जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनतर्फे पुण्यात राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा घेण्यात आली. यात शहरातील प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूलची इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कार्तिकी पाटील हिने 48 ते 50 किलो वजनी गटात तृतीय क्रमांक पटकवत कांस्यपदक मिळवले. याबद्दल विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेतर्फे कार्तिकी पाटीलचा पालक विकास पाटील यांच्या समवेत सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन प्रेमचंद ओसवाल, अध्यक्षा मंगला दुनाखे, सचिव सचिन दुनाखे, मुख्याध्यापिका श्रद्धा दुनाखे, विजया चौरे, सुषमा थोरात, मुख्याध्यापिका मनीषा पाटील, संगीता गोहील यांसह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
Author: Saimat
नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या लढाईमुळे तेल आणि गॅस उद्योगावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थितीमुळे भारतात कंपन्यांनी घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. घरगुती वापराच्या १४.२ किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरची किंमत ३ रुपये ५० पैशांनी वाढली आहे. दरवाढीमुळे दिल्लीत घरगुती वापराचा १४.२ किलो वजनाचा एलपीजी सिलेंडर १००३ रुपयांत उपलब्ध होईल. मुंबईत घरगुती वापराचा १४.२ किलो वजनाचा एलपीजी सिलेंडर १००२.५० रुपयांत उपलब्ध होईल. कोलकाता येथे घरगुती वापराचा १४.२ किलो वजनाचा एलपीजी सिलेंडर १०२९ रुपयांत उपलब्ध होईल. चेन्नईत घरगुती वापराचा १४.२ किलो वजनाचा एलपीजी सिलेंडर १०५८.५० रुपयांत उपलब्ध होईल. याआधी ७ मे २०२२ रोजी घरगुती…
जळगांव प्रतिनिधी परिवर्तन जळगाव संस्था ही उत्तम अशी नाट्यसंस्था असून त्यांनी निर्माण केलेले व मुंबईत सादर केलेले कार्यक्रम परिवर्तन कला महोत्सव ही खान्देशाची ओळख आहे असे मत ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित डॉ भालचंद्र नेमाडे यांनी मुंबईत आयोजित परिवर्तन कला महोत्सवाच्या समारोप सत्रात केले. या तीन दिवशीय कला महोत्सवाचा समारोप शंभू पाटील लिखित अमृता साहिर इमरोज नाटकाने करण्यात आला. परिवर्तन कला महोत्सव जयंत पवारांना समर्पित असल्याने एक छोटेखानी चर्चा समारोपाप्रसंगी घेण्यात आले. याप्रसंगी दिपक राजाध्यक्ष यांनी आपल्या भाषणात आजच्या काळात जयंत पवारांच्या साहित्याची व विचारांची गरज असल्याचे नोदंवत सारं अंधारून आलं असलं तरी पवारांचे लेखन समकालीन व संवेदनशील कलावंतांना प्रकाश देत राहील…
प्रतिनिधी | नाशिक मुंबई इंडियन्स विरुद्ध हैदराबाद सनरायझर्स यांच्यातील क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेणाऱ्या बुकीला अटक करण्यात आली आहे. अासाराम बापू पुलाजवळ दीपमाला बिल्डिंगमधील फ्लॅट नंबर ५ मध्ये गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने ही कारवाई केली. गुरुविंदरसिंग बलदेवसिंग (२८, रा. हिरावाडी) असे या क्रिकेट बुकीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवारी रात्री पथकाचे रवींद्र बागूल यांना एक बुकी हा फ्लॅटमध्ये अायपीएलच्या क्रिकेट सामन्यावर बुकिंग घेत असल्याचे समजले. पथकाने संबंधित इमारतीवर छापा टाकला असता संशयित क्रिकेट सामन्यावर बेटिंग खेळणाऱ्या लोकांना मोबाइलवर सट्टाभावाबाबत माहिती पुरवत त्यांच्याकडून पैसे घेऊन बेटिंग घेत असल्याचे निदर्शनास अाले. पथकाने संशयिताच्या ताब्यातून बेटिंग अायडी असलेले पाच मोबाइल,…
जळगाव ः प्रतिनिधी ‘जळगाव टी-10 क्रिकेट असोसिएशन, जळगाव’ आयोजित नरेंद्राशिष जळगाव प्रिमिअर लिग लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचा दि.18 रोजी महापौर जयश्री महाजन यांनी उद्घाटन केले. प्रथम दिवशी नोमन् क्लब चॅम्पियन्स , रेडियन्स रायडर्स , सागर भाऊ प्रोटेक्टर्स यांची सरशी तत्पूर्वी महापौर सौ.जयश्री महाजन यांनी केले. धावपट्टी पूजन, नाणेफेकीसह क्रिकेट खेळून उद्घाटन केले. याप्रसंगी नरेंद्रशिष जळगाव प्रीमियर लीग चे मुख्य प्रयोजक इंजि.राहुल सोनवणे तसेच उपमापौर कुलभूषन पाटील व सागर सोनवणे, सोबत प्रथम् पारितोषिक देणारे दाते रोहित तलरेजा व द्वितीय पारितोषिक देणारे आशफाक शेख तसेच टी 10 चे सचिव पंकज महाजन, लिंगायत समाज अध्यक्ष संदीप लिंगायत वाणी, विवेक पाटील, सतनामसिंग बावरी यांच्यासह असोसिएशनचे…
मेष : राशीच्या लोकांच्या समस्या दूर होतील आणि घराच्या देखभाली संबंधीच्या कामात लक्ष घालावे लागेल. तुमच्या जवळच्या लोकांना भेटण्याची संधी मिळेल. तुमच्या रागावर आणि उत्कटतेवर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी प्रलंबित योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे. नोकरीत कामाच्या प्रचंड ताणामुळे थकवा जाणवेल. यासोबतच तुमच्या प्रमोशनची शक्यताही वाढेल. प्रेमाने भारलेल्या नातेसंबंधांसह कुटुंबात आनंददायी सुसंवाद राहील. प्रेमाच्या नात्यात एकमेकांच्या भावनांचा आदर करणे महत्त्वाचे असते. आज ८०% नशिबाची साथ आहे. शिवलिंगाला पाणी अर्पण करा. वृषभ : राशीचे लोक पैशाच्या बाबतीत योग्य बजेट ठेवतील. तुम्ही केलेल्या कामाचे समाजात किंवा लोकांमध्ये कौतुक होईल. महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेण्याऐवजी, आपली उर्जा केवळ चालू उपक्रमांवर केंद्रित करा.…
भडगाव : प्रतिनिधी वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला असून यात तीन जण जखमी झाले आहेत. मिळालेली माहिती अशी की, भडगाव ते वडघे फाट्याच्या जवळ दि १८ रोजी रात्री अकराच्या सुमारास वाळूची उचल करण्यासाठी जात असलेले ट्रॅक्टर पलटी झाले. यामध्ये सुरेश अशोक शिंदे (वय २७, रा. टोणगाव), रवी सुरेश शिंदे (वय २५) आणि मयूर भोई (वय २१, रा. आझाद चौक, भडगाव) हे तीन युवक ट्रॅक्टरखाली दाबले गेले. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन या तिघांना रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू होत असतांनाच डॉक्टरांनी या युवकांना मृत घोषित केले. या अपघातामध्ये तर…
मुंबई : महागाईचा मुद्दा घेऊन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या भेटीला गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांवर पुणे येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी हात उगारला. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.या घटनेवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. पुन्हा कोणत्या महिलेवर पुरूषाने हात उचलला तर मी स्वत: त्याचा हात तोडून त्याच्या हातात देईन, अशा शब्दात सुळे यांनी इशारा दिला. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. अतुल भातखळकर यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. कानफाटात मारावीशी वाटली होती या वक्तव्यावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करणारे मर्दांचे महाविकास आघाडी सरकार आता हात तोडण्याची भाषा…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात आजारपणाला कंटाळून शहरातील ३५ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील खोटे नगर परिसरातील झाडाखाली विलास महाजन हा राहत होता. गेल्या अनेक दिवसांपासून तो आजारी देखील होता. या आजारपणाला कंटाळून विलास याने ज्याठिकाणी राहत होता त्याच ठिकाणावरील झाडाला रुमालाने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना त्या परिसरातील रिक्षा स्टॉपवरील रिक्षाचालकांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, वासुदेव सोनवणे, सतिष हाळनोर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा…