मेष: कौटुंबिक जीवन समाधानकारक असेल आणि तुमचा जोडीदार तुमचा सहाय्यक सिद्ध होईल. तुमचे वैवाहिक जीवन काही चिरस्थायी प्रेमाच्या क्षणांसह एक सुंदर वळण घेईल. मित्रांसह स्वारस्ये, अनुभव आणि कल्पना सामायिक केल्याने तुमचा उत्साह वाढेल. परदेशी संपर्क असलेल्या लोकांना अचानक काही लाभ होईल आणि प्रवासही होऊ शकतो. वृषभ : तुम्ही तुमच्या गोड आणि वाजवी बोलण्याने तुमच्या प्रियकराचे मन जिंकू शकाल. वैवाहिक जीवन चांगले राहील. तुम्हाला कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. पगारदार लोक त्यांच्या वरिष्ठांना कठोर परिश्रमाने संतुष्ट करू शकतात. मिथुन: आज तुम्ही सुखी आणि परिपूर्ण वैवाहिक जीवनाचा आनंद लुटू शकाल. तुमचा कोणाशीतरी अध्यात्मिक संबंध…
Author: Saimat
जामनेर(प्रतिनिधी): – आदर्श राजा व आज्ञाधारक पुत्र असावा तर श्री रामा सारखा, केवळ वडिलांनी दिलेल्या वचनांचे पालन करण्यासाठी श्री रामाने राज सिंहासनाचा व कौटुंबिक सुखाचा त्याग केला. अशा प्रभू रामाचा सर्वानी आदर्श घेतला पाहिजे, असे प्रतिपादन धुळे येथील नीलाताई रानडे यांनी येथे आयोजित रामायण कथा वाचन प्रसंगी केले. ब्राह्मण संघाकडून येथील दत्त मंदिरात कथा वाचन कार्यक्रम घेण्यात आला. यांचे स्वागत संगीत कुलकर्णी यांनी केले. पतिव्रता सीतेसारखी असावी, तर भाऊ लक्ष्मण व भरत सारखे असावे हे रामायणातून दिसून येते. रामायण हा केवळ ग्रंथ नाही, तर विचार आहे, असेही रानडे यांनी सांगितले.ब्राह्मण संघाचे अध्यक्ष डॉ नरेंद्र कुलकर्णी…
चोपडा – प्रतिनिधी तालुक्यातील मौजे कोळंबा व वडगावसिम शिवारात मागील आठ दिवसांपासून बिबट्याने हैदोस घातला असून आता तर गावाजवळून बकरी, म्हशीचे पारडु व कुत्रे उचलुन घेऊन गेल्याचे ग्रामस्थांनी बघितले आहे. त्यामुळे या दोन्ही गावातील शेतकरी, शेतमजूर, गुराखी, शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ह्या परिसरातील बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी एका पत्रकान्वये केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, वडगावसिम येथील पितांबर भिल यांचे शेळीचे पिल्लु व कोळंबा हायस्कूल जवळील एका खळ्यातून कुत्रा व म्हशीचे पारडु बिबट्याने उचलून नेल्याचे बाळू देवराम कोळी यांनी प्रत्यक्ष पाहिले आहे. शेतकरी अंबादास कोळी हे…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी उन्हाच्या तडाख्याने लाही लाही झालेल्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची चक्क ग्रामपंचायतीने दखल घेत गावालगत असलेला पाण्याचा हौदाला पाईपलाईन करून पाण्याने हौद भरून ठेवून जनावरांच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी घोसला ग्रामपंचायतीने एक पावूल उचलले आहे.यासाठी सरपंच सुवर्नाबाई वाघ,उपसरपंच सुभाष बावस्कर,यांनी पुढाकार घेतला आहे.ग्रामस्थांनी यासाठी परिश्रम घेवून एकाच रात्रीतून या हौदाला जोडणी करणारी पाईपलाईन जोडली आहे.त्यामुळे घोसला परिसरातील जनावरांच्या घशाची कोरड आता दूर झाली आहे. घोसला गावालगत असलेल्या हौदात ग्रामपंचायतीने पाणी जोडणी करून जनावरांच्या घशाची तहान दूर केली आहे.सध्या परिसरात पाण्याची टंचाई जाणवत असतांना जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असल्याने घोसला ग्राम पंचायतीने मात्र जनावरे आणि पशुपक्षांना पिण्याच्या पाण्यासाठीची वणवण…
लोणार (गुलाब शेख) विद्येविना मती गेली | मतीविना नीति गेली | नीतीविना गती गेली | गतीविना वित्त गेले | वित्ताविना शुद्र खचले | इतके अनर्थ एका अविद्येने केले! लोणार शहरात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, ढोल-ताशांच्या संगीतमय वातावरणात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकापासून शोभायात्रेची सुरुवात झाली. महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले हे महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते,लेखक,विचारवंत आणि जातिविरोधी समाजसुधारक होते. अस्पृश्यता आणि जातिव्यवस्था निर्मूलनासाठी आणि स्त्रियांना शिक्षित करण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे ते आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले हे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते होते.त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला आणि त्यांची जयंती दरवर्षी महात्मा ज्योतिबा फुले जयंती…
यावल (सुरेश पाटील) आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक या निवासस्थानी काही समाजकंटकांनी व माथे फिरूनीं दगडफेक केली या निषेधार्थ यावल तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व सेलच्या तालुकाध्यक्ष,पदाधिकारी कार्यकर्त्यांनी काल दि.11 सोमवार रोजी सकाळी 11 वाजता यावल येथील नायब तहसिलदार आर के पवार यांना निवेदन देऊन निषेधात्मक घोषणा दिल्या व निषेध व्यक्त केला. मा.न्यायालयाचा निर्णय आल्यावर काही एस.टी. कर्मचाऱ्यांनी पेढे वाटून व गुलाल उधळून आनंद व्यक्त केला असतांना आज दगडफेक करण्याचे कारणच काय?आज पर्यंत नेत्यांच्या घरावर अशा प्रकारचे कृत्य पुरोगामी महाराष्ट्रात कधीही घडलेले नाही.महाराष्ट्राचे लोकनेते असलेल्या शरद पवार साहेबांच्या घरावर अशाप्रकारे दगडफेक होणे हे अत्यंत निंदनीय कृत्य…
जळगाव प्रतिनिधी जळगाव येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील शिपायाला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने तीस हजाराची लाच घेताना कार्यालयात अटक केली आहे जळगाव सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात सिक्युरिटी गार्ड च्या नोकरी साठी जळगाव जिल्ह्यातील एका व्यक्तीने अर्ज केला होता कार्यालयात कार्यरत असणारे शिपाई चौधरी याने दोन लाख दहा हजार रुपयांची मागणी केली होती, तर पहिला हप्ता तीस हजार रुपये देण्याचे ठरले. अर्जदाराने थेट तिथून निघून लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे आपली तक्रार नोंदवली. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापडा रचून या शिपाईला तीस हजारची लाच घेताना रंगेहात पकडले.
मुंबई : प्रतिनिधी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले एकनाथ खडसे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ) यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून संघर्ष पेटला आहे. फडणवीस यांच्यावर नाराजी दर्शवतच खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला.मात्र भाजपच्या सहकाऱ्यांसोबत खडसे यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहे. प्रशांत दामलेंच्या ‘किचन कल्लाकार’ या शोमध्ये नाथाभाऊ आणि किरीट सोमय्यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील एका भागात राजकीय नेत्यांचे फोटो दाखवून त्यांबद्दल एक गाणं गाण्याचा टास्क एकनाथ खडसेंना दिला होता. त्यावेळी, देवेंद्र फडणवीसांचा फोटो त्यांना दाखविण्यात आला. त्यावर, एकनाथ खडसेंनी हिंदी चित्रपटातील गाणं गायले. . दुश्मन ना करे दोस्त ने जो काम किया है., हे गाणे एकनाथ खडसेंनी म्हटले.…
प्रतिनिधी : अमिन पिंजारी कजगाव येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सवात साजरी करण्यात आली यावेळी अखिल भारतीय समता परिषद तालुका अध्यक्ष व ग्रामीण पत्रकार जिल्हा अध्यक्ष भानुदास महाजन यांनी जिल्हा परिषद वस्ती शाळा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शाळकरी मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले , यावेळी माझी पंचायत समिती सदस्य अशोक सोनवणे ज्येष्ठ पत्रकार प्रमोदजी ललवाणी , नितीन सोनार , संजय कोतकर , अमिन पिंजारी , नाना पाटील , निलेश पाटील , संजय महाजन , दीपक अमृतकार , अमिन शाह , व शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. https://youtu.be/VkHqwwjqft4
प्रतिनिधी : आमीन पिंजारी कजगाव ता भडगाव येथे प्रभू श्री राम नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी प्रभू श्री रामचंद्र भगवान यांची आरती करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर संध्याकाळी प्रभू रामचंद भगवान यांच्या भव्य मूर्तीची मिरवणूक गावात वाजत गाजत मोठ्या आनंदाने काढण्यात आली यावेळी शिवसेना तालुका संघटक अनिल महाजन व परमेश्वर पाटील विलास बोबडे ऋषिकेश अमृतकर राजेश पाटील सुरेश महाजन आकाश पवार हितेश गुरव चेतन पाटील योगेश पवार भूषण महाजन प्रवीण पाटील चेतन महाजन सागर महाजन सुरेश पाटील फत्तेसिंग राजपूत राहूल महाजन तुषार पाटील व रामराज्य ग्रुपचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित…