Author: Saimat

सरोगेट एजंट म्हणून काम केल्याचा आरोप; रॅकेटमागील साखळी उलगडण्यास तपास यंत्रणा सज्ज साईमत नाशिक प्रतिनिधी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे उघडकीस आलेल्या स्त्रीबीज अवैध विक्री प्रकरणाचे धागेदोरे आता नाशिकपर्यंत पोहोचले असून, या प्रकरणी मोठी कारवाई करत पोलिसांनी नाशिकमधील ‘मालती आयव्हीएफ सेंटर’चे संचालक डॉ. अमोल पाटील यांना अटक केली आहे. बदलापूर पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा ही कारवाई केली. आज (बुधवारी) त्यांना कल्याण सेशन कोर्टात हजर करण्यात येणार आहे. अनेक वेळा स्त्रीबीज काढल्याने रॅकेट उघड बदलापूर येथे एका महिलेकडून एकदा नव्हे तर अनेक वेळा स्त्रीबीज काढण्यात आल्याची बाब समोर आल्यानंतर अवैध विक्रीचे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय निर्माण झाला होता. या प्रकरणाने राज्यभर…

Read More

साईमत मुंबई  प्रतिनिधी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतींनी मुंबईतील वरळी डोम परिसर आज अक्षरशः भारावून गेला. २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या विमान अपघातात त्यांच्या आकस्मिक निधनानंतर आयोजित करण्यात आलेली शोकसभा अत्यंत शोकाकुल वातावरणात पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांच्या नेत्यांनी उपस्थित राहून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. सभागृहात जमलेल्या जनसमुदायाच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू आणि व्यासपीठावरून व्यक्त होणाऱ्या आठवणींनी वातावरण काही काळ स्तब्ध झाले होते. मान्यवरांची मोठी उपस्थिती या शोकसभेला राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, माजी सरन्यायाधीश भुषण गवई, सुनील तटकरे, प्रफुल पटेल, मंत्री छगन भुजबळ,…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी  जळगाव महानगरपालिकेत कामकाजात शिस्त आणण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी आज कडक पावले उचलली. सोमवारी सकाळी पावणे दहा वाजता महापालिका कार्यालयात अचानक उपस्थित होऊन त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली आणि वेळेवर न आल्यास दंडात्मक कारवाई होईल, अशी स्पष्ट भूमिका मांडली. महापौर काळे म्हणाल्या, “उद्यापासून सर्वांनी सकाळी पावणे दहा (९:४५) वाजता कार्यालयात हजर राहावे. नागरिकांच्या कराच्या पैशावर पगार घेतो आणि काम करत नसल्यास हा त्यांचा अनादर ठरेल. प्रत्येकाने आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडले पाहिजे.” आज सकाळी ९:५० च्या सुमारास महापौर कार्यालयात आल्या, तेव्हा त्यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांची तातडीने हजेरी तपासली. काही अधिकारी वेळेवर आले नसल्याचे दिसल्यावर महापौरांनी त्यांना थेट…

Read More

प्रोटोकॉलभंग, कामातील दिरंगाईवर अधिकाऱ्यांना धरले धारेवर; महावितरण-रेल्वे विभागावर ताशेरे साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित जिल्हा विकास समन्वय व सहनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठकीत आज प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले गेले. केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीत होणारी दिरंगाई, प्रोटोकॉलचे उल्लंघन आणि प्रलंबित कामांबाबत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. खासदार स्मिता वाघ यांनीही आक्रमक भूमिका घेत अधिकाऱ्यांना जाब विचारला. महावितरणच्या प्रोटोकॉल उल्लंघनावर मंत्र्यांचा संताप बैठकीत केंद्राच्या विविध योजनांचा आढावा घेत असताना महावितरण विभागाचा गंभीर प्रकार उघडकीस आला. केंद्र सरकारचा ६० टक्के निधी असलेल्या योजनेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री आणि खासदारांना माहिती न देता एका आमदाराच्या मुलीच्या हस्ते पार पडल्याचे समोर…

Read More

साईमत जळगांव प्रतिनिधी श्री काथार कंठहार वाणी समाजसेवा संघ, जळगांव यांनी आयोजित केलेल्या वाणी प्रीमियर लीग (VPL) पर्व ३ स्पर्धा २४, २५ आणि २६ जानेवारी या तीन दिवसांमध्ये मानराज पार्क मैदान, प्रिंप्राळा येथे रंगल्या. या पर्वात १४ पुरुष संघ आणि ३ महिला संघ सहभागी झाले. पुरुष स्पर्धेत हिंदवी स्वराज्य संघाने विजेतेपद पटकावले, तर काथार ११ संघाने उपविजेतेपद मिळवले. महिला स्पर्धेत काथार महिला ११ संघ विजेता ठरला आणि वाणी ११ संघाला उपविजेतेपद स्वीकारावे लागले. पुरुष मालिकावीर ठरले निलेश वाणी, तर महिला मालिकावीर ठरली पायल गौरव वाणी. या तीन दिवसांत एकूण २४ सामने खेळले गेले. सर्व सामने उत्साही वातावरणात आणि निर्विघ्न पार…

Read More

साईमत पुणे  प्रतिनिधी मराठी साहित्य आणि वैचारिक प्रकाशन क्षेत्रातील मोलाची भर घालणारे ‘मनोविकास प्रकाशन’चे संचालक आणि ज्येष्ठ प्रकाशक अरविंद पाटकर (वय ७३) यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. गेल्या आठ दिवसांपासून काविळीच्या विकाराने आजारी असलेल्या पाटकर यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना गुरुवारी पहाटे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामध्येच त्यांचा जीव गेल्या. पार्थिवावर दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कम्युनिस्ट कार्यकर्ते, राजकीय, सामाजिक, पत्रकारिता, साहित्य आणि प्रकाशन व्यवसायातील मान्यवर या वेळी उपस्थित होते. तरुण वयातच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (भाकप) पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून सार्वजनिक जीवनाची सुरुवात केलेल्या अरविंद पाटकरांनी गिरणी कामगार युनियनच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्रिय भूमिका…

Read More

साईमत  प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २९ जानेवारी रोजी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मैदानावर अंत्यसंस्कार झाले. बुधवारी सकाळी झालेल्या भीषण विमान अपघातानंतर आज पार्थ आणि जय पवार यांनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिली. हजारो समर्थक, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते; सर्वांच्या डोळ्यांत अश्रू, आणि आपला दादा गमावल्याचे दुःख स्पष्ट जाणवत होते. अजित पवारांचा राजकीय कार्यकाळ, साधेपण आणि जनसामान्यांशी असलेला नाळ यामुळे राज्यभरातून लाखोंच्या संख्येने लोक अंत्यसंस्काराला उपस्थित झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, शेतकरी, कष्टकरी आणि बहुजनांचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या योगदानाला श्रद्धांजली अर्पण करत घोषणा केल्या: “महाराष्ट्राची शान, पुणे जिल्ह्याचा अभिमान, बारामतीचा आत्मा… राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार अमर…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघातर्फे समाजाच्या युवती व महिलांसाठी एक ऐतिहासिक अधिवेशन २५ जानेवारी २०२६ रोजी जळगावमध्ये आयोजित करण्यात आले आहे. धनाजी नाना विद्या प्रबोधनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाज कार्य महाविद्यालय, जळगाव येथे होणाऱ्या या अधिवेशनात सामाजिक, सांस्कृतिक, व्यवसायिक आणि विवाहविषयक मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षाताई खडसे, सौ मंदाताई एकनाथराव खडसे, सौ अरुणाताई शिरीष चौधरी, माजी नगराध्यक्ष सौ सीमाताई भोळे, सौ जयश्री ताई महाजन, गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ. सौ वर्षाताई उल्हास पाटील आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यासोबतच स्वामीनारायण गुरुकुल सावदा येथील भक्ती प्रसाद महाराज, भोरगाव लेवा…

Read More

साईमत यावल प्रतिनिधी यावल नगरपरिषदेत विषय समितीच्या सभापतींची निवड दि. १९ जानेवारी रोजी नगरपरिषदेच्या सभागृहात संपन्न झाली. या सर्वसाधारण सभेत महाविकास आघाडीच्या तिन समित्यांना सभापतीपद मिळाले, तर भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी (अप) गटाने एकत्र येऊन २ सभापतीपदांची संधी मिळवली. नगरपरिषदेच्या सभेत पिठासीन अधिकारी तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांच्या अध्यक्षतेखाली, मुख्याधिकारी निशीकांत गवई आणि सह मुख्याधिकारी रविकांत डांगे उपस्थित होते. याशिवाय नगराध्यक्ष सौ. छाया अतुल पाटील आणि उपनगराध्यक्ष सईदा बी याकुब शेख तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. सभापती निवडीचे महत्त्वाचे निर्णय स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्ष सौ. छाया अतुल पाटील यांची निवड झाली, ज्या गटाचे सहा पैकी चार सदस्य असल्यामुळे…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव, दि. १९ जानेवारी २०२६ – जळगाव लोकसभा मतदारसंघातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना मोठा धक्का मिळाला आहे. खासदार स्मिताताई वाघ यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर केंद्र शासनाने गिरणा नदीवरील नवीन बांभोरी पुलाच्या उभारणीसाठी ७९ कोटी २३ लाख ३९ हजार ६४८ रुपये मंजूर केले आहेत. हा पूल नॅशनल हायवेवर येणार असून, वाढत्या वाहतुकीच्या ओझ्यामुळे निर्माण होणाऱ्या कोंडीची समस्या कमी करण्यासाठी अत्याधुनिक PSC Girder (Pre-Stressed Concrete Girder) तंत्रज्ञान वापरून बांधला जाणार आहे. नवीन पूलामुळे शहरातील वाहतूक सुरळीत होईल तसेच जळगावचा चेहरामोहरा बदलून राहील, असा विश्वास स्थानिक आणि अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. स्मिताताई वाघ म्हणाल्या, “जळगावच्या सर्वांगीण विकासासाठी हा प्रकल्प एक महत्त्वाचा टप्पा…

Read More