उस्मानाबाद : प्रतिनिधी तालुक्यातील आकुबाई पाडूळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांच्या जिल्हा परिषद गटातील विवीध विकासकामांचे लोकार्पण व कार्यकर्ता मेळावा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या मेळाव्यात भाजपावर जोरदार टीका करण्यात आली. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुडे यांनी यावेळी ईडीच्या कारवायांवरून देखील टोला लगावला. “ईडी पेक्षा आमच्या शेतकऱ्याच्या खिशातल्या बिडीची किंमत जास्त आहे.”, असं त्यांनी बोलून दाखवलं. धनंजय मुंडे भाषणात म्हणाले, “आगामी काळात ज्या निवडणुका होणार आहेत, आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे. भाजपाचा आणखीही अंगातला माज गेलेला नाही. होत्याचं नव्हतं नव्हत्याचं होतं केलं तरी. भल्या भल्याच्या मागे इनकम टॅक्स काय, सीबीआय काय… ईडी…
Author: Saimat
यावल(सुरेश पाटील) आज दि.5 रोजी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्कूल मध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धां घेण्यात आल्या. कार्यक्रमात यावल पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले सर,भुसावळ येथील नाहाटा कॉलेजच्या प्राध्यापिका सौ.भारती सोनवणे मॅडम व सौ.दिपाली महाजन मॅडम,तसेच साखर कारखाना संचालक मिलिंद नेहते,अनिल महाजन,अतूल उल्हास चौधरी तसेच शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र महाजन तसेच शशिकांत फेगडे इत्यादि मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचा शुभारंभ सर्वात प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.त्यानंतर इयत्त्ता नववीच्या कु.फाल्गुनी विनोद चौधरी व कु.दिक्षा दिनेश महाजन या विद्यार्थिनींनी स्वागत गीत म्हणून प्रमुख अतिथींचे स्वागत केले. स्वागतगीतानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शिला तायडे यांच्या…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी महादेवाच्या मंदिरात नंदी पाणी व दुध सेवन करत असल्याची वार्ता वाऱ्यासारखी तालुक्यात ग्रामीण भागात पसरताच अचानक सायंकाळी ग्रामीण भागातील महादेवाच्या मंदिरावर महिलांची मोठी गर्दी उसळली या घटनेच्या गर्दीमुळे उसळलेली गर्दीला आवर घालण्यासाठी अखेरीस सोयगाव पोलिसांना घटनास्थळी पाचारण करावे लागले .मात्र अख्रेर हि अफवा असल्याचे समोर आले आहे परंतु प्रत्यक्षदर्शी काही महिलांशी वार्तालाप केला असता अफवा पसरण्याच्या आधी दहा मिनिटे आधीच काही महिलांकडून नंदीने दुध वर्ज केल्याचे महिलांनी सांगितले व या सुखद घटनेचा महिलांना मोठा आनंद द्विगुणीत झाल्याचे काही महिलांच्या तोंडातून ऐकावयास मिळाले परंतु शेवटपर्यंत हिं अफवाच असल्याचे बोलले जात आहे. सोयगाव तालुक्यात महादेवाच्या मंदिरावर नंदी दुधाचे आणि…
भुसावळ : प्रतिनिधी घटस्फोटीत, विधवा, विधूर, शेतकरी, प्रौढ, व्यवसायिक व दिव्यांग विवाहेच्छुक युवक-युवती परिचय संमेलनाचे आयोजन येथील संतोषी माता हॉलमध्ये 3 एप्रिलला केले आहे. यासाठी नावनोदणीचा फॉर्म भरण्याची मुदत 15 मार्चपर्यंत होती. मात्र ती मुदत आता 10 मार्चपर्यंत करण्यात आली आहे. इच्छुकांनी नावनोंदणी करावी, असे आवाहन भोरगाव लेवा पंचायतीतर्फे उपक्रम चेअरमन आरती चौधरी यांनी केले आहे. भोरगाव लेवा पंचायत ऑफीस, पुरुषोत्तम जनरल स्टोअर्स, मामा पान सेंटर येथे मोफत नावनोंदणी केली जात आहे. विवाहेच्छुकांनी विहित मुदतीच्या आत नोंदणी करावी.
एकविसाव्या शतकाकडे झेप घेणाऱ्या, अत्याधुनिकता व नवतंत्रज्ञानाची जोड मिळालेल्या आपल्या देशात आजही अज्ञान व अंधश्रध्देतून शेकडो लोकांचे बळी पडत आहेत. विशेषतः देशातील ग्रामीण भागात वाड्यावस्तीवर अशिक्षित कुटूंबामध्ये वंशाच्या दिव्यासाठी किंवा घरात सुखशांती लाभावी, यासाठी नवस फेडले जातात. त्यासाठी सावकाराकडे आपले दागिने गहाण ठेवण्याची वेळ येते. अशाच आशयाचे मात्र सत्य घटनेवर आधारीत व अंधश्रध्देविषयी जागरुकता निर्माण करणारे ‘बळी’ हे नाटक जळगावच्या सुबोध बहुउद्देशिय युवा विकास प्रतिष्ठानने काल नाट्यस्पर्धेत सादर केले व ते रसिकांच्या पसंतीसही उतरले मात्र संथगतीमुळे ते अपेक्षित प्रभाव पाडण्यात कमी पडले. लेखिका व दिग्दर्शिका रूपाली गुंगे यांच्या टिमने ‘बळी’ सादर करतांना जी मेहनत घेतली ती निश्चितच वाखाणण्याजोगी म्हणावी लागेल.…
जळगाव : प्रतिनिधी दीपस्तंभ मनोबल हे देशातील दिव्यांग, अनाथ आणि वंचितांचे विदयापीठ आहे, आणि हे विदयापीठ दिव्यांग विदयार्थ्यांच्या स्वप्नपूर्ती साठी महत्वाची भूमिका बजावत आहे.आपल्या आयुष्यात अडचणी आल्या की आपण अस्वस्थ होतो.पण या दिव्यांग आणि अनाथांच्या आयुष्यात इतक्या अडचणी असूनही त्यांच्यातील उत्साह आणि चेहऱ्यावरील आनंद हा नक्कीच प्रेरणादायी आहे.दिव्यांगांच्या आणि अनाथांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करून त्यांना जगण्याची ऊर्जा आणि बळ निर्माण करणाऱ्या या प्रकल्पाला भेट देणं हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा आणि समाधानाचा दिवस आहे असे प्रतिपादन विभागीय आयुक्त नाशिक राधाकृष्ण गमे यांनी केले. दीपस्तंभ फाऊंडेशनच्या मनोबल प्रकल्पास राधाकृष्ण गमे, प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ आणि जळगावचे तहसीलदार नामदेव पाटील यांनी…
जळगाव ः प्रतिनिधी युक्रेन मध्ये सुरू असलेले युद्व त्वरित थांबावे व पूर्ण विश्वात शांतता नांदावी यासाठी शुक्रवार रोजी मुस्लिम समुदायाने विशेष प्रार्थनेचे आयोजन केले होते व प्रार्थना झाल्यानंतर मनियार बिरादारीचे अध्यक्ष फारूक शेख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन भारताचे राष्ट्रपती व पंतप्रधान यांना पाच मागण्याचे निवेदन देण्यात आले. प्रार्थना – श्रद्धांजली व निषेध सर्वप्रथम विश्वशांतीसाठी अल्लाकडे प्रार्थना करण्यात आली त्यानंतर युद्धात मरण पावलेल्या नवीन शेखर आप्पा या विद्यार्थ्यास श्रद्धांजली अर्पण करून त्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. राष्ट्रपति व पंतप्रधान यांना निवेदन निवेदनातील मागण्या युक्रेन मध्ये गोळीबारात मृत्यू झालेल्या नवीन शंकरअप्पा या विद्यार्थ्यास रशियन सरकारने आर्थिक मदत द्यावी,यूक्रेन…
जळगाव : प्रतिनिधी येथील जैन इरिगेशनसह कंपनीमधील विविध आस्थापनांमध्ये दि.4 ते 11 दरम्यान सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सुरक्षा जनजागृतीसाठी निबंध व सेफ्टी स्लोगन स्पर्धेचेही आयोजन केले आहे. जैन व्हॅलीमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये सुरक्षा प्रतिज्ञा घेण्यात आली. जैन व्हॅली परिसरात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी एस. डी. गुप्ता, व्ही. पी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. सेफ्टी विभागाचे डी. जे शितोळे, मानव संसाधन विभागाचे जी. आर. पाटील, कैलास सैंदाणे, योगेश्वर पवार यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले. राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणून 4 मार्च देशभर साजरा केला जातो. 4 मार्च 1966 रोजी देशात राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची स्थापना करण्यात आली होती. देशातील सर्व उद्योग, आस्थापनांमध्ये दि.4 ते 11 मार्च…
जळगाव : प्रतिनिधी बॉक्स ऑफ हेल्प फाऊंडेशनतर्फे उद्या रविवार रोजी जागतिक महिला दिनानिमित्त मोफत आरेाग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर सकाळी 11 ते 1 या वेळात ज्ञान साधना शाळा (हुडको), पिंप्राळा जळगाव येथे होणार आहे. या आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार करतील तर प्रमुख पाहुणे म्हणुन काँग्रेसचे जामनेर तालुकाध्यक्ष शरद पाटील यांची उपस्थीती लाभणार आहे. शिबिरात स्री रोग तज्ज्ञामार्फत महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येईल.तसेच मूळव्याध तज्ज्ञ डॉ मनोज पाटील हे मूळव्याध, फिशर, भगंदर व इतर संबंधित आजारांवर तपासणी व उपचार करतील. मूळव्याध शत्रक्रिया, मोती बिंदू शत्रक्रिया विनामूल्य करण्यात येईल. यावेळी बालरोगतज्ज्ञ डॉ. राहुल पाटील,…
जळगाव ः प्रतिनिधी खान्देश हा विविध लोक साहित्य आणि परंपरेनी नटलेला प्रदेश आहे खान्देशातील वहीगायन, सोंग, कानबाई गिते, गोठ, सोगाड्या पार्टी, भगत भोपे आदि लोककला ह्या परंपरेन चालत आलेल्या व खान्देशातील सण, उत्सव व मौखिक साहित्यातुन निर्माण झालेल्या अस्सल लोककला आहे. खान्देशातील विविध लोककले च्या जतन व संवर्धना सोबतच ह्या लोककलां ची माहिती नव्या पिढीला मिळाली तसेच काळाच्या ओघात नामशेष होणा-या या कलेला नव संजीवन मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांच्या वतीने खान्देशात प्रथमच या महोत्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा शुभारंभ जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा रजंननाताई पाटील व जळगाव शहराच्या महापौर जयश्रीताई महाजन यांच्या शुभ हस्ते…