आज ०१ मार्च महाशिवरात्री, आज चंद्र संध्याकाळपर्यंत मकर नंतर कुंभ राशीत संचार करेल. आज शिवयोगाचा शुभ संयोगही बनला आहे. यासोबतच आज संध्याकाळपर्यंत पंचग्रही योगही मकर राशीत असेल. या परिस्थितीत, मार्चचा पहिला दिवस तुमच्यासाठी कसा असेल? १ मार्च चे भविष्य पाहा… मेष : मेष राशीच्या लोकांच्या जीवनात आनंदाचे आगमन होईल. तुम्ही तुमच्या प्रतिभेने लोकांना प्रभावित कराल. जर तुम्ही हुशारीने काम केले तर तुम्ही अतिरिक्त पैसे कमवू शकता. सामाजिकदृष्ट्या सक्रिय लोकांना इतरांना मदत करण्यात आनंद होईल. तुमचे सामाजिक वर्तुळ वाढेल आणि तुम्ही काही महत्त्वाचे संबंध निर्माण करू शकाल. तुमच्या नवीन कल्पना आणि कार्यशैलीचे कौतुक होईल. आज ६०% नशिबाची साथ आहे. शिवलिंगाची पूजा करावी. वृषभ…
Author: Saimat
मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी मुंबईत गेल्या तीन दिवासांपासून संभाजीराजेंचं उपोषण सुरू होते. मात्र शासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले आहे. यावेळी कोणत्या मागण्या मान्य झाल्या याबाबतची यादी शासनाकडून देण्यात आली आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळण्यापूर्वी शिफारस झालेल्या एसईबीसी, ईएसबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी अधिसंख्य पदे निर्मितीचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर आणण्याबरोबरच सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या संदर्भातील मागण्यांवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आले. दरम्यान, मंत्री दिलीप वळसे-पाटील, एकनाथ शिंदे आणि अमित देशमुख यांनी आझाद मैदान येथे उपोषणस्थळी जाऊन खासदार संभाजीराजे छत्रपती यांना या निर्णयांची जाहीर माहिती दिल्यानंतर…
शेतकऱ्यांच्या घोषणाबाजीने चार तास दणाणले जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय. जळगाव : प्रतिनिधी (मुराद पटेल) जिल्ह्यातील 10140 शेतकऱ्यांचे सुमारे 4 कोटीं 70 लाखपेक्षा अधिक रक्कम प्रलंबित होती.वारंवार पत्र देऊन देखील कृषी विभाग गांभीर्याने घेत नसल्याने अंतीम इशारा पत्र देऊन ठिय्या आंदोलनाचा इशारा खासदार उन्मेशदादा पाटील यांनी पत्रान्वये जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना दिला होता. एक तर विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा किंवा विम्याची रक्कम शेतकऱ्यांना द्या नाही तर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला होता दि. 25 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी सहा वाजेपासून ठिय्या आंदोलन केले. खासदार उन्मेशदादा पाटील यांचे नेतृत्वात पाच तास सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला रात्री दहा…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी सोयगाव वनपरिक्षेत्रातील मौजे जरंडी याठिकाणी दिनांक 23/02/2022 व 24/02/2022 रोजी आढळलेल्या वन्यप्राणी बिबट्याचा मृत्यू झाला. सदर घटनेच्या आरोपीच्या शोधासाठी लगेचच वनविभागाने चक्रे फिरवली व दिनांक 27/02/2022 रोजी एका आरोपीस अटक करून त्यास मा. न्यायालय सोयगाव याठिकाणी हजर केले. मा. न्यायालयाने आरोपीला दिनांक 2/3/2022 पर्यंत तीन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. त्यामुळे अवैध शिकार करणाऱ्याचे चांगलेच धाबे दणाणले आहे. जरंडी शिवारात आढळलेल्या दोन्ही बिबट्याचा विषबाधेतून मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यादिशेने वनविभागाने आपला मोर्चा वळविला असून एका आरोपीस दिनांक 27/02/2022 रोजी अटक करण्यात आली व तपासातून योग्य दिशेने वाटचाल होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. सदर प्रकरण वनविभागाने युद्धपातळीवर…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी सोयगाव तालुक्यात १०५ पोलिओ लसीकरण केंद्रांवर तेरा हजार ७४३ बालकांपैकी तब्बल १२ हजार ९७४ बालकांना पोलिओची मात्रा देण्यात आली आहे सोयगाव तालुक्यात ९४ टक्के पोलिओ लसीकरण झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तीन प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सोयगाव तालुक्यात पोलिओ लसीकरणाची टक्केवारी वाढलेली असून यामुळे १२ हजार ९७४ बालके पोलिओ पासून सुरक्षित झाली आहे.सोयगाव तालुक्यात जरंडी-९८,बनोटी-४५ आणि सावळदबारा-२२ याप्रमाणे पोलिओ लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आले असून त्यावर २६७ कर्मचाऱ्यांनी पोलिओ लसीकरण मात्रा बालकांना दिल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. —–आजपासून घरोघरी मोहीम—- रविवारी पोलिओ लसीकरण मोहीम संपल्यानंतर सोमवार पासून तीन दिवस घरोघरी पोलिओ लसीकरण हाती घेण्यात आली आहे.त्यामुळे सोयगाव…
मुबई : प्रतिनिधी शिवजयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘पावनखिंड’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळत आहे. दुसऱ्या वीकेंडलाही या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने कमाईचा आकडा पोस्ट केला आहे. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने १० कोटी रुपयांचा आकडा पार केला. ‘पावनखिंड’ने पहिल्या आठवड्यात 12.17 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. दुसऱ्या वीकेंडला इतर मोठ्या चित्रपटांची टक्कर असतानाही ‘पावनखिंड’ने दणक्यात कमाई केली. दुसऱ्या वीकेंडमध्ये शुक्रवारी 1.02 कोटी रुपये, शनिवारी 1.55 कोटी रुपये तर रविवारी 1.97 कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली. पहिला आठवडा आणि दुसरा वीकेंड मिळून आतापर्यंत या चित्रपटाने 16.71 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. आलमंड्स क्रिएशन्स…
जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे दोन दिवसाच्या जळगाव दौऱ्यावर आहेत. रविवारी सायंकाळी त्यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते वाहनाने जैन हिल्सकडे रवाना झाले. व या नंतर दुसऱ्या दिवशी राज्यपाल यांची भेट कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात होती. यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जलतरण तलावाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, विद्यापीठाचे प्र. कुलगुरु प्रा. ई. वायुनंदन, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्यासह विद्यापीठातील विविध शाखांचे प्रमुख, सिनेट सदस्य उपस्थित होते.
जळगाव :प्रतिनिधी येथील लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे आयोजित सरदार वल्लभभाई पटेल चषक पर्व तिसरे आयोजित “लेवा पाटीदार प्रीमियम लीग” स्पर्धेचे विजेतेपद सिध्दीविनायक सुपर रायडर्स संघाने पटकावले. द्वितीय विजेतेपद शिवम सुपर किंगने जिंकले. रविवारी २७ फेब्रुवारी रोजी रात्री मान्यवरांच्या हस्ते चमचमती ट्रॉफी देऊन विजेत्यांना गौरविण्यात आले. रविवारी उपांत्य फेरीचे सामने झाले. या सामन्यात शिवम सुपर किंगने त्रिमूर्ती ब्लास्टर्स संघाचा तर सिध्दीविनायक सुपर रायडर्स संघाने रिअल्टी रोव्हर्स संघाचा दणदणीत पराभव करीत दिमाखाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. दुपारी तिसऱ्या क्रमांकासाठी त्रिमूर्ती आणि रिअल्टी संघात सामना झाला. यामध्ये त्रिमूर्ती संघाने रिअल्टी रोव्हर्स संघाचा पराभव करून तिसरे स्थान राखले. संध्याकाळी ७ वाजता…
जळगाव : प्रतिनिधी जैन हिल्स येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या गांधी धाममध्ये बापूंचे जीवन चित्रित केलेले आहे. लहान मुली-मुले आणि तरुण पिढी येथे येऊन प्रेरणा घेतात. गांधीजींच्या सत्य, अहिंसा, स्वदेशी, सदाचार आदींचे शिक्षण घेऊन देश चालवणारे देशाला नवी दिशा देऊ शकतात असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गौरवोदगार काढले. राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी जैन हिल्सस्थित गांधीतीर्थ ला भेट दिली. गांधी तीर्थ येथे जैन इरिगेशनचे अध्यक्ष तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक अशोक जैन, डॉ. सुदर्शन आयंगार यांनी त्यांचे स्वागत केले, या वेळी अतुल जैन सोबत उपस्थित होते. संपूर्ण जगाला गांधी विचारांची अनिवार्यता असून गांधी विचारांचे संस्कार अत्याधुनिक पद्धतीने युवा पिढीसमोर…
रावेर : प्रतिनिधी झाडाची फांदी तोडतांना विळा हाताला लागल्याने गंभीर जखमी होवून ४४ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना बक्षीपूर येथे घडली आहे. याप्रकरणी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, भगवान लक्ष्मण शिंगोटे (वय-४४) रा. बक्षीपूर ता. रावेर हे घरासमोर असलेल्या झाडावरील फांद्या तोडण्यासाठी झाडावर चढले. त्यावेळी झाडीची फांदी विळ्याने तोडत असतांना त्यांच्या हाताला विळा लागला. यात मोठ्याप्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने भगवान शिंगोटे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार सतीष सानप करीत आहे.