चाळीसगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्या शिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल? असे वादग्रस्त वक्तव्य औरगांबाद येथे एका जाहीर कार्यक्रमात केले त्यांचे हे विधान निषेधार्थ असून राज्यपालांनी आपले विधान त्वरित मागे घेऊन शिवप्रेमींची माफी मागावी अशी मागणी, जनआंदोलन खान्देश विभागाचे प्रा.गौतम निकम व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. मुबंई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि.16 जुलै 2018 रोजी दिलेल्या निकालानुसार तपास अधिकार्यांनी इतिहासतज्ञ आणि इतर अभ्यासकांची मते विचारत घेतल्यानंतर न्यायालयात सादर केल्या पुराव्यांनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही शिवाजी महाराज आणि रामदास यांच्यामध्ये गुरूशिष्याचे नाते असल्याचा देखील कोणताही पुरावा…
Author: Saimat
जळगाव : प्रतिनिधी राज्यपालांनी दिपक गुप्ता यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आरपीआयतर्फे करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते दिपक प्यारेलाल गुप्ता यांच्यावर राज्यभरात असलेल्या गुन्ह्याचा अनुषंगाने त्यांना जिल्हा पोलीस प्रशासनाने पोलीस संरक्षण दिले असून ते काढून त्यांना प्रशासनाने दोन वर्षाकरीता हद्दपार करावे तसेच महानगरपालिका मालकीच्या दोन सदनिका बेकायदेशीर बळकावलेले आहे ते मनपाने ताब्यात घेऊन ज्यांना घरकूल मंजूर झालेले आहे त्याच्यावर देखिल मनपा कायद्यानुसार कारवाई करावी दि,03,फेबु्रवारी 2022 पर्यन्त चोरून वीज वापरली आहे ते दंडासह वसूल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी यामागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गटातर्फे ) पक्ष्याचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली देण्यात येऊन राज्यपाल महोदय यांनी…
फैजपूर ता यावल : प्रतिनिधी देवाधिदेव महादेव यांची महिमा अफाट आहे. शंकर भगवान सर्व देवतांमध्ये सर्वात जास्त महत्त्व असून महादेव म्हणजे महान देव म्हणून ओळखले जातात.त्यांचे केस मनाचे प्रतीक, त्रिशूल मनावर नियंत्रण करतो.ध्यान शांततेचे प्रतिक आणि गळ्यातील सर्प अहंकाराचे प्रतिक असून जगातील दुष्टांचा नाश करणारा देवता म्हणून शंकर भगवान यांची ओळख आहे. महाशिवरात्रीचे औचित्य साधून फैजपूर येथील रहिवासी व श्री एस. बी. चौधरी हायस्कूल, चांगदेव येथील कलाशिक्षक राजू साळी यांनी आपल्या कल्पकतेने अतिवास्तव वादी शैलीत कुंचल्याद्वारे महादेवाची पैंटींग तयार करण्यात आली असून सदर पैंटींग मध्ये पिंडेवर महादेवाचे मुख दाखवण्यात आलेले आहे. पैंटींग साठी निळ्या रंगाचा वापर करून सुंदर कलाकृती तयार…
धरणगाव : जिल्हा प्रतिनिधी येथील विवेकानंद पंतसंस्थेचे तसेच स्वप्निल मेडीकल चे संचालक सुधाकर शेठ वाणी व स्वामी समर्थ ट्रेडर्स चे संचालक किशोर शेठ वाणी यांचे वडील कै नामदेव महादु येवले यांचा प्रथम पुण्यस्मरण निमित्त येथील वाणी समाज कार्यालयात भव्य मोफत नेत्र तपासणी शिबीराचा कार्यक्रम संपन्न झाला त्यात शहर व परिसरातील 240 नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्या प्रसंगी प्रारंभी प्रमुख अतिथी चा हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले प्रसंगी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमाचे अध्यक्ष विवेकानंद पंतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड भोलाणे बापु होते तर प्रमुख अतिथी म्हणुन नेत्रतज्ञ डॉ आम्रपाली चेतन काकलीया, जळगाव, उमविचे सिनेट सदस्य दिलीपदादा पाटील, प.रा.विद्यालय चे…
चाळीसगाव : प्रतिनीधी काही दिवसांपूर्वी चाळीसगाव तालुक्यातील पोहरे येथील केशव राघो महाजन यांच्या घराला गॅस लिकेजमुळे लागलेल्या आगीत घरातील रोख रक्कम जवळपास ७ लाख ७० हजार रुपये व घरातील स्त्रियांचे दागिने जळुन खाक झाले होते. या दुर्दैवी घटनेने केशव महाजन यांनी आयुष्यभर कष्ट करून उभा केलेल्या संसाराची राख झाली. तालुक्याचे आ. मंगेश चव्हाण यांना याबाबत कळताच त्यांनी गावातील भाजपा कार्यकर्त्यांकडून याबाबत माहिती घेतली होती व लवकरच सदर कुटुंबाला भेट देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आमदार मंगेश चव्हाण यांनी पोहरे येथे केशव राघो महाजन यांची भेट घेतली व झालेल्या नुकसानीची पाहणी केली. झालेले नुकसान पाहून व ग्रामस्थांनी मांडलेली व्यथा पाहून आमदार…
जळगाव ः प्रतिनिधी शहरातील सरदार वल्लभ भाई पटेल सभागृहात 1 मार्च रोजी आमदार राजुमामा भोळे व कलेक्टर अभिजित राऊत , महापौर जयश्रीताई महाजन, विष्णु भंगाळे, नगरसेवक डॉ.चंद्रशेखर पाटील, यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराला भेट दिली. यावेळी 219 श्री सदस्यांनी रक्तदान केले. पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने आणि सचिनदादा धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. नियमांचे पालन करा अन् मनातील भीती काढा नियमांचे पालन करा आणि मनातील भीती दूर करा असे आवाहन मा,कलेक्टर अभिजित राऊत व राजुमामा भोळे शासकीय वैद्यकीय यांनी रक्तदान शिबीर प्रसंगी केले. या वेळी त्यांनी प्रतिष्ठानच्या नियोजन बद्ध कार्याचे कौतुक ही केले. जळगांव जिल्ह्यातील शासकीय रक्तपेढीमध्ये…
पहुर ता.जामनेर : प्रतिनिधी येथील आर.टी.लेले विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी कागदी पुठ्या पासून बनवलेले जेसीबी आणि ट्रॅक्टर ट्रॉली प्रोजेक्टचे प्रदर्शन करून राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला. दरम्यान , राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम देखील साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे व्हा. चेअरमन साहेबराव देशमुख, प्रमुख मार्गदर्शक म्हणून संभाजी पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे, शिवसेना प्रवक्ते तथा पत्रकार गणेश पांढरे, सहकार महर्षी अरुण घोलप पत्रकार, प्रवीण कुमावत, यांची प्रमुख उपस्थित होती. यावेळी इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी राजधर पांढरे गणेश पांढरे, मुख्याध्यापक आर बी पाटील, प्रमुख…
भडगाव : प्रतिनिधी डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा ता. अलिबाग जि. रायगड यांच्या सौजन्याने महाराष्ट्र भूषण डॉ. नारायण विष्णू धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त १ मार्च रोजी भडगाव नगरीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. भडगाव नगरपरिषदेच्या परवानगीने १४३ श्रीसदस्यांच्या माध्यमातून सकाळी ठीक ८-०० ते १०-०० वाजेपर्यंत भवानी मंदिर,गिरणा वसाहत, श्रीगणपती मंदिर, जिजामाता शाळा, पोलिस वसाहत, श्रीदत्त मंदिर, बस स्थानक, बढे व्यापारी संकुल आदि परिसरातील तसेच भडगाव पेठ भागातील श्रीमारुती मंदिर, जि.प.शाळा ते स्मशानभुमी अशा एकूण ५.७ कि.मी.क्षेत्रफळ परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सदर स्वच्छता अभियानांतर्गत एकूण ५.२ टन सुखा कचरा संकलीत करुन त्याची नगरपालिकेच्या कचरा संकलन केंद्रात विल्हेवाट लावण्यात आली.
जळगाव : प्रतिनिधी येथील कांचन नगर येथील रहिवासी इसमाने 2 मार्च बुधवार रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बारदान शिलाईच्या कामावर असताना गळफास घेतला. सोबतच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात असल्याचे समजते. याबाबत सविस्तर वृत्त असे की, रमेश सुकलाल राजपूत (वय 48, रा.कांचन नगर) असे मयत इसमाचे नाव आहे. रमेश राजपूत यांचा 13 वर्षीय मुलगा यश याने मकर संक्रांतीच्या दिवशी 14 जानेवारी रोजी क्षुल्लक कारणावरून गळफास घेतल्याची घटना घडली होती. या घटनेपासून मयत यशचे वडील रमेश हे तणावात असल्याचे मित्रांनी व कुटुंबीयांनी सांगितले. बुधवारी…
जळगाव ः प्रतिनिधी शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील हनुमान नगर परिसरता एका 21 वर्षीय तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर असे की, शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील हनुमान नगरात ज्ञानेश्वर अर्जुन पाटील(वय 21) या तरूणाने काल दि.1 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घरात कोणी नसतांना छताला दोरी बांधून गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्याचे कारण मात्र समजले नाही. शहरातील फुले मार्केट येथे ज्ञानेश्वर एका भांड्यांच्या दुकानात कामाला होता. त्याच्या पश्चात आई, वडिल, दोन बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पुढील तपास पो.ना.दत्तात्रय…