चोपडा : प्रतिनिधी येथील वनविभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी शासनाच्या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाला हरताळ फासून त्यांच्या कर्मचार्यांना हाताशी धरुन सातपुडा बोडका करून टाकला आहे. वृक्षतोडीचे काम जोमाने सुरू आहे. या सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपजिल्हाध्यक्ष अमृतराज सचदेव थेट मुख्यमंत्र्याकडे केली आहे. याबाबत माहीतीअशी की, गेल्या काही वर्षांत जेवढी वृक्षतोड झाली नाही तेवढी वृक्षतोड मागील दोन वर्षांत झाली आहे. त्याचप्रमाणे डिंक शासकीय नियमाप्रमाणे फक्त आदिवासींनाच काढण्याची परवानगी असते व त्याअनुषंगाने प्रत्येक गावात एक समिती स्थापन करुन त्यासमितीला तो अधिकार असतो. मात्र आदिवासींना डावलून काही दलाल डिंकाचा काळाबाजार करीत आहेत. तसेच शासनाला कुठलाही…
Author: Saimat
भुसावळ : प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर साकेगाव नजीक सर्व्हिस रोडवरील एका पुलास चक्क भगदाड पडल्याने या भगदाडातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. दरम्यान, ही पाण्याची गळती साकेगाव ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा वाहिनीस क्षती पोहचल्याने पुलास भगदाड पाडत मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरु झाली आहे. या प्रकरणाने चौपदरीकरणाच्या कामास 19 महिने झाले असतांनाच हा प्रकार झाल्याने संबंधित कंपनीने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. याबाबत माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या साकेगाव गावालगत एका नाल्यावर पुल बांधण्यात आलेला आहे. या नाल्याच्यालगत दक्षिणेकडे असलेल्या साकेगाव ग्रामपंचायतीच्या वहिरीतून गावास पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी गेली आहे. या जलवाहिनीच्या वरतून चौपदरीकरण करणाऱ्या कंपनीने एका पुलाची…
मुंबई : प्रतिनिधी यास्मिन शेख मुंबै बँकेतील घोटाळा (Mumbai Bank Scam Case) य़ाप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडून सुरू असलेल्या चौकशीत शहरातील २५ मजूर संस्थांची बँक खाती सील करण्यात आली आहेत. या संदर्भात उल्लेखनीय आहे की, बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत भाजपाचे नेते व विधानपरिषदेतील विरोधी प्रवीण दरेकर हे मजूर मतदार संघातून, मजूर म्हणून निवडून येत असतात. संचालक मंडळाने एकाच दिवशी मंजुरी दिलेल्या ७४ मजूर संस्था बोगस असल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. यापैकी सुमारे सात-आठ प्रकरणांत चौकशी पूर्ण करून आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एका प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली. मुंबै बँकेतील घोटाळय़ाप्रकरणी दाखल असलेल्या तक्रारीची चौकशी आर्थिक…
पारोळा : प्रतिनिधी पारोळा शहरातील एका पतीने आपल्याच पत्नीचे अश्लिल फोटो व्हायरल केल्याचे उघड झाले आहे. पिडीत पत्नीने याप्रकरणी पतीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पतीने त्याच्या पत्नीला अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडून नको त्या अवस्थेत्य फोटो काढण्याच्या प्रकाराला पत्नीने विरोध केला. त्यामुळे पतीने तिला घराबाहेर काढण्याची धमकी दिली. विवाहितेचे नातेवाईक तिला घेण्यासाठी आले असता सासरच्या मंडळींनी त्यांच्यासोबत वाद घालून तिच्यासह सर्वांचा अपमान केला. विवाहितेसोबत काढलेले नको त्या अवस्थेतील फोटो पतीनेच व्हायरल केल्याचे बघून तिच्यासह तिच्या नातेवाईकांना धक्काच बसला. याप्रकरणी पत्नीने पतिविरुद्ध पारोळा पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कुटुंबात गोड बातमी असल्याचं वृत्त आहे. राज ठाकरे लवकरच आजोबा होणार आहेत. राज यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि सूनबाई मिताली ठाकरे यांच्याकडे गुड न्यूज आहे. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने अमित ठाकरे यांच्या खांद्यावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची धुरा देण्याची घोषणा राज ठाकरेंनी केली होती. यावेळी अमित ठाकरेंच्या राजकीय प्रमोशनची चर्चा रंगली होती. मात्र वैयक्तिक आयुष्यातही आता त्यांचं ‘बाबा’ म्हणून प्रमोशन होणार असल्याचं समोर आलं आहे. राज ठाकरेंच्या कुटुंबाचे नवीन निवासस्थान ‘शिवतीर्था’वर सध्या आनंदाचं वातावरण आहे. राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेही आनंदात असून येत्या एप्रिल महिन्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार…
मुंबई : प्रतिनिधी आजपासून दैनंदिन जीवनातील अनेक महत्त्वाच्या वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आजपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात आजपासून 105 रुपयांनी वाढ झाली आहे. 14 किलो गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. याशिवाय अमूल दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ झाली आहे. देशातील सर्वात मोठी कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हर ने फेब्रुवारीमध्ये आपल्या उत्पादनांच्या किमतीत दोनदा वाढ केली आहे. वाढलेल्या किंमतीचा परिणाम या महिन्यात तुमच्या घरच्या बजेटवर दिसून येईल. नवीन उत्पादन महाग होईल. किंमतीत 105 रुपयांनी वाढ झाल्यानंतर नवी दिल्लीत 19.2 किलो गॅस सिलिंडरचा नवीन दर 2,012 रुपये झाला आहे.…
रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील चिनावल येथील शिवारातून होणार्या चोर्यांबद्दल शेतकर्यांनी रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर आता पोलिसांनी कारवाईस प्रारंभ केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, चिनावलसह परिसरातील गावांच्या शिवारातून मोठ्या प्रमाणात चोरी होत असतांनाही पोलीस प्रशासन काही कारवाई करत नसल्याने शेतकर्यांचा दोन दिवसांपूर्वीच उद्रेक झाला होता. यामुळे संतापलेल्या शेतकर्यांनी रविवारी सावदा येथे दोन तास रास्ता रोको आंदोलनही केले. चोरट्यांना व शेतमाल आणि साहित्याची नासधूस करणार्यांना तत्काळ अटक करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले होते. यानंतर कालपासून चोरी करणार्यांची खातरजमा करण्यात येत असून त्यांच्यावर कारवाईची तयारी करण्यात येत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. 35 पेक्षा जास्त चोरटे पोलिसांच्या रडारवर असून त्यापैकी दोन…
पंढरपूर – महाशिवरात्रीच्या निमित्ताने पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात विविध फुलांची व बेलाच्या पानांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. सजावटीमुळे देवाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे. ही सजावट पंढरपूर येथील भाविक रमेश पांडुरंग कोळी यांनी केली आहे.
यावल (सुरेश पाटील) 24,25व26 तारखेला दिल्ली येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील 8 व्या स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशन स्पर्धेत जळगाव जिल्हा टीमने चांगले प्रदर्शन करत घवघवीत यश मिळवले आहे. जळगाव येथे रेल्वे स्टेशनवर खेळाडूंचा जिल्हा सचिव योगेश चौधरी,जिल्हा सदस्य कोमल पाटील,किरण तायडे,आकाश पाटील,आरोही नेवे,विद्या कोळी, ऐश्वर्या पाटील,रितेश भारंबे यांनी स्वागत केले.जळगाव जिल्हा अध्यक्ष तेजस पाटील,जिल्हा उपाध्यक्ष दिव्या भोसले व जिल्हा सचिव योगेश चौधरी यांच्या मार्गदर्शना खाली संपूर्ण जिल्ह्याने दिल्ली येथे राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत नेतृत्व केले.स्पर्धेत जळगाव जिल्हा टीम तर्फे व्हॉलीबॉल टीम (चोपडा)मधील मयूर पाटील,स्वप्नील माळी, प्रतीक नगराळे,दिग्विजय पाटील, सिद्धार्थ वाघ,हर्ष वाघ,वैभव डोके,विशाल कविरे,योगेश साळुंखे,अभिषेक पाटील आणि जयेश पाटील या खेळाडूंना सिल्व्हर मेडल…
यावल (सुरेश पाटील) यावल येथील सरदार वल्लभभाई पटेल स्कूल मधे सोमवार दि.28 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बालसंस्कार विद्यामंदिर शाळेचे विज्ञान शाखेचे शिक्षक नितीन बारी सर उपस्थित होते. सर्वात प्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शिला तायडे मॅडम यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन नितीन बारी सर यांचा सत्कार करण्यात आला व सरांच्या हस्ते राष्ट्रीय विज्ञान दिन कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.नितीन बारी सर यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्व सविस्तरपणे समजावून सांगितले.कार्यक्रमाचे संचालन इयत्ता नववी मधील विद्यार्थिनी कु.फाल्गुनी विनोद चौधरी हिने केले.इयत्ता पाचवी ते नववीतील विद्यार्थ्यांनी अत्यंत कुशलतेने…