मराठी पत्रकार दिनानिमित्त राज्यातील दहा विद्यापीठांचे विशेष ऑनलाइन व्याख्यान साईमत जळगाव प्रतिनिधी मुद्रणकलेनंतर जर कोणती मोठी क्रांती झाली असेल, तर ती कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) तंत्रज्ञानाची आहे. पत्रकारितेत अनेक नवे प्रयोग झाले असले, तरी मानवी मेंदूला टक्कर देण्याची क्षमता असलेली कृत्रिम बुद्धीमत्ता ही अत्यंत संवेदनशील बाब असून, तिचा वापर पत्रकारांनी अधिक सजगता आणि विचारपूर्वक करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी केले. मराठी पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्रातील दहा विद्यापीठांच्या जनसंवाद व पत्रकारिता विभागांतर्फे मंगळवारी (६ जानेवारी) ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि माध्यमे’ या विषयावर विशेष ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ऑनलाईन व्याख्यानाचे हे सहावे वर्ष…
Author: Saimat
सविस्तर बातमी:राजकोट – विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत बडोद्याविरुद्ध झालेल्या सामन्यात हार्दिक पंड्याने एक अविश्वसनीय शतक साकारले. निरंजन शहा स्टेडियममध्ये झालेल्या लढतीत हार्दिकने फक्त ९२ चेंडूत १३३ धावा काढल्या, यामध्ये ८ चौकार आणि ११ षटकारांचा समावेश होता. खेळाच्या सुरुवातीस हार्दिक फक्त ६२ चेंडूत ६६ धावांवर खेळत होता. पण पुढील ३० चेंडूत त्याने ६७ धावा जमवून मैदानावर झंझावाती खेळ सादर केला. पार्थ रेखाडेच्या गोलंदाजीवर तो चार मिनिटांत ६६ वरून शतकावर पोहोचला. शतकानंतरही हार्दिकने आक्रमक खेळ सुरू ठेवला, अखेरीस यश ठाकूरने त्याला बाद केले. लिस्ट ए प्रकारातील ही हार्दिकची पहिली शतकी खेळी असून, एका बाजूने त्याचा जोरदार आक्रमक खेळ दिसला तर दुसरीकडे बडोद्याचे…
साईमत प्रतिनिधी नाताळ सुट्टीपासून ते सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत या कालावधीत, श्री साईबाबांच्या समाधीवर देश-विदेशातील सुमारे ८ लाख साईभक्तांनी दर्शन घेतले, आणि संस्थानाला २३ कोटी २९ लाख २३ हजार रुपयांची देणगी प्राप्त झाली आहे. ही माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. श्री. गाडीलकर यांनी सांगितले की, देणगीचे माध्यम खालीलप्रमाणे होते: दानपेटी: ६ कोटी २ लाख ६१ हजार रुपये देणगी काउंटर: ३ कोटी २२ लाख ४३ हजार रुपये सशुल्क पास (जनसंपर्क कार्यालय): २ कोटी ४२ लाख ६० हजार रुपये डेबिट, क्रेडिट, ऑनलाईन, चेक/डीडी व मनीऑर्डर: १० कोटी १८ लाख ८६ हजार रुपये विदेशी चलन (२६…
साईमत धुळे प्रतिनिधी प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही सुप्त कलागुण दडलेले असतात. या कलागुणांना व्यासपीठ मिळाले, तर त्यातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि व्यक्तिमत्त्व घडण्यास मदत होते. वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम व कलामहोत्सव हे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचे प्रभावी माध्यम असून, प्रत्येक शाळेत शालेयस्तरावर असे कला महोत्सव आयोजित झाले पाहिजेत, असे प्रतिपादन आमदार राम भदाणे यांनी केले. धुळे तालुक्यातील जुनवणे येथील पार्वताई इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आयोजित वार्षिक कलामहोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ईश्वर युवराज खैरनार अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी विठ्ठल घुगे, उपसरपंच रावसाहेब पाटील, पोलीस पाटील जितेंद्र वाघ, विसरणेचे सरपंच रवींद्र पाटील, वेल्हाणेचे सरपंच राजू पहेलवान,…
साईमत जळगाव प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याने इच्छुक उमेदवाराच्या कुटुंबीयांचा संताप उफाळून आला. या निर्णयाविरोधात इच्छुक उमेदवार संगीता पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी आमदार सुरेश भोळे यांना थेट घेराव घातल्याची घटना हॉटेल रॉयल पॅलेस येथे घडली. या घडामोडीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. उमेदवारी नाकारल्याने प्रचंड नाराज झालेल्या संगीता पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी आमदार सुरेश भोळे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. पक्षासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम केले, निवडणुकीसाठी तयारी केली असतानाही अचानक उमेदवारी नाकारण्यामागे नेमके कारण काय, असा जाब यावेळी विचारण्यात आला. वरिष्ठ पातळीवर आमची बाजू मांडण्यात का अपयश आले, असा सवालही कुटुंबीयांकडून उपस्थित करण्यात आला. यावेळी संगीता…
साईमत भुसावळ प्रतिनिधी काँग्रेस पक्षाचे भुसावळ मतदारसंघातील माजी आमदार निळकंठ चिंतामण फालक यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक असून त्यांच्या जाण्याने जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि कार्यकर्त्यांच्या वर्तुळात शोककळा पसरली आहे. आमदारपदासारखी जबाबदारी सांभाळूनही त्यांनी आयुष्यभर साधेपणा, प्रामाणिकपणा आणि सर्वसामान्य माणसाशी नाळ जपली, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. साध्या जीवनशैलीतून लोकप्रतिनिधीपद निळकंठ फालक हे आमदार असतानाही त्यांनी कधीही सत्ता किंवा पदाचा दिखावा केला नाही. साधी राहणी, थेट संवाद आणि सर्वसामान्य नागरिकांशी असलेली आपुलकी हीच त्यांची ओळख होती. सामान्य कार्यकर्ता असो वा गावातील शेवटचा माणूस, प्रत्येकासाठी ते सहज उपलब्ध असत. जनहितासाठी सातत्यपूर्ण संघर्ष आमदार म्हणून त्यांनी भुसावळ मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य…
साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव शहरालगतच्या एल. के. फार्म हाऊसवरील बोगस कॉल सेंटर प्रकरणात मागील तीन महिन्यांपासून कारागृहात असलेले माजी महापौर ललित कोल्हे यांना महापालिका निवडणूक लढविण्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करणे व आवश्यक निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांना जळगाव जिल्हा कारागृहात तात्पुरते स्थलांतर करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आगामी जळगाव महापालिका निवडणुकीच्या राजकारणात नवा रंग भरण्याची चिन्हे दिसत आहेत. न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेशसध्या नाशिक कारागृहात असलेल्या ललित कोल्हे यांच्यावतीने अॅड. सागर चित्रे यांनी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. निवडणूक लढविणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असल्याचा युक्तिवाद न्यायालयासमोर मांडण्यात आला. हा युक्तिवाद ग्राह्य धरत मुख्य न्यायदंडाधिकारी…
साईमत धरणगाव प्रतिनिधी (रविंद्र कंखरे) सोशल नेटवर्किंगच्या जमान्यात ऑनलाईन खरेदीच्या वाढत्या प्रमाणाबरोबरच ग्राहक फसवणुकीच्या घटनाही वाढल्या आहेत. यासोबतच ग्राहकांची जागरूकता आणि साक्षरता निर्माण करणे ही आजच्या काळाची गरज आहे, असे प्रतिपादन साहित्यिक व ग्राहक साक्षरता तज्ज्ञ डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी धरणगाव तहसील कार्यालयात ग्राहक जागृती दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी रेवना कांबळे होत्या, तर मंचावर पुरवठा अधिकारी किशोर मोरे, ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश तायडे, आणि तालुका अध्यक्ष विनायक महाजन उपस्थित होते. डॉ. सोनवणे यांनी आपल्या व्याख्यानात ग्राहक पंचायतीचे महत्त्व, ग्राहक दिनाचे उद्दिष्ट आणि ग्राहकांची जबाबदारी विविध उदाहरणांसह स्पष्ट केली. त्यांनी नागरिकांना ऑनलाईन व्यवहारात सतर्क…
साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील राजकीय घडामोडींना वेग येत असताना, भारतीय जनता पक्षात सामाजिक क्षेत्रातील सक्रिय व्यक्तिमत्त्वांचा प्रवेश सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर, सामाजिक कार्यकर्ते व सेवानिवृत्त अधिकारी भास्करराव पाटील यांनी बुधवारी (दि. २५ डिसेंबर) भाजपमध्ये जाहीर प्रवेश करून पक्षाला बळकटी दिली आहे. जी. एम. फाउंडेशन येथे आयोजित स्वागत सोहळ्यात जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजू मामा) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश समारंभ पार पडला. आमदार भोळे यांनी नवप्रवेशितांना भाजपचे गमछे देऊन अधिकृत स्वागत केले. या वेळी नवप्रवेशितांनी भाजपच्या विचारधारेशी निष्ठा राखत समाजहितासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. भास्करराव पाटील हे दीर्घकाळ सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असून, विविध उपक्रमांमधून समाजाशी थेट…
साईमत प्रतिनिधी नवीन वर्षाच्या स्वागताच्या तयारीत असलेल्या रेल्वे प्रवाशांना केंद्र सरकारने दरवाढीचा मोठा धक्का दिला आहे. रेल्वे मंत्रालयाने तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून ही दरवाढ आजपासून (२६ डिसेंबर) लागू झाली आहे. विशेष म्हणजे, ही चालू वर्षातील रेल्वे भाड्यातील दुसरी दरवाढ ठरली आहे. रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, २१५ किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या प्रवासासाठी तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. सामान्य श्रेणीच्या तिकिटांसाठी प्रति किलोमीटर एक पैसा, तर मेल व एक्सप्रेस गाड्यांमधील नॉन-एसी तसेच एसी वर्गांसाठी प्रति किलोमीटर दोन पैसे वाढ करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, प्रवाशांना परवडणारे भाडे राखत असतानाच रेल्वेच्या वाढत्या खर्चाचा समतोल राखण्यासाठी…