Author: Saimat

जळगाव ः प्रतिनिधी विधान परिषद निवडणुकीत भाजपाने पंकजा मुंडे यांना डावलल्याने मुंडे समर्थक संतप्त झाले आहेत. विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच मुंडे यांना डावलल्याचा आरोप करत निषेध करण्यात आला. वंजारी समाजाच्या कार्यकर्त्यांनी महामार्गावर टरबूज फोडून भाजप नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून पाच जागांकरिता उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. त्यात माजी मंत्री पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्याने वंजारी समाजाचे कार्यकर्ते ईश्वर पाटील, अनिल घुगे, गजानन वंजारी, रितेश लाडवंजारी, योगेश नाईक, राहुल सानप, शेखर लाडवंजारी, महेश घुगे, तेजस वाघ, विशाल घुगे, अभिजीत घुगे, गौरव वाघ, किरण नाईक, वैभव वाघ, ऋषिकेश वाघ, आकाश पाटील, मयूर पाटील,…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी महावितरणमध्ये कंत्राटी महिला कर्मचाऱ्याशी अश्लील वर्तणूकप्रकरणी महावितरणच्या मानव संसाधन विभागाच्या व्यवस्थापकासह लिपिकाला पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर महावितरणच्या कार्यकारी संचालकांनी दोघांना निलंबित केले आहे. व्यवस्थापक उद्धव रामभाऊ कडवे व निम्नस्तर लिपिक राजेंद्र निळकंठ अमोदकर अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहे. पीडीत महिलेने महावितरण कार्यालयाच्या विशाखा समितीकडे कडवे व अमोदकर याने अश्लील वर्तन केल्याची तक्रार दाखल केली होती परंतु त्याची दखल न घेतल्याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता तसेच शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी देखील महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.या तक्रारीच्या आधारे महावितरणच्या मानव संसाधन विभागाचे कार्यकारी संचालक अरविंद भादलीकर (मुंबई) यांनी दोघांच्या निलंबनाचे आदेश काढले.

Read More

मुंबई : प्रतिनिधी  येत्या २० जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपल्या दोन उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे  आणि रामराजे निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी झहीर झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देत पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे आभार मानत भाजपकडून माजी मंत्री पंकजा मुंडे  यांना उमेदवारी न दिल्यावरून खंतही व्यक्त केली. माझे नाव विधान परिषदेसाठी जाहीर केले यासाठी मी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे मी मनापासून आभार मानतो. मागील ४० वर्षे भाजपामध्ये निष्ठेने काम करत होतो. पण अनेकदा त्याठिकाणी माझ्यावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली. भाजपात असताना विधान परिषदेसाठी नाव देण्याचे आश्वासन देण्यात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी महेश नवमी हा दिवस माहेश्वरी समाजाच्या वंश उत्पत्ती दिनाचे प्रतीक म्हणून देशभरात साजरा केला जातो. या निमित्ताने माहेश्वरी समाजातर्फे बुधवारी दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सायंकाळी समाजबांधवांनी काढलेल्या शोभायात्रेने जळगावकरांचे लक्ष वेधून घेतले होते. महेश नवमीनिमित्त पहाटे 6.30 वाजता ‘बालाजी मंदिर संस्थान` येथे अभिषेक व आरती, पांजरपोळ गोशाळेत अ.भा. माहेश्वरी सभेच्या संघटन मंत्री शैला कलंत्री यांच्या हस्ते गोसेवा, अयोध्यानगर येथील महादेव मंदिरात सकाळी 9.30 वाजता आरती, सकाळी 10 वाजता वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांच्या उपस्थितीत स्व. मोतीभाऊ दहाड परिवारातर्फे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये फळ वाटपाचा कार्यक्रम, सकाळी 10.30 वाजता माहेश्वरी बोर्डिंग येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेवक…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाच्या माध्यामातून प्रसिद्ध केलेल्या प्रारूप गट-गण रचनेवर जिल्हाभरातून 74 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या हरकतींवर उद्या 10 जून रोजी सुनावणी होणार आहे. नव्या गट-गण रचनेनुसार जिल्ह्यात 77 जिल्हा परिषद गट, 154 गणांची रचना जाहीर करण्यात आली आहे. या प्रारूप रचनेवर जनतेतून हरकती मागवण्यात आल्या होत्या. 8 जूनपर्यंत एकुण 74 हरकती प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. या हरकतींवर 10 जून रोजी विभागीय आयुक्तांकडे सुनावणी घेतली जाणार आहे. दरम्यान, 6 जून रोजी 8 हरकती, 7 जून रोजी 29 तर 8 जून रोजी शेवटच्या दिवशी 37 हरकती दाखल केल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील यावल व चाळीसगाव तालुक्यात प्रत्येकी 5…

Read More

मुंबई ः प्रतिनिधी ज्येष्ठ सिने पत्रकार अली पीटर जॉन यांचे काल बुधवारी निधन झाले. यानंतर चित्रपट क्षेत्रातून अभिनेते अनुपम खेर, अभिषेक बच्चन यांच्यासह अनेक दिग्गजांनी जॉन यांना श्रद्धांजली वाहिली. अनुपम खेर यांनी ट्वीट करत अली पीटर जॉन यांच्याविषयीच्या आपल्या आठवणींना वाट मोकळी करून दिली. त्यात अनुपम खेर यांनी जॉन यांना सिने पत्रकारीतेतील ‘दिलीप कुमार` म्हटले. अनुपम खेर म्हणाले, “माझे जवळचे पत्रकार मित्र अली पीटर जॉन यांच्या निधनाची बातमी कळाल्यावर दुःख झाले. माझ्यासाठी अली पीटर1 जॉन सिने पत्रकारितेतील दिलीप कुमार होते. मी चित्रपटसृष्टीत येण्याआधीपासून त्यांच्या स्क्रीन मॅगेझीनमधील त्यांचा स्तंभ ‘अलीज नोट्स`चा चाहता होतो. ते पहिले पत्रकार होते ज्यांनी माझ्या मुंबईतील नाटकाविषयी…

Read More

मुंबई : प्रतिनिधी  उद्या होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या नाट्यमय राजकीय घडामोडी घडत असताना विधान परिषदेच्या निवडणूक  प्रक्रियेनेही वेग धरला आहे. येत्या २० जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपल्या दोन उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याचा अंतिम दिवस आहे. त्यामुळे खडसे आणि निंबाळकर हे दोघेही आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे येत्या विधानपरिषद निवडणुकीसाठी रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथराव खडसे हे उमेदवार असतील. दोन्ही उमेदवार विजयी होऊन महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहतील, असा आम्हाला विश्वास आहे,…

Read More

प्रतीनिधी : आमीन पिंजारी दिनांक ८ रोजी इयत्ता बारावीचा निकाल घोषित करण्यात आला कजगाव येथील बबनबाई जवरीलाल हिरण माध्यमिक व उच्च माध्यमिक उद्यालयाचा निकाल ९७.८२ टक्के लागला असून ४६ विद्यार्थी पैकी ४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये विद्यालयातुन प्रथम – पूजा बापू मिस्तरी(७७.३३%) द्वितीय – सविता तात्या निकुंभ (७६.६७.%) तृतीय – चैताली संजय कोळी (७६.१७%) गुण मिळून यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे चेअरमन मंगेश पाटील व्हाईस चेअरमन दिनकरराव पाटील सचिव रत्नाताई पाटील सहसचिव पंजाबराव देवकर व संचालक वृंद व मुख्याध्यापक एम. के. पवार पर्यवेक्षक जी टी पाटील यांच्या सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले…

Read More

प्रतिनिधी : आमीन पिंजारी कजगाव ता भडगाव येथील माजी ग्रा प सदस्य हाजी शे शफी मणियार यांची नात व आसिफ मणियार यांची मुलगी हीने जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स ह्या विद्यालयातून ८८ टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे दिनांक ८ रोजी इयत्ता १२ वि परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला त्यात मारिया आसिफ मणियार ने यश संपादन केले तिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे कजगाव सह परिसरातून कौतुक होत आहे.

Read More