यावल : प्रतिनिधी यावल शहरात विकसित भागात व्यास नगरमधील खुल्या जागेवर यावल नगरपालिकेचे बांधकाम सुरू आहे या बांधकामाच्या ठिकाणी विविध कामासाठी संबंधित ठेकेदाराने एका घरमालका मार्फत घरगुती वापराची अनधिकृत वीज आपल्या ठेकेदारी साठी वापरून वीजचोरी केल्याने यावल येथील वीज वितरण कंपनीने तात्काळ दखल घेऊन कारवाई केली. याबाबत सविस्तर माहिती अशी की व्यास नगरमधील खुल्या जागेवर गेल्या सहा-सात महिन्यापासून यावल नगरपालिके तर्फे एक ठेकेदार बांधकाम करीत आहे या बांधकामाच्या ठिकाणी विविध कामासाठी वीज पुरवठा आवश्यक असतो या कामावर संबंधित ठेकेदार बऱ्याच वेळेला इलेक्ट्रिक तारांवर आकडे टाकून अनधिकृतपणे वीज पुरवठा घेत असल्याची व्यासनगर मधील परिसरात बोलले जात होते…
Author: Saimat
यावल : प्रतिनिधी दि.20 एप्रिल2022 बुधवार रोजी डॉ.कुंदनदादा फेगडे यांच्या संपर्क कार्यालयात लोकप्रिय पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी यांची असंघटीत कामगारांसाठी असलेली महत्वाकांक्षी जनकल्याणकारी योजना ई -श्रम कार्ड नोंदणी अभियानाचे कामगार पंधर वाड्यानिमित्त भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी जळगाव यांनी आयोजित केले होते. सदर अभियानाला डॉ.कुंदन फेगडे यांचे सहकार्याने यावल शहरात राबविण्यात आले. या उपक्रमात यावल शहरातील नागरिकांनी लाभ घेतला.नागरिकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा याकरिता श्रमजीवी कुटुंबास ई -श्रम कार्डची मोफत नोंदणी अभियान घेण्यात आले. या अभियानास एकूण 187 लाभार्थ्यांनी लाभ घेतला.या वेळी अभियानाच्या अध्यक्ष स्थानी जळगाव जिल्हा भाजपा कामगार आघाडी अध्यक्ष विजयभाऊ मोरे होते,या प्रसंगी जळगाव…
मेष – गुरुवारी तुमचे मन चांगले काम करेल, परंतु बुद्धीचा वापर नम्रता आणि विवेकाने करावा लागेल. नोकरीतील बदलाची योजना बनवू शकता, जुन्या बॉसकडून लाभ मिळू शकतो. व्यवसाय वाढवण्यासाठी नियोजन करा. त्यातून तुम्ही नफा कमवू शकतात. आरोग्याच्या दृष्टीने पाठ आणि कंबरदुखीची समस्या असू शकते, काळजी घ्या. वृषभ – तुम्हाला सर्वांचे सहकार्य करावे लागेल. तुमच्या कार्यालयात वाद होण्याची शक्यता आहे. सर्वांशी प्रेमाने वागा आणि विभागीय राजकारण टाळण्याचा प्रयत्न करा. ग्राहकाला देव मानावे. त्यांच्याशी प्रेमाने बोला, नाराज होऊ नका अन्यथा ग्राहक तुटतील जे योग्य नाही. आरोग्याची काळजी घ्या. भरपूर पाणी प्या आणि समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. कुटुंबातील सदस्यांच्या भविष्याची चिंता राहील. तसेच…
लोणार/गुलाब शेख लोणार तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती 22/03/2022 ती 19/4/ 2022 पर्यंत आहे जवळपास एक महिना बंद आहे या सर्व गलथान कारभाराला बाजार समितीचे संचालक मंडळ जबाबदार आहे असा आरोप भाजपा शहराध्यक्ष गजानन मापारी यांनी केला आहे,एका महिन्यापासून बंद असलेले बाजार समिती 19/4/2022 ला सुरू करण्यात आली परंतु काही तासानंतर लगेच खरेदीदाराने खरेदी बंद केली या धोरणामुळे हजारो शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे खरीप हंगामाच्या अगोदर शेती मशागतीसाठी पैशाची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांना आपला शेतमाल मार्केटमध्ये विकण्याशिवाय पर्याय राहत नाही परंतु अशा वेळेसच कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असेल तर शेतकऱ्यांनी काय करायचा असा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत डोंगराळ भाग व जंगलास आग लागू नये व नुकसान टळावे म्हणून सोयगाव वन विभाग सतर्क झाला आहे सहाय्यक वनसंरक्षक सिल्लोड पुष्पा पवार, सोयगाव वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ यांच्या मार्गदशनाखाली तसेच वनपाल गणेश सपकाळ यांच्या नेतृत्वखाली वनरक्षक एस एस हिरेकर यांनी आपल्या सहकाऱ्यासह जरंडी,निंबायती, रामपूरा,बहुलखेडा शिवार परिसरातील डोंगराळ भागात आग लागू नये म्हणून ग्रस्त वाढवली आहे. रात्री उशिरापर्यत डोंगराळ भागात रात्रीची ग्रस्ती वाढवली आहे तसेच परिसरातील शेतकऱ्यांना या बद्दल महिती देऊन सतर्क करण्यात येत आहे तसेच वनविभागास सहकार्य करण्याचे आव्हान करण्यात येत आहे. वनरक्षक एस एस हिरेकर , कर्मचारी गोविंदा गांगुर्डे,गणेश चौधरी,…
जळगाव : प्रतिनिधी आयुष्मान भारत ह्या केंद्रीय आरोग्य उपक्रम अंतर्गत आरोग्यवर्धिनी दिवस*” म्हणून साजरा करण्यात येत असून *16 एप्रिल रोजी 4 वर्ष पूर्ण झाले. आरोग्यवर्धिनी दिवसाचे औचित्य साधून ग्राम पातळीवर देशभरात विविध आरोग्यदायी उपक्रम रबिवण्यात आले. जळगाव तालुक्यातील आरोग्यवर्धिनी केंद्र जळगाव खुर्द येथे लाभार्थी साठी प्रामुख्याने ई – संजीवनी पोर्टल वरून टेली कन्सल्टिग, योग वर्ग तसेच झुम्बा डान्स व्यायाम प्रशिक्षण, उचित आहार विहार, गरोदर माता तपासणी, SAM MAM बालक तपासणी, तीस वर्षवरील लोकांसाठी NCD स्क्रिनइंग्, वयोगट 12 ते 14 वर्ष मधील मुलमुलींना Covid लसीकरण, वृक्षरोपण, आदी हेल्थ अँड वेलनेस* उपक्रम राबवण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्हा…
मेष : मेष राशीच्या लोकांना आज बुधवारी नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. नोकरीत पदोन्नतीची शक्यता असून कार्यक्षेत्रात लाभाची स्थिती राहील. कुटुंबात एखादी शुभ घटना घडेल, तुम्ही त्यात सहभागी व्हाल. संपूर्ण दिवस मजेत जाणार आहे. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी बुधवारचा संपूर्ण दिवस उत्साहाचा जाणार आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल. कामात चांगली कमाई कराल. बुधवारी तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल. बुधवारचा दिवस चांगला जाईल. बुधवारी तुमचे नशीब चांगले राहील. मिथुन: मिथुन राशीच्या लोकांना बुधवारी कार्यक्षेत्रात चांगले यश मिळेल, तुमचा पैसा योग्य कामात खर्च होईल. विद्यार्थी परीक्षेत चांगली कामगिरी करतील पण मनात भीती राहील. बुधवारी विद्यार्थी अभ्यासात चांगली कामगिरी करतील. कोणालाही…
पाचोरा : प्रतिनिधी युवासेनेच्या उपजिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते तथा मेडिकल व्यावसायिक जितेंद्र जैन यांचे वर सोपवण्यात आली असून नुकतेच त्यांना नियुक्ती पत्र प्राप्त झाले आहे. सदरचे नियुक्तीपत्र आ.किशोर पाटील यांनी त्यांना समारंभ पूर्वक प्रदान केले असून, संघटना वाढीसाठी एकसंघपणे काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे .तर जैन यांनी आगामी काळात आपण युवा संघटनेला अधिक व्यापक चेहरा देणार असल्याचे सांगत पक्ष नेतृत्वाने दिलेल्या जबाबदारी बद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत. आ.किशोर अप्पा पाटील यांच्या ‘शिवालय’संपर्क कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे गटनेते रावसाहेब पाटील, रमेश बाफना,डॉ भरत पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, स्वीय सहाय्यक राजेश पाटील, पत्रकार प्रवीण ब्राह्मणे, यांचे…