साईमत /न्यूज नेटवर्क / मुंबई गुजरात टायटन्सची आशिष नेहरा साथ सोडणार असल्याच्या व युवराजसिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा आहेत. आयपीएल चॅम्पियन गुजरात टायटन्स संघाचे २०२५ हे चौथे वर्ष असेल. गुजरात टायटन्सने आयपीएलच्या पर्दापणातच चॅम्पियन होण्याचा मान पटकावला. नंतर अवघ्या दोन वर्षातच कर्णधार हार्दिक पंड्याने संघ सोडला त्यानंतर जबाबदारी शुभमन गिलवर सोपवण्यात आली. आता पुढील हंगामात संघाला अजून धक्क्याला सामोरे जावे लागणार आहे. आशीष नेहरा गुजरात टायटन्स संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत ते आता संघ सोडणार असल्याच्या बातम्या आहेत. त्यांच्यासोबत विक्रम सोळंकीही संघ सोडण्याच्या तयारीत आहे. आशिष नेहरा आणि विक्रम सोलंकी पदार्पणापासून संघासोबत आहेत. अशा स्थितीत नेहराने संघ सोडल्यास गुजरातसाठी तो…
Author: Saimat
साईमत /न्यूज नेटवर्क / जळगाव महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज गुरूवार दि. २५ जुलै रोजी सकाळी १० ते १२ या कालावधीत वेबीनारच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक व संस्था प्रतिनिधी यांच्याशी शासन निर्णय आणि विविध शिष्यवृत्ती योजना या विषयी संवाद साधणार आहेत तरी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नीत सर्व महाविद्यालयांनी या संवादाचे थेट प्रक्षेपण करण्याची व्यवस्था करावी असे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे. ज्या विद्यार्थिंनींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थिंनींना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्कात १०० टक्के सवलत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाबद्दल तसेच…
साईमत /न्यूज नेटवर्क / जळगाव भारतीय स्टेट बँकेच्या वतीने सीएसआर योजनेअंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहासाठी पाच सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिग मशिन आणि डिस्पोजल मशिन भेट देण्यात आले. बँकेचे महाव्यवस्थापन अनिरूध्दकुमार चौधरी यांनी कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांची बुधवार दि. २४ जुलै रोजी भेट घेवून संवाद साधला त्यावेळी हे मशिन भेट देण्यात आलेत. भारतीय स्टेट बँकेचे महाव्यवस्थापक अनिरूध्दकुमार चौधरी हे जळगाव दौऱ्यावर आले असता त्यांनी कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांची भेट घेतली. बँकेच्या सीएसआर उपक्रमांतर्गत मुलींच्या वसतिगृहासाठी पाच सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिग मशिन विद्यापीठाला भेट देण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, वित्त व लेखाधिकारी सीए रवींद्र पाटील, उपवित्त…
साईमत /न्यूज नेटवर्क / जळगाव शहिद सैनिकांच्या बलिदानाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी राज्यात दि. 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात आपल्या जिल्ह्यात दि. 26 जुलै रोजी सकाळी 9 वाजता माजी सैनिक बहुउद्देशिय सभागृहात कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येईल. कार्यक्रमात कारगिल युद्धात शहित झालेले अधिकारी, जवान यांच्या अवलंबितांना 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधुनत्यांचा सत्कार करण्यात येईल. तसेच जवान फाऊंडेशन जळगाव व रेड प्लस ब्लड बँक तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जिल्ह्यातील रक्तदात्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहुन…
साईमत न्यूज नेटवर्क जळगाव भविष्यात निर्माण होणारे गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येकाच्या मनात महात्मा गांधीजींचे विचार रुजविणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यानंतर विज्ञान, इनोव्हेशन, कृषी क्षेत्रात भारताने प्रगती केली, मात्र गांधीजींच्या विचारातून भारताचे भवितव्य घडविण्याचे मूल्यवर्धित काम आणखी खूप मोठ्या स्वरूपात करायचे आहे. स्वच्छता अभियान, वाहतूक नियमांचे पालन, सूत्रबद्धतेसह काटेकोर व्यवस्थापनाद्वारे कल्पनाशक्तीतून नवीन पिढी हे शिक्षणाच्या माध्यमातून करत आहे, त्याची रूजवात गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या गांधी तीर्थ स्वच्छ शाळा प्रतियोगितेतून झाली आहे खरं तर ही प्रतियोगिता शाळा शाळा राबवून त्याची चळवळ व्हावी, असे अध्यक्षीय भाषणात अणूशास्त्रज्ञ तथा गांधी रिसर्च फाऊंडेशनचे चेअरमन डॉ. अनिल काकोडकर यांनी प्रतिपादन केले. गांधी तीर्थच्या कस्तुरबा सभागृहात ‘गांधी तीर्थ स्वच्छ…
साईमत न्यूज नेटवर्क जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जळगाव जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा रविवार दि.२१ जुलै रोजी, सकाळी १० वाजता येथील शिरसोली रोडवरील श्रीकृष्ण लॉन मध्ये आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी ) चे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील, जळगाव जिल्ह्याचे पक्षनिरीक्षक प्रसन्नजीत पाटील यांची प्रमुख उपस्थितीत राहणार आहे. मेळाव्यासाठी जिल्ह्याचे पदाधिकारी, आजी, माजी खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, लोकसभा व विधानसभा क्षेत्रप्रमुख, सहकार क्षेत्रातील मान्यवर, जिल्ह्याचे प्रदेश व महानगरचे पदाधिकारी, तालुका व शहराध्यक्ष, विविध फ्रंटल व सेलचे जिल्हाध्यक्ष, महिला संघटनेचे पदाधिकारी, युवक व युवती संघटनेचे पदाधिकारी , कार्यकर्ते यांना आमंत्रीत करण्यात आले आहे. मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी…
साईमत न्यूज नेटवर्क जळगाव कोल्हापूर येथे झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात येऊन हल्लेखोरांवर युएपीए अंतर्गत कारवाई करा, निष्क्रिय व कर्तव्यात कसूर करणारे प्रशासकीय अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करा, हल्ल्यामध्ये धार्मिक स्थळ व लोकांची घराचे नुकसान झाले आहे त्यांची नुकसान भरपाई द्या, जे या हल्ल्यात जखमी झाले त्यांना सरकारने प्रत्येकी ५ लाख रुपये द्यावे, मुस्लिम समाजावर होत असलेल्या हल्ल्यासाठी हल्ले थांबवण्यासाठी मुस्लिम समाजासाठी संरक्षण कायदे विशेष अधिवेशन बोलवून पारित करण्यात यावे व या संपूर्ण घटनेची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत चौकशी करण्यात यावी अशा मागण्या एमआय पक्षातर्फे झालेल्या धरणे आंदोलना मार्फत करण्यात आल्या. आंदोलन संपल्यावर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन मागण्याचे…
साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव विद्यापीठातील नियोजित बहिणाबाई चौधरी पुतळ्या शेजारी संग्रहालय उभारण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. महाराष्ट्र शासन व जळगाव जिल्हा नियोजन विकास समिती यांच्या निधीतून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात उभारण्यात आलेल्या सौर उर्जा प्रकल्पाचे उद्घाटन तसेच बहिणाबाई चौधरी यांच्या पुतळा उभारणीचे भूमिपूजन पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सोमवार दि. १५ जुलै रोजी झाले, यावेळी ते बोलत होते. कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी अध्यक्षस्थानी होते. ना. गुलाबराव पाटील आपल्या भाषणात…
साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव सुब्रतो मुखर्जी फुटबॉल चॅम्पियनशिप जिल्हास्तरीय स्पर्धा नुकत्याच झाल्या. यात एकूण २७ शाळांचे संघ सहभागी झालेले होते. यामध्ये वेगवेगळ्या ग्रुपच्या सामन्यांमधून खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघाने आपले स्थान अतिशय मेहनतीने निश्चित केले. ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघाने क्वॉटर फायनलमध्ये सेंट टेरेसा स्कूलला २-१ हरवले आणि सेमी फायनलमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत फायनलमध्ये प्रवेश केला; परंतु पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांसोबत त्यांना केवळ २-१ ने दुसऱ्या स्थानावर रहावे लागले. सर्व खेळाडूंना शाळेच्या क्रीडा शिक्षक योगेश महाजन आणि राजेंद्र सोनवणे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या विशेष उल्लेखनीय कामगिरीमुळे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार…
साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव दुसऱ्याचे दुःख हे आपले दुःख या भावनेने कार्य करणाऱ्यांची संवेदना जागृत असते तेव्हाच सेवा घडते, असे रोटरी क्लब ऑफ बॉम्बे ईस्टचे माजी अध्यक्ष व निर्माण ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. अजित मराठे यांनी प्रतिपादन केले. गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये आयोजित रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलच्या पदग्रहण सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. सोहळ्यात नूतन अध्यक्ष दिनेश थोरात, मानद सचिव समर्थसिंग पाटील यांनी पदभार स्वीकारला. यावेळी व्यासपीठावर सहप्रांतपाल जितेंद्र ढाके, मावळते अध्यक्ष कल्पेश शाह यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ अजित मराठे यांनी मार्गदर्शन करताना सामाजिक कार्यासाठी पैशापेक्षा वेळ देणे जास्त महत्त्वाचे असून ते मोठे योगदान…