Author: Saimat

जळगाव ः प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात पुनर्रचीत हवामानावर आधारित फळपिक विमा योजना 2021-22 या वर्षात लागू करण्यात आली असून याच्या अंतर्गत भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेट मुंबईच्या माध्यमातून जिल्ह्यातील गृम व आंबिया बहारासाठी फळपिकांसाठीची भरपाई मिळण्यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केलेला पाठपुरावा फलदायी ठरत आहे. त्यात मृग बहारमध्ये लिंबू, पेरू, सिताफळ आणि मोसंबी या पिकांसाठी 77 लक्ष 70 हजार रूपये मंजूर होऊन थेट शेतकऱ्यांच्या खाती जमा करण्यात आली असून आंबिया बहारमध्ये केळी पिकासाठी कमी तापमानाच्या निकषाच्या अंतर्गत 127 कोटी तर जास्त तापमानासाठी 175 कोटी अशी एकूण 302 कोटी नुकसान भरपाई मंजूर होणार असल्याने ही रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 28 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तालुकानिहाय मतदान केंद्र निश्चित करण्यात आले असून, सहकार विभागातर्फे इलेक्शन ड्यूटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. ग.स. सोसायटीसाठी गुरुवारी मतदान होणार आहे. मतदान केंद्राध्यक्ष मतदान, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग सोमवारी पार पडला. जिल्हा उपनिबंधक, जिल्हा विशेष लेखापरीक्षक, जिल्ह्यातील सर्व तालुका सहायक निबंधक कार्यालये, जिल्ह्यातील सर्व तालुका लेखापरीक्षक कार्यालये, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जळगाव जनता बँक, जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या या आस्थापनांवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. संस्थेचे निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांनी प्रशिक्षण…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी जिल्ह्यातील 116 दुकानदारांनी वर्षभराच्या कालावधीत रेशन दुकान चालवण्यास इच्छुक नसल्याने स्वेच्छेने जिल्हा पुरवठा विभागाकडे राजीनामा दिला आहे. रेशन दुकान चालवण्यासाठी कुणी व्यक्ती नसणे, प्रकृती ठीक नसणे, स्वेच्छेने तसेच कंटाळूनही दुकानदारांनी रेशन दुकानाचा राजीनामा दिला असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. रेशन धान्य वाटप ऑनलाइन होत आहे. ई-पॉस मशीनवर अंगठा उमटवल्यानंतर लाभार्थ्यांना धान्य वाटप करणे बंधनकारक आहे. पूर्वीसारखा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार करणे शक्य होत नाही. बहुतांश लाभार्थी जागरूक झालेले असल्याने धान्याचा लाभ सोडत नाहीत.त्यामुळे प्रतिक्विंटल दीडशे रुपये मार्जीनवर रेशन दुकानदारांना अवलंबून राहावे लागत आहे. रेशन दुकानदारांनी राजीनामा देण्यामागे ही सुद्धा कारणे आहेत. लाभार्थींना वाटप करण्यात येणाऱ्या धान्याचे रेकॉर्ड अद्ययावत…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी युवासेनेतर्फे इंद्रप्रस्थ नगरात रविवारी प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान घेण्यात आले. नोंदणीसाठी युवकांचा मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. पर्यावरण व पर्यटन विकास मंत्री आदित्य ठाकरे व युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या आदेशाने व युवासेना सचिव दुर्गाताई भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान 2022 वीर सावरकर सभागृह, इंद्रप्रस्थनगर येथे रविवारी शिवसैनिक महेश ठाकूर यांच्या पुढाकाराने घेण्यात आले. उद्घाटन व युवासेना सदस्य कार्ड वाटप शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे यांच्या हस्ते करण्यात आले. युवासेना तरुणांना स्वाभिमानाने जगणे शिकवते. विविध समाजकार्य करण्यासाठी युवासेना अग्रेसर आहे. युवकांनी युवासेनेत सहभागी व्हावे असेही यावेळी विष्णू भंगाळे यांनी सांगितले. युवासेना…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी तालुक्यातील नशिराबाद गावातील 200 बांधकाम मजुरांना बांधकाम कामगार विभागासह शिवसेनेच्या कामगार सेना व झिअम फाउंडेशन अध्यक्ष प्रदीप साळी यांच्या प्रयत्नातून सुरक्षारक्षक किट असलेल्या पेट्यांचे वाटप करण्यात आले. भवानीनगर येथे हा कार्यक्रम पार पडला. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप साळी, माजी सरपंच पंकज महाजन, विकास पाटील, विनोद रंधे, गणेश चव्हाण, सय्यद बरकत अली, विनायक धर्माधिकारी, बंडू रत्नपारखी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Read More

जळगाव ः प्रतिनिधी जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पारा 43.2 अंशांवर होता. पूर्वमोसमी पावसाचे ढग घोंगावत असताना मंगळवारपासून उत्तर महाराष्ट्रात तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 30 एप्रिलपर्यंत ढगाळ वातावरणासह ही लाट कायम राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रात 26 एप्रिलपासून उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार आहे. राज्यात सर्वाधिक तापमान जळगाव जिल्ह्यात विदर्भानंतर आता उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची तीव्रता वाढणार आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये तापमान 45 अंशांवर जाईल अशी शक्यता आहे. याच काळात विजांच्या कडकडाटासह पूर्वमोसमी पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोमवारपासून पुढील पाच दिवस जिल्ह्याच्या उष्णतामानात वाढ होण्याची पूर्वसूचना प्रादेशिक हवामान विभाग मुंबईने जिल्हा प्रशासनाला दिली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पिंप्री खुर्द येथून सात वर्षीय बालिकेचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. याप्रकरणी येथील पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर वृत्त असे की, पिंप्री खु. येथील राकेश भाईदास बारेला (वय २०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २१ एप्रिल रोजी पिंप्री खुर्द येथून त्यांची बहीण मुंगळी भाईदास बारेला (वय ७) हिचे अज्ञात इसमाने अपहरण केले. याप्रकरणी धरणगाव पोलिसांत कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धरणगाव पोलिसांनी शोधासाठी मध्यप्रदेशसह विविध भागात पथके रवाना केली आहेत.

Read More

मेष : मेष राशीच्या लोकांना आज काही कामात चांगला लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन भागीदार व्यवसायात सामील होऊ शकतात. पैशाशी संबंधित काही बाबींमध्ये तणाव कमी होईल. प्रॉपर्टी डीलरसाठी आजचा दिवस अधिक फायदेशीर आहे. जास्त खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. घरातून काम करणार्‍या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज ८५% नशिबाची साथ आहे. शिवलिंगाला पाणी अर्पण करा. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी आज व्यावहारिक निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. दुधाशी संबंधित व्यवसाय करणार्‍यांना आज चांगला नफा मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला नफा मिळू शकतो. छोट्या प्रलोभनांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. एखाद्या मालमत्तेबद्दल तुम्हाला अभिमान वाटेल. तुम्ही तुमच्या जीवनसाथीसोबत जीवनाचा उत्तम अनुभव घेऊ…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी आपल्यावर निस्वार्थी प्रेम फक्त आई-वडिलच करु शकतात, त्यांच्या प्रेमाचा नेहमी आदर करा, दर महिन्यातून एकदा तरी त्यांची भेट घ्या, त्यांच्याजवळ राहा, जन्मदात्यांचे आशिर्वाद घ्या, दुसऱ्या मोठ्या शहरात जाऊन वैद्यकीय सेवा देण्यापेक्षा जन्मभूमीतच वैद्यकीय सेवा द्या, तिथे जे स्पेशालिस्ट डॉॅक्टर्स नाहीत, त्याचे पुढे शिक्षण घ्या, हार्डवर्क करा आणि जन्मभूमीलाच कर्मभूमी बनवतं यशस्वी व्हा असा कानमंत्र पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ.तात्याराव लहाने यांनी दिला. गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ.केतकी पाटील सभागृहात काल आयोजित दिक्षांत सोहळा थाटात पार पडला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांची विशेष उपस्थिती होती, याप्रसंगी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत व्यासपीठावर गोदावरी फाऊंडेशनचे…

Read More