साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव येथील कै. भालचंद्र शंकर जहागिरदार प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ डॉक्टर म्हणून गुरुपौर्णिमेनिमित्त आरोग्यदीप किडनी फाउंडेशनच्या संस्थापक व आयएमए जळगावचे उपाध्यक्ष डॉ. शशिकांत गाजरे यांचा सुप्रसिद्ध किडनीविकार तज्ञ डॉ. सुधीर कुलकर्णी (संभाजीनगर) यांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. १९९४ पासून दरवर्षी जहागिरदार प्रतिष्ठानतर्फे गुरु पौर्णिमेनिमित्त व्याख्यानमाला व ज्येष्ठ डॉक्टरांचा सत्कार करण्यात येतो.त्यात आजपर्यंत ८० वक्ते व ७० डॉक्टरांचा सत्कार केल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. जयंत जहागिरदार यांनी यावेळी सांगितले. व्यासपीठावर रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेनन, चेअरमन विनोद बियाणी, रोटरी जळगाव वेस्टचे अध्यक्ष विनीत जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. सत्काराला उत्तर देताना डॉ.गाजरे यांनी जहागिरदार…
Author: Saimat
साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव ‘प्रत्येकाला कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी भविष्याचा अचूक अंदाज बांधावा लागतो. त्यादृष्टीने वर्तमानात कृती करावी लागते. कुठं थांबलं पाहिजे, वळण केव्हा घेतले पाहिजे हे डोळसपणे बघावे लागते. बुध्दिबळ हा खेळ सुद्धा आपल्याला सकारात्मक जीवन जगण्याची कला शिकवितो. आत्मचिंतन करुन भविष्यातील लढाईची रणनिती आखण्यासाठी मदत करतो. सृजनशील विचारांना चालना बुध्दिबळ खेळातून मिळते. असे प्रतिपादन माजी आ. मधुभाभी जैन यांनी केले. एच2ई पॉवर सिस्टीम्स, पुणे आणि जैन इरिगेशन सिस्टीमचे प्रायोजकत्व लाभलेल्या महाराष्ट्र राज्य खुला गटाच्या बुध्दिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन जळगाव येथील खान्देश सेंट्रल येथे दि. २५ पासून २८ जुलै २०२४ दरम्यान होत आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी…
साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी दि. २५ जुलै रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, शहरातील अक्सा नगर परिसरात शेख रऊफ शेख अब्दुल्ला बेलदार (वय ६९ ) हे आपल्या परिवारासह रहिवासाला आहे. ते ठेकेदारी करून आपला उदरनिर्वाह करीत होते. शेख रऊफ हे महाबळकडून दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीडी २७५१) ने जात होते. गजबजलेल्या आकाशवाणी चौकात आल्यावर त्यांना पाळधीकडून भुसावळकडे जाणारा ट्रक क्रमांक (आरजे ११ जीबी ७६४२) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने…
व्हॉट नाऊ संस्थेच्या हेल्पलाईनचे उद्घाटन; सायबर सुरक्षा अधिक भक्कम करण्यावर भर साईमत/ न्यूज नेटवर्क/ मुंबई सध्या समाजात डिजीटल साधनांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. मात्र, ऑनलाईन व्यवहारांच्या माहिती अभावी अनेकांची फसवणूक होण्याच्या घटनाही घडत आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील सायबर सुरक्षा अधिक भक्कम करून सायबर गुन्हेमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ‘व्हॉट नाऊ’ ही संस्था सायबर जनजागृतीबाबत काम करीत आहे. अशा उपक्रमांना शासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहील, असे प्रतिपादन राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात महाराष्ट्र युवा सायबर सुरक्षा उपक्रम तसेच ‘व्हॉट नाऊ’ संस्थेच्या 9019115115 या हेल्पलाईनचे उद्घाटन मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांच्या हस्ते करण्यात…
साईमत/ न्यूज नेटवर्क/ फैजपूर शासनातर्फे रॅपीड फ़ायर फ़ायटिंग अँड एमर्जन्सी बाईक व प्रोविझमिटी सुटचा पुरवठा दिनांक 25 रोजी दुपारी १ वा. जिल्हा नियोजन भवन समोर, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव मान्यवरांच्या उपस्थित देण्यात आली. सदर रॅपिड फायटिंग बाईक चा उपयोग शहरात आग लागल्यानंतर गल्लीबोळा मध्ये चार चाकी वाहन जात नसल्यास या बाईकमध्ये सर्व आग विझवण्याचे साहित्य आहे. ती पालिकेला सुपूर्त करण्यात आली, पालिकेचे कर्मचारी आग विझवण्यासाठी या बाईकचा उपयोग करणार आहे. ज्या ठिकाणी चार चाकी जात असेल त्या ठिकाणी या गाडीचा उपयोग लवकर चार चाकी पोहोचत नसल्यास या बाईक्स सगळ्यात लवकर पोहोचून आज आग विझवण्यासाठी सोयीची असल्यामुळे शासनाकडून सदरची बाईक देण्यात आलेली…
साईमत /न्यूज नेटवर्क / जळगाव रेमंड लिमिटेड जळगाव येथील २४ कर्मचाऱ्यांना २४ फेब्रुवारी २०२३ रोजी हेतूपुरस्सर, द्वेषभावनेतून, संगनमताने जाणीवपूर्वक मनमानी आरोप करून बडतर्फ करण्यात आले. जिल्ह्यातील एका बड्या नेत्याचे पंटर या कर्मचाऱ्यांच्या जागी नेमले जावे व कामगार संघटनांवर आपला दबाव या पंटरांच्या माध्यमातून गाजवता यावा, यासाठी ही बेकायदा बडतर्फी आकाराला आल्याच्ी कामगार वर्तुळात चर्चा आहे. ही बडतर्फी निषेधार्ह असून या कर्मचारी वर्गाचा पालन पोषण, रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे १८ महिन्यापासून २४ कर्मचाऱ्यांचे परिवार रस्त्यावर आलेले आहेत त्यांची परिस्थिती खालावलेली आहे त्यामुळे अनेक राजकीय नेत्याना, मोठ्या अधिकाऱ्यांना, कंपनी व्यवस्थापनाला, कामगार संघटनेच्या अध्यक्षांना भेटून सुद्धा या कर्मचारी वर्गाला कंपनीने रुजू केलेले नाही…
साईमत /न्यूज नेटवर्क / जळगाव केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आक्रमक भूमिका घेत अमित शाह , देवेंद्र फडणवीस याच्या विरोधात निषेद आंदोलन सुरु केलेले आहे, या अनुषंगाने जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटा तर्फे बुधवार २३ जुलै रोजी आकाशवाणी चौकातील पक्ष कार्यालयाबाहेर केंद्रीय गृहमंत्री अमित शहां, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला जोडे मारून , निषेधाच्या घोषणा देऊन तीव्र आंदोलन करण्यात आले. भाजप सरकारने २०१७ साली शरद पवारांना भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आता त्याच सरकारचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे…
साईमत /न्यूज नेटवर्क / जळगाव मूळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त) मध्ये महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत मंत्रिमंडळाची स्थापना झाली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागाचे संचालक आणि करिअर कट्टाचे विभागीय समन्वयक प्रा.डॉ.जे.डी.लेकुरवाळे यांनी मुख्यमंत्री प्रतिक वरयानी यांच्यासह अन्य मंत्र्यांना शपथ दिली. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवला जातो. या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना स्पर्धा परीक्षा, उद्योजकता या विषयाचे सविस्तर मार्गदर्शन मिळावे, यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यांच्या हितासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्रिमंडळ नेमणूक करण्यात आली. त्यामध्ये मुख्यमंत्री, नियोजनमंत्री, कायदा व शिस्त…
साईमत /न्यूज नेटवर्क / जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील जीवरसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेश जांभुळकर यांच्या हस्तलिखित छपाई असलेल्या “बायोकेमिस्ट्री रॅपिड रिव्हिजन” पुस्तकाचे नुकतेच अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. डॉक्टरांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी लिहिलेले आणि हस्तलिखित पद्धतीचे, छपाई केलेले “बायोकेमिस्ट्री रॅपिड रिव्हिजन” महाराष्ट्रातील हे पहिलेच पुस्तक आहे. या पुस्तकाची तिसरी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे. दिल्ली येथील प्रसिद्ध जेपी ब्रदर्स मेडिकल पब्लिशर्स यांच्या पन्नास वर्षातील कारकीर्दीतील ही पहिलीच हस्तलिखित छपाई असलेले पुस्तक आहे. जीवरसायनशास्त्र विषयाशी संबंधित व एमबीबीएसच्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सुटसुटीत आणि सोप्या भाषेत समजावे अशा विविध व्याख्यांसहित मार्गदर्शन या पुस्तकांमध्ये करण्यात आले आहे. आतापर्यंत…
साईमत /न्यूज नेटवर्क / जळगाव मंदिर उभे करणाऱ्या प्रमाणे या मुलाचे जीवन रुपी मंदिर घडविण्याचे काम कित्येक वर्षापासून सुधर्मा संस्था करीत असून या कार्यामुळे अज्ञानाचा काळोख निश्चित दूर होत असल्याचे प्रतिपादन डी डी बच्छाव यांनी केले. ते सुधर्मातर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करतांना भाऊचे उद्याने येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. सुधर्मा ज्ञानसभा सामाजिक संस्थेने परिसरातील वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आपली शक्ती केंद्रित केली आहे. सुधार्माच्या वतीने सावखेडा बुद्रुक, खेडी बुद्रुक,तांबापुरा, मेहरून, समतानगर परिसरातील गरीब कुटुंबातील ६५ विद्यार्थ्यांना रजिस्टर, पेन,पेन्सिल, रबर, शॉपनर, फाईल, चित्रकलेची वही, क्रेयॉन्स कलर आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डी डी बच्छाव, रामानंद पोलीस…