Author: Saimat

मुंबई प्रतिनिधी राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात विधान परिषदेच्या आज, सोमवारी होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा चुरशीची लढत होत आहे. महाविकास आघाडीपुढे सहाही जागा जिंकण्याचे आव्हान असताना, भाजपाने पुन्हा आघाडीला तडाखा देऊन सरकार स्थिर नाही, हा संदेश देण्याची योजना आखली आहे. या निवडणुकीत ‘अकरावा’ म्हणजे पराभूत होणारा उमेदवार कोण असेल याचीच उत्सुकता आहे. सकाळी नऊ वाजता मतदानास सुरुवात झाली आहे. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. विधानसभेतील एक जागा रिक्त आहे तर अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार मिळण्याची शक्यता मावळली आहे. विजयासाठी पहिल्या पसंतीच्या २५ ते २६ मतांची आवश्यकता असेल. गुप्त पद्धतीने…

Read More

पंढरीची वारी वारकऱ्यांसाठी भक्तीचा, श्रद्धेचा आणि चैतन्याचा सोहळा असतो. पंढरीची वारी पायीच करण्याचा प्रघात एके काळी होता व आजही अनेक वारकरी तो पाळतात. वाहनांची सोय झाल्यामुळे बरेचसे लोक वाहनानेही जातात. एरव्ही ठिकठिकाणी विखुरलेले वारकरी पंढरीच्या वाटेवर एकमेकांना भेटू शकतात. जे जाऊ शकत नाही त्याची भावना संत नामदेवांनी ‘पंढरीची वारी जयाचिये कुळी । त्याची पायधुळी लागो मज ॥1्‌॥’ अशा शब्दात वर्णिली आहे. असा हा वारीचा सोहळा अनुभवण्यासाठी राज्यातून आणि राज्याबाहेरून भाविक येतात. विठूनामाचा गजर करीत एकरूप होतात. तहान-भूक विसरून पंढरपूरकडे प्रस्थान करतात. त्यांना वारीचा आनंद लुटता यावा आणि उत्साहाने पंढरीच्या दर्शनासाठी ते मार्गस्थ व्हावे यासाठी प्रशासनाने पूर्वतयारी केली आहे. पुणे जिल्ह्यात…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्र.6 जवळ भरधाव कंटेनरने दुचाकीस्वारास चिरडल्याची घटना 3 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असून या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वर खोटेनगरच्या पुढे असलेले हॉटेल मराठा मटन जवळ भरधाव कंटेनरने दुचाकीस्वारास जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार MH.19.DQ.8749  जागीच ठार झाल्याची घटना दि.20 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली आहे. घटनास्थळी तालुका पोलिस स्थानकाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेत अपघातग्रस्तांना जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केल्याची प्राथमिक माहिती आहे.

Read More

सामाजिक विशेष अर्थ सहाय योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना व राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय योजना राबविल्या जातात. दिव्यांग, वयोवृद्ध, अनाथबालके, दुर्धर आजारी व्यक्ती, एकल महिला इत्यादी हे या योजनांचे लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात दरमहा ठराविक अर्थसहाय वितरीत करण्यात येते. राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय एकरकमी अर्थसहाय या योजनेच्या लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाते. दिव्यांग, वयोवृद्ध, दुर्धर, आजारी व्यक्ती व इतर लाभार्थ्यांना बँकेत जावून त्यांचे अर्थसहाय आवश्‍यकतेनुसार काढावे लागते. दरवेळी या लाभार्थ्यांना बँकेत जाणे शक्य होईलच असे नाही.…

Read More

आषाढी एकादशीच्या वारीत संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) पालखी सोहळ्यातील मानाचे स्थान असलेल्या छत्रपती घराण्याकडून जरी पताका देण्याची परंपरा अखंडित ठेवण्याचा निर्णय कोल्हापूरचे छत्रपती घराणे आणि देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थान यांनी घेतला.  रविवारी या मानाच्या  जरी पताका पूजन करून मानकरी प्रा. महादेव तळेकर (पंढरपूर) यांच्या सुपूर्द  करण्यात आल्यात. स्वराज्यावर आलेले औरंगजेबरूपी महाभयंकर संकट सलग २६ वर्षे महाराष्ट्राच्या भूमीवर होते. त्याच्यासह निजामशाह, आदिलशाह, इंग्रज, पोर्तुगीज, डच, सिद्धी व अंतर्गत कलह, आदी संकटांचा सामना देत असतानासुद्धा छत्रपतींनी वारकरी संप्रदायाची परंपरा अखंडित व निर्भयपणे सुरू ठेवली. पंढरीच्या वारीमध्ये कधीच खंड पडू दिला नाही. त्याचे प्रतीक म्हणजे या जरी पताका होय.…

Read More

सांगलीमधील मिरज येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिरजेपासून १२ किमी अंतरावर असणाऱ्या म्हैसाळमधील अंबिकानगरमध्ये ही घटना घडली आहे. दोन सख्ख्या भावांनी कुटुंबासह विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मिरजेमधील म्हैसाळ येथे रविवारी रात्री एकाच कुटुंबातील नऊ जणांनी विष पिऊन जीवन संपवलं. माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे या दोन भावांनी आपल्या कुटुंबासहित आत्महत्या केली. मृतांमध्ये आई, पत्नी आणि मुलांचाही समावेश आहे. सोमवारी सकाळी मृतदेह आढळल्यानंतर घटना उघडकीस आली. माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे दोघे वेगवेगळ्या घऱात राहत होते.…

Read More

चोपडा – प्रतिनिधी  जळगांव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी लि. जळगाव म्हणजेच ग.स. च्या चोपडा शाखेच्या शाखाधिकारी पदावर जगन्नाथ तुळशीराम बाविस्कर (गोरगावले बु.) यांची नियुक्ती करण्यात आली. सहकार नेते व संस्थेचे माजी अध्यक्ष स्व.बी.बी.पाटील यांनी सन १९८९ मध्ये बाविस्कर यांची भडगाव शाखेवर लिपीक म्हणुन नियुक्ती केलेली होती. त्यानंतर त्यांनी अमळनेर, यावल व एरंडोल येथेही चांगल्या प्रकारे सेवा बजाविली. सध्या ते शाखा चोपडा नं.५ येथे उपशाखाधिकारी पदावर कार्यरत होते. मुख्य कार्यालयाचे आदेशान्वये सेवा जेष्ठता व शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना शाखा चोपडा नं.५ येथेच शाखाधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आलेली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष उदय पाटील, समस्त संचालक मंडळ, व्यवस्थापक वाल्मिकराव पाटील,…

Read More

मुंबई : प्रतिनिधी  स्वप्न  ही प्रत्येकालाच पडतात. त्या स्वप्नांचे अर्थ लावण्याचे प्रकार आपण सारे जण करतो. स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टींचा प्रत्यक्ष आयुष्याशी संबंध जोडणारे अनेक सिनेमे, गोष्टी आहेत. प्रत्यक्ष आयुष्यात स्वप्नातील गोष्टी खऱ्या होण्याचे प्रकार कमीच घडतात. मुंबईतील लालबागच्या व्यापाऱ्याचं स्वप्न मात्र खरं ठरलं आहे. या व्यापाऱ्याच्या स्वप्नात त्याचे दिवंगत वडील आले होते. त्यांनी त्याला कोट्यवधींच्या खजिन्याची माहिती दिली. वडिलांनी स्वप्नात दिलेल्या माहितीनुसार त्या मुलाने खजिन्याचा शोध घेतला आणि तब्बल 4 कोटींच्या चोरीचा उलगडा झाला आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार लालबागाचे व्यापारी दीपक जैन यांच्या कुटुंबीयांनी गिरगावच्या विठ्ठलवाडी परिसरात एक रूम भाड्यानं घेतली होती. जैन यांच्या वडिलांच्या निधनानंतर ही रूम बंद…

Read More

जामनेर : इंदिराबाई ललवाणी कनिष्ठ महाविद्यालय तर्फे इयत्ता 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले, प्रमुख मार्गदर्शक सिद्धार्थ पाटील यांनी विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षा बद्दल माहिती दिली तसेच आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी अभ्यास , चिकाटी ध्येय हे महत्त्वाचे असून केवळ दहावी परीक्षा उत्तीर्ण किती मार्कस्‌ मिळवले हे महत्त्वाचे नसून ती गुणवत्ता सिद्ध करणे हेच महत्त्वाचे आहे असे उदगार या प्रसंगी केले. कार्यक्रम प्रसंगी इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुल संस्थेचे सचिव किशोर महाजन यांनी- महाविद्यालयीन शिक्षण कुठून व कसे घ्यावे व ते किती महत्त्वाचे या बद्दल माहिती व पालकांचे शंकेचे निरसन केले. संचालक फकिरा धनगर, संचालक तथा माजी मुख्याध्यापक के.व्ही.महाजन, मुख्याध्यापक…

Read More