Author: Saimat

यावल : ता.प्रतिनिधी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील 8 व्या स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशन स्पर्धेत जळगाव जिल्हा टीमने चांगले प्रदर्शन करत घवघवीत यश मिळवले आहे. जळगाव येथे रेल्वे स्टेशनवर खेळाडूंचा जिल्हा सचिव योगेश चौधरी, जिल्हा सदस्य कोमल पाटील,किरण तायडे, आकाश पाटील,आरोही नेवे, विद्या कोळी, ऐश्वर्या पाटील,रितेश भारंबे यांनी स्वागत केले.जळगाव जिल्हा अध्यक्ष तेजस पाटील,जिल्हा उपाध्यक्ष दिव्या भोसले व जिल्हा सचिव योगेश चौधरी यांच्या मार्गदर्शना खाली संपूर्ण जिल्ह्याने दिल्ली येथे राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत नेतृत्व केले.स्पर्धेत जळगाव जिल्हा टीम तर्फे व्हॉलीबॉल टीम (चोपडा)मधील मयूर पाटील,स्वप्नील माळी, प्रतीक नगराळे,दिग्विजय पाटील, सिद्धार्थ वाघ,हर्ष वाघ,वैभव डोके,विशाल कविरे,योगेश साळुंखे,अभिषेक पाटील आणि जयेश पाटील या खेळाडूंना सिल्व्हर मेडल…

Read More

चोपडा : प्रतिनिधी येथील वनविभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी शासनाच्या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाला हरताळ  फासून त्यांच्या कर्मचार्यांना हाताशी धरुन सातपुडा बोडका करून टाकला आहे. वृक्षतोडीचे काम जोमाने सुरू आहे. या सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे  अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपजिल्हाध्यक्ष अमृतराज सचदेव थेट मुख्यमंत्र्याकडे केली आहे. याबाबत माहिती अशी की, गेल्या काही वर्षांत  जेवढी वृक्षतोड झाली नाही तेवढी वृक्षतोड मागील दोन वर्षांत झाली आहे. त्याचप्रमाणे डिंक शासकीय नियमाप्रमाणे  फक्त आदिवासींनाच काढण्याची परवानगी असते व त्याअनुषंगाने प्रत्येक गावात एक समिती स्थापन करुन त्यासमितीला तो अधिकार असतो. मात्र आदिवासींना डावलून काही दलाल डिंकाचा काळाबाजार करीत आहेत. तसेच शासनाला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी अखिल भारतीय साहित्य परिषद तर्फे मराठी भाषा गौरव दिन दिनांक 27 रविवार रोजी “अखिल भारतीय साहित्य परिषद, शाखा जळगाव व “संस्कार भारती, जळगाव तसेच “कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. भाऊंच्या उद्यानातील अम्फी थिएटर येथे झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रा. मनिष जोशी होते प्रा. शरदचंद्र छापेकर उपस्थित होते. उद्घाटक म्हणून ज्येष्ठ कवयित्री सौ. मायाताई धुप्पड़ व वक्ते म्हणून कार्यक्रमाची सुरुवात “कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस माल्यार्पणाने झाली. नंतर प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ…

Read More

मुंबई :  प्रतिनिधी रणजी ट्रॉफी 2022 खेळली जात आहे. ज्यामध्ये बंगालचे क्रीडा मंत्री मनोज तिवारी देखील खेळत आहेत. बंगालमधील शिबपूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले मनोज तिवारी विधानसभा निवडणुकीपूर्वी टीएमसीमध्ये दाखल झाले होते. आता ममता सरकारमध्ये क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री आहेत. रणजी ट्रॉफी खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत काही मंत्र्यांचीही नावे आहेत. त्यापैकी मनोज तिवारी सर्वात खास आहे. मंत्री म्हणून प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धेत उतरणारा मनोज तिवारी देशातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. बंगालचे क्रीडा मंत्री मनोज तिवारी हे क्रिकेटसाठी नवीन नाव नाही.यापूर्वी मनोज तिवारी हे रणजीमध्ये खेळताना दिसले आहेत, मात्र नवीन गोष्ट म्हणजे क्रीडामंत्री आणि आमदार झाल्यानंतर ते पहिल्यांदाच शेतात शेती…

Read More

फैजपुर ता.यावल : प्रतिनिधी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त दि.27 रोजी फैजपुर येथील सम्राट बुद्ध विहारात उत्सव समिती गठन करण्यासाठी बैठकचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकी मध्ये उत्सव समितीच्या अध्यक्ष पदी आयु. दिपकभाऊ हिवरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. कार्यकारणी पुढील प्रमाणे, उपाध्यक्ष सागर किशोर भालेराव, सचिव देवानंद मेढे, कार्याध्यक्ष शे. जहांगीरभाई, खजिनदार रोहित प्रकाश मेढे, सल्लागार पत्रकार मयुरभाऊ मेढे, तसेच सदस्यपदी उदय तायडे, पवन विजय मेढे, किरण मेढे(बग्गनभाऊ) कुणाल मेढे, चेतन गाढे, आर्यन केदारे, राजु वाघ, चेतन मेढे, चंद्रमनी मेढे, रोहित मेढे, बाळा मेढे, अतुल मेढे, अनिकेत साळुंके, सुमित मेढे यांची सर्वानुमते…

Read More

राज्य मराठी नाट्य हौशी स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील अंतीम नाटकात जळगावच्या मु.जे.महाविद्यालय(स्वायत्त)ने ‘ब्लडी पेजेस’हे जुन्या व नविन विचार संघर्षावरील नाटक प्रभावीपणे सादर करुन स्पर्धेतील चुरस आणखी वाढविली आहे. लेखक श्रीपाद देशपांडे यांच्या मूळ संहितेला दिग्दर्शक वैभव मावळे यांनी आपल्या टीमच्या माध्यमातून जे ‘वैभव’प्राप्त करुन दिले ते कौतुकास्पद व अभिनंदनीय. आपले कुळ पुरुष, त्यांचे कर्तृत्व, त्यांनी मिळवलेल्या गतवैभवाचा मिजास हीच आपली खरी संपत्ती व जीवनशैली मानून कृतिशून्य आयुष्य जगणारा ‘बटू’ व जुनाट परंपरेत गुदमरलेला आणि नविन ते स्विकारण्यासाठी धडपडणारा ‘मोरु’ या दोन व्यक्तिरेखांमधील वैचारिक व्दंद म्हणजेच ‘ब्लडी पेजेस’ ही कथा. प्रारंभापासून उठावदार पडदा उघडल्यापासून ते पडदा पडेपर्यंत प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यात लेखक,दिग्दर्शक,…

Read More

मुंबई : प्रतिनिधी: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काही दिवसांपूर्वी अटक केली होती. न्यायालयाने त्यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.याच प्रकरणात आता नवाब मलिकांचा मुलगा फराझ यालाही समन्स बजावण्यात आले आहे. दाऊद इब्राहीम टोळी क्रिकेटवरील सट्टेबाजी आणि बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करत असल्याच्या आरोपावरून ‘ईडी’ने दाऊद आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात नवाब मलिक यांचा मुलगा फराझ मलिक याला ईडीने समन्स बजावले आहे. याप्रकरणी ‘ईडी’ने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केल़ी दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे 300 कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी…

Read More

कीव्ह : वृत्तसंस्था :युक्रेनची राजधानी किव्ह आणि खार्कीव्ह या पूर्वेकडील प्रमुख शहरांवर ताबा मिळवण्यासाठी रशियन लष्कराकडून मागील काही दिवसांपासून प्रयत्न सुरु आहेत. मागील आठवड्यामध्ये रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केली. त्यानंतर सुरु असणाऱ्या संघर्षामध्ये रशियन सैन्याचीही आता दमछाक होताना दिसतेय. तरीही रशियन हवाईदलाच्या माध्यमातून बॉम्ब वर्षाव सुरुच आहेत. दरम्यान, सोमवारी युक्रेनने संयुक्त राष्ट्रांसमोर आपली बाजू मांडताना पुतिन यांच्या नेतृत्वाखाली युक्रेनवर युद्ध लादणाऱ्या रशियावर गंभीर आरोप केलेत. आम्ही नागरी वस्तीवर हल्ले करत नसल्याचा दावा करणाऱ्या रशियाकडून रुग्णालये, अनाथाश्रमांवर बॉम्बहल्ले केले जात असल्याचा दावा युक्रेनने केला आहे. रहिवाशी ठिकाणांवर हल्ले रशियन क्षेपणास्त्रे आता आमच्या येथील मोठ्या प्रकल्पांवर, किर्णोत्सर्जन करणाऱ्या…

Read More

मुंबई- यास्मीन शेख  लवासा प्रकरणी न्यायालयाने हे राष्ट्रीय संपत्तीची लूट आहे, असून यामध्ये पवार कुटुंबीयांचा सक्रिय सहभाग असल्याबाबत गंभीर ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाने ओढले आहेत याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्याची भूमिका स्पट करावी अशी मागणी भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार केली आजच्या पत्रकार परिषदेत केली. याबाबत आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, काही दिवसापुर्वी लावासा प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने आपला निकाल दिला व निष्कर्ष स्पष्ट केले आणि निरिक्षण नोंदवली. हा निकाल, निष्कर्ष आणि निरिक्षणे राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांनी वाचली असतील अशी अपेक्षा आहे. न्यायालय म्हणते की लवासमध्ये राजकीय मनमानी आहे, सत्तेचा दुरूपयोग आहे, प्रशासकी हलगर्जीपणा आहे, पवार कुटुंबीयांचा…

Read More