Author: Saimat

साईमत/ न्यूजनेटवर्क / जळगाव महाराष्ट्र विज्ञान आरोग्य विद्यापिठ नाशिक येथे नुकतीच हेल्थ सायन्सेस एज्युकेशन टेक्नॉलॉजी या विषयावर कार्यशाळा झाली यात गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राध्यापकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. २४ जुलै ते २६ जुलै २०२४ दरम्यान ही कार्यशाळा ऑफलाइन आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यशाळेचा उद्देश अध्यापन पद्धती सुधारण्याचा आणि आरोग्य विज्ञानाच्या अभ्यासक्रमात प्रगत शैक्षणिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्याचा होता. प्राध्यापकांनी विविध सहभागात्मक सत्रांमध्ये भाग घेतला, ज्यातून त्यांना आधुनिक अध्यापन पद्धतींबद्दल मौल्यवान माहिती मिळाली. या कार्यक्रमाने क्षेत्रातील सहकारी आणि तज्ज्ञांशी संवाद साधण्याचे उत्कृष्ट व्यासपीठ प्रदान केले. त्यांच्या सहभागामुळे सतत व्यावसायिक विकास आणि आरोग्य विज्ञानातील…

Read More

साईमत/ न्यूजनेटवर्क / जळगाव एस. एस. मणियार विधी महाविद्यालयात विधी व्याख्यानमाला अंतर्गत विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानमालेसाठी प्रमुख वक्ते म्हणून जयपूर येथील मणिपाल विद्यापीठातील विधी विभाग प्रमुख डॉ. विजयालक्ष्मी शर्मा यांनी मार्गदर्शन केले. यात स्त्री – पुरुष समानता विषयी विचारमंथन झाले. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी, धुळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचे डॉ. साजिदा शेख, डॉ. विजेता सिंग आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष, खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी व्यवस्थापन परिषद सदस्य आणि शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे यांनी उपस्थित होते. या वेळी डॉ. डी. आर. क्षीरसागर, डॉ. रेखा पाहूजा, प्रा. गणपत धुमाळे, डॉ. योगेश महाजन, डॉ. अंजली बोंदर,…

Read More

साईमत/ न्यूजनेटवर्क / जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात महामार्गावरील वाहतुक कोंडी, वारंवार होणारे अपघात यावर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तसेच रस्त्या सुरक्षा समितीच्या बैठकीत या मुद्दावर चर्चा झालेली आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी २६जुलै रोजी विशेष बैठक घेतली. त्यानंतर रस्ता दुरुस्ती संदर्भात प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग,वाहतुक नियमन संदर्भात जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक, रस्त्यातील अतिक्रमण संदर्भात जळगाव महानगरपालिका आयुक्त यांना पत्र लिहून यावर तात्काळ कार्यवाही करण्यासाठी सांगितले आहे. प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग याच्या पत्रात ‘ आकाशवाणी चौक, अजिंठा चौक आणि इच्छादेवी चौक येथे वाहतूक सिग्नल उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली आहे. धुळ्याकडून आकाशवाणी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रंबलरच्या पट्ट्या आणि रिफ्लेक्टरही…

Read More

साईमत/ न्यूजनेटवर्क / जळगाव शहरासह गावा – गावांमध्ये विक्री आणि विपणनाशी संबंधित लोकांची बैठक नुकतीच ईदगाह मैदानाजवळील मस्जिद अरकमच्या सभागृहात पार पडली. बैठकीत सेल्स युनियनची स्थापना होऊन युनियनच्या अध्यक्षपदी मुनाफ शेख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. बैठकीत विक्री आणि विपणनाशी संबंधित सुमारे ६५ जण सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे उद्देश व ध्येय यावर बख्तियार शेख यांनी सविस्तर प्रकाश टाकला. यानंतर सर्व उपस्थितांनी थोडक्यात आपली मते मांडली आणि निवडणूक प्रक्रियेत भाग घेतला. एकमुखी एकमताने युनियनची स्थापना करण्यात आली. सेल्स यूनियन ची कार्यकारणी अध्यक्ष मुनाफ शेख, उपाध्यक्ष मुजाहिद खान, सचिव याकुब खान, खजीनदार आबिद शेख, उपसचिव जावेद शेख, मीडिया प्रभारी बख्तियार शेख, सदस्य…

Read More

साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव पोलीस काका त्या बंदूका दाखवा ना… वॉकी-टॉकीवाल्या फोनचा काय उपयोग… अशा शेकडो प्रश्नांना उत्तरे देत पोलीस काकांनी चिमुकल्यांना पोलीस स्टेशनची अनोखी सफर घडविली. पोलिसांविषयी मनामध्ये असलेली भिती आणि त्यांच्या कामाविषयीची उत्सुकता असलेल्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कमी केली. येथे मुलांनी बंदूक जवळून पाहण्यासोबतच पोलिसांसह महिला अधिका-यांशीही मनमोकळ्या गप्पा मारल्या. प्राथमिक विभागातील विध्यार्थ्यांसाठी कारगिल दिनानिमित्त मुख्याध्यापिका तेजल ओझा यांच्या मार्गदर्शनाखाली ही भेट आयोजित करण्यात आली होती. यावेळी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी, राजेंद्र उगले, प्रदीप पाटील, इश्वर लोखंडे, गणेश वंजारी,…

Read More

साईमत / न्यूज नेटवर्क / धुळे धुळे जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचा कोनशीला अनावरण व भूमिपूजन समारंभ शनिवार, 27 जुलै, 2024 रोजी सायंकाळी 5.30 वाजता जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचे प्रांगण, महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर, धुळे येथे संपन्न होणार आहे. नवीन इमारतीचे भूमिपूजन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. रविंद्र घुगे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. सारंग कोतवाल, न्या. नितीन सूर्यंवशी, न्या. संजय मेहरे, न्या. शैलेश ब्रह्मे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच धुळेच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती माधुरी आनंद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार…

Read More

साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथीतर्फे आयोजित गुरुपौर्णिमेनिमित्त नि:शुल्क चिकित्सा शिबिरास उत्तम प्रतिसाद लाभला. या शिबिराचे आयोजन प. पू. भक्तराज महाराज समाधी ट्रस्ट, कांदळी (ता. जुन्नर) येथे करण्यात आले होते. योग आणि निसर्गोपचाराचा प्रचार प्रसार होऊन जास्तीत जास्त गरजूंना या चिकित्सा पद्धतीचा लाभ घेता यावा, या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये सुरुवातीला योग निसर्गोपचार तज्ज्ञ प्रा. सोनल महाजन यांनी निसर्गोपचार पद्धती विषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रा. अनंत महाजन यांनी पंचमहाभूत चिकित्सा पद्धती विषयी माहिती दिली. प्रा.सोनल महाजन यांनी तपासणी करुन शिबिरार्थींना…

Read More

साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात कला मंडळाचे उद्घाटन कवी, गीतकार प्रा.रत्नाकर कोळी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी मू. जे. महाविद्यालयाचे प्रा.डॉ.भूपेंद्र केसूर होते. उद्घाटनप्रसंगी गीतकार प्रा.रत्नाकर कोळी यांनी स्वतः लिहिलेली आणि संगीतबद्ध केलेली विविध गीतं गाऊन कार्यक्रमात रंगत आणली. त्यांच्या मराठी आणि अहिराणी या खान्देशची ओळख असलेल्या अस्सल बोली भाषेतील ठसकेबाज गीतांनी सभागृह दणाणले. व्यासपीठावर स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. आर.बी.ठाकरे, विज्ञान शाखा समन्वयक प्रा.स्वाती बऱ्हाटे, कला व वाणिज्य शाखा समन्वयक प्रा.उमेश पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक कला मंडळाचे अध्यक्ष प्रा. दीपक चौधरी, सूत्रसंचालन प्रा. योगेश…

Read More

साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव भारतीय मजदूर संघाच्या ७०व्या वर्षांत पदार्पणानिमीत्ताने जळगाव जिल्ह्यात विविध उद्योगात असंख्य कार्यक्रमांनी वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी कामगार मेळावा, घरेलू कामगारांना नोंदणी कार्ड वाटप, रक्तदान शिबिर-१०० श्रमिक रक्तदाते रक्तदान, स्वर्णिम-७० या उपक्रमाने ७० वृक्षरोपण,फलक व प्रतिमा पूजन,BMS-70 नावाचा केक कापुन व पेढे भरवून स्नेह भेट आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कामगार मेळाव्यामधे महिला भगिनी यांनी संघटनेचे ‘’मानवता के लिये उषा की,किरण जगाने वाले हम” गीत सामुहीकरित्या सादर केले. बांधकाम कामगार, घरेलू कामगार यांना शासनाच्या योजनांची माहिती देण्यात आली तसेच कामगारांना येणाऱ्या अडचणी संदर्भात चर्चा करण्यात आली. प्रसंगी भा.म.संघ महाराष्ट्र प्रदेश सचिव वंदना कोलारकर…

Read More

साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव विवेकानंद प्रतिष्ठान संचलित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल पूर्व प्राथमिक विभागात “रेड कलर डे” साजरा करण्यात आला. शिक्षक व विद्यार्थी लाल रंगाच्या वेशात येऊन, विद्यार्थ्यांना लाल रंगाची ओळख करून देऊन. यावेळी टेबलावर सुंदर व आकर्षक लाल रंगाच्या वस्तू मांडण्यात आल्या व शिक्षकांनी सर्व वस्तूंचा परिचय करून दिला. त्याबद्दल माहिती सांगण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रमुख कमल सपकाळे होत्या. कार्यक्रमास मुख्याध्यापक प्रवीण सोनावणे, ज्येष्ठ शिक्षिका स्मिता राव उपस्थित होते.

Read More