साईमत जळगाव प्रतिनिधी विवाह सोहळ्याचा खर्च सामान्य कुटुंबाला आज परवडणारा नाही. समाजातील गरजूंची मदत व्हावी या उदात्त उद्देशाने मुस्लीम काकर समाजाने सामुहिक विवाह सोहळा आयोजित केला आहे . काकर समाजाचे कार्य समाज हितकारी आणि कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन कॅन्सर तज्ज्ञ डॉ. निलेश चांडक यांनी केले. ते ते येथील काकर समाजातर्फे आयोजित सामुहिक विवाह सोहळ्या प्रसंगी बोलत होते. या विवाह सोहळ्यात सात जोडपी विवाहबद्ध झाले. यावेळी व्यासपीठावर नगरसेवक गणेश सोनवणे, अशोक लाडवंजारी, विक्की बजाज, वरिष्ट पत्रकार वाहिद काकर, राजु बर्तन वाला उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष रियाज काकर यांनी सांगितले की, आजचा हा पाचवा सामुहिक विवाह सोहळा आहे. समाज संघटनेतर्फे समाजातील गरजू व्यक्तींना नेहमीच…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी एखाद्या आईच्या दुधाची समस्या असेल अशा वेळी इतर माताचे दूध डोनेट घेऊन मानवी दूध बँकेद्वारे दिले जाते. अशी सुसज्ज यंत्रणा असलेली सुविधा जळगाव जिल्हा रुग्णालयात जिल्हा वार्षिक योजनेतर्गत नाविन्यपूर्ण योजनेच्या निधीतून बसविण्यात आली आहे. नाशिक विभागातली पहिली अशी ही मदर मिल्क बँक नवजात शिशुंसाठी नवसंजीवनी ठरणार असल्याची भावना जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. येथील जिल्हा रुग्णालयात ही ‘मदर मिल्क बँक ‘ पालकमंत्र्यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता श्री. ठाकूर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.…
साईमत जळगाव प्रतिनिधी प्रस्तावित जिल्ह वारकरी भवन ५५ एकरांच्या भूखंडावर होणार असून सात कोटी एवढा निधी अपेक्षित असून हे इतर जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक प्रकल्प ठरणार आहे. वारकरी प्रशिक्षण, विद्यार्थी वसतीगृह, संत निवास, सुटीतील संस्कार शिबिरे इ. माध्यमातून संस्कारी पिढी घढवण्यासाठी उत्तम व्यासपीठ ठरणार आहे. जिल्हास्तरीय “ वारकरी भवन ” बांधकाम जळगाव परिसरात होण्यासाठी जिल्ह्यातील वारकरी मंडळींची व लोकप्रतिनिधींची सातत्याने मागणी होती.त्यानुसार खेडी शिवारात ६ कोटी ०६ लक्ष निधीचे वारकरी भवन मंजूर केले असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. तसेच यासाठी सर्व खासदार व आमदार व जिल्हा प्रशासनाचे सहकार्य लाभल्या बद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आभार व्यक्त केले. वारकरी भवनाचे भूमिपुजन मुख्यमंत्री…
साईमत जळगाव प्रतिनिधी सध्या लोकसभा निवडणुकाजवळ येत असताना जळगावातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवी प्रदान सभागृहात संपूर्ण संसद भवनच शुक्रवारी उतरले होते. संसद भवनाचे कामकाज कळावे, युवकांमध्ये आत्मविश्वास जागृत व्हावा या हेतूने नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी जिल्हास्तरीय पडोस युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयातर्फे हा उपक्रम राबविला जातो. नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे शुक्रवार दि.१ मार्च रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवी प्रदान सभागृहात जिल्हास्तरीय पडोस युवा संसद २०२४ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना व सामजिक विज्ञान प्रशाळा, क.ब.चौ.उ.म.विद्यालयाचे सहकार्य लाभले होते. प्रसंगी अध्यक्षस्थानी रावेर…
साईमत जळगाव प्रतिनिधी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त एकलव्य क्रीडा संकुलाच्या मैदानावर विविध क्रीडा स्पर्धा उत्साहात सुरू आहे. यात विद्यार्थ्यांचे विविध खेळातील अथक, परिश्रम, मेहनत, क्रीडा कौशल्याचे दर्शन होतेय. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर, प्राचार्य संजय सुगंधी यांच्या हस्ते एकलव्य क्रीडा संकुलाच्या क्रीडांगणावर झाले. या क्रीडा महोत्सवात बुद्धिबळ, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, क्रिकेट आदी स्पर्धा होत आहे. या स्पर्धा महाविद्यालयाचे क्रीडा संचालक नितीन चौधरी यांच्या मार्गदर्शनाने सुरू आहेत. या स्पर्धा प्रसंगी महाविद्यालयाच्या डिन प्रज्ञा विखार, डिन अँडमिनिस्ट्रेशन डॉ.श्रीकांत तारे, डिप्लोमा विभागाचे प्रमुख चंद्रशेखर पाटील, सचिन नाथ, जगदिश…
साईमत भुसावळ प्रतिनिधी येथील काशीराम नगर परिसरातील कपिलेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त संगीतमय श्री शिवमहापुराण कथा व किर्तन सप्ताह सोहळा आयोजीत करण्यात आला आहे. २ ते ८ मार्च पर्यंत दररोज सकाळी १० ते १२ व दुपारी २ ते ४ : ३० वाजे दरम्यान संगीतमय श्री शिवमहापुराण कथा, तर २ ते ९ मार्च पर्यंत दररोज रात्री ८ ते १० वाजे दरम्यान किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. या भक्तिमय सोहळ्याच्या कथा श्रवणाचा लाभ परिसरातील भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. काशीराम नगर परिसरातील कपिलेश्वर महादेव मंदिर परिसरात जय बजरंग मंडळाच्या आयोजनातून संगीतमय श्री शिवमहापुराण कथा व तब्बल आठ दिवस…
साईमत जळगाव प्रतिनिधी भारताला विश्वगुरू बनविण्याची क्षमता असलेले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करणारे असून त्याच्या अंमलबजावणीसाठी शिक्षण क्षेत्राशी निगडित सर्व संस्था, घटक यांना कठोर परिश्रम घ्यावे लागतील असे प्रतिपादन असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीच्या सरचिटणीस डॉ. पंकज मित्तल यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३२ वा दीक्षांत समारंभ गुरूवार दि.२९ फेब्रुवारीला झाला. या समारंभात असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीच्या सरचिटणीस डॉ. पंकज मित्तल दीक्षांत भाषणात बोलत होत्या. यावेळी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे तसेच व्य.प. सदस्य यांची उपस्थिती होती. डॉ. मित्तल यांनी आपल्या भाषणात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे विविध पैलू उलगडून दाखविले.…
साईमत जळगाव प्रतिनिधी समाजसेवा आणि सिद्धांतनिष्ठ कर्मयोगाची प्रेरणा भगवान श्रीकृष्ण यांनी भगवतगीतेतून दिली. याच भगवत गीतेला आपल्या कृतीतून आचरणात आणणारे महात्मा गांधी, श्रीकृष्णाने सांगितलेल्या कर्मयोगातून गांधीजींचे तत्त्वज्ञान, यावर गांधी रिसर्च फाऊंडेशनद्वारा ‘मोहन लीला’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये वृंदावनच्या राधारमण मंदिराचे उपासक आचार्य श्रीवस्त गोस्वामी मार्गदर्शन करतील. ‘मनमोहन’ ते ‘मोहनादास’ पर्यंतचा प्रवास ते उलगडतील. यावेळी ओडिसा नृत्यशैलीतून मोहन लिलांची अनोखी प्रस्तूती नृत्यांगना विष्णुप्रिया गोस्वामी करेल. गांधी तीर्थ येथील कस्तूरबा सभागृह येथे दि. ४ मार्च ला दुपारी ३.३० ला मोहन लिला हा भारतीय संस्कृती आणि विचारधारेचा प्रवाह यावर हा विशेष कार्यक्रम होईल. अधिक माहितीसाठी अशोक चौधरी ९४२२७७५९१८, ९४०४९५५२२० याच्याशी संपर्क करावा.…
साईमत जळगाव प्रतिनिधी अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ५ वी ते ८ व्या इयत्तेसह सर्व विद्यार्थ्यांनी ३७ प्रोजेक्ट साकारले आहेत. समाज हितासाठी उपयुक्त असलेल्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमानिमित्त स्वयंप्रेरणेतून प्रोजेक्टच्या संकल्पनांवर काम केले. यात विज्ञान, तंत्रज्ञान, आर्टिफिशीयल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, केमिस्ट्री, बायोलॉजी, भौतिकशास्त्र, अवकाश तंत्रज्ञान, रोबोटिक्स, थ्री डी प्रिंटींगसह अन्य विषयांवर प्रोजेक्ट साकारण्यात आले आहेत. अनुभूती निवासी स्कूलमधील असेंम्बली हॉलमध्ये हे प्रोजेक्ट ठेवण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन दि. २८ रोजी जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांच्याहस्ते फित सोडून आणि दीपप्रज्वलनाद्वारे करण्यात आले. याप्रसंगी अनुभूती स्कूलचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन, संचालिका निशा जैन, प्राचार्य देबासिस दास, अभंग…
साईमत जळगाव प्रतिनिधी कै.सुनीता जगन्नाथ वाणी – भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी लक्षवेधी ग्रंथदिंडी, भव्य ग्रंथप्रदर्शन, नृत्य, पोवाडा, काव्यगायन, मराठी दिनाचे महत्व सांगण्यात आले. निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापिका प्रिया सफळे, उपमुख्याध्यापक एस. पी. निकम, पर्यवेक्षक जे. एस.चौधरी, कुसुमाग्रज मराठी वाड:मय मंडळाचे प्रमुख अशोक पारधे, आर.डी.कोळी, अलका पितृभक्त, संगीता बेहडे, रत्नमाला सपकाळे, वैशाली बाविस्कर, प्रज्ञा राणे, ग्रंथपाल ऋषिकेश जोशी, डॉ. व्ही. एस. पाटील, जिजाबराव धनगर, भारत गोरे, नरेश फेगडे, अनील शेलकर आदींसह सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर सहकारी…