जळगाव ः प्रतिनिधी शहरातील निमखेडी शिवारात असलेले शिवधाम मंदिरात काल महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दरवर्षाप्रमाणे यंदाही या मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त महत्व प्राप्त झालेले आहे. याठिकाणी येणाऱ्या भक्तांना आर.के.गृपतर्फे साबुदाणा खिचडी वाटप करण्यात आली. यावेळी गृपचे राज कोळी, गौरव कोळी, शाम पवार, हरिश रावतकर, सुनिल वाघ, रुपेश साळुंके, कुणाल खैरनार, लवेश पाटील, राहुल पाटील आदींचे सहकार्य लाभले.
Author: Saimat
मेष : मेष राशीच्या लोकांना आज एखाद्या बाबत चांगली माहिती मिळू शकते. घरातील जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या दिशेने तुम्ही निर्णय घेऊ शकता. व्यवसाय, नोकरी चांगली असेल. नोकरीत आर्थिक लाभ होतील, पदोन्नतीचे संकेत आहेत. व्यापार्यांसाठी नफ्याची स्थिती असेल. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वात नवीन आकर्षण निर्माण होईल. आज तुमचा संपूर्ण दिवस उत्साहात जाईल. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवायला मिळेल. तुमच्या कौशल्याने आणि समजूतदारपणाने तुम्ही कामे चांगल्या प्रकारे पूर्ण कराल. मिथुन: मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असेल. तुमच्या मनात काही असेल तर ते व्यक्त करा. प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. महिलांनी त्यांच्या करिअरबाबत अधिक खोलवर विचार करण्याची गरज आहे. विद्यार्थी परीक्षेत…
मुंबई : प्रतिनिधी काही महिन्यांपूर्वी कॉर्डिलिया ड्रग्ज पार्टी प्रकरणात प्रचंड गाजावाजा करत अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यनला अटक करण्यात आली होती. मात्र, आता या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने आर्यन खान याच्याकडे त्यावेळी ड्रग्ज सापडलेच नव्हते, असा अहवाल दिला आहे. एनसीबीतील सूत्रांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे अमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या भूमिकेवर नव्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आर्यन खान याच्याकडे ड्रग्ज सापडलेच नाहीत तर मग त्याचा फोन ताब्यात घेऊन चॅटस का तपासण्यात आले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच कॉर्डिलिया क्रुझवर धाड घातली तेव्हा एनसीबीच्या नियमांप्रमाणे त्याचे व्हीडिओ चित्रीकरण करण्यात…
नंदुरबार : प्रतिनिधी राकसवाडे येथे ग्रामस्थांच्यावतीने आयोजित कार्यक्रमाच्या प्रसादातून १३४ जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली. विषबाधेमुळे अनेकांना उलट्या आणि काहींना जुलाबचा त्रास जाणवू लागला. मात्र, उपचारानंतर सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून ४० जणांवर राकसवाडे आरोग्य केंद्रातच उपचार सुरू आहेत. दरम्यान, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी राकसवाडे येथेच तळ ठोकून आहेत. काल महाशिवरात्रीनिमित्त राकसवाडे येथे ग्रामस्थांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसाद वाटपानंतर काही ग्रामस्थांना सायंकाळी उलट्या होऊ लागल्या. हळूहळू उलट्या होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली. यामुळे अनेकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. उलट्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने प्रसादातून विषबाधा झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
जळगाव : प्रतिनिधी शहरातील पांडे डेअरी चौकात बेकायदेशीर गावठी कट्टा घेवून फिरणाऱ्या संशयित आरोपी पवन उर्फ माठ्या केशव गावळे (वय-२४) रा. शिवाजी नगर याला एमआयडीसी पोलीसांनी मंगळवार १ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता अटक केली. त्यांच्या ताब्यातील १५ हजार रूपये किंमतीचा गावठी कट्टा हस्तगत केला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील पांडे डेअरी चौकात तरूण हातात गावठी कट्टा घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल मिलींद सोनवणे यांना गोपनिय माहिती मिळाली. मंगळवार १ मार्च रोजी सायंकाळी मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, पोहेकॉ मिलींद सोनवणे, पो.ना. विकास सातदिवे, सचिन पाटील, छगन…
मुंबई: प्रतिनिधी महेश मांजरेकरांच्या “नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा” या चित्रपटामध्ये अल्पवयीन मुलांची लैंगिक मानसिकता बीभत्सपणे दाखवल्याचा आरोप करत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांना आता हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळालेला आहे. पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश हायकोर्टाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. “नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा” या चित्रपटात काही वादग्रस्त दृष्यांवरून या प्रकरणी मुंबई पोलिसांनी महेश मांजरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. चित्रपटात लहान मुलांशी संबंधित काही आक्षेपार्ह दृश्यांवरून माहिम पोलीस स्टेशनमध्ये ‘पोक्सो’ आणि ‘आयटी’ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आली होती. “नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा” या चित्रपटामध्ये किशोरवयीन मुलांच्या…
गोंदीया :वृत्तसंस्था ज्यांना मुलंबाळं नाही अशा लोकांना त्यांच्या वेदना कळणार नाहीत अशी टीका काँग्रेस प्रदेशाशध्यक्ष नाना पटोले यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती केली आहे. युक्रेनमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी अडकून आहेत. मी स्वतः त्या विद्यार्थ्यांशी फोनवर बोललो त्यांचे व्हिडियो पाहिले भारताच्या विदेश मंत्रालयाशीही मी अनेकदा बोललो असून त्यांच्याकडून कोणतेही प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. तसंच ज्या प्रमाणे कोरोनामध्ये (Corona) पाच राज्याच्या निवडणूका दुसऱ्या लाटेत आल्या, त्यावेळी भारताचे पंतप्रधान प्रचारात व्यस्त होते, आणि दुसरीकडे कोरोनामुळे गंगानदीत प्रेतं तरंगतांना दिसली तेव्हा त्यांना जाग आली. त्याचप्रमाणे आताही पाच राज्याचे निवडणुका (Election) सुरु झाल्या आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु…
जळगाव : प्रतिनिधी नुकतेच महाराष्ट्र कॅरम संघटना आयोजित महाराष्ट्र राज्य निवड कैरम स्पर्धा रत्नागिरी येथे झाली. जलगाँव जिल्हा खेलाड़ू सय्यद मोहसिन याचि महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे. येत्या ३० मार्च ते ३ एप्रिल दरम्यान राष्ट्रीय कॅरम स्पर्धा दादर येथे होणार आहे. या निवडीबद्दल जैन इरिगेशनचे अशोकभाऊ जैन, अतुल जैन, शाम कोगटा, नितिन बरडे व मंज़ूर खान यानी अभिनंदन केले.
जळगाव : प्रतिनिधी विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल येथे माध्यमिक विभागामध्ये ‘मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त’ ‘साहित्यिक आपल्या भेटीला’ या सदरात सुप्रसिद्ध साहित्यिक आणि इयत्ता सातवीच्या बालभारती पुस्तकातील ‛स्वप्न विकणारा माणूस’ या पाठाचे लेखक ज्येष्ठ साहित्यिक अशोक कोतवाल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर यावेळी विद्यार्थ्यांसाठी स्वरचित काव्यवाचन स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे परीक्षण ब.गो. शानभाग विद्यालयाच्या मराठीच्या शिक्षिका अनुराधा देशमुख यांनी केले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते थोर साहित्यिक कविवर्य वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर भूषण खैरनार यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी ही माय भूमी, ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमुची हे…
जळगाव ः प्रतिनिधी शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे बहुउद्देशीय संस्था (नाशिक) तर्फे डॉ. अब्दुल करीम सालार यांना राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना हा पुरस्कार प्राचार्य डॉ. अशोक राणा व वीरमाता नीता आमले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार विकास भदाणे हे होते. माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, श्रीराम पाटील, मारुती जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले. या वेळी महापौर जयश्री महाजन, डॉ. इक्बाल शाह, एजाज मलिक, अब्दुल अजिज सालार, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ पाटील आदी उपस्थित होते.