विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी सोयगाव वनपरिक्षेत्रातील मौजे जरंडी याठिकाणी दिनांक 23/02/2022 व 24/02/2022 रोजी आढळलेल्या वन्यप्राणी बिबट्याचा मृत्यू झाला. सदर घटनेच्या आरोपीच्या शोधासाठी लगेचच वनविभागाने चक्रे फिरवली व दिनांक 27/02/2022 रोजी एका आरोपीस अटक करून त्यास मा. न्यायालय सोयगाव याठिकाणी हजर केले. मा. न्यायालयाने आरोपीला दिनांक 2/3/2022 पर्यंत तीन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. त्यामुळे अवैध शिकार करणाऱ्याचे चांगलेच धाबे दणाणले आहे. जरंडी शिवारात आढळलेल्या दोन्ही बिबट्याचा विषबाधेतून मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यादिशेने वनविभागाने आपला मोर्चा वळविला असून एका आरोपीस दिनांक 27/02/2022 रोजी अटक करण्यात आली व तपासातून योग्य दिशेने वाटचाल होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. सदर प्रकरण वनविभागाने युद्धपातळीवर…
Author: Saimat
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी सोयगाव तालुक्यात १०५ पोलिओ लसीकरण केंद्रांवर तेरा हजार ७४३ बालकांपैकी तब्बल १२ हजार ९७४ बालकांना पोलिओची मात्रा देण्यात आली आहे सोयगाव तालुक्यात ९४ टक्के पोलिओ लसीकरण झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तीन प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सोयगाव तालुक्यात पोलिओ लसीकरणाची टक्केवारी वाढलेली असून यामुळे १२ हजार ९७४ बालके पोलिओ पासून सुरक्षित झाली आहे.सोयगाव तालुक्यात जरंडी-९८,बनोटी-४५ आणि सावळदबारा-२२ याप्रमाणे पोलिओ लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आले असून त्यावर २६७ कर्मचाऱ्यांनी पोलिओ लसीकरण मात्रा बालकांना दिल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. —–आजपासून घरोघरी मोहीम—- रविवारी पोलिओ लसीकरण मोहीम संपल्यानंतर सोमवार पासून तीन दिवस घरोघरी पोलिओ लसीकरण हाती घेण्यात आली आहे.त्यामुळे सोयगाव…
मुबई : प्रतिनिधी शिवजयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘पावनखिंड’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळत आहे. दुसऱ्या वीकेंडलाही या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने कमाईचा आकडा पोस्ट केला आहे. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने १० कोटी रुपयांचा आकडा पार केला. ‘पावनखिंड’ने पहिल्या आठवड्यात 12.17 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. दुसऱ्या वीकेंडला इतर मोठ्या चित्रपटांची टक्कर असतानाही ‘पावनखिंड’ने दणक्यात कमाई केली. दुसऱ्या वीकेंडमध्ये शुक्रवारी 1.02 कोटी रुपये, शनिवारी 1.55 कोटी रुपये तर रविवारी 1.97 कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली. पहिला आठवडा आणि दुसरा वीकेंड मिळून आतापर्यंत या चित्रपटाने 16.71 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. आलमंड्स क्रिएशन्स…
जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे दोन दिवसाच्या जळगाव दौऱ्यावर आहेत. रविवारी सायंकाळी त्यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते वाहनाने जैन हिल्सकडे रवाना झाले. व या नंतर दुसऱ्या दिवशी राज्यपाल यांची भेट कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात होती. यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जलतरण तलावाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, विद्यापीठाचे प्र. कुलगुरु प्रा. ई. वायुनंदन, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्यासह विद्यापीठातील विविध शाखांचे प्रमुख, सिनेट सदस्य उपस्थित होते.
जळगाव :प्रतिनिधी येथील लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे आयोजित सरदार वल्लभभाई पटेल चषक पर्व तिसरे आयोजित “लेवा पाटीदार प्रीमियम लीग” स्पर्धेचे विजेतेपद सिध्दीविनायक सुपर रायडर्स संघाने पटकावले. द्वितीय विजेतेपद शिवम सुपर किंगने जिंकले. रविवारी २७ फेब्रुवारी रोजी रात्री मान्यवरांच्या हस्ते चमचमती ट्रॉफी देऊन विजेत्यांना गौरविण्यात आले. रविवारी उपांत्य फेरीचे सामने झाले. या सामन्यात शिवम सुपर किंगने त्रिमूर्ती ब्लास्टर्स संघाचा तर सिध्दीविनायक सुपर रायडर्स संघाने रिअल्टी रोव्हर्स संघाचा दणदणीत पराभव करीत दिमाखाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. दुपारी तिसऱ्या क्रमांकासाठी त्रिमूर्ती आणि रिअल्टी संघात सामना झाला. यामध्ये त्रिमूर्ती संघाने रिअल्टी रोव्हर्स संघाचा पराभव करून तिसरे स्थान राखले. संध्याकाळी ७ वाजता…
जळगाव : प्रतिनिधी जैन हिल्स येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या गांधी धाममध्ये बापूंचे जीवन चित्रित केलेले आहे. लहान मुली-मुले आणि तरुण पिढी येथे येऊन प्रेरणा घेतात. गांधीजींच्या सत्य, अहिंसा, स्वदेशी, सदाचार आदींचे शिक्षण घेऊन देश चालवणारे देशाला नवी दिशा देऊ शकतात असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गौरवोदगार काढले. राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी जैन हिल्सस्थित गांधीतीर्थ ला भेट दिली. गांधी तीर्थ येथे जैन इरिगेशनचे अध्यक्ष तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक अशोक जैन, डॉ. सुदर्शन आयंगार यांनी त्यांचे स्वागत केले, या वेळी अतुल जैन सोबत उपस्थित होते. संपूर्ण जगाला गांधी विचारांची अनिवार्यता असून गांधी विचारांचे संस्कार अत्याधुनिक पद्धतीने युवा पिढीसमोर…
रावेर : प्रतिनिधी झाडाची फांदी तोडतांना विळा हाताला लागल्याने गंभीर जखमी होवून ४४ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना बक्षीपूर येथे घडली आहे. याप्रकरणी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, भगवान लक्ष्मण शिंगोटे (वय-४४) रा. बक्षीपूर ता. रावेर हे घरासमोर असलेल्या झाडावरील फांद्या तोडण्यासाठी झाडावर चढले. त्यावेळी झाडीची फांदी विळ्याने तोडत असतांना त्यांच्या हाताला विळा लागला. यात मोठ्याप्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने भगवान शिंगोटे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार सतीष सानप करीत आहे.
जळगाव : प्रतिनिधी शहरातून भुसावळकडे जाणाऱ्या महामार्गावरील बुलेट शोरूम समोर भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाल्याची घटना रात्री घडलीय. सागर विजय राणे (वय-३०) रा. हिंगोणा ता. यावल ह.मु. जळगाव मृत तरुणाचे नाव असून याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, यावल तालुक्यातील हिंगोणा येथील सागर विजय राणे हा जळगाव शहरात नोकरीच्या निमित्ताने वास्तव्याला आहे. सागर हा २६ रोजी दुचाकीने हिंगोणा येथे राहत्या घरी गेला होता. घरून परतत असताना रविवारी रात्री जळगाव-भुसावळ मार्गावरील बुलेट शोरूमच्या समोरून त्याच्या दुचाकीला अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत सागर राणे हा…
जळगाव : प्रतिनिधी अल्पसंख्यांक मुस्लिम समाजातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या संशयितांवर कठोर कठोर कारवाई करण्यात यावी, अश्या मागणीचे निवेदन मुस्लीम समाजातर्फे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना देण्यात आले. निवेदनात नमूद आहे की, शिरसोली गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातीलच २६ वर्षीय आरोपी साबीर शेख जहुर या इसमाने अत्याचार केल्यामुळे सदरची पिडीता ही गर्भवती झाली असून या आरोपी विरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी साबीर शेख जहुर याने केलेल्या कृत्यांबाबत त्याचे विरूध्द तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करण्यात येवून कडक शासन करण्यात यावे, जेणेकरून भविष्यात या प्रकारचे कृत्य करण्याची कोणी हिंमत करणार नाही. चाळीसगांव पो.स्टे. अंतर्गत अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी…
???????? आरोग्य के स्वामी सूर्यनारायण का दिन और एकादशी व्रत भी है…. आईये सूर्यनारायण का स्मरण करके आरोग्य के बारे में जानिए ???? काला तिल 40 ग्राम अजवायन 20 ग्राम पुराना गुड़ 60 ग्राम मिलाकर 6 -6 ग्राम सुबह शाम (बच्चो जो बिस्तर पर पेशाब करते हैं उन्हें 2- 2 ग्राम) ????खस खस ,पुराना गुड़ बराबर मिलाकर 1- 1 ग्राम सुबह शाम???? ????मिश्री, मुलेठी, काली मिर्च 4:3:2 के अनुपात में मिलाकर 4 ग्राम सुबह दोपहर शाम नियमित 7 से 10 दिन???? ????????2- 3 छुहारे या खजूर को एक गिलास दूध में उबालकर जब दूध आधा रह जाये तो पहले दूध…