साईमत जळगाव प्रतिनिधी मेहरुणमधील साईबाबा मंदिरापासून संत नरहरी महाराजांच्या ७३८ व्या पुण्यतिथी निमित्त दि. २७ रोजी सायंकाळी संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे रमेश वाघ व मीना वाघ यांनी पूजन केल्यानंतर पालखी सोहळाला सुरुवात करण्यात आली. समाज बांधवानी जागो – जागी पालखीचे पूजन केले. टाळमृदुंगाच्या तालावर ठेका धरत फुगडी खेळून उत्सव साजरा करण्यात आला. रामेश्वर कॉलोनीतील राज शाळेजवळील शिव नरहरी तीर्थ येथे गणेश सोनवणे, रंजना वानखेडे, राजेंद्र घुगे पाटील, विजय वानखेडे, गणेश दापोरेकर, राजेंद्र वडनेरे, संजय विसपुते, नंदू बागुल यांच्या हस्ते पालखीची सांगता महाआरती व प्रसाद वाटपाने करण्यात आली. यावेळी संत नरहरी सोनार बहुद्देशिय संस्थेचे माजी अध्यक्ष प्रशांत सोनार, अध्यक्ष रमेश…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी येथील ‘परिवर्तन’ आयोजित सहा दिवसीय ‘मैत्र -महोत्सवा’चा समारोप मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवार दि.२९ रोजी सायंकाळी ६.30 वाजता येथील उदयोन्मुख रंगकर्मी तथा सुप्रसिध्द नृत्यकार ‘तनय मल्हारा’ चे एकलनाट्य “दंद्व” या रंगावृत्तीने होणार आहे. आयुष शर्मा द्वारा लिखित व दिग्दर्शित तसेच “तनय मल्हारा” द्वारा रंगमंचावर खेळले गेलेले “दंद्व” एक असे नाटक आहे कि जे भूतकाळ व वर्तमान स्थितीतील राजनैतिक, धार्मिक अन काल्पनिक परिस्थितिला जाब विचारत, थेट धर्म अन अधर्माच्या पिंजऱ्यात नेऊन उभे करते. कधी परस्परांना जोडते..अन पुन्हा मुळापासून तोडते.. भले कुणाला महाभारत माहित असो वा नसो.. मात्र आजच्या नाटकातील “तनय” अभिनित “द्वंद” मधील साकारलेला ‘कर्ण’ तुम्हाला प्रश्न विचारत काहीसा अस्वस्थ…
साईमत जळगाव प्रतिनिधी जी. एच. रायसोनी इस्टीट्युट संचालित सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये ‘जागतिक मराठी भाषा दिन’ विविध उपक्रमासह उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात शाळेच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांच्या हस्ते कुसुमाग्रज व छत्रपती शिवाजी महाराजाच्या प्रतिमा व शिल्प पूजनाने करण्यात आली. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘हीच एक प्रार्थना’ हे गीत ‘एक सूर एक ताल’ या संकल्पनेतून सादर केले. मराठी बाणा आणि मराठीची धन्यता दाखवून देण्यासाठी विद्यार्थ्यांनी ‘लाभले आम्हास भाग्य’या गीतावर नृत्य सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी ‘शिवराज्यभिषेक’ हे शिवरायांच्या जीवनावर आधारीत जनजागृतीपर नाटक सादर केले. मराठी वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी या महोत्सवात विविध कला सादर केली व पसायदान म्हटले…
साईमत जळगाव प्रतिनिधी टीव्ही, इंटरनेट, मोबाइल आणि कॉम्प्युटरच्या जगात जन्माला येणारी नवी पिढी आधीपेक्षा वेगळी आहे, त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत आणि सहाजिकपणे त्यांचे समस्या सोडवण्याचे मार्गही वेगळे आहेत. अशा परिस्थितीमध्ये आजच्या काळात मुलांचे संगोपन करताना, त्यांच्यावर संस्कार करताना पालकांच्या समोर नक्की काय आव्हाने आहेत हे आधी जाणून घेतले पाहिजे आणि पालक म्हणून आपण कुठे चुकत आहोत, याचे मूल्यमापन करून स्वत:मध्ये बदल घडवला पाहिजे. असे प्रतिपादन नागपूर येथील ज्येष्ठ बाल मानसोपचार तज्ज्ञ तथा लाईफ कोच डॉ. रोझिना राणा यांनी केले. सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल येथे पालकांना मार्गदर्शन करतांना डॉ. रोझिना राणा बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका…
साईमत जळगाव प्रतिनिधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी निमित्त स्वातंत्र्य चौकातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सकाळी आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड यांनी माल्यार्पण करून आदरांजली वाहिली. कार्यक्रमा प्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस मुख्य लेखाअधिकारी चंद्रकांत वानखेडे , मुख्य लेखापरीक्षक मारुती मुळे, सहा. आयुक्त अभिजीत बाविस्कर, कार्यालय अधीक्षक सुनील गोराणे आदींनी माल्याअर्पण करून आदरांजली वाहिली.
साईमत जळगाव प्रतिनिधी केंद्रात व राज्यात वरचढ असलेल्या भाजपचे ना. गिरीश महाजनांसह आ. सुरेश भोळे यांनी राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात शहर, जिल्ह्याच्या विकासासाठी काहीतरी करावे आणि जनतेला दिलेल्या आश्वासनांबद्दल गांभीर्य दाखवून सत्तेतील आपला प्रभावही सिध्द करावा, असे दणकेबाज आव्हान माजी महापौर जयश्री महाजन यांनी दिले. यावेळी त्यांनी आगामी अर्थसंकल्पाकडून शहर, जिल्ह्याला असलेल्या अपेक्षांचाही पाढा त्यांनी पत्रपरिषदेत वाचला. माजी महापौर जयश्री महाजन आ. भोळे व ना. महाजन यांना सडेतोड भाषेत आरसा दाखवत पुढे म्हणाल्या की, विकासकामांच्या दृष्टीने अर्थसंकल्प महत्वाचा असतो. अर्थसंकल्पात विविध खात्याअंतर्गत कामांसाठी तरतूद केली जाते. जळगाव शहराची नागरिक आणि माजी लोकप्रतिनिधी म्हणून शहराचे आ. सुरेश भोळे यांचेकडे शहराच्या हितासाठी…
साईमत जळगाव प्रतिनिधी तालुका शेती संघाच्या चेअरमन पदी शिवसेनेचे ( शिंदे ) ब्रिजलाल पाटील तर व्हाईस चेअरमन पदी राष्ट्रवादीचे ( पवार गट) अनिल पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तालुका शेती संघाच्या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल बिनविरोध झाले होते. त्यात राष्ट्रवादी शरद पवार गट, शिंदे सेना बीजेपी, बीआरएस यांनी एकत्र येऊन बिनविरोध पॅनल निवडून आणले होते, त्यात शिंदे सेनेचे पाच, शरद पवार गटाचे पाच, भाजपचे तीन व बीआरएसचे दोन असे १५ संचालक निवडून आले होते. चेअरमन निवडीत शिंदे गटाचे बिजलाल पाटील (धानवड) तर व्हाईस चेअरमन पदी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अनिल पाटील ( ममुराबाद ) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी…
साईमत जळगाव प्रतिनिधी गोवा येथील ६ वी नॅशनल मास्टर गेम – २०२४ मध्ये अॅक्वा स्पा कोकीळ गुरुजी म. न. पा. जलतरण तलावाचे जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. जवाहरलाल नेहरू स्टेडीयम गोवा येथे ६ वी नॅशनल मास्टर गेम २०२४ स्विमीगच्या स्पर्धा दिनांक ८ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत झाल्या. या स्पर्धेसाठी १८ राज्यातून स्विमींगच्या विविध क्रीडा प्रकारात स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. सदर स्पर्धेत जळगाव शहरातील अॅक्वा स्पा कोकीळ गुरुजी म. न. पा. जलतरण तलाव येथील ५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवून उत्कृष्ट कामगिरी केली. त्यात राहुल अभंगे (३० ते ३५ वर्षेवयोगटात) १०० मीटर बॅक स्ट्रोक -प्रथम, १०० मी. ब्रेस स्ट्रोक- द्वितीय, ५० मी.…
साईमत जळगाव प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील पाडळसे येथील निम्न तापी प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत घ्यावा साठी केंद्रीय जल आयोगाकडे सादर केला असून त्या प्रस्तावाला येत्या काही दिवसात मान्यता देण्याचे केंद्रीय जल आयोगाचे चेहरमन कुशवेंद्र वोहरा यांनी आश्वासित केल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. आज दिल्लीतील केंद्रीय जल आयोगाच्या कार्यालयात जाऊन चेअरमन कुशवेंद्र वोहरा यांची मदत व पुनर्वसन मंत्री अनिल यांनी भेट घेतली. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये या धरणाचा प्रस्ताव सादर केला आहे. त्या प्रस्तावाच्या मंजुरीबाबत त्यांच्याशी आज त्यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा झाली. या प्रस्तावास केंद्रीय जल आयोगाची मान्यता लवकरात लवकर प्रदान केली जाईल…
साईमत जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आयोजित पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट (पुरुष) स्पर्धेच्या बाद फेरीत चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रात एमआयटी आर्ट अँड डिझाईन विद्यापीठ पुणे, सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठ, आत्मिय विद्यापीठ राजकोट आणि मुंबई विद्यापीठ यांनी आपआपल्या गटातील सामने जिंकले. दरम्यान, दुपारच्या सत्रात महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदरा, डॉ.सुभाष विद्यापीठ, जुनागड आणि सरदार पटेल विद्यापीठ, गुजराथ हे तीन संघ विजयी झाले. असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीच्या वतीने पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धा दि. १८ फेब्रुवारी पासून सुरू आहेत. बुधवारी चौथ्या दिवसाच्या सकाळ सत्रात बाद पध्दतीने चार मैदानांवर चार सामने झाले. अ गटात डी. वाय पाटील विद्यापीठ पुणे…