साईमत मुंबई प्रतिनिधी मुंबई – विधानभवनाच्या लॉबीत आज (दि. ४ मार्च) एक धक्कादायक घटना घडली आहे. उद्धवसेनेचे आमदार भास्कर जाधव आणि भाजपाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यात शाब्दिक वाद घडला. या वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला ३ दिवसांच्या सुट्टीनंतर आज पुन्हा सुरुवात झाली. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी लॉबीतील कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्याच्या प्रक्रियेत या दोघांमध्ये वाद सुरू झाला. व्हिडिओत दिसते की, भास्कर जाधव संतापलेल्या अवस्थेत म्हणतात, “परवा आम्हाला इथं राज्यपालांचे भाषण मिळाले नाही.” यावर सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, “बाप कशाला काढता, बाप काढायचा अधिकार तुम्हाला आहे का?” या विधानावर भास्कर जाधव अधिक संतापले. कल्याणशेट्टी यांनी हे देखील…
Author: Saimat
साईमत मुंबई प्रतिनिधी महाराष्ट्रातील राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election 2026) उद्या (दि. ५ मार्च) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. राज्यातील एकूण सात जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती या दोन मुख्य गटांमध्ये रणनीती जोरात सुरु आहे. महायुतीकडून भाजपने चार उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये माजी मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, रामराव वडकुते आणि माया ईवनाते यांचा समावेश आहे. शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी एक जागा असून, या पक्षांनी सायंकाळपर्यंत उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये राज्यसभेच्या जागेसाठी विशेष पेच निर्माण झाला होता. शिवसेना या जागेसाठी आग्रही होती, तर काँग्रेसने देखील…
तेहरान/कोलंबो श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ एका इराणी सैन्य जहाजावर धक्कादायक पाणबुडी हल्ला झाला असून, यात ७८ जण जखमी झाले आहेत आणि १०१ जण अद्याप बेपत्ता आहेत. या हल्ल्यात किमान एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, हल्ल्यानंतर जहाज समुद्रात बुडाले आहे. तेहरान आणि कोलंबोच्या अधिकृत सूत्रांनुसार, हल्ला केव्हा आणि कोणाकडून केला गेला याची सविस्तर माहिती अद्याप मिळालेली नाही. तथापि, हे हल्ले मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षाशी संबंधित असल्याचे आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था नोंदवत आहेत. श्रीलंकेच्या हवाई दलानं सांगितले की, हल्ला झालेल्या ठिकाणी कोणतेही विमान आकाशात नव्हते, तर नौदलाच्या तपासणीनुसार परिसरात इतर जहाजही उपस्थित नव्हते. समुद्रात बुडालेलं जहाज इराणी सैन्याचं होतं, आणि त्यावर नेमके किती सैनिक होते,…
सरोगेट एजंट म्हणून काम केल्याचा आरोप; रॅकेटमागील साखळी उलगडण्यास तपास यंत्रणा सज्ज साईमत नाशिक प्रतिनिधी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे उघडकीस आलेल्या स्त्रीबीज अवैध विक्री प्रकरणाचे धागेदोरे आता नाशिकपर्यंत पोहोचले असून, या प्रकरणी मोठी कारवाई करत पोलिसांनी नाशिकमधील ‘मालती आयव्हीएफ सेंटर’चे संचालक डॉ. अमोल पाटील यांना अटक केली आहे. बदलापूर पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा ही कारवाई केली. आज (बुधवारी) त्यांना कल्याण सेशन कोर्टात हजर करण्यात येणार आहे. अनेक वेळा स्त्रीबीज काढल्याने रॅकेट उघड बदलापूर येथे एका महिलेकडून एकदा नव्हे तर अनेक वेळा स्त्रीबीज काढण्यात आल्याची बाब समोर आल्यानंतर अवैध विक्रीचे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय निर्माण झाला होता. या प्रकरणाने राज्यभर…
साईमत मुंबई प्रतिनिधी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतींनी मुंबईतील वरळी डोम परिसर आज अक्षरशः भारावून गेला. २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या विमान अपघातात त्यांच्या आकस्मिक निधनानंतर आयोजित करण्यात आलेली शोकसभा अत्यंत शोकाकुल वातावरणात पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांच्या नेत्यांनी उपस्थित राहून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. सभागृहात जमलेल्या जनसमुदायाच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू आणि व्यासपीठावरून व्यक्त होणाऱ्या आठवणींनी वातावरण काही काळ स्तब्ध झाले होते. मान्यवरांची मोठी उपस्थिती या शोकसभेला राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, माजी सरन्यायाधीश भुषण गवई, सुनील तटकरे, प्रफुल पटेल, मंत्री छगन भुजबळ,…
साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव महानगरपालिकेत कामकाजात शिस्त आणण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी आज कडक पावले उचलली. सोमवारी सकाळी पावणे दहा वाजता महापालिका कार्यालयात अचानक उपस्थित होऊन त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली आणि वेळेवर न आल्यास दंडात्मक कारवाई होईल, अशी स्पष्ट भूमिका मांडली. महापौर काळे म्हणाल्या, “उद्यापासून सर्वांनी सकाळी पावणे दहा (९:४५) वाजता कार्यालयात हजर राहावे. नागरिकांच्या कराच्या पैशावर पगार घेतो आणि काम करत नसल्यास हा त्यांचा अनादर ठरेल. प्रत्येकाने आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडले पाहिजे.” आज सकाळी ९:५० च्या सुमारास महापौर कार्यालयात आल्या, तेव्हा त्यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांची तातडीने हजेरी तपासली. काही अधिकारी वेळेवर आले नसल्याचे दिसल्यावर महापौरांनी त्यांना थेट…
प्रोटोकॉलभंग, कामातील दिरंगाईवर अधिकाऱ्यांना धरले धारेवर; महावितरण-रेल्वे विभागावर ताशेरे साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित जिल्हा विकास समन्वय व सहनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठकीत आज प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले गेले. केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीत होणारी दिरंगाई, प्रोटोकॉलचे उल्लंघन आणि प्रलंबित कामांबाबत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. खासदार स्मिता वाघ यांनीही आक्रमक भूमिका घेत अधिकाऱ्यांना जाब विचारला. महावितरणच्या प्रोटोकॉल उल्लंघनावर मंत्र्यांचा संताप बैठकीत केंद्राच्या विविध योजनांचा आढावा घेत असताना महावितरण विभागाचा गंभीर प्रकार उघडकीस आला. केंद्र सरकारचा ६० टक्के निधी असलेल्या योजनेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री आणि खासदारांना माहिती न देता एका आमदाराच्या मुलीच्या हस्ते पार पडल्याचे समोर…
साईमत जळगांव प्रतिनिधी श्री काथार कंठहार वाणी समाजसेवा संघ, जळगांव यांनी आयोजित केलेल्या वाणी प्रीमियर लीग (VPL) पर्व ३ स्पर्धा २४, २५ आणि २६ जानेवारी या तीन दिवसांमध्ये मानराज पार्क मैदान, प्रिंप्राळा येथे रंगल्या. या पर्वात १४ पुरुष संघ आणि ३ महिला संघ सहभागी झाले. पुरुष स्पर्धेत हिंदवी स्वराज्य संघाने विजेतेपद पटकावले, तर काथार ११ संघाने उपविजेतेपद मिळवले. महिला स्पर्धेत काथार महिला ११ संघ विजेता ठरला आणि वाणी ११ संघाला उपविजेतेपद स्वीकारावे लागले. पुरुष मालिकावीर ठरले निलेश वाणी, तर महिला मालिकावीर ठरली पायल गौरव वाणी. या तीन दिवसांत एकूण २४ सामने खेळले गेले. सर्व सामने उत्साही वातावरणात आणि निर्विघ्न पार…
साईमत पुणे प्रतिनिधी मराठी साहित्य आणि वैचारिक प्रकाशन क्षेत्रातील मोलाची भर घालणारे ‘मनोविकास प्रकाशन’चे संचालक आणि ज्येष्ठ प्रकाशक अरविंद पाटकर (वय ७३) यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. गेल्या आठ दिवसांपासून काविळीच्या विकाराने आजारी असलेल्या पाटकर यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना गुरुवारी पहाटे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामध्येच त्यांचा जीव गेल्या. पार्थिवावर दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कम्युनिस्ट कार्यकर्ते, राजकीय, सामाजिक, पत्रकारिता, साहित्य आणि प्रकाशन व्यवसायातील मान्यवर या वेळी उपस्थित होते. तरुण वयातच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (भाकप) पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून सार्वजनिक जीवनाची सुरुवात केलेल्या अरविंद पाटकरांनी गिरणी कामगार युनियनच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्रिय भूमिका…
साईमत प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २९ जानेवारी रोजी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मैदानावर अंत्यसंस्कार झाले. बुधवारी सकाळी झालेल्या भीषण विमान अपघातानंतर आज पार्थ आणि जय पवार यांनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिली. हजारो समर्थक, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते; सर्वांच्या डोळ्यांत अश्रू, आणि आपला दादा गमावल्याचे दुःख स्पष्ट जाणवत होते. अजित पवारांचा राजकीय कार्यकाळ, साधेपण आणि जनसामान्यांशी असलेला नाळ यामुळे राज्यभरातून लाखोंच्या संख्येने लोक अंत्यसंस्काराला उपस्थित झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, शेतकरी, कष्टकरी आणि बहुजनांचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या योगदानाला श्रद्धांजली अर्पण करत घोषणा केल्या: “महाराष्ट्राची शान, पुणे जिल्ह्याचा अभिमान, बारामतीचा आत्मा… राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार अमर…