Author: Saimat

यावल प्रतिनिधी  शुक्रवार दि.10जुन2022रोजी यावल तालुक्यातील सातोद येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची दि.24एप्रिल रोजी संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत हर्षलभाऊ पाटील यांच्या नेतुत्वाखाली बिनविरोध विजय झाल्यामुळे सर्व निवडून आलेल्या उमेदवारांचे युवा सामाजिक कार्यकर्ते व विकासो चे सभासद डॉ.कुंदनदादा फेगडे यांनी पुष्यगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विकास सोसायटीच्या चेअरमनपदी सतीश पाटील तर व्हाईस चेअरमनपदी केशव तळेले यांची बिनविरोध निवड होऊन सलग 3वेळा या पॅनलचे वर्चस्व त्यांनी कायम ठेवले.या प्रसंगी सुधाकर फेगडे,भाजपा जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, डॉ.कुंदन फेगडे,विकासो चेअरमन सतीश पाटील,व्हाईस चेअरमन केशव तळेले,सदस्य अशोक पाटील,सतीश फेगडे,रुपचंद तळेले रवींद्र महाजन,केदार धांडे, त्र्यंबक तळेले,सौ.लीलाबाई तळेले,सौ.युगंधराबाई पाटील, सचिव अंबादास मराठे,खत विभाग…

Read More

यावल प्रतिनिधी गुरुवार दि.9रोजी रावेर विधानसभा मतदार संघात रावेर तालुक्यात मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे बऱ्याच गावांना नुकसानीचा मोठा फटका बसला,या नुकसानीची पाहणी करून नुकसानग्रस्तांना रावेर मतदार संघातील यावल येथील समाजसेवक तथा भावी लोकप्रतिनिधी डॉ.कुंदन फेगडे व रावेर येथील समाजसेवक, उद्योगपती तथा श्रीराम फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीराम पाटील यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. सावखेडा ता.रावेर येथे ग्रामपंचायत जवळ प्रल्हाद बाबुराव पाटील व समाधान पाटील यांच्या घरावर सुमारे दीडशे ते दोनशे वर्ष पूर्वाचा जुना मोठा वटवृक्ष कोसळून घराचे नुकसान झाले.तसेच शेती मशागती साठी लागणारे ट्रॅक्टर सुद्धा या वृक्षा खाली दाबले जाऊन मोठे आर्थिक नुकसान झाले.अशा नैसर्गिक आपत्ती व संकटाच्या काळात त्यांना दिलासा दिला व…

Read More

बोदवड, प्रतिनिधी – बोदवड येथील न्यायालयात शनिवारी फिरत्या लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी जलद न्यायासाठीच लोकअदालतीचा गरजुंनी लाभ घ्यावा असे अवाहन न्या.सरवरी यांनी केले. बोदवड येथील न्यायालयात फिरत्या लोक अदालतीचे तसेच मोफत कायदेविषयक सल्ला शिबीर घेण्यात आले. न्यायधीश क्यू.ए.एन.सरवरी अध्यक्षस्थानी होते. फिरत्या लोक अदालतीत एकुण १६ प्रकरणी तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. १६ फौजदारी प्रकरणांत तडजोड झाली. व्यासपीठावर बोदवड तालुका वकील संघाचे अध्यक्ष व पंच म्हणुन ॲड.अर्जुन पाटील, ॲड.धनराज प्रजापति उपस्थित होते. सदर कार्यक्रमास मोठया प्रमाणावर पक्षकार, व्यापारी वर्ग उपस्थित होते. फिरत्या न्यायालयामाफर्त पक्षकाराच्या केसेसचा ताबडतोबनिपटरा झाल्यामुळे पक्षकारानी समाधान व्यक्त केले तसेच सदर कार्यक्रमास यशस्वितेसाठी ॲड. के.एस.इंगळे, ॲड. ‍व्हि.के…

Read More

बोदवड प्रतिनिधी आज दिनांक 11 जून रोजी महाराष्ट्रात घेण्यात आलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत मा. विरोधीपक्ष नेते देवेंद्र; फडणवीस यांच्या चाणक्य नितीने भारतीय जनता पार्टी ने ज्यांच्यावर राज्यसभेच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली होती असे भाजपा चे ज्येष्ठ नेते गिरीषभाऊ महाजन, आशीषजी शेलार, व प्रसादजी लाड़ यांनी केलेल्या योग्य नियोजन व रणनीतीमुळे राज्यसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीला जोरदार धक्का देत पुरेशे संख्याबळ नसतांना महाविकास आघाडीत फुट पाडून तीन जागेवर भारतीय जनता पार्टीचे पियुषजी गोयल, डॉ.अनिल बोंडे व धनंजय महाडिक या उमेदवारांचा विजय झाला. म्हणून भारतीय जनता पार्टी,बोदवड़ तर्फे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात फटाके फोडून व पेढे वाटप करून जल्लोष करण्यात…

Read More

लोणार(शेख गुलाब) नुपूर शर्मा, दिल्ली (माजी प्रवक्ता भाजप ) ह्यांनी टाईम्स नाव, या चैनलवर “न्यूज हावर डिबेट कार्यक्रमात” इस्लाम, प्रेषित मोहम्मद पैगंबर व त्याच्या तत्त्वांवर टिप्पणी करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावले व प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल अपशब्द वापरले. ह्या टिप्पण्यांमुळे देशात जातीय तणाव निर्माण होऊ शकतो असे तक्रारींमध्ये नमूद करण्यात आले आहे. नवीन कुमार जिंदल, (भाजपचे माजी मीडिया प्रमुख, दिल्ली सर्कल) यांनी १ जून २०२२ रोजी भारतातील मुस्लिम समुदायांना लक्ष्य करून प्रेषित मुहम्मद यांच्या विरोधात त्याच मुद्द्यावर टिप्पणी केली होती. नॅशनल टेलिव्हिजन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून भारतातील मुस्लीम समुदायांना लक्षकरून अशा निंदनीय टिप्पण्या करून धार्मिक समुदायांमध्ये शत्रुत्व, द्वेष आणि…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कंत्राटी पद्धतीने 189 कर्मचारी कार्यरत असून गेल्या दोन महिन्यापासून वेतन रखडल्याने शुक्रवारी कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर ठिय्या आंदोलन केले. विद्यापीठात कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये शिपाई व क्लार्क यांचा समावेश असून सुमारे 189 कर्मचारी कार्यरत आहे. दोन महिन्यापासून वेतन न झाल्याने कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी कर्मचाऱ्यांनी सकाळी 10 वाजता प्रशासकिय इमारती समोर ठिय्या आंदोलन केले. तसेच कुलगुरू प्रा. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांची भेट घेत आपल्या समस्या मांडल्या. यावेळी येत्या दोन दिवसात वेतन देण्यात येईल असे आश्वासन कुलगुरूंनी दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले व कामावर रुजू झाले.

Read More

जळगाव ः प्रतिनिधी जिल्ह्यातील वाळूगटांच्या लिलावाची मुदत 9 जून रोजी संपुष्टात आलेली आहे. त्यामुळे सर्व वाळू गटांतून वाळू उत्खनन व वाहतूक करण्यास बंदी आलेली आहे. त्यामुळे आता रस्त्यावर धावणारे सर्व वाळूचे ट्रॅक्टर्स नदीपात्रातून चोरी करुन अवैधरित्या वाहतूक करणारेच असतील. त्यासाठी महसूल, पोलिस व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयांची संयुक्त पथकांकडून सक्रीय कारवाई करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत. जिल्ह्यात वडदे (ता. भडगाव), परधाडे (ता. पाचोरा), कोळंबा (ता. चोपडा), थोरगव्हाण (ता. यावल), रुंधाटी व हिंगोणेसीम (ता. अमळनेर) या सहा वाळूगटांचा लिलाव जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेला होता. या वाळू गटांच्या लिलावाची मुदत 9 जून रोजी संपुष्टात आलेली आहे. लिलावाची मुदत संपुष्टात आल्याने…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी शहरातील कॅरीबॅग विक्रेते,व्यावसायिक, उत्पादक यांना महाराष्ट्र शासनाच्या बऱ्याचशा अधिनियमाची माहिती नसल्याकारणाने महानगरपालिकेकडून होणाऱ्या प्लास्टिक निर्मूलनाबाबतच्या कारवाईस बऱ्याचशा व्यावसायिकांकडून प्लास्टिक निर्मूलनाच्या कारवाईस विरोध होत असतो. त्यामुळे प्लास्टिकच्या कोणकोणत्या वस्तुंचे उत्पादनांवर निर्बंध आहे याचे विक्रेत्यांना अधिनियम ज्ञात नसल्याने दुकानदार व मनपा प्रशासन, कर्मचारी यांचे वाद होऊ नये यासाठी प्लास्टिक विक्री करणारे व्यावसायिक विक्रेत्यांनी 9 जून रोजी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची त्यांचे कार्यालयात भेट घेऊन प्लास्टिक अधिनियमांतर्गत निर्बंधाची माहिती व कायद्याची माहिती होणेसाठी सर्व प्लास्टिक विक्रेते,व्यापारी वर्गाची काल रोजी मनपा सभागृहात दुपारी बैठक बोलावणेसंदर्भात मागणी करण्यात आली होती. त्यानुसार सदर बैठकीचे मनपा सभागृहात आयोजन करण्यात आले. या बैठकीमध्ये आयुक्त…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी राज्यात व महापालिकेत एकाच पक्षाची सत्ता, त्यात निधी उपलब्ध असतानाही विकासाबाबतची अपेक्षा फोल ठरली आहेे. प्रशासकीय मान्यता मिळालेली 47 कोटींची कामे एक वर्ष उलटूनही पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. त्यामुळे मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ मिळावी यासाठी पालिका प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. मुदत संपायला दोन महिने उलटल्यानंतर प्रशासनाला आता जाग आल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरात विकासकामांचा मोठा अनुशेष निर्माण झाला आहे. रस्ते सुस्थितीत नसल्याची स्थिती आहे. पावसाळा सुरू होणार असल्याने येणारे चार महिने कसे राहतील या विचाराने नागरीक हैराण झाले आहेत. सन 2018 नंतर पहिल्या टर्ममध्ये अडीच वर्षात जी परिस्थिती होती. त्यापेक्षा वेगळी परिस्थिती सत्तांतर होऊनही…

Read More