यावल : प्रतिनिधी तालुकयातील सांगवी या गावातील एका शाळेत १३ वर्षीय अल्पवयीन विध्यार्थीनीचे ११ वीतील दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांने आक्षेपार्ह फोटो काढून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना सांगवी ता.यावल येथे घडली आहे. या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून पोस्को अन्वये गुन्हा झाला आहे. यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक शाळेतील विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून ती मंगळवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास शाळेच्या पायरीवर बसलेली असताना डोंगर काठावरील दोन ११ वीतील विध्यार्थी तेथे आले. व तिचा आक्षेपार्ह फोटो काढत विनयभंग केला. हा प्रकार विद्यार्थिनीने मुख्याध्यापकांना सांगितला असता त्यांनी मोबाईल मधील फोटो डिलीट केले. मात्र, विध्यार्थीनीच्या नातेवाईकांनी याबाबत यावल पोलिसांत तक्रार दिली आहे. पुढील…
Author: Saimat
जळगाव : प्रतिनिधी शहरातील रेल्वे स्टेशनजवळच असलेल्या नवीपेठ परिसरात एका घरात चोरी झाल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले आहे. लोखंडी खिडकीचे गज वाकवून चोरट्यांनी अंदाजे 16 ते 18 लाखांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली आहे. नवीपेठ परिसरात पत्र्या हनुमान मंदिर समोर बॉम्बे लॉजच्या गल्लीत राजू गोविंद अग्रवाल (वय 52) हे परिवारासह वास्तव्यास आहेत. त्यांचा मोबाईल रिपेअरिंगचा व्यवसायातून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दि.24 मार्च रोजी ते दुपारी पुणे येथे मुलगा अखिल अग्रवाल याच्याकडे गेले होते. तत्पूर्वी त्यांची बहीण सुरेखा नंदू भावसार या दुबई येथे मुलाकडे जाणार असल्याने त्यांनी सोन्याचे दागिने राजू अग्रवाल यांच्या घरी ठेवले होते. चोरट्यांनी रेल्वेच्या बाजूने येत…
जळगाव ः प्रतिनिधी शहरातील शनिपेठ परिसरातील काट्या फैल येथे 38 वर्षीय महिलेचा घरात पाय घसरुन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना दि.29 रोजी घडली. याबाबत शनिपेठ पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर असे की, शहरातील शनिपेठ परिसरातील काट्या फैल येथील मोना इम्रान सैय्यद (वय 38) यांचा घरात काम करत असतांना पाय घसरुन डोक्यावर पडल्याने मृत्यू झाल्याची घटना दि.29 रोजी सकाळी घडली. त्यांना लागलीच परिवाराने शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात हलविले असता महाविद्यालयाचे डॉ.सचिन अहिरे यांनी त्यांना मयत घोषित करून शनिपेठ पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याचा तपास पोलिस हवालदार अमोल विसपुते करीत आहे.
मुंबई : सकाळचा नाश्ता आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. म्हणूनच सकाळी आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करणे महत्त्वाचे आहे. ते तुमची ऊर्जा पातळी राखण्यासाठी काम करते. तुम्ही तळलेले आणि अस्वास्थ्यकर अन्नाऐवजी काही आरोग्यदायी पर्याय निवडू शकता जे ऊर्जा पातळी वाढवण्यास आणि चयापचय गतिमान करण्यास मदत करतात. तुम्ही पपई, भिजवलेले बदाम आणि भाज्यांचे रस इत्यादी अनेक गोष्टी सकाळी नाश्त्यात (Breakfast) घेऊ शकता. हे वजन कमी करण्यास देखील मदत करतील. चला जाणून घेऊया असे कोणते पदार्थ आहेत जे तुम्ही नाश्त्यात रिकाम्या पोटी घ्यावेत. या 5 आरोग्यदायी पदार्थांचा नाश्त्यामध्ये समावेश करा! पपई सकाळच्या नाश्त्यामध्ये पपईचा समावेश करणे खूप जास्त फायदेशीर आहे. पपईमध्ये फायबर जास्त प्रमाणात…
मेष: आज मेष राशीचे लोक कामाच्या ठिकाणी संपूर्ण वेळ व्यस्त असतील. काही रखडलेले प्रकल्प आता वेगाने सुरू होतील. नोकरदार लोकांचा प्रभाव वाढू शकतो. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी चांगल्या संधी मिळतील. काही चांगले बदल देखील होऊ शकतात. सरकारी कामात पैसे गुंतवण्याची शक्यता आहे. पैशाच्या व्यवहारात यश मिळेल. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांचे आरोग्य आणि कौटुंबिक जीवन आनंदी राहील. आज तुमचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे, तुमच्याकडे नवीन गोष्टी येतील ज्यामुळे तुमची सामाजिक स्थिती सुधारेल आणि तुमचे उत्पन्न वाढेल. नातेवाईक आणि मित्रांशी तुमचे संबंध सुधारतील. उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात. नवीन कामात भरपूर यश मिळेल. सासरच्यांशी चर्चा होईल. मिथुन: आज मिथुन राशीच्या…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी दि.२९मार्च २०२२ वार :- मंगळवार रोजी सप्ताहाची सांगता झाली. यामध्ये प.पु.वैकुंठ वासी रामकृष्ण नाईक (दादा) यांच्या आशिर्वादाने , ह.भ.प.भागवत महाराज गाडेकर यांच्या कुशल मार्गदर्शनाने ह.भ.प.श्री रवींद्र महाराज परेराव यांच्या संगीतमय भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. व दररोज रात्री ह।भ.प.श्री नारायण महाराज ढासाळेकर, अरुण महाराज जामठीकर, सौ.साक्षीताई भगत चौधरी, मनोज महाराज ऐनगाव, ताराचंद महाराज पाटील, आळंदी देवाची, गोरक्षनाथ महाराज काकडे ,वाघलगांव , रमेश महाराज पाटील, सुसरीकर आदी महाराजांची साप्ताहिक किर्तने झाली ह.भ.प.रवींद्र महाराज परेराव यांच्या काल्याचे कीर्तनाने सांगता झाली. यावेळी संस्थान व ग्रामस्थ मंडळी यांनी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणें विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान व ग्रामस्थ…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील मौजे.कंकराळा येथे दि.२९ रोजी गावांची भुमीपुत्री रेणुका देविदास राजपुत (परदेशी) यांची MPSC मार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत उत्तीर्ण होवून पोलिस उपनिरीक्षक(PSI) या पदी निवड झाली त्याबद्दल सोयगाव तालुका प्रशासकीय यंत्रणा व कंकराळा ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला होता , यावेळी कार्यक्रमाला उपस्थित सोयगाव तहसिलदार रमेश जसवंत, गटविकास अधिकारी प्रकाश नाईक , पोलिस निरीक्षक सुदाम शिरसाट , विस्तार अधिकारी साळवे , शिवसेना तालुका प्रमुख प्रभाकर आबा काळे , तालुका संघटक दिलीप मचै , जि.प.सदस्य गोपीचंद जाधव , पंचायत समिती सदस्य संजिवन सोनवणे , लोकनियुक्त सरपंच चंदाताई राजपुत , उपसरपंच मनिषा जैस्वाल , ग्रामसेवक एस.बी.पुल्लेवाड , मुख्याध्यापक…
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत चार ठिकाणी भाजपने आपले वर्चस्व प्रथापित केले. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने दणदणीत विजय मिळविला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसबद्दल (Congress) मोठे वक्तव्य केले आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने (AAP) काँग्रेसला जोरदार धक्का दिला. यानंतर येत्या काळात काँग्रेसची जागा आप घेईल, असे गडकरी म्हणाले. राजकीय घडामोडी पाहता काँग्रेस पक्ष कमी होत असताना त्याची जागा प्रादेशिक पक्ष घेत आहे. मात्र हे लोकशाहीसाठी घातक असल्याचे गडकरी म्हणाले. एका मुलाखतीत त्यांना विरोधक आणि लोकशाही यावर प्रश्न विचारण्यात आला. यावेळी बोलताना नितीन गडकरींनी काँग्रेसबद्दल भूमिका मांडली. काँग्रेस पक्षाला मजबूत होण्याची गरज आहे. लोकशाही ही सत्ताधारी पक्ष आणि…