Author: Saimat

धरणगाव : प्रतिनिधी शहरातील सोनवड रोडच्या डाव्या बाजूला एका विहिरीत अनोळखी मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर वृत्त असे की, सध्या ग्रामीण भागात सर्वत्र शेतीचे कामे जोरात सुरू असून संबंधित शेतात काही दिवसांपूर्वी मक्का पिकांची काढणी होऊन काम संपल्याने शेत मालक दोन तीन दिवस शेतमजूर पाणी घेण्याची विहिरीवर गेल्यामुळे संबंधित घटक उघडकीस आली. त्यानंतर धरणगाव पोलिस ठाण्यात तात्काळ घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी पोलिस बांधवांनी स्थानिक लोकांच्या मदतीने विहिरीतील मृतदेह बाहेर काढून पुढील तपास पो. नि. राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पोलिस कर्मचारी करीत असुन मृददेहाचा उजव्या हातावर आकाश नाव गोंदण केलेले असुन अंगात चौकडीचा निळ शर्ट…

Read More

मुंबई : प्रतिनिधी विलीनीकरणाच्या मुख्य मागणीसह इतर काही मागण्यांसाठी गेल्या सहा महिन्यांपासून आंदोलनाचे हत्यार उपसलेले एसटी कर्मचारी अखेर सेवेत रूजू झाले आहेत. त्यामुळे सामान्यांची जीवनवाहिनी असलेली एसटी पुन्हा एकदा रस्त्यांवर धावू लागली आहे. एसटीच्या पटावरील एकूण 82,263 कर्मचाऱ्यांपैकी 76,962 कर्मचारी गुरुवारपर्यंत कामावर परतले आहेत. 11 हजार कर्मचारी अद्याप बडतर्फ आहेत. संपापूर्वी एसटीच्या सेवेत एकूण 92,266 कर्मचारी होते. दीर्घ प्रतीक्षेनंतर मोठ्या प्रमाणावर बसफेऱ्या सुरू झाल्याचे दिलासादायक चित्र राज्यात दिसू लागले असून ग्रामीण भागाला मोठा आधार मिळू लागला आहे. बुधवारी महामंडळाने राज्यात 29 हजार फेऱ्या चालवल्या. यातून 17.78 लाख प्रवाशांची वाहतूक करत 11 कोटींचे उत्पन्न मिळवले, अशी माहिती महामंडळाने दिली. विलीनीकरण, वेतनवाढीसह…

Read More

धुळे / जळगाव : प्रतिनिधी धुळे जिल्हा सामाजिक, आर्थिक व शैक्षणीकदृष्टया मागासलेला आहे परंतु, विकास साधायचा असेल तर पाणी, वीज, संचार व्यवस्था व रस्ते असले तरच तेथे उद्योग व्यापार येतो. जिथे उद्योग व्यापार वाढतो तिथे विकास होतो. जिथे रोजगार येतो तेथील गरीबी दूर होते. हेच नंदुरबार व धुळे जिल्ह्यात करायचे आहे. याच दृष्टीने येत्या तीन -चार वर्षात दोन्ही जिल्ह्यातील रस्ते हे अमेरिकेच्या दर्जाचे असतील; असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बोलताना दिले. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी धुळे व जळगाव शहर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम, प्रकल्पांचे उद्घाटने, कार्यारंभ होवून राजर्षी छत्रपती शाहू नाट्यमंदिरात राष्ट्रीय महामार्ग…

Read More

मेष : आज खर्च होऊ शकतो. वायफळ खर्च करू नका. कामाच्या ठिकाणी मन लावून काम करा. मेहनतीचं फळ नक्कीचं गोड असेल. व्यापार करणाऱ्यांसाठी दिवस चांगला आहे. मोठी ऑफर मिळू शकते. अनावश्यक काळजी तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. तुमचे आवडते पदार्थ बनवा आणि संपूर्ण कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा आनंद घ्या. युवक कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. वृषभ : शुक्रवारी एखाद्या भीतीने तुमचे मन अस्वस्थ होईल. मनाला तुमच्यावर वर्चस्व मिळवू देऊ नका. स्पर्धेला सामोरे जाण्याची आणि जिंकण्याची तयारी करा पण सहकर्मचाऱ्यांचा मत्सर करू नका, हे ठीक नाही. व्यवसायाबद्दल ज्ञान मिळवा आणि व्यवसायातील बारकावे समजून घ्या. आयुष्याच्या जोडीदाराच्या चांगल्या करिअरची सुरुवात होईल. मिथुन :…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील जिल्हा क्रिडा संकुलातील जलतरण तलावाचे जिल्हा क्रिडा अधिकारी मिलींद दिक्षीत यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. सविस्तर वृत्त असे की,  कोरोना काळात बंद करण्यात आलेला जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव आज नागरिकांसाठी पुन्हा खुला करण्यात आला. जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी फीत कापून व नारळ वाढवून जलतरण तलावाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी गोविंद सोनवणे, विनोद कुलकर्णी, विजय माने, सागर सपके, नरेंद्र जाधव, शंकरराव निंबाळकर, प्रभाकर खर्चे, राजेंद्र सोनवणे, जगन जाधव, प्रशांत मांडोळे, गोविंद महाले यांचीही उपस्थिती होती. यावेळी क्रिडा अधिकारी दिक्षीत यांचे स्वागत आरसी गृपचे राहुल सुर्यवंशी व चेतन महाले यांनी केले तर कार्यक्रम यशस्वितेसाठी…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी शामखेडे तालुका धरणगाव येथील युवक  योगेश पांडुरंग सातपुते यास विनंयभंग प्रकरणी 3 वर्षाची शिक्षा देण्यात आली याबाबत सविस्तर वृत्त असे  कि शामखेडे येथील योगेश पांडुरंग सातपुते याने गावातीलच महिलेचा विनयभंग केला व जीवेनीशी मारण्याची धमकी दिली होती म्हणून धरणगाव न्यायालयात खटला भा.द.वि कलम 354,506 प्रमाणे सुरू होता सदरील खटल्यास फिर्यादी सह एकूण 10 साक्षीदार तपासण्यात येऊन आरोपी योगेश पांडुरंग सातपुते यास कलम 354 प्रमाणे तिन वर्ष शिक्षा व दहा हजार दंड तसेच कलम 506 प्रमाणे दोन वर्ष शिक्षा व दहा हजार रुपये दंड देण्याचे आदेश धरणगाव येथील न्यायमूर्ती श्री एस.डी.सावरकर यांनी निकाल दिला सदरील खटल्यात सरकारी वकील…

Read More

यावल  : सुरेश पाटील पोलीस स्टेशन पासून 500 मीटर अंतरावर असलेल्या व्यापारी संकुलनातील रेडिमेट कापड दुकानात चार-पाच जणांनी प्रवेश करून दुकान मालकास लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून जीवे ठार मारण्याची घटना आज गुरुवार दि.21एप्रिल रोजी13 ते13:30 वाजेच्या सुमारास घडल्याने केल्याने यावल शहरातील संपूर्ण व्यापारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली यामुळे यावल पोलीस स्टेशन हद्दीत आणि यावल शहरात पोलिसांचा धाक संपला असे बोलले जात आहे आणि अशी वस्तुस्थिती असताना सुद्धा यावल पोलिसात खांदेपालट होत नसल्याने आणि काही ठराविक पोलीस आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देत असल्याने त्याचे विपरीत परिणाम दैनंदिन कामकाजावर होत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल…

Read More

जळगाव : प्रतिनिधी बेपत्ता असलेल्या इसमाचा मृतदेह आज संशसास्पद अवस्थेत आढळून आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज दुपारी आसोदा येथील रेल्वे गेट जवळच्या एका शेतात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी केली असता संबंधीत मृतदेह हा मिसींगची नोंद करण्यात आलेल्या व्यक्तीचा असल्याचे दिसून आले. शहरातील हरीओम नगरमध्ये असलेल्या वाणी मंगल कार्यालयाच्या जवळ असलेल्या किशोर विनायक पाटील ( वय ३९) याचा हा मृतदेह असल्याचे तपासात दिसून आले. ते काल दुपारपासून कुणालाही न सांगता घरातून निघून गेल्याने त्यांची पत्नी दीपमाला किशोर पाटील यांनी काल शनिपेठ पोलीस स्थानकात मिसिंगची नोंद केली होती. यानंतर आज हा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील चिंचोली येथील माहेर असलेल्या विवाहितेचा पाच लाख रुपयांसाठी छळ केल्याने पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे , चिंचोली येथील काजल सुनील गोसावी यांचा विवाह मध्यप्रदेशातील भोपाळ येथील सुनील अशोक गोसावी यांच्यासोबत झाला असून लग्नानंतर काही दिवसातच पतीसह सासरच्यांनी काजल हिच्याकडे माहेरुन पाच लाख रुपये आणावेत व संसारपयोगी साहित्य आणावे असा तगादा लावला होता. याच कारणावरुन पतीसह सासरच्यांनी काजल हिचा दोन वषापर्यंत वेळावेळी मानसिक तसेच शारिरीक छळ केला. या जाचाला कंटाळून अखेर काजल या माहेरी निघून आल्या होत्या व याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात ठाण्यात सासरच्या मंडळींविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन बुधवारी काजलचे…

Read More