चंदीगड: वृत्तसंस्था पंजाबमधील सत्ता जाताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर या पाचही राज्यातील प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे मागितले होते. त्यानुसार सिद्धू यांनी राजीनामा दिला आहे. हायकमांडच्या इच्छेनुसारच राजीनामा देत असल्याचं सिद्धू यांनी म्हटलं आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरच्या प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्यास सांगितलं होतं. प्रदेश कमिट्यांचे पुनर्गठन करण्यासाठी हे राजीनामा मागण्यात आल्याचं ट्विट काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केलं होतं. त्यामुळे आता उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडच्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचेही राजीनामे एक दोन दिवसात येण्याची शक्यता वर्तवली…
Author: Saimat
फैजपूर ता. यावल : प्रतिनिधी गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारी मुळे बंद असलेली अखंड महाराष्ट्राचे दैवत असलेले येथील खंडोबा देवस्थानची यात्रा कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून उद्यापासून सुरू होत आहे. दिनांक १७ मार्च ते २४ मार्च दरम्यान ही यात्रा भरणार असून यात्रा विश्वासाठी पोलीस प्रशासन, नगरपालिका, वीज वितरण कंपनी, मंदिर देवस्थान व अन्य घटक सज्ज असल्याचे देवस्थानचे गादिपती महामंडलेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या यात्रोत्सवात भाविकांनी खंडोबा देवाला मानलेला मान, कर्ण छेदणाचे कार्यक्रम शहरात मोठ्या प्रमाणात होणार आहे. यासह वेगवेगळी खेळणी, आकाश पाळणे, ब्रेक डान्स, मौत का कुवा, भांड्याची दुकाने, हॉटेल आधी दुकाने थाटण्यात आलेली आहे. यात्रा…
माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे वृद्धपकाळाने आज पहाटे निधन झाले. ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भाजपच्या माजी आ.स्नेहलता बिपीन कोल्हे यांचे ते सासरे होते. त्यांच्या कार्यकाळात सहकारमंत्री , कृषी मंत्री , परिवहन मंत्री, महसूलमंत्री असे मंत्री पद त्यांनी भूषवले आहे. कोपरगाव तालुक्यातुन सलग ३५ वर्ष महाराष्ट्र विधिमंडळावर आमदार म्हणून निवडून आले आहे. वयाच्या एकविसाव्या वर्षी सरपंच पदापासून राजकारणाची सुरुवात केली होती . त्यांनी पाठ पाण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांचा अंत्यविधी 4.30 वाजता कोपरगाव येथील इंजिनिअरिंग कॉलेज येथे होणार आहे.
मेष : आजच्या दिवशी मेष राशीचे लोक आपल्या ज्येष्ठांचा आणि सज्जनांचा आदर करण्यात पुढे असतील. आज तुमच्या प्रतिभेने नशीब उजळेल आणि तुम्हाला सर्व कामात यश मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये संवेदनशीलता दिसून येईल, त्यामुळे आज विचारपूर्वक बोलावे. आज ६०% नशिबाची साथ आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कामाच्या दृष्टीने चांगला आहे. नवीन मित्राच्या मदतीने तुम्हाला तुमच्या योजनांमध्ये अपेक्षित यश मिळेल. आज आर्थिक स्थिती चांगली राहील, पण अचानक खर्चही वाढणार आहेत. आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज ८५% नशिबाची साथ आहे. गाईला हिरवा चारा द्या. मिथुन : आजच्या दिवशी मिथुन राशीच्या लोकांचे नशीब चांगले राहील. तुम्ही तुमच्या मित्र आणि ओळखीच्या…
जळगाव : प्रतिनिधी कोरोनाच्या प्रार्दूभावाने गेल्या दोन वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधी नसल्याने जिल्ह्यातील विकासकामे थोडी मंदावली होती, मात्र 2020 मध्ये मक्तेदारांनी विकासकामांना जोमाने सुरुवात केली. मात्र या विभागात दोन वर्षांची कामांपोटी मक्तेदारांचे 250 कोटी रुपयांची देयके प्रलंबित आहे तर राज्यशासनाचे पथदर्शी योजना असलेल्या ग्रामविकास मंत्रालयाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कामांपोटी मक्तेदारांचे सुमारे 100 कोटी रुपयांचे देयके प्रलंबित असल्याने जिल्ह्यातील मक्तेदार हवालदिल झाले असून जिल्ह्याच्या पायाभूत सुविधांना खोडा बसतो की काय? असा सवाल उभा राहिला आहे. दरम्यान, प्रलंबित निधीच्या देयकांसाठी नागपूर विभागातील मक्तेदारांनी शासनाला कामबंद करण्याचा इशाराही दिला आहे. असाच इशारा आपल्या जिल्ह्यातूनही दिल्या जाण्याची खात्रीलायक वृत्त आहे. जिल्ह्यात यंदाच्या अर्थसंकल्पात…
मलकापूर : प्रतिनिधी चुकीच्या धोरणांमुळे नळगंगा नदीला गटार गंगेचं स्वरूप प्राप्त झाले. दुष्काळी परिस्थितीत खोलीकरण करण्यात आल्याने जलस्त्रोतात वाढ झाल्याची शेखीही मिरवण्यात आली. दरम्यान जलस्त्रोतांच्या भविष्यातील भवितव्याबाबतचा दूरदृष्टीकोन मात्र बाळगण्यात आला नाही. त्यामुळे गावगाड्यातील सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे नदी मरणासन्न अवस्थेत असून शेवटच्या घटका मोजू लागली आहे. तरीही नगर पालिकेने सांडपाण्यावर उपाय योजना करण्याऐवजी जलपर्णी काढण्याच्या कामावर लाखो रुपये खर्च करून केवळ ठेकेदारांना पोसण्यातच धन्यता मानली. या घोडचुकीमुळेच आज मितीस नळगंगा नदी पात्राची दुरावस्था झालेली दिसत आहे. कधीकाळी स्वच्छ व नितळ पाण्याने बारामाही खळखळून वाहणारे नदी पात्र नळगंगा धरणाच्या निर्मितीमुळे कालांतराने ओस पडत गेले. केवळ पावसाळ्यातच नदीला पाणी वाहते राहीले. धरणातील…
जळगाव ः प्रतिनिधी येथील लाइफ इज ब्युटिफुल फाउंडेशन आयोजित मल्हार हेल्प फेअर-4 प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी जळगावकरांनी प्रचंड उत्साहाने आपला सहभाग नोंदवत सेवाकार्याच्या कुंभमेळ्याला निरोप दिला. या माध्यमातून सेवा आणि सदाचाराचा एक सोहळाच जणू जळगावकरांनी अनुभवला. समारोप कार्यक्रमात उत्कृष्ट सेवा संस्था व स्वच्छतादूतांचा सन्मान करण्यात आला. फेअरमध्ये यंदा एकूण 60 समाजसेवी संस्था व 26 सेवा महर्षी फेअरमध्ये सहभागी झालेत. सोमवारी समारोप कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, ॲड. ललिता पाटील, डॉ. केतकी पाटील, मिस मल्टिनॅशनल तन्वी मल्हारा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून मुंबई येथील समतोल फाउंडेशनचे अध्यक्ष विजय जाधव हे होते.…
जळगाव : प्रतिनिधी सध्या मराठी शाळांसमोर इंग्रजी माध्यमाचे मोठा आव्हान उभे ठाकले आहे. यातच जिल्हा परिषद शाळांना नव्या युगाच्या आव्हानाशी जुळवून घेतांना अडचणी येत आहेत. यामुळे शिक्षकांनी दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून याला तोंड देण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. तालुक्यातील चिंचोली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील दोन नवीन खोल्यांचे लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. दरम्यान, जिल्ह्यात यंदा तब्बल 108 नवीन शाळा खोल्या उभारण्यात आल्या असून यापुढे देखील याच गतीने कामे होतील अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी मंजूर झालेल्या चिंचोली येथील शाळा खोल्यांचे लोकार्पण आज ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ना.…
मुंबई यास्मिन शेख राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी इडी च्या कारवाही विरोधात दाखल केलेली याचिका फेटाळून लावत न्यालायने मलिक यांना चपराक दिली असून मलिक यांच्या अडचणी वाढत असल्याचे अंदाज लावला जात आहे . नवाब मलिक यांना ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली ती अटक बेकायदेशीर असल्याचं सांगत नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात ईडीच्या कारवाई विरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिकांची याचिका फेटाळून लावली आहे. नवाब मलिकांच्या या याचिकेवर ईडीच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद केला आणि पीएमएलएचा कायदा लागू होतो असं ईडीने म्हटलं. त्यानंतर उच्च न्यायालयाने नवाब मलिकांच्या वकिलांचा युक्तीवाद फेटाळून लावला. तसेच नवाब मलिकांना…