भगीरथ शाळेत मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

0
9

साईमत जळगाव प्रतिनिधी

कै.सुनीता जगन्नाथ वाणी – भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी लक्षवेधी ग्रंथदिंडी, भव्य ग्रंथप्रदर्शन, नृत्य, पोवाडा, काव्यगायन, मराठी दिनाचे महत्व सांगण्यात आले. निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी मुख्याध्यापिका प्रिया सफळे, उपमुख्याध्यापक एस. पी. निकम, पर्यवेक्षक जे. एस.चौधरी, कुसुमाग्रज मराठी वाड:मय मंडळाचे प्रमुख अशोक पारधे, आर.डी.कोळी, अलका पितृभक्त, संगीता बेहडे, रत्नमाला सपकाळे, वैशाली बाविस्कर, प्रज्ञा राणे, ग्रंथपाल ऋषिकेश जोशी, डॉ. व्ही. एस. पाटील, जिजाबराव धनगर, भारत गोरे, नरेश फेगडे, अनील शेलकर आदींसह सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर सहकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here