Author: Saimat

फैजपूर  ता.य़ावल ः उमाकांत पाटील   गेल्या वर्षभरापासून यावल व रावेर तालुक्यात शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान, केळी घडांची चोरी, ठिंबक संच नळ्यांची चोरी, विहिरीतील केबल चोरी, स्टार्टर्, डीपी कॉईल व ऑइलची चोरी अशा अनेक समस्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. उभ्या पिकात गुरेढोरे चारण्याचा प्रकार नित्याचाच असून गावातील ठेंगे संस्था, विविध कार्यकारी सोसायटी, पोलीस पाटील यांच्यासह परिसरातील पोलीस स्टेशनला वेळोवेळी तक्रारी अर्ज देऊन सुद्धा शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. उलट चोरीचे व कापणीवर आलेल्या केळीच्या खोडांचे नुकसान करण्याचे सत्र सतत सुरू आहे. चिनावलसह परिसरातील शेतकऱ्यांनी या प्रश्‍नी सावदा येथील बस स्थानकासमोर चौकात नुकतेच रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात ट्रॅक्टर, बैलगाडी घेऊन…

Read More

चोपडा : प्रतिनीधी ‘जाता जाता गाईन मी गाता गाता जाईन मी, गेल्यावरही या गगनातील गीतांमधून राहीन मी …. माझे जगणे होते गाणे’ ही जगण्यातली सार्थकता स्पष्ट करणारी कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांची रचना मराठी मनाला आनंद देऊन जाते. तोच आनंद उपस्थित श्रोत्यांना मिळाला …. शब्द सूर मैफलीच्या निमित्ताने! महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा – चोपडा व रोटरी क्लब ऑफ चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त व ज्येष्ठ गायिका शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्त ‘सुश्राव्य शब्द-सूर मैफल’ आयोजित करण्यात आली होती. या संगीत मैफलीचा आरंभ शिवरंजनी संगीत विद्यालयाचे मनोज चित्रकथी व विवेक…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था जिल्ह्यातील कुही तालुक्यातील किन्ही येथील भारत गॅस कंपनीचे मालक चिंधु आत्माराम ठवकर यांचे वडील आत्माराम मोतीराम ठवकर (80) यांनी गॅस गोडाऊन असलेल्या शेताच्या एका बाजूला स्वतःच सरण रचून विधिवत पूजा- अर्चना करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.ही घटना महाशिवरात्रीच्या दिवशी किन्ही गावाबाहेरील असलेल्या त्यांच्याच शेतात घडल्याचे आज सकाळी उघडकीस आले. आत्माराम हे वारकरी होते. धार्मिक वृत्तीचे होतेय तसेच ते नेहमी आजारी असायचे. परंतु मागील बऱ्याच काळापासून त्यांची प्रकृती उत्तम होती. तरीही अशाप्रकारे आत्महत्या करण्याचं काय कारण असू शकते, यासंदर्भात आता गावात चर्चांना उधाण आलंय. आत्महत्या केली त्याच दिवशी आत्माराम यांनी गावात मंडईनिमित्त सुरू असलेल्या झाडीपट्टीतील…

Read More

 मुंबई : प्रतिनिधी राज्याचे विधानसभा अध्यक्षपद अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. माजी अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर यापदावर अद्यापतरी नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक 9 मार्च रोजी घेण्यात यावी याची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्याकडे करणार आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येणार आहे. यासंबधीची विनंती महाविकास आघाडी राज्यपालांना करणार आहे. काँग्रेस पक्षाकडून ही अध्यक्षपदाची निवडणूक तत्काळ घ्यावी याबाबत आग्रह आहे.अध्यक्षपदाच्या  निवडणुकीसाठी  काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण, संग्राम थोपटे यांची नावे आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Read More

पहुर ता.जामनेर : प्रतिनीधी जय श्रीराम मंडळाने आयोजित केलेल्या भव्य जंगी शंकर पट बैलगाडा शर्यत मोठ्या उत्साहाने पार पडली. पहुर मध्ये खुप दिवसानंतर बैलगाडा शर्यतीचे नियोजन करण्यात आले. या बैलगाडा शर्यतील जळगाव जिल्हा आणि औरंगाबाद जिल्ह्यातील बैलगाड्याचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. या शर्यतीत सहभाग घेण्यासाठी ७०० रूपयांची पावती घेऊन सहभाग घ्यावा लागत होता. शर्यतीत डॉ.सागर गरूड यांच्या वतीने पहिले ११ हजार, दुसरे प्रदिप लोठा यांच्या वतीने ७ हजार आणि तिसरे स्नेहदिप गरूड ५ हजार असे तिन प्रकारचे बक्षीस ठेवण्यात आले होते. बैलगाडा शर्यतीसाठी एकूण ६० बैलजोड्यांचा समावेश होता. शर्यतीचे अंतर २५० फुट असुन पहिल्या नंबर चे बक्षीस घेणाऱ्या तळेगाव…

Read More

मुंबई : प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत आज 46,690 रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत 47,010 रुपये प्रति 10 ग्रॅमवरवर बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी 67,200 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. काय आहे आजचा भाव? गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,690 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 52,940 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22…

Read More

लंडन : वृत्तसंस्था पुतीन यांचे आचारी म्हणून परिचित असलेले येगवेनी प्रिगोजहिन यांनी युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्यासह 23 जणांच्या हत्येसाठी कुख्यात व्हॅगनर ग्रुपच्या किलरला सुपारी दिली आहे. प्रिगोजहिन रशियाचे अब्जाधीश आहेत. रशियात त्यांची अनेक हॉटेल आहेत. पुतीन आपल्या अनेक पार्ट्या प्रिगोजहिन यांच्या हॉटेलमध्ये आयोजित करतात.प्रिगोजहिन उद्योजक असले तरी त्यांची पुतीन यांचे आचारी अशी ओळख आहे. प्रिगोजहिन यांनी मोठी रक्कम देऊन व्हॅगनर ग्रुपला युक्रेनला पाठवले आहे.पाच महिन्यांपासून 400 मारेकरी युक्रेनमध्ये मुक्काम ठोकून असल्याचे सांगितले जाते. हे मारेकरी बेलारूस मार्गे युक्रेनमध्ये घुसले आहेत. आतापर्यंत सुपारी किलर दक्षिण आफ्रिकेत होते परंतु युक्रेनमध्ये दडून बसलेल्या मारेकऱ्यांची एकूण संख्या 4 हजारांवर आहे. युक्रेनच्या सुरक्षा दलाने काही…

Read More

यावल : प्रतिनीधी ( सुरेश पाटील) आश्रय फॉउंडेशन यावल -रावेर तर्फे आयोजित मोफत आरोग्य तपासणी व औषधेपचार शिबिराचे आयोजन विकास सोसायटी गाऊंड हिंगोणा येथे आश्रय फॉउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे व आश्रय फॉउंडेशन पदाधिकारी यांनी केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच रुकसाना फिरोज तडवी या होत्या. शिबिराचे उदघाट्न आश्रय फॉउंडेशन चे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे हार व पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करण्यात आले.विकास सोसायटी गाऊंड हिंगोणा ता.यावल येथे डॉ. कुंदन फेगडे, डॉ.राजेश चौधरी, डॉ. पराग पाटील, डॉ.भरत महाजन, डॉ.प्रशांत जावळे, डॉ.प्रविण पाटील, डॉ.योगेश पाटील, डॉ.प्रशांत भारंबे डॉ.नितीन महाजन, डॉ.गौरव धांडे, डॉ.दिलीप भटकर, डॉ.ललित बोरोले आदी आश्रय फॉउंडेशनचे पदाधिकाऱ्यांनी…

Read More

पहुर ता. जामनेर पहूर कसबे गावात ठेकेदाराकडून बोगस कामे सुरू असल्याची जोरदार चर्चा पहुर परिसरात सुरू असून या कामांविषयी सत्ताधारी, विरोधी व अधिकारी गप्प का ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. पहूर कसबे गावातील वार्ड क्रमांक दोन मध्ये राजाराम बनकर यांच्या घरा जवळील गटारी वर नुकताच ढापा टाकण्यात आला होता तो ढापा पंधरा दिवसातच एका बाजूने तुटला व एका बाजूने चक्क आसाऱ्या दिसू लागल्या होत्या त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात होता पहूर येथील काही नागरिक पहूर येथील कामांची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव व गटविकास अधिकारी जामनेर यांच्याकडे करणार असल्याची चर्चा सुरू होताच…

Read More