जळगाव : प्रतिनिधी शहरातील शिवाजी नगर परिसरातील हरी ओम नगर जवळील नाल्यात आज सायंकाळी 6 ते 7 वाजेच्या सुमारास मृतदेह आढळून आला. याबाबत सविस्तर असे की, शिवाजी नगर परिसरातील दत्तात्रय नगरातील रहिवासी गजानन मोहन पवार (वय 41) हे गेल्या 7 तारखेपासून घरातून कुणाला काही एक न सांगता निघून गेले होते. परिवारातील सदस्यांनी शोधले असता सापडले नसल्याने त्यांनी शहर पोलीस स्थानकात हरवल्याची नोंद केली होती. मात्र आज 5 दिवसांनी पवार यांचा मृतदेह घराजवळील नाल्यात आढळला. सापडलेल्या मृतदेह बघून घात आहे की अपघात आहे हे मात्र तूर्तास सांगणे अनुचित नसेल. घटनास्थळी तात्काळ शहर पोलीस स्थानकाचे कर्मचारी पोहोचले होते.
Author: Saimat
जळगाव : प्रतिनिधी येथील सोयो सिस्टिम्स प्रा.लि.चे संचालक किशोर ढाके यांचे वडील भालोद येथील न्यू इंग्लिश स्कूलचे सेवा निवृत्त शिक्षक डालू कृष्णा ढाके (वय ८३) यांचे आज रोजी दुपारी १ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात १ मुलगा, सुन, ३ मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर उद्या जळगाव येथील नेरीनाका स्मशानभूमीत अंतिमसंस्कार होणार असून त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरुन दि. १३ रोजी १० गजानन हाऊसिंग सोसायटी, चर्च जवळ, येथून सकाळी ९ वाजता निघेल.
सोयगाव : प्रतिनिधी संभाजीनगर समाज कल्याण सभापती मोनाली राठोड यांनी जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना तीनचाकी स्कुटर मंजूर केल्या होत्या त्यानुसार जिल्ह्यातील ७० दिव्यांग बांधवांना तीनचाकी स्कुटरचे वाटप करण्यात आले. यावेळी संभाजीनगर शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड यांच्या हस्ते व समाज कल्याण सभापदी मोनालीताई राठोड यांच्या हस्ते जिल्ह्यातील ७० दिव्यांग बांधवांना मंजूर करण्यात आलेल्या ७० तीनचाकी स्कुटरचे वाटप करण्यात आले यावेळी दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते संभाजी नगर समाज कल्याण सभापती मोनाली राठोड व संभाजी नगर शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांच्या प्रयत्नातून तीनचाकी स्कुटरची मंजुरी मिळाली व स्कुटरचे वाटप देखील झाले. यामुळे समाधानी असलेल्या दिव्यांग बांधवांनी संभाजीनगर शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेंद्र…
बोदवड : प्रतिनिधी तालुक्यातील मनुर खुर्द येथे देशी दारू गावठी दारू खुलेआम विक्री केली जात असल्या बाबत सबंधीतांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी पोलीस निरीक्षकांना निवेदनाद्वारे सरपंच स्वाती हाडपे यांनी केली आहे. सदर मागणीचे निवेदन बोदवड पोलिस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना देण्यात आले. यावेळी मनूर खुर्द च्या सरपंच स्वाती अमोल हाडपे, उपसरपंच गणेश सोनवणे , ग्रामपंचायत सदस्या इंदुबाई धनगर, गीता धनगर, सरला वांगेकर, शोभाबाई गावंडे, पोलीस पाटील नितीन पाटील , तुषार सोनवणे , अमृत हाडपे, माणिक बोरसे , नामदेव धनगर , पांडुरंग धनगर आणि अविनाश श्याम सुंदर पाटील आदींची उपस्थीती होती. दरम्यान , सदर प्रकार एकट्या मनुर…
चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव नगरपालिकेच्या दर्ज्याहीन विकासकामांची नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांनी दखल घेतली असून त्यांनी गुणनियंत्रण सक्षम अधिकारी यांच्या मार्फत सर्व कामाची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. चाळीसगाव बचाव कृती समिती ने दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, गत वर्षी अतिरिक्त पर्जन्यमान असल्यामुळे शहरात सर्वत्र खड्डे आणि धुळीचे साम्राज्य तयार झाले आहे. वाढीव पाणीपुरवठा योजना गेल्या 36 ते 40 महिन्यापासून काम सुरू आहे. त्यात मलनिस्सारण योजना कार्यरत असल्याने रस्ते करण्यास तांत्रिक अडचण शासन स्तरावर निर्माण झाली आहे. ठरलेल्या मुदतीत काम पूर्ण झाले असते तर शहरातील नागरिकांचे हाल टाळता आले असते. त्यात कामात निकृष्ट दर्जा असल्याने भविष्यात योजना किती योग्य पद्धतीने…
कजगाव : प्रतिनिधी ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरात कजगावच्या केटीव्ोयरचा भराव वाहुन गेला होता. यामुळे केटी व्ोयरला गळती लागल्याने केटीव्ोयरने तळ गाठला आहे तर दुसरीकडे चमकवाडी भागातील पाझर तलावाला गळती लागल्याने तो कोरडा पडला असून बरड भागातील विहिरीच्या जल पातळ्या तळ गाठण्यास सुरुवात झाली आहे. या महत्वपूर्ण बाबीकडे संबधित खात्याने तात्काळ लक्ष देऊन कजगाव केटी व्ोयर भरावचे व पाझर तलावच्या दुरुस्तीचे काम सुरू कराव्ो अशी मागणी होत आहे. यासाठी आमदार किशोर पाटील यांनी शासन दरबारी ठोस पाठपुरावा करून वरील कामा साठी तात्काळ निधी उपलब्ध करावा अशी मागणी होत आहे ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरात कजगाव च्या केटी व्ोयर चे दोघ बाजुचा भराव वहाता झाल्याने…
जळगावःप्रतिनिधी येथील महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी अपर आयुक्त विद्या गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. सोबत कार्यालय अधीक्षक चंद्रकांत वांद्रे, सुरेश कोल्हे, आस्थापना अधीक्षक लक्ष्मण सपकाळे, भालेरा, महापौर, पी.ए.नितीन पटव्ो यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
मुंबईः प्रतिनिधी पुढील काही दिवस मुंबईतल्या बहुतांश शाळा पुन्हा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारपासून विद्यार्थ्यांना शाळेत बोलवण्यात येणार नाही, असा निर्णय अनेक स्टेट बोर्डाच्या शाळांनी घेतला आहे. कारण येत्या मंगळवारपासून दहावीच्या परीक्षा सुरु होणार आहे. बहुतांश शाळांमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचे केंद्र देण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांची सोय व्हावी, याकरिता इतर इयत्तांच्या वर्गांची शिकवणी ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. 15 मार्च ते 04 एप्रिल या कालावधीत दहावीच्या परीक्षांचे नियोजन आहे. त्यामुळे या काळात इतर वर्ग ऑनलाइन भरवण्यात येतील आणि दहावीची परीक्षा संपल्यानंतर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्यात येईल, असा निर्णय अनेक शाळांनी घेतला आहे. कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर रुग्णांचे…
मुंबई : शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे . सामान्यतः शनिदेवाचा स्वभाव अत्यंत तापट मानला जातो पण हे खरं नाही. खरे तर शनिदेव हे न्यायाचे देवता आहेत, जे लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. जेव्हा गरज असेल तेव्हा शिक्षा आणि. असे म्हटले जाते की प्रत्येक व्यक्तीला जीवनात कधी ना कधी शनी सदेशाती , महादशा, धैय्या इत्यादी मार्गातून जावे लागते, परंतु जर तुमचे कर्म चांगले असेल तर या अवस्थेतही तुम्हाला कधीही त्रास होणार नाही. म्हणून तुमचे कर्म सुधारा. असे म्हटले जाते की एखाद्या व्यक्तीच्या कर्माने शनिदेव प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीचा आशीर्वाद मिळतो , तर त्याचे भाग्य उजळते. त्याला पदावरून राजा व्हायला वेळ…