Author: Saimat

जळगाव : प्रतिनिधी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ महाराष्ट्र अंतर्गत कार्यरत असलेल्या महिला पर्यावरण सखी मंचच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी येथील सामाजिक कार्यकर्त्या व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था अध्यक्षा मनिषाताई किशोर पाटील यांची निवड करण्यात आली आहे. मनिषा पाटील यांनी पर्यावरण संरक्षण, संवर्धन व त्यासंबंधी केलेल्या कार्याची दखल घेऊन संस्थेचे अध्यक्ष प्रमोद मोरे आणि महिला पर्यावरण सखी मंच अध्यक्षा श्रीमती प्रियंवदा तांबोटकर यांनी ही निवड केली आहे. या निवडीबद्दल मनिषाताई यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी छंद माणसाच्या आयुष्यात समाधानासह प्रदीर्घ आनंद देतात. त्यातच कवितेचा छंद असणे हा जगावेगळा आनंद. 40 वर्षे कवितेची आराधना आणि उपासना ‘प्रवास’ या कवी प्रकाश बारी यांच्या काव्यसंग्रहातून दिसून येते, असे प्रतिपादन कवी साहित्यिक यशवंत मोरे यांनी केले. रविवारी काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. कवी टी.जे. पाटील, अपर्णा भट, व्ही.एन. पाटील, पी.एन. बारी, वसंत सपकाळे, प्रवीण भूते यांनी कविता सादर केल्या. प्रांजल, हर्षित, आदवी यांनी बालकांना भावणारी या संग्रहातील ‘गुड्डी’ ही कविता सादर केली. गजानन फुसे, रघुनाथ आटवाल, संतोष बारी, रूपचंद खलसे, प्रा. सुहास बागुल, लक्ष्मण लावणे, सुरेखा माळी, रिना ताडे, रोहिणी अस्वार, वर्षा उमरकर (अकोला), स्वाती…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळाची राज्य अजिंक्यपद आट्यापाट्या स्पर्धा 18 ते 20 मे दरम्यान शेगाव येथे होत आहे. स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा पुरुष व महिला संघाची घोषणा करण्यात आली. पुरुष संघाच्या कर्णधारपदी आंतरराष्ट्रीय खेळाडू विशाल फिरके, तर महिला संघाच्या कर्णधारपदी राष्ट्रीय खेळाडू रोशनी खान यांची निवड करण्यात आली. खेळाडूंना प्रा. चंद्रकांतअण्णा सोनवणे व आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले. जिल्हा संघटनेचे सचिव डॉ. प्रदीप तळवेलकर आदी उपस्थित होते. जाहीर झालेल्या संघातील खेळाडू पुरुष संघ : विशाल फिरके (कर्णधार) विजय न्हावी, स्वप्निल महाजन, देवेश पाटील, रोहित नवले, गिरीश पाटील, भूपेंद्र भारंबे, सचिन भंगाळे, दीपेश पाटील, हर्षल परदेशी,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी प.पू. नाना महाराज तराणेकर भक्तांमध्ये चैत्र वद्य दशमी ही तिथी मार्तंड दशमी किंवा चैतन्य दशमी म्हणून सर्वांच्या हृदयात अंकीत आहे. सदगुरुंचा ब्रह्मलिन होण्याचा दिवस पण आजही चैतन्याची अनुभूती असल्यामुळे दोन वर्षांच्या आपत्ती कालानंतर हा उत्सव नुकतेच इंदौर येथे झाला. दोन वर्षापूर्वी निर्माण झालेल्या परिस्थितीत आपण कोरोनाच्या काळात आपापल्या ठिकाणी “मार्तंड महिमा पारायण”, “घोरातकष्टता स्तोत्राचा जप”, “दिगंबरा दिगंबरा” मंत्राचा जप इत्यादी संकल्पपूर्वक समग्र परिवाराने केले. याची सांगता पुणे येथे करण्याचे निश्चित झाले होते पण परिस्थितीने पुन्हा उचल खाल्ली त्यामुळे ऑनलाईन कार्यक्रम घेण्यात आला. सन 2021 ते 2022 हे नानांच्या जन्मादिनोत्सवाचे 125वे वर्ष भक्तगण जरी एकत्र येवू शकलो नाही…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या वतीने देण्यात येणारे प्रतिष्ठेचे फुलाबाई आनंदराव फडतरे स्मृती ग्रंथ पारितोषिक डॉ. अशोक कौतिक कोळी यांच्या ‘कडीबंदी’ या कथासंग्रहास जाहिर झाले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यातर्फे विविध वार्षिक ग्रंथ पारितोषिक दिले जातात. त्यापैकी संस्कृती प्रकाशन, पुणे यांचे पुरस्कृत ‘फुलाबाई आनंदराव फडतरे’ पारितोषिक डॉ. कोळी यांच्या कडीबंदी या कथासंग्रहासाठी जाहीर झाले आहे. येत्या 26 मे रोजी पुण्यातील एस.एम.जोशी सभागृहात प्रसिद्ध हिंदी लेखक अशोक वाजपेयी यांचे हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. या समारंभाचे अध्यक्षस्थान डॉ. रावसाहेब कसबे हे भूषवणार आहेत. ‘कडीबंदी’ डॉ. अशोक कौतिक कोळी यांचा पाचवा कथासंग्रह आहे. यातून त्यांनी कोरोना काळातील भयावह…

Read More

जळगाव : प्रतिनिधी “ वृक्ष लागवडीला आर्थिक व सामाजिक विकासाशी सांगड घालून लोक चळवळीचे रुप देऊन पर्यावरणाचा ऱ्हास थांबविणे काळाची काळाची नितांत गरज आहे “ असे कळकळीचे आवाहन हरीत शिक्षक पुरस्कार प्राप्त वृक्षमित्र विजय लुल्हे यांनी केले.राष्ट्रीय वृक्ष दिनानिमित्त बुद्ध जयंतीच्या पर्वात भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी व देवकाई प्रतिष्ठान जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना लुल्हे बोलत होते. वृक्षारोपण जळगाव येथे चंदु अण्णा नगर पुढील सद्गुरु बैठक सभागृह परिसरात दिनांक 16 मे रोजी करण्यात आले. अध्यक्षस्थानी अथर्व प्रकाशनाचे प्रकाशक युवराज माळी होते.पुढील मार्गदर्शनात लुल्हे यांनी सण उत्सवात वृक्षवेलींचे धार्मिक महत्व सांगून परसबागेत लागवडयुक्त औषधी वनस्पतींची…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील शिरसोली रोडवरील जैन व्हॅली येथील एसीला लागणारे तांब्याच्या पाईप चोरून नेत असतांना एकाला रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, शिरसोली रोडवरील जैन व्हॅली येथील कांदा विभागाचे इमारतीच्या मागील बाजूस लावण्यात आलेले एअर कंन्डीशनला लावण्यात आलेले तांब्याचे पाईप रविवार १५ मे रोजी दुपारी २ वाजता चोरून नेत असतांना अमोल बापू पारधी रा. लेबर कॉलनी, जळगाव याला जैन व्हॅलीतील कर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातून ६ हजार ९०० रूपये किंमतीचे साडे पाच किलो तांब्याचे पाईप हस्तगत केले आहे. पुढील कारवाईसाठी त्याला एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी सोमवार १६…

Read More

भुसावळ ः प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हनुमान चालीसा, मशिदींवरील भोंगे, मनसे-शिवसेनेच्या सभा यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे धर्मा-धर्मात तेढ निर्माण होत असल्याची देखील भूमिका मांडली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील महत्त्वाच्या मुद्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा मतप्रवाह दिसून येत आहे. यासंदर्भात भुसावळमध्ये माध्यमांशी बोलताना राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी खोचक शब्दांत टिप्पणी केली आहे. तसेच, त्यांनी नागरिकांना संयम ठेवण्याचे आवाहन देखील केले आहे. भुसावळमध्ये एका कार्यक्रमासाठी माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी उपस्थिती लावली होती.या कार्यक्रमात व्यासपीठावरून देखील यासंदर्भात टीका केल्यानंतर माध्यमांशी बोलताना खडसे यांनी सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली. “सध्या राज्याच्या राजकारणात गढूळ…

Read More

पुणे : वृत्तसंस्था यात्रा सुरु होती. यात्रेला मोठी गर्दीही झाली होती आणि या गर्दीत भरधाव टेम्पो शिरल्याने एकच गोंधळ उडाला टेम्पोचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. दरम्यान, टेम्पोने दिलेल्या धडकेने 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. धनकवडी गावात यात्रा सुरु असताना गर्दीत अचानक टेम्पो शिरल्याने यात्रेत एकच घबराट उडाली. सजावटीसाठी रस्त्यावर लावलेल्या डिजिटल फलकासह टेम्पोने दुचाकींनाही धडक दिली.या अपघातात सनी दत्ता ढावरे (16, रा. सहकारनगर) या अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी टेम्पो चालक रुपेश बळीराम मालुसरे (19, रा. कोंढवा ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी चालक रुपेश याला अटक केली आहे. तसेच टेम्पोमालक दत्ता घनवट याच्या…

Read More

धुळे/ जळगाव ः प्रतिनिधी मुंबई-आग्रा महामार्गवर धुळ्यातील मित्रनगर भागात काल रात्री झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाले असून नऊ जण जखमी झाले आहेत. मागून येणाऱ्या मालमोटारीने रिक्षाला धडक दिल्यामुळे नियंत्रण सुटून ही रिक्षा समोरून येणाऱ्या क्रूजरवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की,यामध्ये रिक्षा आणि क्रूजरचा अक्षरश: चुराडा झाला.अपघातातील क्रूजरमधील प्रवासी पारोळा तालुक्यातल्या तरडीहून पुण्याला लग्नासाठी निघाले होते अशी माहिती मिळाली आहे. नेमके काय घडले? काल रात्री उशीरा हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. प्राप्त माहितीनुसार, मालेगावहून मध्यप्रदेशच्या दिशेने कांदा भरून नेणाऱ्या एका मालमोटारीने रस्त्यावर समोर असलेल्या रिक्षाला मागून जोरात धडक दिली.यामुळे रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटले. रिक्षा समोरून विरुद्ध दिशेने…

Read More