मेष : मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असेल. कापड व्यवसायात आज चांगला फायदा होईल. भविष्याचा विचार करून तुम्ही गुंतवणूक करू शकता. सासरच्यांशी चांगली चर्चा होईल. नोकरीत यश मिळेल. कोणत्याही जबाबदारीच्या कामात निष्काळजीपणा करू नका. आज ८१% नशिबाची साथ आहे. गरजू लोकांना मदत करा. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांना या दिवशी शुभ माहिती मिळू शकते. घरातील जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या दिशेने तुम्ही काही नवीन निर्णय घेऊ शकता. व्यवसाय, नोकरी चांगली राहील. वडिलांच्या कार्यात तुमचे सहकार्य वाखाणण्याजोगे असेल. कामात सहकाऱ्यांना तुमचा हेवा वाटू शकतो. आज ८०% नशिबाची साथ आहे. शिवलिंगाला पाणी अर्पण करा. मिथुन : मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असेल. तुमच्या मनात काही…
Author: Saimat
जळगाव : प्रतिनिधी शहरातील शनीपेठ पोलीस स्टेशन हद्दीत असलेले गवळीवाडा व काट्या फैल या भागात दोन गटांमध्ये रविवारी रात्री ९ ते १० वाजेच्या सुमारास दगडफेक झाल्याचे समजतात शनिपेठ पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी दाखल होताच. पुढील अनर्थ टळला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शनिपेठ पोलिस स्थानक हद्दीत असलेला गवळीवाडा व काट्या फैल या परिसरात रात्री नऊ वाजेनंतर काही तरुणांमध्ये वाद झाल्याने दोन गटात दगडफेक झाली. या घटनेनंतर तत्काळ घटनास्थळी पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांच्यासह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या दगडफेकीत चार चाकी गाडीचे नुकसान झाल्याचे समजते. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या आदेशाने तत्काळ, अप्पर अधीक्षक चंद्रकांत…
मुंबई प्रतीनिधी राज्यभरात एकाच दिवशी न्यायालयांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या वर्षातील पहिल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 17 लाख 51 हजार 211 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. या माध्यमातून वाहतूक विभागाला 69 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा महसूल मिळाला आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील ३४ जिल्हा विधी सेवा प्राधिकरणे, ३ उच्च न्यायालय विधी सेवा समिती/ उपसमित्या आणि ३०९ तालुका विधी सेवा समित्या येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १ हजार ४८७ पॅनल ठेवण्यात आलेली होती. या पॅनलसमोर ६५ लाखांपेक्षा जास्त दाखलपूर्व प्रकरणे आणि ४ लाख प्रलंबित प्रकरणे अशी एकूण ६९ लाख प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी १६ लाख ६८…
प्रतीनिधी भडगाव कजगाव ता.भडगाव पंचायत समिती भडगाव श्री. माताजी चॅरिटेबल ट्रस्ट चाळीसगांव प्राथमिक आरोग्य केंद्र कजगाव तर्फे सावित्रीच्या लेकी चा सन्मान दि.१३ रोजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता मान्यवरांच्या उपस्थितीत कजगाव सह परिसरातील २५० महिलांचा पुष्पगुच्छ ट्राफि देऊन सन्मान करण्यात आला भडगाव पंचायत समिती, श्री.माताजी चॅरिटेबल ट्रस्ट व कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने सावित्रीच्या लेकीचा सन्मान यात कजगाव प्राथमिक केंद्रा अंतर्गत येणाऱ्या परिसरातील गावातील सन्मान सोहळ्यात आशा स्वयंसेविका, बचत गटांच्या महिला,अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका सह कोरोना काळात काम करणाऱ्या महिला सह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ, ट्राफि देऊन गौरविण्यात आले प्रसंगी अनेक…
प्रतीनिधी भडगाव कजगाव ता.भडगाव कजगाव चे मंडळ कार्यालय तलाठी कार्यालय तसेच पोलीस मदत केंद्र यांच्या उडणाऱ्या छताला दगडा चा सहारा घेत छत वाचवावे लागत आहे मोडकळीस राज्यआलेल्या या वास्तू च्या जागी नवीन वास्तू उभारण्यात यावी अशी मागणी केली जात आहे कजगाव हे परिसरातील पन्नास खेड्याचे व्यापारी केंद्र मोठी बाजारपेठ असल्याने सदैव येथे यात्राच भरते अशा या महत्वपूर्ण गावात तलाठी कार्यालय, मंडळ कार्यालय, पोलीस मदत केंद्र हे एकाच वास्तुत कार्यरत आहे मात्र सदर ची वास्तु हि पुर्णपणे मोडकळीस आली आहे वास्तविक पाहता मंडळ कार्यालय व तलाठी कार्यालय हे दोघ कार्यालय अत्यंत महत्त्वाचे आहे या ठिकाणी महत्वाचे कागदपत्रे असतात मात्र या कार्यालया…
भडगाव प्रतीनिधी : अमीन पिंजारी तालुक्यातील वाडे येथील रहिवाशी व भडगावचे पञकार अशोक महादु परदेशी यांना आदर्श पञकार समाजभुषण जिवन गौरव पुरस्कार महाराष्टृ राज्य या राज्यस्तरीय पुरस्काराने शिवमल्हार गड भोर. जि. पुणे येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मानपञ व मानाची मल्हार पगडी या मराठमोळया सन्मानाने सन्मानीत करण्यात आले. हा पुरस्कार शिव मल्हार गड, शिवमल्हार प्रतिष्ठान व वाघ्या मुरळी परीषद महाराष्टृ राज्य यांच्या मार्फत प्रदान करण्यात आला. शिव मल्हार गड भोर जि. पुणे येथे दि. २ मार्च २०२२ रोजी महाशिवराञीच्या दुसर्या दिवशी आयोजीत शिव मल्हार महोत्सवात पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल पञकार अशोक परदेशी यांचे सर्वस्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.…
मुंबईः प्रतिनिधी देशातीलच नाही तर जगात औद्योगिक क्षेत्रात ज्या घराण्याचा दबदबा होता ते घराणे म्हणजे अंबानी. धीरुभाई अंबानींचा आदर्श घेणारे अनेक उद्योजक आजही वेगवेगळ्या देशात आहेत. मात्र आता अंबानी बंधूमधील धाकटे बंधू अनिल अंबानी यांची रिलायन्स कॅपिटल कंपनी कर्जदार झाली आहे. गौतम अदानी यांची कंपनी अदानी फायनान्शिअल सर्व्हिसेस, केकेआर, पिरामल फायनान्स आणि पूनावाला फायनान्ससह 14 मोठ्या कंपन्यांनी ही कंपनी खरेदी करण्यासाठी सरसावल्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने नियुक्त केलेल्या प्रशासकाकडून बोली लावण्याची तारीख 11 मार्च ते 25 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. खरेदीसाठी या कंपन्या सरसावल्या अंबानीच्या रिलायन्स कॅपिटल कंपनीला खरेदी करण्यासाठी वर्दे पार्टनर, मल्टिपल फंड, निप्पॉन लाइफ, जेस्सी फॉलॉवर्स, ब्रूकफिल्ड, अपोल्लो…
सोयगाव : प्रतिनिधी सोयगाव तालुक्यात उन्हाची दाहकता वाढू लागल्याने तसेच पाझर तलाव, कोरडे पडत असल्याने वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी सोयगाव वनविभागाकडून सोयगाव वनपरिक्षेत्रामधील पाणवट्यामध्ये पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे, सोयगाव वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ यांच्या वन्यप्राण्यांचा प्रश्न गांभीर्याने घेऊन पाझर तलाव कोरडे पडलेल्या वनक्षेत्रामध्ये पाणवटे भरण्यासाठी तत्परता दाखवून आपल्या परिक्षेत्रात येणाऱ्या बहुतांश ठिकाणी पाणवटेमध्ये पाणी भरून वन्यप्राण्यांच्या तहानेचा प्रश्न सोडविला आहे, जरंडी शिवार, बहुलखेडा शिवार याठिकाणी पाणवटे मध्ये पाणी सोडण्यात आले असून ज्या ठिकाणी पाणवटे नाहीत अशा ठिकाणी लवकरच पाणवटे तयार करण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ यांनी माहिती दिली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ व सहायक वनरक्षक सिल्लोड पुष्पा…
सोयगाव : प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील वेताळवाडी किल्ला व अजिंठा लेणी परिसरात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी राज्यस्तरीय पर्यटन विकास योजनेतून 5 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून याबाबत तातडीने अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहेत. महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले आहे. सिल्लोड – सोयगाव मतदारसंघातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे गरजेचे असल्याने महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मतदारसंघातील किल्ले संवर्धन व पर्यटन संख्येत वाढ व्हावी यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जंजाळा किल्ला, वेताळवाडी किल्ला, घटोत्कच लेणी, अजिंठा…
भुसावळ : प्रतिनिधी जळगांव रोडवरील रेल्वे उड्डाण पुलाजवळ मोटरसायकल चालकाने स्पीडब्रेकर समोर आल्याने अचानक ब्रेक लावल्याने मागून येणारी चारचाकी वाहन क्रमांक एम.एच 06 ए.एफ.6388 काळ्या रंगाची ह्या वाहनाचे चालकाकडून ब्रेक न लागल्याने मोटरसायकल चालकास वाचविण्यासाठी विजेच्या खांबाला धडक देऊन मोटरसायकल चालकाचे प्राण वाचविले या दरम्यान चारचाकी मधील चार प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहे. खांबाला वाहनांची धडक लागल्याने चारचाकी वाहनाचे अंदाजे एक लाख रुपये पर्यतचे नुकसान झाले आहे.घटनेची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक नियंत्रणात आणून सुरळीतपणे सुरू केली.