Author: Saimat

मेष : आज तुमच्या कुटुंबात परस्पर सौहार्द वाढेल. व्यावसायिक जीवनात प्रत्येक बाबतीत तुमची भूमिका स्पष्ट ठेवा. आज व्यवसायाच्या दृष्टिकोनातून सर्व काही ठीक होईल. तुमचे उत्पन्न चांगले राहील. काही लोकांना परदेश प्रवास आणि परदेशाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. जर तुम्हाला उच्च शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायासाठी परदेशात जायचे असेल तर तुम्हाला तुमच्या प्रयत्नांनी यश मिळेल. आज ९०% नशिबाची साथ आहे. गणेशाची आराधना करा. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांनी सर्वांशी नम्रपणे बोला. राजकारणातील संपर्क क्षेत्र व्यापक असेल. काही नवीन संधी मिळण्याची चिन्हे आहेत. सरकारी कामात पैसे गुंतवण्याची शक्यता आहे. पैशाच्या व्यवहारात यश मिळेल. कुटुंबातील सर्व सदस्यांसह तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी आणि आरामदायक…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मुलगी पाहण्यासाठी जात असताना अचानक महिलेचा भरधाव ट्रकने चिरडल्याने जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली. जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांनी आक्रोश केला होता. मिळालेली अशी की, रावेर तालुक्यातील रेंभोटा येथे राहणाऱ्या कविता मुकेश कोळी (वय-३०) या पती व दोन मुलांसह वास्तव्याला आहे. गावातच त्यांचा भाचा अजय सोनवणे राहतो. त्यांच्यासाठी मुलगी पाहण्यासाठी अजय आणि त्याची मामी कवीता कोळी ह्या एकाच दुचाकीने धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथे जाण्यासाठी निघाले. जळगाव शहराच्या पुढे द्वारका नगराजवळ राष्ट्रीय महामार्गावरून गुरूवारी २८ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता जात असतांना मागून येणारा ट्रक (एमएच २९ एम ०१४४) ने जोरदार धडक दिली. या धडकेत कविता कोळी…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी चाळीसगाव येथे ॲड. सुभाष खैरनार यांच्यावर झालेल्या हल्ल्‌याप्रकरणी जळगाव जिल्हा वकील संघाकडून जाहीर निषेध करण्यात आला. जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. दिलीप बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले. ॲड. खैरनार यांना रुग्णालयात दाखल केले आहे. किसन सांगळे विरुद्ध पोलिसांत कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी वकील संरक्षण कायदा त्वरित मंजूर करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. गुरुवारी अर्धा दिवस न्यायालय बंद ठेवून जाहीर निषेध करण्यात आला. या प्रकरणाची कसून चौकशी व्हावी अशी मागणी ॲड. दिलीप बोरसे, ॲड.प्रभाकर पाटील, ॲड.शरद न्हायदेे, ॲड. प्रकाश पाटील, ॲड. भरत देशमुख, ॲड. दर्शन देशमुख, ॲड.केतन ढाके,ॲड.प्रवीण जंगले,…

Read More

भुसावळ ः प्रतिनिधी तालुक्यातील पिंप्रीसेकम येथील अभियंता असलेल्या युवक शेतकऱ्याने निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेतले आहे. गुणवत्ता चांगली असल्याने त्याने थेट अबुधाबीच्या बाजारात केळीची निर्यात केली आहे. पिंप्रीसेकम येथील निलेश पाटील या तरुणाने दीड एकरावर केळीची लागवड केली आहे. गेल्या आठवड्यात जम्मू काश्‍मीर येथे 300 क्विंटल केळी पाठवल्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांनी अबुधाबीच्या बाजारात 150 क्विंटल केळीची निर्यात केली आहे. निर्यातक्षक केळी असल्याने त्यांना स्थानिक बाजारपेक्षा दुप्पट म्हणजे 1200 रुपये क्विंटलचा दर मिळाला आहे. निलेश पाटील हे गेल्या तीन वर्षांपासून केळीची लागवड करीत आहेत. गुणवत्तापूर्ण उत्पादन असल्याने त्यांनी केळी निर्यातीचा निर्णय घेतला. स्थानिक निर्यातदारांनी साठी सहकार्य केले. केळी निर्यातीमुळे शेतकरी देखील विदेश…

Read More

पाळधी ता.धरणगाव ः वार्ताहर येथील 30 गरजू कुटुंबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिधापत्रिका वाटप करण्यात आले. उपक्रम जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांच्या मार्गदर्शनाने धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंद नन्नवरे यांनी आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता करून तत्काळ एका आठवड्यात या शिधापत्रिका गरजूंसाठी उपलब्ध करून दिल्या. या वेळी धरणगावचे तहसीलदार नितीनकुमार देवरे, सहकारी गणेश पवार यांचे सहकार्य लाभले.या वेळी चांदसरचे सरपंच सचिन पवार, शरद कोळी, भूषण महाजन, गोपाळ सोनवणे यासह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More

जळगाव ः प्रतिनिधी येथील चित्रकार विकास मल्हारा यांना यंदाचा ‘टागोर अवॉर्ड’ रवींद्रनाथ टागोर विद्यापीठ भोपाळतर्फे आयोजित तिसऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिष्ठेच्या पुरस्काराने भोपाळ येथे सन्मानित करण्यात आले. 50 हजार रुपये, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. जैन इरिगेशनच्या कला विभागात कार्यरत असलेले मल्हारा यांना प्रख्यात चित्रकार व लेखक अशोक भौमिक व कुलगुरू लेखक संतोष चौबे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संपूर्ण भारतातून आलेल्या दोन हजार कलाकृतींतून अंतिम पाच पुरस्कारात त्यांच्या क्रॅलिक व चारकोलसह पेपर या माध्यमात केलेल्या अनटायटल्ड-3 या चित्राची निवड झाली होती.

Read More

यावल ः तालुका प्रतिनिधी ओला व सुका घन कचरा संकलन करून वाहतूक करण्याचा ठेका यावल नगरपालिकेतर्फे एका ठेकेदाराला देण्यात आला आहे, ठेकेदाराचे स्थानिक कर्मचारी मात्र ओला व सुका घनकचरा दररोज संकलित न करता एक दिवसाआड़ किंवा दोन दिवसाआड आणि ते सुद्धा अवेळी, अनियमित संकलित करून सोयीनुसार वाहतूक करीत असल्याने तसेच घंटागाडीचा आवाज(घनकचरा संकलन करण्याची रेकॉर्डिंग)बंद असल्याने नागरिकांना समजून येत नसल्याने यावलकर संभ्रमात पडले असून ठेकेदाराची मात्र चांदी होत आहे. याकडे मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी लक्ष केंद्रित करून ठेकेदारावर कार्यवाही करून पेमेंटची कपात करावी,अशी मागणी संपूर्ण यावल शहरातून होत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल शहरातील ओला व सुका घन…

Read More

जळगाव : प्रतिनिधी आठ वर्षांपर्यंत तरूणीला ब्लॅकमेल करून व सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणातील पाच संशयितांना पोलीस कोठडी मिळाली असून दोन महिला मात्र फरार झाल्या आहेत. सविस्तर माहिती अशी की, एका तरूणीला आठ वर्षे ब्लॅकमेल करून तिचे शारिरीक शोषण केल्याच्या प्रकरणामुळे प्रचंड खळबळ उडालेली आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात दोन महिलांनी बलात्कार्‍यांना साथ दिल्याची माहिती समोर आल्याने त्यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणीने आठ वर्षांनंतर या घटनेला वाचा फोडली. सात जणांच्या विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यातील प्रमुख संशयित रितेश सुनील बाविस्कर (वय २७), पवन उर्फ बंटी अशोक झारपकर (वय २७), राहुल सुरेश…

Read More

मेष : मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. तुमची बुद्धिमत्ता आणि कामावरील निष्ठा पाहून अधिकारी तुमची प्रशंसा करतील. अनेक छोटी गुंतवणूक भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकते. भागीदारी व्यवसायात कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. आज महिला घरातील कामात जास्त व्यस्त राहतील. आज तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते. विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या क्षेत्रात यश मिळेल. आज ८०% नशिबाची साथ आहे. शिवलिंगाला पाणी अर्पण करा. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल. कठोर परिश्रमाच्या बळावर तुम्ही संकटातून बाहेर पडाल. प्रॉपर्टी डीलबाबत निर्णय तुमच्या बाजूने होऊ शकतात. आपली कमाई सावधगिरीने खर्च करा. कुटुंबातील सर्वांना सोबत घेण्याचा प्रयत्न कराल. वाहन चालवताना काळजी घ्या. कामासाठी…

Read More