Author: Saimat

जळगाव : प्रतिनिधी येथील लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे सरदार वल्लभाई पटेल चषक पर्व तिसरे अंतर्गत ‘लेवा पाटीदार प्रीमियर लीग’ क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथमच महिलांच्या क्रिकेट सामना झाला. सामन्यात सुचंद्रजी रायझिंग स्टार संघाने एक हाती विजय मिळवला. विजयी संघाला मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. संघमालक पल्लवी चिरमाडे यांच्या चिरमाडे पिंक दिवास आणि संघमालक पूनम कोल्हे यांच्या सुचंद्रजी रायझिंग स्टार यांच्यामध्ये सामना झाला. हा सामना अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला लेवा पाटीदार प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये तीन वर्षात प्रथमच महिलांचा सामना खेळला गेला. सामन्यात संघमालक पूनम कोल्हे यांच्या विजयी सुचंद्रजी रायझिंग स्टार संघाला मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. यावेळी मंचावर…

Read More

फैजपूर ता यावल : प्रतिनिधी देवाधिदेव महादेव यांची महिमा अफाट आहे. शंकर भगवान सर्व देवतांमध्ये सर्वात जास्त महत्त्व असून महादेव म्हणजे महान देव म्हणून ओळखले जातात.त्यांचे केस मनाचे प्रतीक, त्रिशूल मनावर नियंत्रण करतो.ध्bयान शांततेचे प्रतिक आणि गळ्यातील सर्प अहंकाराचे प्रतिक असून जगातील दुष्टांचा नाश करणारा देवता म्हणून शंकर भगवान यांची ओळख आहे. महाशिवरात्रीचे औचित्य साधून फैजपूर येथील रहिवासी व श्री एस. बी. चौधरी हायस्कूल, चांगदेव येथील कलाशिक्षक राजू साळी यांनी आपल्या कल्पकतेने अतिवास्तव वादी शैलीत कुंचल्याद्वारे महादेवाची पैंटींग तयार करण्यात आली असून सदर पैंटींग मध्ये पिंडेवर महादेवाचे मुख दाखवण्यात आलेले आहे. पैंटींग साठी निळ्या रंगाचा वापर करून सुंदर कलाकृती तयार…

Read More

जामनेर : प्रतिनिधी जामनेर तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने धरणगाव येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ जामनेर तहसीलदार यांना निवेदन सादर केले या निवेदनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य मध्ये महिलांना प्रचंड सन्मान केला जात होता महिलांचा आदर केला होता महिला शत्रूची जरी असली तरी तिचा सन्मान छत्रपती शिवाजी महाराज यांनी केला परंतु त्याच महाराष्ट्र मध्ये अत्यंत लाजिरवाणी अशी घटना धरणगाव मध्ये वय वर्ष 65 या असणाऱ्या चंदुलाल मराठे नराधमाने वय वर्ष 6 व 8 वर्ष असणाऱ्या चिमुरड्यांवर अत्याचार केला या दोघी बालिका ची अवस्था गंभीर असूनया घटनेचा त्यांच्यावर दोघांवर परिणाम झालेला आहे जलदगती न्यायालयात लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात येईल अशी मागणी…

Read More

फैजपूर  ता.य़ावल ः उमाकांत पाटील   गेल्या वर्षभरापासून यावल व रावेर तालुक्यात शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान, केळी घडांची चोरी, ठिंबक संच नळ्यांची चोरी, विहिरीतील केबल चोरी, स्टार्टर्, डीपी कॉईल व ऑइलची चोरी अशा अनेक समस्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. उभ्या पिकात गुरेढोरे चारण्याचा प्रकार नित्याचाच असून गावातील ठेंगे संस्था, विविध कार्यकारी सोसायटी, पोलीस पाटील यांच्यासह परिसरातील पोलीस स्टेशनला वेळोवेळी तक्रारी अर्ज देऊन सुद्धा शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. उलट चोरीचे व कापणीवर आलेल्या केळीच्या खोडांचे नुकसान करण्याचे सत्र सतत सुरू आहे. चिनावलसह परिसरातील शेतकऱ्यांनी या प्रश्‍नी सावदा येथील बस स्थानकासमोर चौकात नुकतेच रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात ट्रॅक्टर, बैलगाडी घेऊन…

Read More

चोपडा : प्रतिनीधी ‘जाता जाता गाईन मी गाता गाता जाईन मी, गेल्यावरही या गगनातील गीतांमधून राहीन मी …. माझे जगणे होते गाणे’ ही जगण्यातली सार्थकता स्पष्ट करणारी कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांची रचना मराठी मनाला आनंद देऊन जाते. तोच आनंद उपस्थित श्रोत्यांना मिळाला …. शब्द सूर मैफलीच्या निमित्ताने! महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा – चोपडा व रोटरी क्लब ऑफ चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त व ज्येष्ठ गायिका शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्त ‘सुश्राव्य शब्द-सूर मैफल’ आयोजित करण्यात आली होती. या संगीत मैफलीचा आरंभ शिवरंजनी संगीत विद्यालयाचे मनोज चित्रकथी व विवेक…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था जिल्ह्यातील कुही तालुक्यातील किन्ही येथील भारत गॅस कंपनीचे मालक चिंधु आत्माराम ठवकर यांचे वडील आत्माराम मोतीराम ठवकर (80) यांनी गॅस गोडाऊन असलेल्या शेताच्या एका बाजूला स्वतःच सरण रचून विधिवत पूजा- अर्चना करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.ही घटना महाशिवरात्रीच्या दिवशी किन्ही गावाबाहेरील असलेल्या त्यांच्याच शेतात घडल्याचे आज सकाळी उघडकीस आले. आत्माराम हे वारकरी होते. धार्मिक वृत्तीचे होतेय तसेच ते नेहमी आजारी असायचे. परंतु मागील बऱ्याच काळापासून त्यांची प्रकृती उत्तम होती. तरीही अशाप्रकारे आत्महत्या करण्याचं काय कारण असू शकते, यासंदर्भात आता गावात चर्चांना उधाण आलंय. आत्महत्या केली त्याच दिवशी आत्माराम यांनी गावात मंडईनिमित्त सुरू असलेल्या झाडीपट्टीतील…

Read More

 मुंबई : प्रतिनिधी राज्याचे विधानसभा अध्यक्षपद अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. माजी अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर यापदावर अद्यापतरी नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक 9 मार्च रोजी घेण्यात यावी याची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्याकडे करणार आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येणार आहे. यासंबधीची विनंती महाविकास आघाडी राज्यपालांना करणार आहे. काँग्रेस पक्षाकडून ही अध्यक्षपदाची निवडणूक तत्काळ घ्यावी याबाबत आग्रह आहे.अध्यक्षपदाच्या  निवडणुकीसाठी  काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण, संग्राम थोपटे यांची नावे आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Read More

पहुर ता.जामनेर : प्रतिनीधी जय श्रीराम मंडळाने आयोजित केलेल्या भव्य जंगी शंकर पट बैलगाडा शर्यत मोठ्या उत्साहाने पार पडली. पहुर मध्ये खुप दिवसानंतर बैलगाडा शर्यतीचे नियोजन करण्यात आले. या बैलगाडा शर्यतील जळगाव जिल्हा आणि औरंगाबाद जिल्ह्यातील बैलगाड्याचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. या शर्यतीत सहभाग घेण्यासाठी ७०० रूपयांची पावती घेऊन सहभाग घ्यावा लागत होता. शर्यतीत डॉ.सागर गरूड यांच्या वतीने पहिले ११ हजार, दुसरे प्रदिप लोठा यांच्या वतीने ७ हजार आणि तिसरे स्नेहदिप गरूड ५ हजार असे तिन प्रकारचे बक्षीस ठेवण्यात आले होते. बैलगाडा शर्यतीसाठी एकूण ६० बैलजोड्यांचा समावेश होता. शर्यतीचे अंतर २५० फुट असुन पहिल्या नंबर चे बक्षीस घेणाऱ्या तळेगाव…

Read More

मुंबई : प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत आज 46,690 रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत 47,010 रुपये प्रति 10 ग्रॅमवरवर बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी 67,200 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. काय आहे आजचा भाव? गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,690 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 52,940 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22…

Read More