मुंबई : पेट्रोल आणि डिजेलच्या वाढत्या किंमती पाहाता सर्वच लोक आता इलेक्ट्रिक पर्यायांकडे वळले आहेत . इलेक्ट्रिक गाड्यांकडे भविष्य म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे बरेच लोक आता इलेक्ट्रिक गाड्या विकत घेत आहे. परंतु होतं काय की, या गाड्या महाग असल्यामुळे लोक या गाड्यांना विकत घेताना 10 वेळे विचार करतायत. परंतु ही बातमी वाचल्यानंतर तुम्ही स्कुटर नक्की घरी आणाल. भारतीय टू व्हीलर मार्केटमध्ये अनेक इलेक्ट्रिक स्कूटर्स उपलब्ध आहेत, या स्कुटर्स पेट्रोलच्या तुलनेत लोकांना परवडणाऱ्या आहेत. बाजारात उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1 लाख रुपयांपर्यंत आहे. पण आज आम्ही तुम्हाला अशाच एका डीलबद्दल सांगणार आहोत, ज्यानंतर तुम्ही फक्त 10 हजार रुपये देऊन…
Author: Saimat
येत्या 4 मार्च रोजी नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका आहे. तर ‘झुंड’च्या निमित्ताने ‘सैराट’ या चित्रपटाची टीम पुन्हा एकदा एकत्र आली आहे. नागराज मंजुळे, रिंकू राजगुरू, आकाश ठोसर यांच्यासोबतच ‘सैराट’चे संगीत दिग्दर्शक अजय-अतुल हेसुद्धा ‘झुंड’साठी काम करत आहेत. ‘सैराट’मधल्या गाण्यांनी फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात भुरळ घातली होती. आजही ही गाणी आवडीने ऐकली जातात. ‘झिंगाट’ हे गाणं आजही पार्ट्यांमध्ये वाजवलं जातं. त्यामुळे ‘झुंड’मधील गाणी अशाच पद्धतीने हिट होणार असल्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. अमिताभ बच्चन यांनी या गाण्याचा टीझर ट्विटरवर पोस्ट केला आहे. ‘तैयार हो जाओ एक…
मुंबई : प्रतिनिधी बदलती जीवनपध्दती, व्यायामाचा अभाव (Lack Of Exercise), चुकीचा आहार, फास्टफूडचा अतिरेक आदी विविध कारणांमुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होत असते. वाढत्या वजनामुळे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्रदयविकार (Heart disease) आदी अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे वजन नियंत्रीत असणे आवश्यक असते. परंतु वजन नेमके कसे नियंत्रित करावे, यासाठी किती कालावधी द्यावा असे अनेक प्रश्न निर्माण होत असतात. जर तुम्हाला फक्त 30 दिवसात 10 किलो वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला तुमची जीवनशैली (Lifestyle) बदलावी लागेल. कारण आहारात बदल केल्याशिवाय तुम्ही हे ध्येय पूर्ण करू शकत नाही. प्रत्येकाला वजन कमी करायचं असतं, असे बरेच लोक आहेत ज्यांना महिनाभरात…
जळगाव : प्रतिनिधी शहरापासून जवळ असलेल्या कुसुंबा गावाजवळील एका शेतातील गवताला अचानक आग लागल्याची घटना आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. यात एका शेतमजूर कुटुंबाची झोपडी जळून खाक झाली आहे. महापालिकेच्या बंबाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे. कुसुंबा येथील विमानतळाच्या पुढे असलेल्या एका पेट्रोल पंपाच्या मागच्या बाजूला असलेल्या शेतातील गवताला अचानक लाग लागल्याची घटना बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. जळगाव महापालिकेच्या अग्निशमन विभागाला याबाबत माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाले. अवघ्या २० मिनीटात बंब घटनास्थळी पोहचला आणि ही आग विझविण्यात आली. शेतालगतच विलास पावरी (बारेला) कुटुंबिय वास्तव्याला आहे. आगी लोळमध्ये कुटुंबिय राहत असलेली झोपडी देखील…
मुंबई प्रतिनिधी – यास्मिन शेख राज्य विधिमंडळाच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने भाजपा आणि मित्रपक्षांची बैठक आज मुंबई येथे झाली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की , दाऊद इब्राहिम, अंडरवर्ल्डशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांना वाचवायला अख्खे सरकार उभे आहे.देशात असे कधी घडले नाही. ज्या सरकारचे प्रमुख शिवसेनेचे आहेत, ते मुंबईच्या खून्यांशी व्यवहार करणाऱ्या सोबत राहतात, हेही आम्ही आणि संपूर्ण महराष्ट्र पाहतो आहे. राज्याच्या मंत्रिमंडळातुन नवाब मलिक यांची हकालपट्टी व्हावी यासाठी आम्ही या अधिवेशनात आक्रमक भूमिका घेऊ . आणि तो घेतलाच पाहिजे ,तसे होणार नसेल तर…
मुंबई : यास्मीन शेख अधिवेशनात गोंधळ घालून तालिकाध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी निलंबित केलेल्या आमदारांचे निलंबन सर्वाच्च न्यायालयातून निलंबन रद्द झाले आहे . त्यामुळे भाजपचे १२ आमदार अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विधिमंडळात येणार आहेत. ठाकरे सरकारवर नेहमीच आगपाखड करणाऱ्या या डझनभर आमदारांकडे या अधिवेशनात आता राष्ट्रवादी नेते, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीचा कार्यक्रम सोपविल्याचे कळते. त्यामुळे निलंबनाच्या मुद्यावरून सरस ठरलेले हे आमदार महाविकास आघाडी सरकारसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ओबीसींच्या बरोबरच मराठा आरक्षण मुद्यावरून सरकारविरोधात आक्रमक झालेल्या विरोधी भाजपने अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारची कोंडी करण्याचा निर्णय घेतला आहे . तेव्हाचे तालिकाध्यक्ष भास्कर जाधव यांना त्यांच्या दालनात जाऊन शिवीगाळ केल्याचा…
मुंबई : यास्मीन शेख सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सार्वजनिक वर्गणी ठिकाण असे म्हटले तर वावगे ठरायला नको, सध्या तरी या विभागाचा कारभार या प्रमाणे सुरू असल्याचे चित्र आहे . मागील काहीदिवसांत सार्वजनिक बदल्या करून चर्चेत आलेले सार्वजनिक बांधकाम विभाग अजूनही सुधारले नाही. सुधारणार ही नाही कारण या विभागात खुद्द मंत्री मोहद्यांचे खाजगी सचिव यांचा एक हाती कारभार सुरू असून विभागाच्या सचिवांनी म्हणजेच वरिष्ठांनी देखील ‘तेरी भी चूप मेरी भी चूप ‘ धोरण स्वीकारले असल्याचे चित्र आहे . सार्वजनिक बांधकाम विभाग हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो त्यामुळे ही चर्चा कदाचित या विभागाच्या अधिकारी मंत्र्यांसाठी नवीन नसावी , मात्र…
मुंबई : प्रतिनिधी अंडरवर्ल्डशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांना वाचवायला अख्खे सरकार उभे आहे. देशात असे कधी घडले नाही. ज्या सरकारचे प्रमुख शिवसेनेचे आहेत, ते मुंबईच्या खून्यांशी व्यवहार करणाऱ्या सोबत राहतात, हेही आम्ही आणि संपूर्ण महराष्ट्र पाहतो आहे. अशी खोचक टिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्य विधिमंडळाच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने भाजपा आणि मित्रपक्षांची मुंबई येथे आज बैठक झाली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राज्याच्या मंत्रिमंडळातुन नवाब मलिक यांची हकालपट्टी व्हावी यासाठी आम्ही या अधिवेशनात आक्रमक भूमिका…
धरणगाव : प्रतिनिधी आज चा सामाजिक व्यवस्थेत अडकलेला समाजाला दिशा देण्याचे महान कार्य संत व महात्मा केले असुन संताचे सातशे वर्ष पुर्वीचा ग्रंथ वाड्मयत लिहलेल्या संदेशाची हुबेहुब पुनवृती होत असुन आज ही संताचे विचार व आचार जगाला प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय समाज प्रबोधनकार माईसाहेब महाराज यांनी केले. नुकत्याच येथील स्वर्गीय नामदेव महादु येवले यांचा प्रथम पुण्यस्मरण दिना निमित्त प्रवचनांच्या कार्यक्रम झाला त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. आपल्या दिड तासाच्या प्रबोधनात माईसाहेब यांनी संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव महाराज,संत मुक्ताबाई यांचा सारखे संत व महात्म्यानी आजची समाज व्यवस्थेत अडकलेला समाजाला दिशा देण्याचे महान कार्य केले असल्याचे नमुद करून ते…
जळगाव : प्रतिनिधी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येतेय. अशातच नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना पाचोरा तालुक्यातून समोर आली आहे. २४ वर्षीय विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून चुलत दिराने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल ७३ लाख ६४ हजार ५०१ रुपये व सोन्याचे दागिनेही घेऊन फसवणूक झाल्याचे समजते. याप्रकरणी संशयीत चुलत दीर आणि सासू, सासऱ्याविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पाचोरा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २४ वर्षीय महिलेच्या पतीचा 2020 मध्ये कोरोनाने मृत्यू झाला होता. पीडित महिलेचा पती आयटी इंजिनिअर होता. दरम्यान, पतीच्या मुत्युनंतर चुलत दीर आणि सासू, सासऱ्याने फसवणुक करण्याचा कट रचुन संगनमताने…