जळगाव ः प्रतिनिधी शहरातील जुन्या अपार्टमेन्टमधील स्वतंत्र नळ जोडणी मिळण्यासाठी जळगाव शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. याबाबत मनपा आयुक्त विद्या गायकवाड यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, शहरातील 25 वर्षापासून जुने शेकडो अपार्टमेन्ट आहेत. त्यामधील प्रत्येक फ्लॅटला स्वतंत्र नळजोडणी आहे. त्याद्वारे प्रत्येक फ्लॅट धारकांना स्वतंत्र्यरित्या शुध्द पाण्याचा पुरवठा होता. नुकतेच अमृत योजनेची नविन जलवाहिनी संपूर्ण शहरात टाकण्यात आली आहे. त्या नविन जलवाहीनीवरुन जुन्या नळांना स्वतंत्र्यरित्या जोडणी करून द्यावी अशी मागणीचे अनेक अर्ज महापालिका प्रशासनाकडे आलेले आहेत. दरम्यान, महानगरपालिका प्रशासनातर्फे जुन्या अपार्टमेंन्टला पूर्वीप्रमाणे नळ कनेक्शन न देता एका अपार्टमेंन्टला एकच कनेक्शन देण्याचे तोंडी सांगितले जात आहे.…
Author: Saimat
सोयगाव तालुका प्रतिनिधी शिवज्योती शिक्षण प्रसारक मंडळाचे, कै.बाबुरावजी काळे स्कूल, सोयगांव येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे शिबीर घेण्यात आले यावेळी शाळेत योगप्रशिक्षण घेतलेला प्रथमेश काटोले या विद्यार्थ्याने शाळेतील विद्यार्थ्यांना योगा चे प्रकार व योगासने कसा करावा याचे प्रात्यक्षिके करून दाखवली यावेळी शाळेचे शिक्षक श्री ज्ञानेश्वर एलीस यांनी विद्यार्थ्यांना योग ही काळाची गरज असून तो सर्व नागरिकांनी प्राणायाम करणे अत्यंत गरजेचे आहे,सध्याच्या काळात योग मनुष्याचे ताणतणाव कमी करतो त्यामुळे प्रत्येक नागरिकाने.सकाळी अथवा संध्याकाळी जसा वेळ मिळेल तेव्हा किमान दहा ते विस मिनिटे स्वतः साठी द्यावा.जेणेकरून जिवन हे सुखकर होईल.असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना त्यांनी केले. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असतानाच आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना हा संघर्ष करणारा पक्ष आहे. आमच्याकडे राखेतून पुन्हा उभारी घेण्याची क्षमता आहे. सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमुळे जास्तीत जास्त काय होईल, आमची सत्ता जाईल ना? सत्ताही परत मिळवता येईल. पण पक्षाची प्रतिष्ठा ही आमच्यासाठी सर्वोच्च असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांचे बंड शमेल, असा आशावाद व्यक्त केला. एकनाथ शिंदे हे सध्या आमच्यापासून लांब आहेत, ते जवळ आल्यावर आम्ही त्यांच्याशी…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पाळधी येथील कॉलेज तरुणाचा आज सकाळी पहूर येथील खर्चाने फाट्याजवळ उभ्या असलेल्या कंटेनर ला जोरदार धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज आठ वाजता घडली आहे. सविस्तर माहिती अशी की पहुर पाळधी येथील रहिवाशी समाधान देव सिंग परदेशी वय 23 हा कॉलेज तरुण सकाळी सोयगाव येथे परीक्षा असल्यामुळे तो पेपर देण्यासाठी मोटरसायकल क्रमांकm h 19 b s 0235 या मोटरसायकली ने जात असताना जळगाव संभाजीनगर महामार्गावर पहूर जवळ खर्चाने फाटा दरम्यान पंचर झालेल्या उभी असलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने त्याच्या हातापायाला डोक्याला जबरदस्त मार लागल्यामुळे समाधान परदेशी याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी आठ…
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रासह मुंबईत कोरोनाने पुन्हा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी ४० पेक्षा जास्त आमदारांसोबत बंड पुकारला आहे. त्यामुळे राज्यातील ठाकरे सरकार धोक्यात आले आहे. त्यातच एकनाथ शिंदे हे दुपारी राज्यपालांची भेट घेणार होते.मात्र आता ते शक्य नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सध्या गुवाहटीत असलेले एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसोबत मुंबईत येणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण शिंदे यांनी विधानसभेत…
मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी ४० पेक्षा जास्त आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारला आहे. हा ठाकरे सरकारसाठी मोठा धक्का मनला जातो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मध्यस्थीचे प्रयत्न होऊनदेखील शिंदेंची नाराजी कायम आहे. त्यातच शिवसेनेकडून शिंदेंवर मोठी कारवाई करण्यात आली. त्यांचं गटनेते पद रद्द करण्यात आले. सध्या शिंदे हे आमदारांसोबत आसाममधील गुवाहटीत आहेत. त्याठिकाणाहून दुपारपर्यंत ते मुंबईत येतील आणि मुंबईत आल्यानंतर राज्यपालांची भेट घेतील. या भेटीनंतरच महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला शिवसेना आमदारांनी दिलेला पाठिंबा काढून घेतला जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच ते भाजपसोबत सत्ता स्थापनेचा दावाही करतील, अशा चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु आहे. दुपारच्या घडामोडीनंतरच ठाकरे सरकार…
मेष राशी: मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात काही मोठे सुख येणार आहे. तुम्ही स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता. व्यापार्यांसाठी दिवस शुभ आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामगिरीने अधिकारी प्रभावित होतील. कठोर परिश्रमाने अवघड कामेही सहज पूर्ण होतील. व्यवसायात चांगला फायदा होईल. आज आरोग्य चांगले राहील. इतरांशी सौहार्दपूर्ण संबंध राहतील. कामानिमित्त लांबचा प्रवास संभवतो. आज ८५% नशिबाची साथ आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. वृषभ राशी: आज तुम्ही तुमचे विचार आणि वागणूक संतुलित ठेवा. दागिने व कपडे खरेदीची शक्यता आहे. व्यवसायात नवीन प्रयोग करून पुढे जाण्याची संधी मिळेल. तुमच्यासमोर एखादे आव्हान येऊ शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. मनाला आनंद होईल. प्रेमसंबंधांमध्ये संवेदनशीलता…
यावल प्रतिनिधी दि.21जुन 2022मंगळवार रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी यावल तालुका वतीने यावल शहरातील खंडेराव महाराज मंदिरा सकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान पाणी फिल्टर हाऊस,बोरावल रोडजवळ,यावल येथे भव्य योग शिबिराचे आयोजन केले होते शिबिरास नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. संयुक्त राष्ट संघाच्या बैठकीत भारताचे लोक प्रिय पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करावा असा प्रस्ताव मांडून 11 डिसेंबर2014ला हा प्रस्ताव मान्य करून दरवर्षी21 जुन हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात यावा असे आव्हान श्री नरेंद्र मोदीजी यांनी जनतेला केले होते. आज 8 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी यावल तालुक्याच्या वतीने भव्य योग…
बोदवड प्रतिनिधी बोदवड येथील जामनेर भुसावळ रोड वरील महात्मा फुले चौकात. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा लवकरात लवकर बसवण्याची मागणी संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी बोदवड तालुका यांच्यावतीने मुख्याधिकारी यांना करण्यात आली. मुख्याधिकारी व नगराध्यक्ष आनंद भाऊ पाटील यांनी निवेदन कर्ते यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू अशी ग्वाही निवेदन करतांना दिले. निवेदन देतांना संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष दीपक एकनाथ खराटे, शहराध्यक्ष पवन नंदू पाटील, आकाश माळी ,आनंद माळी, वैभव माळी, सागर तेली, गोपाल साळुंखे, गणेश भाऊ सोनोने उपस्थित होते.
मुंबई : वृत्तसंस्था विधानपरिषद निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ खडसे यांनी बंड पुकारला आहे. त्यांच्यासोबत अनेक आमदार सुरतमधील एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर एकनाथ शिंदे भाजपमध्ये जाणार असून राज्यातील ठाकरे सरकार कोसळणार असा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी ट्वीट करत भाजपाला टोला लगावला आहे. https://twitter.com/deepalisayed/status/1539101499971842049?s=20&t=P26MPP_bZ4VavWI8_5_D1w माननीय एकनाथ शिंदेसाहेब भाजपात जाणार हे म्हणणाऱ्यांनी भाजपची तेवढी लायकी आहे का? तेही तपासावे उगाच भाजपच्या IT CELL च्या लिंबु टिंबुनी सोशल मिडीयावर तर्क-वितर्क लावण्याचा प्रयत्न करू नये. शिवसेनेचा वाघ भाजपला झेपणार नाही, असा टोला दिपाली सय्यद यांनी…