अहमदाबाद : वृत्तसंस्था गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा हार्दिक पटेल यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही पत्र लिहून राजीनाम्याचे कारण स्पष्ट केले आहे. पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी या वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. माझ्या निर्णयाचे सहकारी स्वागत करतील : हार्दिक पटेल हार्दिक पटेल यांनी ट्विट करून म्हटले आहे की, ‘आज मी धैर्याने काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला खात्री…
Author: Saimat
जळगाव- प्रतिनिधी शहरातून जाणा-या खोटे नगर स्टॉप नजीक असलेल्या शिव फर्निचर या दुकानाला आज भल्या पहाटे पावणे तिन वाजता आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती पोलिस नियंत्रण कक्षातून महाबळ आणि गोलानी मार्केट येथील फायर स्टेशनला देण्यात आली. घटनेची माहिती समजताच अग्नीशमन दलाचे बारा बंब घटनास्थळी दाखल झाले. सकाळी पाच वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. याकामी सहायक अग्निशमन अधिकारी सुनील मोरे, हेड फायरमन, अश्वजीत घरडे, रोहिदास चौधरी, भारत बारी, वाहन चालक देविदास सुरवाडे, चालक संतोष तायडे, संजय भोईटे, वाहन प्रदीप धनगर, सरदार पाटील, भगवान पाटील, वसंत कोळी, जगदीश साळुंखे आदिंनी आगीवर नियंत्रण मिळवण्याकामी परिश्रम घेतले.
पुणे : वृत्तसंस्था मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू असताना राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेची घोषणा करण्यात आली आहे. मे महिन्याअखेर राज ठाकरेंची पुण्यात सभा होणार आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्याचे शहराध्यक्ष बदलल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल आहे. यावर तोडगा काढण्यासाठी राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. तसेच औरंगाबादच्या सभेनंतर अयोध्याची तयारी सुरु असताना भाजप खा. ब्रिजभूषण यांनी राज ठाकरे यांना माफीनामा सादर करण्याचे सांगितले होते. यावर मनसेच्या कुठल्याही प्रवक्ते यांनी कुठलीही ठोस भूमिका मांडली नाही त्यांनी यासंदर्भातील सर्व विषय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेच मांडतील अशी भूमिका घेतली होती. आता पुण्यामध्ये होणाऱ्या सभेत राज ठाकरे त्या भाजप खासदार यांचा…
मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठीच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे अपक्ष म्हणून निवडणूक लढणार आहेत. याकरिता आपल्याला सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा द्यावा यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले. मात्र अद्याप कोणत्याच राजकीय पक्षाने आपला पाठिंबा त्यांना जाहीर केलेला नाही. या निवडणुकीत भाजपच्या दोन जागा निश्चितच निवडून येणार आहेत. तर तिसऱ्या जागेसाठी पक्षाने रणनीती आखली आहे. या निवडणुकीत जिंकण्यासाठी प्रथम क्रमांकाच्या पसंतीचा कोटा हा 42 ठरविण्यात आला आहे. त्यामुळे भाजप दोन जागेवर विजय मिळवेल. तिसऱ्या जागेसाठी भाजपला 13 मते कमी पडत असल्याने भाजपाकडून रणनीती आखण्यात येत आहे. राज्यसभेसाठी पियूष गोयल, विनोद तावडे, हर्षवर्धन पाटील, धनंजय महाडिकयांच्या नावाची…
जळगाव ः प्रतिनिधी मनपाकडून कर्मचाऱ्यांचा तुटवडा लक्षात घेता आकृतीबंध मंजूर होईपर्यंत मानधनावर नियुक्ती केली जाणार आहे. त्यात संधी देताना लेखापरीक्षणात आक्षेप असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना संधी देण्यात येऊ नये अशी मागणी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केली आहे. महानगरपालिकेत सध्या अभियंत्यांसह तांत्रिक कर्मचारी व अधिकाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. सेवानिवृत्तांचे प्रमाण अधिक असल्याने अनुभवी कर्मचाऱ्यांअभावी कामावर परिणाम होत आहे. त्यामुळे येत्या महासभेत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मानधनावर घेण्याचा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आहे. असे करताना ज्या कर्मचाऱ्यांवर उड्डाण पदोन्नतीअंतर्गत आक्षेप आहेत. तसेच यापुर्वी ज्यांच्यावर कारवाई झाली असेल अशा कर्मचाऱ्यांना सेवेत संधी देऊ नये अशी मागणी नाईक यांनी केली आहे. त्यानंतही अशी नियुक्ती…
जळगाव ः प्रतिनिधी दिवसेंदिवस तापमानाचा वाढता पारा पाहता बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांचे हाल होऊ नये त्यांची तहान भागावण्यासाठी शहरातील माहेश्वरी महिला मंडळातर्फे नवीन बसस्थानक येथे थंड पाणी आणि सरबतचे वाटप करण्यात आले. मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी उपस्थित होते. कार्यक्रमास तालुका तहसीलचे पदाधिकारी अध्यक्ष चंचल तापडिया यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्षा उषा राठी, सचिव स्नेहलता लाठी, प्रसिद्धीप्रमुख सरला असावा, सहसचिव सरला पोरवालांसह सदस्यांनी सहकार्य केले.
जळगाव ः प्रतिनिधी आपापल्या कार्यक्षेत्रात सामाजिक संस्था काम करीत असताना अनेक तांत्रिक अडचणी, व्यवस्थापन, पैसा उभारणे, शासकीय रिपोर्ट वेळेवर तयार करणे असे प्रश्न भेडसावतात. अपूर्ण माहितीअभावी अशा संस्था अडचणीत येऊन वेळप्रसंगी बंद पडतात, अशा आजारी संस्थांना योग्य वेळेवर उपचार मिळण्यासाठी सुरु केलेला एनजीओ क्लिनिक हा स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी केले. केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वर्धापनदिनी क्लिनिकचा उद्घाटन सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष भरतदादा अमळकर, समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील, मुंबई येथील झिरो डव्हायझर संस्थेचे जयंत फलके व सचिव रत्नाकर पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन भानुदास येवलेकर यांनी केले. यशस्वीतेसाठी सागर येवले, रोहन सोनगडा,…
जळगाव ः प्रतिनिधी कोणत्याही समाजव्यवस्थेत व्यक्ती हा केंद्रबिंदू ठेऊन त्याचा सर्वांगीण उद्धार हाच त्या व्यवस्थेचा अंतिम उद्देश असला पाहिजे. परंतु भारतासारख्या देशांमध्ये जाती, धर्म, लिंग यावर आधारित समाजव्यवस्था व्यक्ती-व्यक्तींमध्ये विषमता व भेदभाव निर्माण करते. परंतु, बुद्ध धम्म सांगतो तृष्णा हे दुःखाचे कारण आहे. भगवान गौतम बुद्धांनी मानवतेचा विचार मनामनात रुजवला, असे प्रतिपादन साहित्यिक डॉ. मिलिंद बागुल यांनी येथे केले. अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठान व शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदयात्री अण्णासाहेब डॉ. जी. डी. बेंडाळे पुण्यतिथी व बुद्धपौर्णिमा निमित ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते. बुद्धांनी आपल्या पहिल्याच उपदेशात मानवी समाजात असलेल्या विषमतेचे वर्णन…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी हरताळा ता. मुक्ताईनगर येथील शेकडो महिलांनी दि.१६ मे २०२२ सोमवार रोजी राष्ट्रवादीला राम राम ठोकत शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी आमदार पाटील व शिवसेना महिला आघाडी पदाधिकाऱ्यांनी सर्व प्रवेश करणाऱ्या महिलांना शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करून घेतला. आमदार चंद्रकांत पाटील यांनी माजी मंत्री एकनाथ खडसेंना दिवसभरात दिलेला हा दुसरा धक्का असल्याचे बोलले जात असून तत्पूर्वी सकाळी सूळे – रिगाव च्या महिला सरपंच व अन्य ग्रा. पं सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतल्याने आगामी जिल्हा परीषद व पंचायत समिति निवडणुकीच्या पार्श्वूमीवर शिवसेनेत झालेली इंकमिंग ही जोरदार झाल्याचे सर्वत्र बोलले जात…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी नगर पंचायतीचे उत्पन्न वाढावे व स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी सोयगाव येथे 50 दुकानांचे भव्य व्यापार संकुल उभारणार असल्याची घोषणा महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. या व्यापार संकुलामध्ये शहरातील दिव्यांग तसेच महिलांसाठी काही दुकाने आरक्षित असतील असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. सोयगाव नगर पंचायतीच्या माध्यमातून शहरातील दिव्यांग लाभार्थ्यांना 5 टक्के प्रमाणे प्रतिव्यक्ती 1 हजार 214 प्रमाणे 70 लाभार्त्यांना धनादेश तसेच प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत टप्पा 1 ते 4 मधील एकूण 68 लाभार्त्यांना घरकुल अनुदान धनादेशाचे वाटप राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. यावेळी डीपीआर 3 साठी नवीन घरकुल लाभार्त्यांच्या नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला.…