जळगाव : प्रतिनिधी समर्थ बहुउद्देशीय संस्था जवखेडे बु ता. एरंडोल जि. जळगाव या संस्थेने एरंडोल व धरणगाव या तालुक्यात पथनाट्याद्वारे शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व जिल्हा माहिती कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्यायाच्या योजनांचा जागर समर्थ बहुउद्देशीय संस्थेच्या कलावंतांनी धरणगाव व एरंडोल या दोन्ही तालुक्यात मिळून एकूण १४ गावात करण्यात आला या जागर अभियानाअंतर्गत शासनाच्या विविध कल्याणकारी योजना या लोककलेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यात आल्या शासनाच्या अशा बऱ्याच योजना आहेत, ज्या जनसामान्य ग्रामीण भागाच्या लोकांना माहिती नाही म्हणून त्या योजना या दुर्लक्षित केल्या जातात व त्या योजनांचा कोणीही लाभ घेत नाही पण पथनाट्य…
Author: Saimat
जळगाव :प्रतिनिधी युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई खान्देश दौर्यावर आले आहे. काल त्यांनी जळगावात आयोजित युवा सेना निश्चय दौर्यात वेळात वेळ काढून शहरातील आकाशवाणी चौकाजवळ कार्यान्वित ‘महापौर सेवा कक्ष’ला सदिच्छा भेट दिली. युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी शहरातील आकाशवाणी चौकाजवळ कार्यान्वित ‘महापौर सेवा कक्ष’ला सदिच्छा भेट दिली. तसेच तेथील कार्यरत सहकार्यांकडून संपूर्ण कार्यप्रणाली समजावून घेत वर्षभरात जवळपास दहा हजारांवर जळगावकरांच्या समस्या/तक्रारींचे निवारण झाल्याची माहिती जाणून घेतली. त्यात नागरिकांकडून तक्रार आल्यानंतर तिचा पाठपुरावा महापालिका आयुक्त, उपायुक्त व संबंधित अधिकार्यांकडे केला जातो. त्यानंतर ती सोडविल्याचे महापालिकेकडून ‘महापौर सेवा कक्ष’च्या प्रतिनिधींना सांगितल्यानंतर पुन्हा नागरिकांशी संवाद साधून ती निवारण झाल्याचे कळविले जाते. ‘कोविड-19’च्या…
जळगाव : प्रतिनिधी भारतातील प्रथम क्रमांकाच्या आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सूक्ष्मसिंचन प्रणाली उत्पादन करणाऱ्या जैन इरिगेशन कंपनीने 29 मार्च 2022 ला झालेल्या सर्व कर्जदारांच्या संयुक्त सभेत ‘कर्ज निराकरण योजना’, 10 फेब्रुवारी 2022 रोजीच्या मास्टर रिस्ट्रक्चरींग अॅग्रीमेंटनुसार काही अटींची पूर्तता केल्यावर मंजूर व जाहीर करण्यात आली. ही कर्ज पुनर्रचना पूर्ण झाल्यावर कंपनीच्या सर्व कर्जदारांनी कंपनीच्या कर्ज सुविधा सामान्य केल्या असून मागील काळातील सर्व अनियमितता, निष्क्रियता दूर केल्या आहेत. रिझर्व्ह बँकेने 7 जून 2019 ला विशिष्ट धोरण असलेल्या (संपत्तीच्या) कर्ज निराकरणासाठी धोरणपूर्वक मांडणी जाहीर केल्यानंतर या कर्ज निराकरण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेला आयसीआरए आणि क्रिसिल या संस्थांनी RP-4 रेटींग…
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी आज महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली.यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी रेखा शर्मा यांना आयोगाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपक्रमांची वेगवेगळ्या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. श्रीमती शर्मा यांनी महिलांच्या तक्रार निवारणासाठी कार्यरत असलेला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या 155209 या टोल फ्री क्रमांकावर फोन करून माहिती घेतली तसेच आयोगाच्या सादर करण्यात आलेल्या कार्यअहवालावर त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी राष्ट्रीय महिला आयोग आणि राज्य महिला आयोग यांनी एकत्रितपणे काम करावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली तसेच राष्ट्रीय महिला आयोगाचे कामकाज कशा पद्धतीने चालते याची…
जळगाव : प्रतिनिधी दिड वर्षापुर्वी पतीचे निधन झालेल्या तरुण विधवेचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली एकास अटक करण्यात आली आहे. मंगलसिंग ज्ञानेश्वर जाधव असे एमआयडीसी पोलिसांच्या अटकेतील संशयिताचे नाव असून महिलेचा विनयभंग केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. पिडीत महिला ही रामेश्वर कॉलनी परिसरात राहते. तिच्या घराजवळच संशयीत मंगलसिंग जाधव हा राहतो. 30 मार्चच्या रात्री बारा वाजता पिडीत फिर्यादी महिला तिच्या घरात लहान मुलीसह झोपलेली असतांना तेव्हा तिच्या दरवाज्यावर कुणीतरी ठकठक केले. दरम्यान संशयीत लपून बसला. पिडीतेने इमारतीमधील एका भाडेक-यास आपल्या दरवाज्याजवळ कुणी दिसत आहे का अशी विचारणा केली. कुणी दिसत नसल्याचे त्यांनी सांगीतल्यानंतर खात्री करण्यासाठी दरवाजा उघडून महिला बाहेर आली. पिडीत महिलेने आपल्या…
मेष : आज मेष राशीच्या लोकांना कुटुंबाचे पूर्ण सुख मिळेल. आज तुम्ही एखाद्या शुभ कार्यात सहभागी व्हाल. कामाच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला जाईल. आज तुमच्या मनात नवीन उत्साह दिसून येईल. प्रेमसंबंधात यश मिळेल. नातेवाईक आणि मित्रांशी तुमचे संबंध सुधारतील. आज ७६% नशिबाची साथ आहे. पिवळी वस्तू दान करा. वृषभ : आज वृषभ राशीच्या व्यापारी वर्गाला आज चांगले फळ मिळणार आहे. यासोबतच आज तुम्हाला धनलाभ होण्याचे योग आहेत. तुमच्या कार्यक्षेत्रात मोठा बदल होऊ शकतो. कुटुंबाच्या वतीने तुम्ही निश्चिंत राहाल. व्यवसायिकांना भागीदारी किंवा सहवासातून चांगला नफा मिळू शकतो. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आज तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. मिथुन: आज मिथुन राशीच्या लोकांमध्ये उत्साह…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी सोयगाव पोलीस ठाण्याला आता नवीन वाहन मिळाल्याने नादुरुस्त वाहना अभावी आता पोलिसांना रस्त्यावर उभे राहण्याची वेळ येणार नसल्याने आता सोयगाव पोलिसिंग सुसाट होणार आहे.त्यामुळे गुन्ह्यांच्या तपासाला गतीही मिळेल असा विश्वास पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी व्यक्त केला आहे. सोयगाव पोलीस ठाण्याचे जुनाट आणि जीर्ण झालेले नादुरुस्त वाहनावर सोयगाव पोलीस ठाण्यातील ५२ गावांचा भार अवलंबून होता,परंतु सदरील वाहन नादुरुस्त असल्याने जुनाट आणि जीर्ण झालेल्या वाहनामुळे सोयगाव पोलिसांना आरोपींचा पाठलाग आणि रात्रीच्या गस्तीत मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या परंतु आता नवीन वाहन मिळाल्याने सोयगाव पोलिसिंग सुसाट होणार आहे. आता रस्त्यांची अडचण पोलिसांना डोकेदुखी ठरणार नवीन वाहन मिळाल्यावर आता सोयगाव…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी जरंडी(ता.सोयगाव)गावालगत असलेल्या शिवारातील गट क्रमांक-७५ मधील महावितरणचं ए-बी स्वीच मध्ये अचानक शोर्ट सर्किट झाल्याने तुटलेली मुख्य प्रवाहाची तार शेतात ज्वारीच्या शेतात कोसळल्याने दोन एकरातील रबीची काढणीवर आलेली ज्वारीचा कोळसा झाला आहे.या आगीच्या घटनेत १६ क्विंटल ज्वारीचा कोळसा झाला असून जनावरांसाठीचा चारही जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे ८० हजाराचे नुकसान झाले आहे.घटनास्थळी महावितरणच्या वीज मंडळाने घटनेची प्राथमिक पाहणी केली आहे. जरंडी ता.सोयगाव गावालगत चिंतामण देवाजी गोरे यांचे गट क्रमांक-७५ शेत आहे.या शेतकऱ्याने खरिपाच्या ज्वारीचे अतिव्रीष्टीमुळे उत्पन्न हाती न आल्याने पोटाच्या भाकरीसाठी रबी हंगामात दोन एकर क्षेत्रात ज्वारीची लागवड केली होती.परंतु शेतातून निंबायती गावाकडे जाणाऱ्या मुख्य वीजवाहिनीच्या ए-बी स्वीच मध्ये…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी येथील शेंदुर्णी रोडवरील ह. भ. प.सदगुरु नाईक दादा गुरुजी मंदिर येथे त्याचें भक्त सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक एकनाथ सोनाजी आगे, सेवानिवृत्त ग्रुप कॅप्टन एम आर नाईक नाना व विजय अहिरे यांच्या सहकार्याने आर ओ फिल्टर शुद्ध व शीतल पाणपोई सुरु करण्यात आली. या पाणपोईचे आज (दि ३०) उदघाटन प्रमोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सेवानिवृत्त शिक्षक मधुकर आहिरे गुरुजी,प्रल्हाद चौधरी,प्रमोद पाटील,प्रकाश बोर्डे ,पंडित काकडे,कडुबा मानकर,शिवाजी चौधरी,सारंग बागले, किशोर पाटील, छोटू चौधरी शांताराम चौधरी,गोलू आहिरे, सुकलाल परदेशीं आदिसह भक्त मंडळ उपस्थित होते.