लखनौः वृत्तसंस्था साऱ्या देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निकालाचे कल हाती आले असून, सध्या तरी भाजपने मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. भाजप तब्बल दोनशे पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. तर समाजवादी पक्षाने आतापर्यंत शतकी खेळी केल्याचे समोर येतेय. उत्तर प्रदेशमध्ये भाजपने योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढवली. भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील प्रचारात उपस्थिती लावली. दुसरीकडे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या नेतृत्त्वात समाजवादी पक्ष आणि आरएलडीने निवडणूक लढवली आहे. भाजपची जादूचा आकडा पार उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या एकूण 403 जागा आहेत. येथे बहुमत मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षाला 202 जागांची गरज आहे. सकाळी आठ…
Author: Saimat
यावल : प्रतिनिधी 9 मार्च रोजी शेतकी संघ यावल येथे युवक कांग्रेस चे नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष फैजान अब्दुल गफ्फार शाह यांचा यावल तालुका व शहर कांग्रेस कमेटीतर्फे सत्कार करण्यात आला. यावल तालुका कांग्रेस कमेटी चे अध्यक्ष व जि. प.चे गट नेते श्री प्रभाकर अप्पा सोनवाने यानी फैजान शाह याना बहु मताने विजय झाला बद्दल शुभेच्छा व्यक्त केली आणि पुढील जीवन सुखाचा आणि संघटकात्मक आपले पक्षांसाठी त्यांना वेळ देता यावा या साठी परमेश्वराला त्याला आशीर्वाद देऊ असं भावना व्यक्त केले. पक्षांनी प्रतेकांना कार्यकारणी मध्य पदे दिलेले आहेत मारुड येथे मुदाससर नझर यांनी उपाध्यक्ष आणि फैजपूर येथे जावेद जनाब यांना महासचिव पदे…
लखनौः वृत्तसंस्था उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी बरोबर आठ वाजता सुरुवात झालीय. करहल मतदार संघातून समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव आघाडीवर असल्याचे वृत्त आहे. त्यातच त्यांनी एक ट्वीट करून निकालाआधीच फटाके उडवले आहेत. आपल्या अतिशय मोजक्या आणि मार्मिक शब्दांमध्ये त्यांनी भाजपसह विरोधकांचा समाचार घेतलाय. ते म्हणतायत की, इम्तिहान बाकी है हौसलों का…पुढे ही त्यांनी अतिशय मार्मिक टिप्पणी केलीय. खरे तर प्रत्येकाचे पाच राज्यांपैकी सर्वाधिक लक्ष उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालावर लागले आहे. उत्तर प्रदेशातील मतदारांचा कौल कोणत्या राजकीय पक्षाला मिळणार यावर देशाच्या आगामी राजकारणाची दिशा ठरणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपने योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढवली. भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र…
जळगाव : प्रतिनिधी मेहरूण येथील श्री.संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिनी विशेष कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थिनींनी विविध वेशभूषा करीत महिलांच्या कर्तृत्वाविषयी माहिती सांगितली. श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे जागतिक महिला दिनी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून सहायक पोलीस निरीक्षक योगिता धनगर, डॉ. कोमल पाटील, संस्थेच्या संचालिका अर्चना नाईक, मुख्याध्यापिका शीतल कोळी आदी उपस्थित होते. प्रस्तावनेतून संस्थेचे सचिव तथा उपशिक्षक मुकेश नाईक यांनी कार्यक्रमाविषयी माहिती सांगितली. त्यानंतर राजमाता जिजाऊ, विद्येची देवता सावित्रीबाई फुले, झाशीची राणी यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी माल्यार्पण केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या कला सादर केल्या. यात…
जळगाव : प्रतिनिधी येथील जेसीआय संस्थेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पहिल्याच दिवशी ३४ महिलांनी शिबिराचा लाभ घेतला. शिबीर १८ मार्च पर्यंत सुरु आहे. जेसीआय जळगाव संस्थेतर्फे मंगळवार दि. ८ ते १८ मार्च दरम्यान भास्कर मार्केटसमोरील राम टोटल बॉडी चेकअप सेंटर येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात येत आहे. मंगळवारी शिबिराचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी शल्यचिकित्सक डॉ. ए. सी. पाटील, शल्यचिकित्सक डॉ. ए. जी. भंगाळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढीतील तांत्रिक पर्यवेक्षक लक्ष्मीकांत त्रिपाठी, डॉ. राहुल व्यास यांची उपस्थिती होती. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन…
जळगाव : प्रतिनिधी दिनांक 9 मार्च 2022 रोजी जळगाव शहर आम आदमी पार्टीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली या बैठकीत आम आदमी पार्टीचे जळगाव जिल्हाअध्यक्ष तुषार निकम व जळगाव जिल्हा सचिव रईस खान तसेच जळगाव जिल्हा सल्लागार प्रमुख.डॉ.सुनीलजी गाजरे सर या मान्यवरांनी प्रमुख उपस्थिती दिली यावेळी जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या उत्साहात उपस्थित होते. कार्यकारणी पुढील प्रमाणे जळगाव महानगर कार्य अध्यक्षपदी.योगेश दत्तात्रेय हिवरकर. जळगाव शहर महानगर सचिव. चंदन दामू पाटील व जळगाव शहर महानगर मीडिया प्रमुख.योगेश चुडामन भोई यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमा प्रसंगीउपस्थित कार्यकर्ते.अनिल वाघ, आत्माराम चौधरी. प्रीतपाल सिंग, सुभाष कोळी, रवींद्र चव्हाण कार्यकर्ते उपस्थित होते.
पुणे : प्रतिनिधी मनसेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे राज्यपालांना टार्गेट करताना दिसून आले. गेल्या काही दिवसातल्या राज्यपालांच्य वादग्रस्त वक्तव्यांवरून राज ठाकरे राज्यपालांवर मान्सुनातला पाऊस बरसावा तसे बरसले आहेत. त्यांनी राज्यपालांच्या ब्रम्हचार्याचाही खरपूस समचार घेतलाय. राज्यपालांनी एका कार्यक्रमात बोलताना, सावित्रिबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या लग्नातील वयावरून वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून राज ठाकरे आज राज्यपालांवर तुटून पडताना दिसून आले. तर छत्रपती शिवाजी महाजारांबाबत राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरही ते बरसले आहेत. आमच्याच महापुरुषांना बदनाम करायचं आणि माती फिरवून मतं मिळवायची. एवढाच उद्योग सुरु आहे. परवादिवशी भाषणात कुणीतरी मला दाखवलं, जोतिबा आणि सावित्राबाईंबद्दल बोलतो, नक्कल करुन दाखवतो. अहो तेव्हा व्हायची लग्न..…
पाचोरा -गणेश शिंदे शेतकऱ्यांना अनुदान सह धान्य पुरवठा तात्काळ होण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने शिंगाडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. तहसील कार्यालयातील शहर आणि तालुक्यातील विविध समस्या लवकर सोडविण्यासाठी पाचोरा कॉंग्रेस शिंगाडा मोर्चा दि २१ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ वाजता आठवडे बाजारातुन काढणार आहे. कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघणार आहे. या मोर्चात प्रमुख मागण्यात पाचोरा शहरातील स्वस्त धान्य दुकानातून जानेवारी २०२२ चा मोफत धान्य चा अद्याप पुरवठा झाला नाही. यात तालुक्यातील काही ठिकाणी पुरवठा बाकी आहे तो तात्काळ देण्यात यावा. शहरातील जवळपास २२०० दारिद्र्य रेषेखालील कुटुंब आहेत मात्र केवळ चार कुटुंबांना लाभ दिला जातो गेल्या विस वर्षा…
मुंबई : यास्मिन शेख मागील अधिवेशनात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना शिवीगाळ करत गोधळ घालणाऱ्या भाजप च्या ” त्या १२ ” आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी निलंबित केले होते . यावरून राजकारण चांगलेच तापले, म्हणे राज्यपाल नियुक्त ” त्या ” १२ आमदारांची नियुक्ती होत नाही, म्हणून सरकार ने १२ आमदारांना निलंबित केले. सरकार आणि विरोधी पक्ष यात सत्तासंघर्ष नेहमी सुरू राहणार फक्त खुर्ची वरील चेहेरे बदलत असतात . या १२ आमदारांची सभागृहात अनुपस्थिती ही विरोधकांचा आवाज दाबत होती की, काय त्यांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले आणि सर्वोच्च न्यायालयाने त्या १२ आमदारांचे निलंबनच रद्द केले. यामुळे भाजप चा विजय झाला असला तरी…
पूर्वार्ध जळगाव : हेमंत काळुंखे राज्य नाट्यस्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात जळगाव व भुसावळच्या नाटकांनी आपला ठसा उमटवला असून या स्पर्धेच्या निमित्ताने सांस्कृतीकदृष्ट्या मागासलेल्या जळगावला व नाट्यरसिकांना सलग विविधांगी नाटकांची अपूर्व मेजवानी मिळत आहे. नाट्यस्पर्धेचा पडदा लवकरच पडणार असून आता रसिकांना उत्कंठा लागली आहे ती या स्पर्धेत कोण बाजी मारणार? कोण-कोणती नाटके चमकणार? हौशी कलावंतापैकी कोणाला पारितोषिक मिळणार याबाबतची.यंदाचे वैशिष्ट म्हणजे या स्पर्धेत जळगाव शहरासह जिल्ह्यातील 11 संस्थांनी सहभाग नोंदविला असून भुसावळच्या तीन तर मध्यप्रदेशातील एका संस्थेनेही हजेरी लावली आहे. कोणतीही स्पर्धा म्हटली की, त्यात चुरस निर्माण झाालीच पाहिजे.ती यंदाही दिसून आली. स्पर्धेत जय-पराजय वाट्याला येतोच मात्र स्पर्धेत भाग घेणेे ही सर्वप्रथम…