साईमत यावल प्रतिनिधी १५व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार शिलाई मशीन प्रशिक्षण दिल्यानंतर गरजू महिलांना शिलाई मशीन देण्याच्या मोबदल्यात मंजूर निधीतून ५० टक्के रक्कम म्हणजे १ लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना यावल तालुक्यातील चुंचाळे गावातील ग्रामसेवक आणि डीडीपी ऑपरेटर याला जळगाव लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत यावल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ग्रामसेवक हेमंत कमलाकर जोशी रा.साकळी ता.यावल आणि ऑपरेटर सुधाकर धुडकू कोळी (वय-३५) रा. चुंचाळे ता.यावल असे लाचखोर संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील चुंचाळे गावात राहणारे तक्रारदार यांच्या वडिलांची नावे एक संस्था आहे. यातून…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी माहिती अधिकारात मागितलेली माहिती न मिळाल्याने एका व्यक्तीने थेट वैद्यकीय अधीक्षकांना फोन करून मारहाण करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार जळगावमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे घडला आहे. दिवसभर जळगावात घटनेचे पडसाद उमटले आहे. महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक परिषदेतर्फे शनिवारी संध्याकाळी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंतर्गत कार्यरत असणारे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय गायकवाड यांना दि १५ रोजी महेंद्र पाटील नामक व्यक्तीने अर्वाच्च भाषेत फोन करुन सर्व महिला व पुरुष डॉक्टरांना यांना देखील मारेन अशी देखील धमकी दिलेली आहे. तसेच अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकुर यांच्याबददल…
साईमत जळगाव प्रतिनिधी शहरालगत असलेल्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल आयोजित व मुख्याध्यापिका तेजल ओझा यांच्या मार्गदर्शनाखाली जी. एच. रायसोनी स्पोर्ट अॅन्ड कल्चरल फाउंडेशनतर्फे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत पहिला आणि दुसरा दिवस कॅरम, चेस, स्विमिंग, स्पीड स्केटिंग व बास्केटबॉल या विविध स्पर्धेत विध्यार्थ्यानी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे गाजला. शनिवार जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धाचा दुसरा दिवस असून, रविवार रोजी सकाळी ११ वाजता बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत यंदा काय नवे पाहायला मिळणार याकडे जिल्हाभरातील हजारो क्रीडाप्रेमीचे लक्ष लागून आहे. या स्पर्धेत यंदा रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल, विद्या इंग्लिश मीडियम स्कूल, ओरियन स्कूल, पोद्दार स्कूल,…
साईमत जळगाव प्रतिनिधी केसीई सोसायटी संचालित ओजस्विनी कला महाविद्यालयातील प्रा.पुरुषोत्तम विष्णू घाटोळ यांना नाशिक येथील ७९ व्या राष्ट्रीय चित्रकला प्रदर्शनातील स्पर्धेत बेस्ट पोट्रेट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानिमित्त प्रा.घाटोळ यांचा गुणगौरव केसीई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर व ओजस्विनी कला महाविद्यालयाचे प्राचार्य मिलन भामरे यांच्या हस्ते करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण नाशिक येथील डॉ. सुनंदाताई गोसावी आर्ट गॅलरी गोखले एज्युकेशन सोसायटी येथे नाशिक कला निकेतनचे सचिव प्रा.दिनकर जानमाळी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रा.घाटोळ यांच्या ” ऋषी” या जलरंगातील व्यक्तिचित्रणाला प्रोफेशनल कॅटेगिरीमध्ये बेस्ट पोट्रेट पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप सिल्वर मेडल, प्रमाणपत्र आणि आठ हजार रुपयांचा धनादेश असे आहे.…
साईमत जळगाव प्रतिनिधी मूळजी जेठा महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी द्वारे सामूहिक सूर्यनमस्कार साधना आणि व्याख्यानाचा कार्यक्रम झाला. व्याख्याते प्रा. डॉ. मनोजकुमार चोपडा, तत्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. रजनी सिन्हा आणि सोहम चे संचालक डॉ. देवानंद सोनार उपस्थित होते. सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथीचे संचालक डॉ. देवानंद सोनार यांनी प्रास्ताविकातून सूर्यनमस्कार दिनाचे महत्व विशद केले. उपस्थित योग साधक आणि विद्यार्थ्यांकडून सूर्यनमस्काराचा सामूहिक अभ्यास प्रा. स्मिता पिले यांनी करून घेतला. प्रा. डॉ. मनोजकुमार चोपडा, यांनी सूर्यनमस्कार दिनानिमित्त मार्गदर्शन करीत शरीरशास्त्रीय दृष्टीकोनातून आणि सर्वांगीण स्वास्थ्यासाठी सूर्यनमस्काराचे व्याख्यानातून पटवून दिले. डॉ. रजनी सिन्हा यांनी सूर्यनमस्कार साधनेचे आध्यात्मिक दृष्टीकोनातून महत्व या विषयी…
साईमत जळगाव प्रतिनिधी खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित ओरियन इंग्लिश मिडीयम स्टेट बोर्ड हायस्कूलमध्ये शिवजयंतीनिमित्त ‘ उत्सव माझ्या राजाचा ‘ कार्यक्रम जल्लोषात साजरा झाला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शिवकालीन शिवनेरी, रायगड सह ८० गड, किल्यांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या. यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर होते. त्यांच्यासह विचार मंचावर प्राचार्य श्रीधर सुनकरी, प्रा.प्रसाद देसाई, प्रा. संध्या महाजन आदी उपस्थित होते. यात कथाकथन व पावडा गायन झाले. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी शिवाजी महाराजांच्या शौर्याची माहिती दिली. अफजल खानचा वध आणि पावड्यांमुळे सर्वांमध्ये शौर्याचे शहारे आले. या उत्साहाच्या वातावरणामुळे उपस्थित पालक आणि शिक्षकही भारावले. जिजामाता यांची भूमिका दर्शना वासुदेव…
साईमत जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जळगाव जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त “जाणता राजा ” या महानाट्याचे आयोजन जळगाव जिल्ह्यातील शिवप्रेमी रसिकांसाठी करण्यात आले असून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पूर्वसंध्येपासून दिनांक १८, १९ आणि २० फेब्रुवारी असे तीन दिवस दररोज सायंकाळी ६ वाजता जळगाव शहरातील पोलीस कवायत मैदानावर हे महानाट्य सादर होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम व शौर्य अनुभवण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील शिवप्रेमी नागरिकांनी हे नाट्य पाहायला यावे असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. या महानाट्याच्या आयोजनातून छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि जीवन सर्वांना पाहता येणार…
साईमत जळगाव प्रतिनिधी येथील बहुभाषिक ब्राह्मण महिला संघाची सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. या सभेत पुढील दोन वर्षांकरिता संस्थापक अध्यक्षा सुधाताई खटोड यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन बहुभाषिक ब्राह्मण महिला संघाची कार्यकारिणीची निवड करण्यात आली. कार्यकारिणीत अध्यक्षपदी वृंदा भालेराव, उपाध्यक्षा प्रियांका त्रिपाठी, मृदुला कुलकर्णी, सचिव अंजली हांडे, सहसचिव वर्षा पाठक, कोषाध्यक्षा वृषाली जोशी, सविता नाईक यांची निवड झाली. प्रसंगी माजी अध्यक्ष मनीषा दायमा, प्रमुख सल्लागार स्वाती कुलकर्णी, राजश्री रावळ उपस्थित होत्या. कार्यकारिणी सदस्या मध्ये वैशाली नाईक, छाया त्रिपाठी, अनुराधा कुलकर्णी, भगवती दायमा, उषा पाठक, अश्विनी जोशी, मानसी जोशी , पुनम तिवारी, मालती वैष्णव, स्वप्नगंधा जोशी ,पुनम जोशी ,सोनल दायमा , किर्ती दायमा,गायत्री पंडित,…
साईमत जळगाव प्रतिनिधी सातारा जिल्ह्यातील उंडाळे ता. कराड येथे स्वातंत्र्य सैनिक दादा उंडाळकर यांच्या ५० व्या स्मृतीदिनानिमित्त ४१ वे स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन व माजी सैनिक मेळाव्याचे रविवारी ता.१८ ला आयोजन करण्यात आले आहे. अधिवेशनात यंदाचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार जळगावच्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांना माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप यांच्याहस्ते दिला जाणार आहे. १९९२ पासून सुरू झालेला हा पुरस्कार यापुर्वी स्वातंत्र्य सेनानी गोविंदभाई श्रॉफ, सामाजिक कार्यकर्ते मोहन धारिया, प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, न्यायमूर्ती पी. बी. सावंत, कृषितज्ज्ञ जयंत पाटील, पत्रकार पी. साईनाथ, डॉ. प्रकाश आमटे, नेत्रतज्ज्ञ तात्यासाहेब लहाने,…
साईमत जळगाव प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांनी कृषी क्रांती, अर्थ क्रांती, सामाजिक क्रांती आणि लष्करी व सांस्कृतिक क्रांती अशी पंचक्रांती देवून १७ व्या कालखंडात परकीयांना आव्हान देण्याचे काम केले. त्यातूनच या देशात मन्वंतर घडून आले. असे प्रतिपादन भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषदेचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागाच्यावतीने ‘छत्रपती शिवाजी महाराजांची लष्करी निती आणि प्रशासकीय धोरणांची आधुनिक युगातील प्रासंगिकता’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राला शुक्रवार दि. १६ फेब्रुवारी रोजी प्रारंभ झाला. या परिषदेत डॉ. सहस्त्रबुध्दे यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज – राष्ट्रबांधणी करणारे सर्वोत्कृष्ट नेतृत्व या विषयावर बीजभाषण केले. समारंभाच्या…