Author: Saimat

मुंबई : प्रतिनिधी  शिवसेनेचे  नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे शिवसनेमध्ये हालचालींना सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे एकीकडे एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यातच दुसरीकडे मोठी कारवाई करत शिवसेनेने शिंदे यांना गटनेतेपदावरुन हटविले आहे. शिंदेंच्याजागी मुंबईतील शिवसेना आमदाराला संधी देण्यात आली आहे.अजय चौधरी  यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड मागे घेण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. त्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत यापुढे आघाडी नको. त्याऐवजी शिवसेनेने भाजपासोबत युती करून सत्ता स्थापन करावी. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद द्यावं आणि एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद द्यावं, असा थेट प्रस्ताव शिंदे यांनी मांडला आहे. शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमूळे राज्यात राजकीय…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. ठाकरे सरकार बनविताना देखील अशी बंडाळी झाली होती. पण नंतर काय झालं, हे संपर्ण देशाने पाहिलं. आताही चर्चेतून सगळं काही ठीक होईल, असा विश्वास आहे. पण सध्या शिवसेनेत जे काही चाललंय तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर आम्ही आमची भूमिका मांडू असं शरद पवार म्हणाले. त्यावर सरकार कोसळेल का? आणि सरकार पडल्यावर राष्ट्रवादीची भूमिका काय असेल, आपण भाजपसोबत जाणार का?, असा थेट सवाल पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला. त्यावर ‘जरा तरी सेन्सिबल प्रश्न विचारा. आम्ही विरोधी पक्षात बसू’, असं थेट…

Read More

औरंगाबाद : वृत्तसंस्था विधान परिषदेच्या निवडणूक निकालानंतर शिवसेनेचे मोठे नेते एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थक आमदारांनी केलेल्या बंडात मराठवाड्यातील सहा आमदारांची नावे समोर येत आहेत. यात शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील दोन मंत्र्यांसकट, चार कट्टर आमदारांचा समावेश असल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आज सकाळी एकनाथ शिंदे यांचे बंड व त्यातील एकेक आमदारांची नावे समोर येऊ लागताच वातावरण तापू लागले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मंत्रिमंडळातील संदीपान भुमरे व अब्दुल सत्तार यांच्यासह औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय सिरसाट, वैजापूरचे रमेश बोरणारे, परंड्याचे तानाजी सावंत, उमरग्याचे ज्ञानराज चौगुले हे सहा आमदार नाॅटरिचेबल असून ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत सूरतमध्ये आहेत. मराठवाड्यात शिवसेनेचे…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत भाजपनं यश मिळवल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारपुढं राजकीय संकट निर्माण आहे. शिवसेनेचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जाणारे एकनाथ शिंदे हे सध्या नॉट रिचेबल असून बंडाच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. https://twitter.com/mieknathshinde/status/1539171911044718593?s=20&t=qufqwqPuUPFyCvCfTZSdGw एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे २२ आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं असून “आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही”, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

Read More

मुंबई : प्रतिनिधी  काल विधानपरिषद निवडणुकीचा निकाल (Legislative Council election results) लागल्यानंतर शिवसेनेत मोठा भूकंप आला आहे. अचानक शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेते आणि मंत्री एकनाथ शिंदेंनीच बंड पुकारल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे आता सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देणारे अपक्ष आमदारही बिथरल्याचे दिसत आहेत. शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी काही अपक्ष आमदारांनी आपला पाठिंबा दिला होता. यामध्ये मिरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन(Geeta Jain) यांचा देखील सहभाग आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी बंडाळीची भूमिका घेतल्यानंतर जैन यांनी फेसबुक पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता अनेक पत्रकारांनी तसेच कार्यकर्त्यांनी संपर्क साधला असून भूमिकेबद्दल विचारणा केली. मी सगळ्यांना सांगू इच्छिते…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी काल रात्री विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर सर्वत्र विजयोत्सव साजरा होत असतांनाच अचानक शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेते असलेले मंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याने त्यांनी शिवसेनेचे 35 आमदारांना एकत्र घेवून सुरत गाठल्यानंतर आज सकाळी ही बाब उघडकीस आल्यानंतर राजकीय भूकंप झाला आहे. आज सकाळपासून राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. यामध्ये ठाण्याचे पालकमंत्री असलेले व शिवसेनेचे नेते ना.एकनाथ शिंदे हे गुजरातचे मंत्री सी.आर.पाटील यांनी त्यांना चांगलाच पाहुणचार केल्यानंतर आज दुपारी एकनाथ शिंदे यांनी संजय राठोड यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना प्रस्ताव पाठविला आहे. त्या प्रस्तावात म्हटले आहे की, भाजपासोबत युती करा व देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री तर एकनाथ…

Read More

मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे २९ आमदारांसह सुरतमधील एका हॉटेमध्ये आहे. शिंदे हे सध्या कोणाच्याही संपर्कात नाही. त्यामुळे राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. तसेच शिंदे कोणाच्याही संपर्कात नसल्याने ते बंडाच्या तयारी असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे शिवसनेच्या गोटात खळबळ निर्माण झाली. यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भात केलेल्या ट्विटमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. “शाब्बास एकनाथजी, ….नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता”, असे ट्वीट नारायण राणे यांनी केल्याने उलट -सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान विधानपरिषद निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीला धक्का दिला…

Read More

मुंबई: प्रतिनिधी  शिवसेनेचे ज्येष्ठ आणि वजनदार नेते एकनाथ शिंदे  हे नाराज असल्याची माहिती माहिती मिळत आहे. काल विधान परिषदेच्या मतदानानंतर एकनाथ शिंदे हे विधानभवनातून थेट गुजरातमधील सुरतला गेले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पक्षावर नाराज असलेले एकनाथ शिंदे भाजपात (BJP) प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय. मोठी बाब म्हणजे एकनाथ शिंदे एकटे गेले नसून त्यांच्यासोबत त्यांचे निकटवर्तीय असलेले तब्बल १७ आमदार आणि पदाधिकारीही सुरतमधील एका हॉटेलात थांबले असल्याची सुत्रांची माहिती आहे. याबाबत महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  यांनी भाजपवर निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत. नाना पटोले म्हणाले की, भाजपने पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असा खेळ सुरू केला आहे. मात्र…

Read More

सूरतच्या हॉटेलमध्ये असणाऱ्या शिवसेनेच्या नाराज आमदारांना आता अहमदाबादला पाठवण्यात येणार आहे. अहमदाबादमध्ये ते अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान तत्पूर्वी केंद्रीय मंत्री अमित शहा हे भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेण्यासाठी नड्डा यांच्या घरी पोहचल्याचे समजते. दुसरीकडे वर्षावर शिवसेना आमदार आणि खासदारांची बैठक थोड्याच वेळात होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः या ठिकाणी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारवर संकट अधिक गडद झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे 25 आमदारांसह गुजरातला गेले आहेत. यामध्ये शिवसेनेच्या 15 आमदारांचा समावेश आहे, तर 10 अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांचा समावेश आहे. शिवसेनेत…

Read More