सूर्यनमस्कार दिनानिमित्त सामूहिक सूर्यनमस्कार साधना उत्साहात

0
2

साईमत जळगाव प्रतिनिधी

मूळजी जेठा महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी द्वारे सामूहिक सूर्यनमस्कार साधना आणि व्याख्यानाचा कार्यक्रम झाला. व्याख्याते प्रा. डॉ. मनोजकुमार चोपडा, तत्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. रजनी सिन्हा आणि सोहम चे संचालक डॉ. देवानंद सोनार उपस्थित होते.

सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथीचे संचालक डॉ. देवानंद सोनार यांनी प्रास्ताविकातून सूर्यनमस्कार दिनाचे महत्व विशद केले. उपस्थित योग साधक आणि विद्यार्थ्यांकडून सूर्यनमस्काराचा सामूहिक अभ्यास प्रा. स्मिता पिले यांनी करून घेतला.
प्रा. डॉ. मनोजकुमार चोपडा, यांनी सूर्यनमस्कार दिनानिमित्त मार्गदर्शन करीत शरीरशास्त्रीय दृष्टीकोनातून आणि सर्वांगीण स्वास्थ्यासाठी सूर्यनमस्काराचे व्याख्यानातून पटवून दिले. डॉ. रजनी सिन्हा यांनी सूर्यनमस्कार साधनेचे आध्यात्मिक दृष्टीकोनातून महत्व या विषयी मनोगत व्यक्त केले.
योगशिक्षक पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पदविका प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. सूत्रसंचालन अमिता सोमाणी यांनी केले. तर आभार लीना बडगुजर यांनी मानले. शांतीपाठाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्राचार्य डॉ. सं. ना. भारंबे यांचे विशेष सहकार्य लाभले. यशस्वितेसाठी प्रा. ज्योती वाघ, प्रा. अनंत महाजन, प्रा. सोनल महाजन, मीनाक्षी घुले यांनी परिश्रम घेतले. बी. ए. एम. ए. योगिक सायन्स, योगशिक्षक पदविका, निसर्गोपचार पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी तसेच योग- निसर्गोपचार प्रेमी साधकांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवून सामूहिक सूर्यनमस्कार साधनेचा लाभ घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here