जळगाव : हायवे दर्शन कॉलनी, जुना निमखेडी रोड येथील रहिवासी सौ. प्रमिलाबाई लक्ष्मण ढमाळ ( रा. शाहूनगर ) ( वय ७४ वर्षे ) यांचे आज शनिवार, दि. ९ एप्रिल २०२२ रोजी सकाळी राहत्या घरी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज शनिवार, दि. ९ एप्रिल २०२२ रोजी संध्याकाळी ५ वा. प्लॉट नं १ अ /२, गट नं ७८, हायवे दर्शन कॉलनी, जुना निमखेडी रोड, जळगाव येथील राहत्या घरून नेरी नाका येथे निघणार आहे. त्यांचे पश्चात पती, ३ मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या रविंद्र, ईश्वर, आणि गोलाणी मार्केट येथील सर्वेश एटंरप्राईजेस या कुरियरचे संचालक उमेश ढमाळ यांच्या आई होत.
Author: Saimat
यावल (सुरेश पाटील) माहितीचा अधिकार कायद्यान्वये मिळालेल्या माहितीनुसार तसेच दिलेल्या तक्रारीची संबंधितांनी चौकशी करून सरकारी वकिलांचा अभिप्राय घेऊन तसेच पाचोरा पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील व त्यांच्या सहकार्यांनी प्रकरणाची तत्काळ दखल घेत पाचोरा पीपल्स बँकेची दहा लाखांत फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन सहाय्यक निबंधक तथा पाचोरा पीपल्स बँकेचे तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप पाडवी यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पाचोरा पीपल्स बँकेचे तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक प्रताप बाबा पाडवी,समर्थ टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा चालक(पांडव नगर,आदर्श नगर जळगाव) आणि कपिल प्रिंटर्स संचालक विलास जोगेंद्र बेंडाळे रा.जळगाव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची संशयित आरोपीतांची नावे आहेत. पाचोरा पीपल्स बँकेच्या सन 2011-12 ते 2015-16…
यावल (सुरेश पाटील) यावल पोलीस स्टेशन पासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या व्यापारी संकुलना समोर म्हणजे यावल एसटीस्टँड पासून तर यावल पोलीस स्टेशन समोरील अंतरावर आणि बुरुज चौकापासून तर बोरावल गेटपर्यंत तसेच सुदर्शन चित्रमंदिर चौकात बेशिस्तपणे चारचाकी दुचाकी वाहनांसह अतिक्रमित दुकाने,हाथगाड्यावर व्यवसाय करणाऱ्यांची मोठी गर्दी होत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे,यात यावल पोलीस मात्र मद्यप्राशन करणाऱ्या एका होमगार्ड सोबत आणि त्याच्या सल्ल्यानुसार100वाहनांपैकी फक्त एका वाहनधारकांवर कारवाई आणि गुन्हा दाखल करण्याची धमकी,दमदाटी देऊन कारवाईचा देखावा करीत असल्याने आणि 95 टक्के वाहनधारकांना कारवाई न करता सोडून दिले जात असल्याने पोलिसांमध्ये कारवाई करण्याची हिंमत राहिलेली नाही असे संपूर्ण यावल पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात…
जळगाव : प्रतिनिधी येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्डसिटीतर्फे भादलीच्या महात्मा गांधी विद्यालयास मूळ जळगावचे रहिवासी असलेले व चेअरमन मुकुंद काबरा यांच्या ऍडव्हॉन्स बायो-ऍग्रोटेक लि. ठाणे या कंपनीच्या सीएसआर निधीतून ८० बेचेंस विद्यार्थ्यांसाठी देण्यात आले. यावेळी रोटरीचे सहप्रांतपाल विष्णू भंगाळे, प्रेसिडेंट एन्क्ल्यु चेअरमन लक्ष्मीकांत मणियार, रुरुल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन गोविंद महाजन, सचिव सुनील नारखेडे, सहसचिव राजेंद्र कोल्हे, गोल्डसिटीचे अध्यक्ष उमंग मेहता, मानद सचिव डॉ.निरज अग्रवाल यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळाव्या या भावनेने ठाणे येथील मुकुंद काबरा यांनी त्यांची जन्मभूमी असलेल्या जळगाव जिल्ह्यात सामाजिक भावनेने कंपनीच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला असून भविष्यातही अधिक…
जळगाव प्रतिनिधी तालुक्यातील नंदगाव येथील जि.प.मराठी शाळेच्या मुख्य द्वारावरील सरपंच व सहकारीचे टाकलेले नाव हे बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे हे नावे तात्काळ हटविण्यात आली आहेत. याबाबतीत नंदगाव येथील ग्रामस्थांनी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देत तक्रार नोंदवली होती. यानंतर जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली. नंदगाव येथील सरपंच भूषण पवार यांनी गावातील नुकत्याच बांधकाम झालेल्या सरकारी जि.प. शाळेच्या गेटवर बेकायदेशीररित्या स्वतःसह आपल्या सहका-याचे नाव टाकले होते. नागरिकांनी याबाबतीत प्रशासनाकडे तक्रार केली. ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, गावातील जि.प. मराठी शाळेच्या इमारतीच्या मुख्य गेटचे काम नुकतेच ग्रामपंचायतीने चौदावे वित्त आयोग व रोजगार हमी योजनेतून ठेकेदाराकडून करून घेतलेले…
मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेचे उपनेते आणि मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव ( Yashwant Jadhav) यांच्यावर धाड टाकल्यानंतर आयकर खात्याने त्यांना आणखी एक दणका दिला. त्यांच्या ४१ संपत्ती जप्त केल्या. यात जाधव यांचा वांद्रयातील पाच कोटींचा फ्लॅटचा समावेश आहे. आयकर खात्याने २५ फेब्रुवारीला जाधव यांच्या माजगाव येथील निवासस्थानी धाड टाकली होती. तेव्हापासून तपासादरम्यान यशवंत जाधव यांच्या अनेक संपत्तींवर टाच आली आहे. २०१८ ते २००२ दरम्यान स्थायी समिती अध्यक्ष असताना यशवंत जाधव यांनी बेकायदा मार्गाने मिळवलेल्या पैशांच्या माध्यमातून ही संपत्ती खरेदी केली असावी असा आयकर विभागाला संशय आहे. आयकर विभागाने यशवंत जाधव यांचे मेहुणा विलाश मोहिते आणि पुतण्या विनीत जाधव…
चौधरी-सोयगाव प्रतिनिधी भाजपचे किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांतच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर निधी जमा केला हा निधी राजभवनात जमा न केल्याची माहिती समोर येत असल्याने किरीट सोमय्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन तालुका शिवसेनेच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले आहे. भाजपचे किरीट सोमय्याने आयएनएस विक्रांतच्या नावाखाली गोळा केलेला निधीच काय झालं असा सवाल करीत सोमय्याने गोळा केलेली रक्कम राजभवनाला जमा न करता त्या पैशाचा स्वतःच्या कामासाठी खर्च केल्याचा आरोप शिवसेना युवासेनेने केला. किरीट सोमय्याने देशवासियांचा विश्वास घात करीत देशाची गद्दारी केल्याने किरीट सोमय्या विरुध्द देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी तालुका शिवसेनेने निवेदनात केली आहे. यावेळी शिवसेना शहर…
लोणार (गुलाब शेख) शिवसेना खासदार प्रतापराव जाधव व शिवसेना आमदार संजय रायमुलकर. शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.बळीराम मापारी मार्गदर्शनाखाली आयएनएस विक्रांत प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात किरीट सोमय्या व निल सोमय्या यांच्यावर देशद्रोही चा गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी यासाठी . शिवसेनेच्या वतीने लोणार येथील चौकात आंदोलन करण्यात आले . यावेळी शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या प्रतिकात्मक फोटोच दहन करून त्यांच्याविरुध्द प्रचंड घोषणाबाजी केली . तसेच तहसीलदार प्रभारी पदी असलेल्या गायकवाड मॅडम यांना निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हा प्रमुख प्रा.बळीराम मापारी शिवसेना शहर प्रमुख पांडुरंग सरकटे गणेश सोसायटी अध्यक्ष गजेंद्र मापारी युवासेना तालुका अध्यक्ष गजानन मापारी नगर सेवक डॉ.अनिल मापारी,कु.उ.बा.समितीचे माजी सभापती सुनिल…
गुगल मॅपमुळे एखादं ठिकाण शोधणं सोपं झालं आहे. त्यामुळे वेळेची बचत होते आणि चुकीच्या ठिकाणी जाण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे हल्ली लोकांना पत्ता विचारण्याऐवजी गुगल मॅपवर लोकेशन सेट करून जाता येतं. त्यामुळे गुगल मॅप प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असतंच असतं. आता गुगल मॅप अॅपच्या माध्यमातून चालकांना आणखी एक मदत होणार आहे. गुगल मॅपवरून आता टोलची माहिती मिळणार आहे. इच्छित ठिकाणी जाण्यासाठी एकदा लोकेशन सेट केलं की, वाटेत येणारे टोल आणि त्याचं शुल्क किती आहे? याबाबत माहिती मिळणार आहे. त्याबरोबर या सुविधेद्वारे टोल मार्ग निवडायचा की टोल नसलेला मार्ग निवडायचा हे सुद्धा ठरवता येईल. भारत, इंडोनेशिया, जपान आणि अमेरिकेतील गुगल मॅप वापरणाऱ्यांना कोणत्याही…
नाशिक:- एका नदीच्या नावाने गिरणा प्रतिष्ठान उभं राहते आणि अविरत २३ वर्ष काम करत आहे. ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. नदीच्या नावाने दिला जाणारा हा सन्मान त्या नदीचा सन्मान आहे. गिरणाकाठचे नाव महाराष्ट्रभर पोहचविण्याचे श्रेय खऱ्या अर्थाने गिरणा गौरव प्रतिष्ठाण या संस्थेला जाते. तसाच सन्मान नाशिक शहरातील गोदावरीचा देखील व्हावा यासाठी तिला स्वच्छ सुंदर ठेवणं आपली जबाबदारी असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. नाशिक शहरातील महाकवी कालिदास कलामंदिर, गिरणा गौरव प्रतिष्ठाण नाशिक, आयोजित गिरणा गौरव पुरस्कार संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे, जलतज्ञ…