Author: Saimat

मुंबई :  प्रतिनिधी रणजी ट्रॉफी 2022 खेळली जात आहे. ज्यामध्ये बंगालचे क्रीडा मंत्री मनोज तिवारी देखील खेळत आहेत. बंगालमधील शिबपूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले मनोज तिवारी विधानसभा निवडणुकीपूर्वी टीएमसीमध्ये दाखल झाले होते. आता ममता सरकारमध्ये क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री आहेत. रणजी ट्रॉफी खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत काही मंत्र्यांचीही नावे आहेत. त्यापैकी मनोज तिवारी सर्वात खास आहे. मंत्री म्हणून प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धेत उतरणारा मनोज तिवारी देशातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. बंगालचे क्रीडा मंत्री मनोज तिवारी हे क्रिकेटसाठी नवीन नाव नाही.यापूर्वी मनोज तिवारी हे रणजीमध्ये खेळताना दिसले आहेत, मात्र नवीन गोष्ट म्हणजे क्रीडामंत्री आणि आमदार झाल्यानंतर ते पहिल्यांदाच शेतात शेती…

Read More

फैजपुर ता.यावल : प्रतिनिधी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त दि.27 रोजी फैजपुर येथील सम्राट बुद्ध विहारात उत्सव समिती गठन करण्यासाठी बैठकचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकी मध्ये उत्सव समितीच्या अध्यक्ष पदी आयु. दिपकभाऊ हिवरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. कार्यकारणी पुढील प्रमाणे, उपाध्यक्ष सागर किशोर भालेराव, सचिव देवानंद मेढे, कार्याध्यक्ष शे. जहांगीरभाई, खजिनदार रोहित प्रकाश मेढे, सल्लागार पत्रकार मयुरभाऊ मेढे, तसेच सदस्यपदी उदय तायडे, पवन विजय मेढे, किरण मेढे(बग्गनभाऊ) कुणाल मेढे, चेतन गाढे, आर्यन केदारे, राजु वाघ, चेतन मेढे, चंद्रमनी मेढे, रोहित मेढे, बाळा मेढे, अतुल मेढे, अनिकेत साळुंके, सुमित मेढे यांची सर्वानुमते…

Read More

राज्य मराठी नाट्य हौशी स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील अंतीम नाटकात जळगावच्या मु.जे.महाविद्यालय(स्वायत्त)ने ‘ब्लडी पेजेस’हे जुन्या व नविन विचार संघर्षावरील नाटक प्रभावीपणे सादर करुन स्पर्धेतील चुरस आणखी वाढविली आहे. लेखक श्रीपाद देशपांडे यांच्या मूळ संहितेला दिग्दर्शक वैभव मावळे यांनी आपल्या टीमच्या माध्यमातून जे ‘वैभव’प्राप्त करुन दिले ते कौतुकास्पद व अभिनंदनीय. आपले कुळ पुरुष, त्यांचे कर्तृत्व, त्यांनी मिळवलेल्या गतवैभवाचा मिजास हीच आपली खरी संपत्ती व जीवनशैली मानून कृतिशून्य आयुष्य जगणारा ‘बटू’ व जुनाट परंपरेत गुदमरलेला आणि नविन ते स्विकारण्यासाठी धडपडणारा ‘मोरु’ या दोन व्यक्तिरेखांमधील वैचारिक व्दंद म्हणजेच ‘ब्लडी पेजेस’ ही कथा. प्रारंभापासून उठावदार पडदा उघडल्यापासून ते पडदा पडेपर्यंत प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यात लेखक,दिग्दर्शक,…

Read More

मुंबई : प्रतिनिधी: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काही दिवसांपूर्वी अटक केली होती. न्यायालयाने त्यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.याच प्रकरणात आता नवाब मलिकांचा मुलगा फराझ यालाही समन्स बजावण्यात आले आहे. दाऊद इब्राहीम टोळी क्रिकेटवरील सट्टेबाजी आणि बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करत असल्याच्या आरोपावरून ‘ईडी’ने दाऊद आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात नवाब मलिक यांचा मुलगा फराझ मलिक याला ईडीने समन्स बजावले आहे. याप्रकरणी ‘ईडी’ने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केल़ी दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे 300 कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी…

Read More

कीव्ह : वृत्तसंस्था :युक्रेनची राजधानी किव्ह आणि खार्कीव्ह या पूर्वेकडील प्रमुख शहरांवर ताबा मिळवण्यासाठी रशियन लष्कराकडून मागील काही दिवसांपासून प्रयत्न सुरु आहेत. मागील आठवड्यामध्ये रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केली. त्यानंतर सुरु असणाऱ्या संघर्षामध्ये रशियन सैन्याचीही आता दमछाक होताना दिसतेय. तरीही रशियन हवाईदलाच्या माध्यमातून बॉम्ब वर्षाव सुरुच आहेत. दरम्यान, सोमवारी युक्रेनने संयुक्त राष्ट्रांसमोर आपली बाजू मांडताना पुतिन यांच्या नेतृत्वाखाली युक्रेनवर युद्ध लादणाऱ्या रशियावर गंभीर आरोप केलेत. आम्ही नागरी वस्तीवर हल्ले करत नसल्याचा दावा करणाऱ्या रशियाकडून रुग्णालये, अनाथाश्रमांवर बॉम्बहल्ले केले जात असल्याचा दावा युक्रेनने केला आहे. रहिवाशी ठिकाणांवर हल्ले रशियन क्षेपणास्त्रे आता आमच्या येथील मोठ्या प्रकल्पांवर, किर्णोत्सर्जन करणाऱ्या…

Read More

मुंबई- यास्मीन शेख  लवासा प्रकरणी न्यायालयाने हे राष्ट्रीय संपत्तीची लूट आहे, असून यामध्ये पवार कुटुंबीयांचा सक्रिय सहभाग असल्याबाबत गंभीर ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाने ओढले आहेत याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्याची भूमिका स्पट करावी अशी मागणी भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार केली आजच्या पत्रकार परिषदेत केली. याबाबत आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, काही दिवसापुर्वी लावासा प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने आपला निकाल दिला व निष्कर्ष स्पष्ट केले आणि निरिक्षण नोंदवली. हा निकाल, निष्कर्ष आणि निरिक्षणे राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांनी वाचली असतील अशी अपेक्षा आहे. न्यायालय म्हणते की लवासमध्ये राजकीय मनमानी आहे, सत्तेचा दुरूपयोग आहे, प्रशासकी हलगर्जीपणा आहे, पवार कुटुंबीयांचा…

Read More

चाळीसगाव – प्रतिनिधी मुराद पटेल  राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी औरंगाबाद येथे आपली गरळ ओकली.तेथे रामदास हे शिवरायांचे गुरू होते व रामदास नसते तर शिवरायांना कोणीच ओळखले नसते असे संतापजनक विधान केल्याने शिवप्रेमींमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या संतापजनक विधानाच्या निषेधार्थ शहरातील तहसील कार्यालय समोर दि १ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ वाजता शिवप्रेमीं संघटनानी निषेध आंदोलन करून राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी सपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी. अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरू दिले जाणार नाही. असा इशारा शिवप्रेमी संघटनाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री यांना चाळीसगाव तहसीलदार द्वारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वयंभू व्यक्तिमत्व होते.त्यांच्या स्वराज्याची संकल्पना ही राष्ट्रमाता जिजाऊ…

Read More

???????? नमस्ते ???????? ????️ आज तिसरे भाग में देवों के देव महादेवकी उपासना करने से क्या फल प्राप्त होता है ये जानेंगे ❇️ जो व्यक्ति महाशिवरात्रि, श्रावण मास के सोमवार, प्रदोष व्रत करते है, 16 सोमवार का उपवास करते है उस व्यक्ति ने किसी बिल्व वृक्ष के नीचे खड़े होकर खीर और देसी घी का दान करें… ये दान वेदोक्त ब्राम्हण देवतां या किसी जरूरतमंद लोगों को भी दे सकते है… ये करने से महालक्ष्मी जी की कृपा प्राप्त होती है क्योंकि बिल्ववृक्ष लक्ष्मी जी ने खुद के हाथों से लगाया है ???????? हनुमान जी शिवजी के 11 वे…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या मोबाइल दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून दुकानातील एकूण ३८ हजार रुपये किंमतीचे मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, अक्षय अशोक जैन (वय-२३) रा. रंगार गल्ली पाचोरा हे कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. अक्षय जैन यांचे पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ अथर्व मोबाईल नावाचे मोबाइल दुकान आहे. मोबाईल विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात. दरम्यान २७ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता नेहमीप्रमाणे ते दुकान बंद करून घरी गेले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकावून दुकानातील एकूण ३८ हजार १९० रुपये किंमतीचे मोबाईल चोरून…

Read More