चेन्नई : वृत्तसंस्था दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास त्याच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. मध्यंतरी प्रभासच्या लग्नाबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या. आता पुन्हा एकदा तो लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे. लग्नासाठी प्रभास तयार आहे आणि लवकरच तो लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. त्याचे चाहते देखील प्रभास आनंदाची बातमी कधी येणार याची वाट पाहत आहेत. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, प्रभासचे काका कृष्णम राजू लवकरच प्रभासच्या लग्नाची घोषणा करु शकतात. तसेच सोशल मीडियावर प्रभासच्या लग्नासंदर्भातील एक जूना व्हिडीओ व्हायरल देखील होत आहे. या व्हिडीओमध्ये प्रभासच्या लग्नाबाबत चर्चा होताना दिसत आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून चाहते देखील खूश झाले आहेत. लग्नासाठी प्रभासने मुलगी देखील पसंत…
Author: Saimat
मुंबई : प्रतिनिधी मध्यरात्रीनंतर उशीरा सुरू झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. बऱ्याच राजकीय घडामोडी आणि चर्चांनंतर शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार यांचा पराभव झाला असून भाजपाचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. त्यामुळे भाजपाचे तीन सदस्य राज्यसभेवर निवडून गेले असून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी एक सदस्य राज्यसभेवर निवडून गेले आहेत. या विजयामुळे देवेंद्र फडणवीसांची चाणक्यनीती यशस्वी ठरल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. राज्यसभेच्या 6 जागांसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत भाजपाचे पियूष गोयल (48), अनिल बोंडे (48), काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी (44), राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल (43) व शिवसेनेचे संजय राऊत (41) हे…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील सागर पार्कजवळील घरात युवकाने एका नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. या प्रकरणी त्याच्याविरुध्द रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शाहरुख खान करीम खान (वय २५ रा. दूध फेडरेशनजवळ) असे संशयिताचे नाव आहे. शाहरुख या मुलीच्या घरात गेला होता. त्याने त्या मुलीचे नाव विचारले. तिच्याजवळ जावून शरीराला स्पर्श करुन विनयभंग केला. याप्रकरणी मुलीने रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मेष राशी: चांगल्या संधी तुमच्या वाट्याला येऊ शकतात. मालमत्ता किंवा आर्थिक व्यवहाराशी संबंधित निर्णय काळजीपूर्वक घ्या. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. तुमच्या कामात आई-वडील तुम्हाला मदत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील. प्रेमीयुगुलांमध्ये काही मतभेद होऊ शकतात. तुमच्यापैकी काही भौतिक गोष्टींच्या संपादनावर खर्च करतील. कौटुंबिक जीवन अधिक आनंदी आणि आनंददायक असेल. आज ७९% नशिबाची साथ आहे. भगवान विष्णूची पूजा करा. वृषभ राशी: वृषभ राशीच्या लोकांसाठी आज सकाळची सुरुवात खूप चांगली होईल. कामाशी संबंधित गोष्टींमध्ये हळूहळू प्रगती दिसून येईल. व्यवसायाशी संबंधित कोणतीही मोठी समस्या आज सुटू शकते. कामाच्या ठिकाणी इतरांच्या आकांक्षा पुढे ढकलणे टाळा. तुमच्या ध्येयांना प्राधान्य द्या. इतरांकडून भेटवस्तू मिळविण्यासाठी ही चांगली…
मुंबई प्रतिनिधी यास्मिन शेख मतांच्या जुळवाजुळवीनंतर ‘वजाबाकी’ होणार नाही, याची दक्षता घेत, महाविकास आघाडी आणि भाजपच्या आमदारांनी शुक्रवारी राज्यसभेसाठी मतदान केले. विशेष म्हणजे रणनीतीप्रमाणे वेळेत आणि चुका टाळून मतदानाला साऱ्याच पक्षांचे प्राधान्य राहिले. आघाडीच्या दोघा मतदारांनी मतपत्रिका दाखविण्याऐवजी इतर नेत्यांच्या हातात दिल्याने भाजपने त्यावर आक्षेप घेतला. तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे दोन मतपत्रिका आल्याकडेही भाजप नेत्यांनी लक्ष वेधले. तर भाजपच्या एका मतदानावरही काँग्रेसने बोट ठेवले. आजारी असतानाही भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक या रुग्णवाहिकेतून येत मतदानाचा हक्क बजाविला. दरम्यान, या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय आणि अपक्ष २८५ आमदारांनी मतदान केले. छोट्या पक्षांनी मतदान करेपर्यंत प्रमुख पक्षांजी धाकधूक वाढवली होती. परंतु,…
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील मालखेडा येथील मुलचंद तापीराम पाटील (७०) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे तापी पुलावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. मुलचंद तापीराम पाटील या वयोवृद्ध शेतकऱ्यावर कर्ज होते, नापिकी व कमी उत्पादन यामुळे त्यांच्या वर ३ ते ४ लाखांचे कर्ज डोक्यावर होते. कर्ज कसे फिटेल ? या विवंचनेत असल्याने ते दोन दिवसांपासून गायब होते.त्यांचा शोध घेतला असता आज दि.९रोजी त्यांचे शव पाथरडे शिवारात तापी नदी क्षेत्रात पाण्यावर तरंगताना आढळून आले यावेळी जागेवर पंचनामा करून दहन करण्यात आले.यावेळी माजी सरपंच प्रशांत पाटील, लिलाचंद पाटील, ज्ञानेश्वर पाटील आदीं उपस्थित होते.
जळगाव : प्रतिनिधी बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या गुन्ह्यातील सात महिन्यांपासून फरार संशयित महिलेस पोलिसांनी कांचननगर, जैनाबाद परिसरातून अटक केली आहे. सपना सागर पाटील असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून तिच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बाललैंगिक अत्याचार प्रकरणी संशयित महिला सपना पाटील हिच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात १० डिसेंबर २०२१ रोजी गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित फरार होती. पथकातील उपनिरीक्षक दीपक जगदाडे, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, दत्तात्रय बडगुजर, विकास सातदिवे, गणेश शीरसाळे, योगेश बारी, छगन तायडे अशांच्या पथकाने बातमीची खात्रीकरुन अलगदपणे धडक देत जैनाबादेतून संशयित सपना पाटील हिला ताब्यात घेतले आहे. न्यायालयात हजर…
प्रतिनिधी । धरणगाव बेलदार मोहल्ला भागात किरकोळ वादातून एकाला मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आवेश खान नासिर खान (वय २० रा. बेलदार मोहल्ला, धरणगाव) यांनी फिर्याद दिली अाहे. ४ जून रोजी ३.३० वाजता शकील खान जमाल खान यांच्या घराजवळ त्याचे घराचे अतिक्रमण काढणे चालू होते. त्याठिकाणी यातील आवेश खान उभे असल्याचा शकील खान जमाल खान, रहेमखान जमाल खान, अकीलाबी आसिफ खान, जाफर खान जमाल खान या संशयितांना राग आला. त्यांनी आवेश खान व त्यांचे आई- वडील यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी व लाठ्या काठ्यांनी मारहाण केली.
प्रतिनिधी । धरणगाव वाहन घेण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणावे, या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी पती, सासू-सासरे, जेठ आणि दीर अशा पाच जणांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपना अनिल मोहिते (रा. माणिक नगर मारोती मंदिराजवळ सिल्लोड, जि. औरंगाबाद, ह.मु. बोरगाव खु. ता. धरणगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दि. २० ऑगस्ट २०२१ ते दि. २१ मार्च २०२२ रोजी दरम्यान विवाहितेने वडिलांकडून गाडी घेण्यासाठी दोन लाख रुपये आणावे, यासाठी संशयित पती- अनिल मनोहर मोहिते, सासरे- मनोहर आसाराम मोहिते, सासू-मिराबाई मनोहर मोहिते, जेठाणी-अरुणा अशोक मोहिते, जेठ-अशोक मनोहर मोहिते, दिर-सुनिल मनोहर मोहिते यांनी छळ केला. विवाहितेस तू…