्थापनासाठी अनुदानित तत्वावर योजना राबविण्यासाठी 7 कोटीचा प्रस्तावास शासनाची लवकरच मंजुरी मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनांना योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकर्यांची मोठी हानी होत असते. यामुळे शेतकर्यांनी कृषी उत्पादनांवर प्रक्रियेकडे मोठ्या प्रमाणात वळावे, जेणेकरून त्यांना कृषी मालाचा मोबदला चांगला मिळू शकतो. तसेच शेतकऱ्यांनी नवतंत्राचा स्वीकार करून शास्वत शेतीसाठी गट शेतीचा अवलंब करावा असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव…